झुक झुक गाडी -(बालकविता)

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
18 Mar 2013 - 2:47 pm

मित्रांनो या, मैत्रिणीनो या
एकामागे एक उभे राहूया -

दंगामस्ती कमी करूया
झुकझुकगाडी खेळ खेळूया ,

दादा ड्रायव्हर पुढे नेहमी
सर्वामागे गार्ड हजर मी -

हिरवी निशाणी दाखवली
दादाने कुकशिटी वाजवली -

भाकचुक भाकचुक
भाकचुक भाकचुक !

धुराविना ही धावते गाडी
रुळाविना ही पळते गाडी -

जिथून निघालो तिथे जाणार
सांगा आणखी कोण येणार ?

इथेच सगळयाना फिरवीन
गोलगोल चकरा मारीन तीन -

भाकचुक भाकचुक
भाकचुक भाकचुक !

सिग्नल नाही- स्टेशन नाही
गाडी चकरा मारत राही -

छान छान आवाज गाडीचा
गोंगाट सगळ्यांच्या आवडीचा ,

आपल्या तीन चकरा झाल्या
सगळे तयारीत रहा.. उतराया ,

फुर्रर्रर्र शिट्टी मी वाजवली
झुकझुकगाडी ही थांबवली -

भाक चूक भाक चूक
भाक चूक भाक चूक !
.

बालगीत

प्रतिक्रिया

पैसा's picture

18 Mar 2013 - 4:25 pm | पैसा

मजेशीर गाडी आहे!

गंगाधर मुटे's picture

31 Mar 2013 - 4:06 pm | गंगाधर मुटे

भाक चूक भाक चूक
भाक चूक भाक चूक !

छान बालगीत.

पाषाणभेद's picture

31 Mar 2013 - 7:11 pm | पाषाणभेद

सुंदर बालगीत!