अ‍ॅपल / सफरचंदाचे चिप्स

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
18 Mar 2013 - 11:04 pm

साहित्यः

सफरचंद
दालचिनी पावडर
प्रमाण असे नाहीये, आवडीनुसार घ्यावे.

.

पाकृ:

ओव्हन ११० डिग्री सें वर प्री-हीट करून घेणे.
सफरचंदाच्या शक्य तितक्या पातळ चकत्या करून घेणे, बीया काढून टाकणे. (चकत्या नसेल जमत तर फोडी कापून त्याचे पातळ काप करणे)
दालचिनीपूड सर्व चकत्यांवर नीट चोळून घ्यावी.
बेकिंग ट्रे वर बेकिंग पेपर लावून घेणे किंवा हलके ग्रीज करुन घेणे.
ट्रेवर चकत्या लावून ११० डिग्री सें वर ३० मिनिटे बेक करावे.
अधून्-मधून लक्ष द्यावे.
३० मिनिटानंतर चकत्या उलटवून पुन्हा ३० मिनिटे दुसरी बाजू बेक होऊ द्यावी.
बेक झाल्यावर , ट्रे बाहेर काढून ५ मिनिटे गार होऊ द्यावे.
चिप्स पूर्ण गार झाले की कुरकुरीत होतील .

.

हवाबंद डब्यात भरुन ठेवावे. (अर्थातच उरले तर ;) )

दालचिनी भुरभुरलेले चिप्स

.


नोटः

दालचिनी व सफरचंद हे काँबिनेशन भन्नाट लागतं
दालचिनी आवडत नसल्यास नुसते सफरचंदाचे चिप्स पण करु शकता.
आवडत असल्यास वरुन थोडे लाल तिखट भुरभुरावे,गोड्-तिखट छान चव येते.
सफरचंद जराशी करकरीत घ्यावीत, एकदम पिठूळ नको.
तळणे नसल्यामुळे पौष्टिक ही आहेत.

लाल तिखट भुरभुरलेले चिप्स

.

प्रतिक्रिया

रश्मि दाते's picture

18 Mar 2013 - 11:17 pm | रश्मि दाते

कीती दीवस टीकतील जास्तीचे केले तर?

सानिकास्वप्निल's picture

19 Mar 2013 - 2:41 am | सानिकास्वप्निल

कमी तापमानावर चांगले बेक केल्यास व हवाबंद डब्यात ठेवल्यास २०-२५ दिवस सहज टिकतात :)

अभ्या..'s picture

18 Mar 2013 - 11:33 pm | अभ्या..

ग्रेट :)
बरणीवाला फोटो लैच भारी. :)

अक्षया's picture

19 Mar 2013 - 11:29 am | अक्षया

+ १

पैसा's picture

18 Mar 2013 - 11:35 pm | पैसा

पण आमच्याकडे सफरचंद कापायची सुद्धा कोणी वाट बघत नाहीत! =))

ह्ये साणिका गालाचे सफरचंदेत का हे ?? भारी चविष्ठ बै ते :)
सासुबै म्हणताय्त ते खरय हं ;)
आमच्याकडे मेलं कुणी सफरचंद कापूनच देत नै :-/
:P

सानिकास्वप्निल's picture

19 Mar 2013 - 2:43 am | सानिकास्वप्निल

हो गालाचेच आहेत :)
मला अख्खे सफरचंद खाण्याचा जाम कंटाळा येतो म्हणून हे उद्योग :P

अरे वा... मस्तच एकदम.... इथे पण मिळतात सफरचंदाचे चिप्स.. पण कधी अजुन खाल्ले नाही. आता घरीच करुन बघेल. :)

काय म्हणावे या बाईला.

खल्लास.

मोदक's picture

19 Mar 2013 - 6:39 pm | मोदक

+१

मलाही बरणीवाला फोटू फार आवडला. मी हे चिप्स स्यालडमध्ये मिसळलेले खाल्ले आहेत. छान लागतात. सफरचंद आणि दालचिनी हे काँबीनेशन प्रचंड आवडते.... अ‍ॅपल क्रिस्पमध्ये. ;)

निमिष ध.'s picture

19 Mar 2013 - 2:57 am | निमिष ध.

फोटो पाहिले आणि खल्लास झालो. सफरचन्द आणि दालचीनी एक अप्रतिम जोड आहे.

nishant's picture

19 Mar 2013 - 3:00 am | nishant

अप्रतिम फोटो...
शेवट्चे २ खास आवडले... :)

५० फक्त's picture

19 Mar 2013 - 7:47 am | ५० फक्त

बरणीवाला फोटो इज लई भारी, लाईक द बरणी इस क्राईंग बिकॉज सो गुड चिप्स आर गोइंग अवे फ्रॉम हर...

कच्ची कैरी's picture

19 Mar 2013 - 8:13 am | कच्ची कैरी

एकदम,म्मस्त आणि सोपी पण !!!!

दिपक.कुवेत's picture

19 Mar 2013 - 10:56 am | दिपक.कुवेत

बरणीवाला फोटो पाहुनच खल्लास! आता तुझ्याकडुन फोटोग्राफि पण शीकली पाहिजे :)

वामन देशमुख's picture

19 Mar 2013 - 11:44 am | वामन देशमुख

सानिकास्वप्निल यांना चांगल्या फोटोग्राफर म्हणावं की स्वयंपाकर की दोन्ही मिळून अजून काही म्हणावं असा प्रश्न मला पडलाय!

अर्रे बापरे ३०-३० मिन्ट बेक करून फक्त ट्रेभर चिप्स.. नको बाबा विकत आणणे स्वस्त पडेल ;)
बाकी रेसिपि आवडली

मी_देव's picture

19 Mar 2013 - 11:58 am | मी_देव

नेहमीप्रमाणे मस्तच!

पिलीयन रायडर's picture

19 Mar 2013 - 12:20 pm | पिलीयन रायडर

तुम्ही फार भारी आणि तुमचे कुटुंब फार भाग्यवान आहे हो..
देवा.. पुढच्या जन्मी सानिका तरी कर किंवा स्वप्नील तरी...

बॅटमॅन's picture

19 Mar 2013 - 6:12 pm | बॅटमॅन

+११११११११.

अगले जणम मे मुझे साणियाजीके कुटुंबमेही जणम दीजो भगवाण!

अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र चूक झाली. साणिया णै साणिका. स्वारी बरंका साणिकातै :)

पाहूनच तोंडाला पाणी सुटले :)

धनुअमिता's picture

19 Mar 2013 - 2:27 pm | धनुअमिता

मस्तच नेहमीप्रमाणे. कुठुन तुंम्हाला ह्या एव्हढ्या रेसिपी सुचतात हो.

प्यारे१'s picture

19 Mar 2013 - 3:23 pm | प्यारे१

ए बाई,

किती छळ करणारेस अजून? ;)

सूड's picture

19 Mar 2013 - 3:38 pm | सूड

मस्तच !!

दालचिनीचे कॉम्बीनेशन भारी!!

सानिकास्वप्निल's picture

19 Mar 2013 - 5:57 pm | सानिकास्वप्निल

फारसा फरक पडत नाही
धन्यवाद :)

स्वाती दिनेश's picture

19 Mar 2013 - 5:58 pm | स्वाती दिनेश

सफरचंद + दालचिनी भन्नाट लागते .. प्रचंड सहमत!
हे चिप्स हायडलबर्गच्या किल्ल्याच्या पायथ्याशी खूप छान मिळतात, तसेच आमच्या इथे फ्रांकफुर्टमध्ये ऑगस्टच्या शेवटच्या विकएंडला मुझेउम उफर फेस्ट म्हणजे माइन नदीच्या काठी म्युझिअमचा उत्सव असतो त्या वेळी नदीच्या दोन्ही काठांना पालं पडतात आणि तेथे हे चिप्स हमखास असतात.
स्वाती

bharti chandanshive१'s picture

19 Mar 2013 - 6:08 pm | bharti chandanshive१

मस्तच नेहमीप्रमाणे

आयला... काय भारी दिसत आहेत या चिप्स ! आता इतक्या भारी दिसत आहेत म्हणजे चवीला पण लयं भारी लागत असणार ! :)
फोटो सुंदरच... :)

हासिनी's picture

20 Mar 2013 - 11:05 am | हासिनी

अरे वा! नविन प्रकार दिसतोय चिप्सचा!
धन्यवाद, रेसिपी दिल्याबद्दल. आता करून पहायला हरकत नाही!!
:)

तोंडाला पाणी सुटले हे चिप्स बघून.. बाकी बरणी भरून सानिकाताय मला चिप्स देतेय असे स्वप्न पडले..