कॉकटेल लाउंज : बे ऑफ पॅशन (Bay of Passion)

सोत्रि's picture
सोत्रि in पाककृती
16 Mar 2013 - 7:40 pm

‘कॉकटेल लाउंज’ मालिकेतील आजचे कॉकटेल आहे “बे ऑफ पॅशन"

पार्श्वभूमी:

गोव्यावरून आणलेल्या पॅशन फ्रूट लिक्युअर (भ्रष्ट भारतीय नक्कल) वापरून बरेच दिवस झाले होते. आज त्या लिक्युअरच्या गुलाबी रंगाची पुन्हा एकदा भुरळ पडली. अ‍ॅबसोल्युट वोडकाचे संस्थळ चाळता चाळता पॅशन फ्रूट लिक्युअर वापरून केलेल्या कॉकटेल्स्ची खाणच मिळाली. मग एक मस्त आकर्षक रंगाचे बे ऑफ पॅशन आवडले. महत्वाचे म्हणजे सर्व  साहित्य मिनीबार मध्ये दाखल होते. :)

प्रकार: वोडका बेस्ड, कंटेम्पररी कॉकटेल, लेडीज स्पेशल

साहित्य:

वोडका
1.5 औस (45 मिली)

पॅशन फ्रूट लिक्युअर
1 औस (30 मिली)

क्रॅनबेरी ज्युस
4 औस (120 मिली)

पायनॅपल ज्युस
2 औस (60 मिली)

बर्फ

लिंबचा 1 काप सजावटीसाठी

1 स्ट्रॉ

ग्लास:हाय बॉल

Cocktail

कृती:

ग्लासमधे बर्फ भरून घ्या.

बर्फाच्या खड्यांवर वोडका ओतून घ्या

आता लिक्युअर आणि क्रॅनबेरी ज्युस वोडकावर ओतून घ्या

मस्त लाल रंग आला आहे ना! :)  आता त्यात पायनॅपल ज्युस घाला. कॉकटेला वरच्या भागात मस्त पिवळसर रंग येइल.
लिंबाचा काप घालून सजवा आणि स्ट्रॉ टाकून सर्व्ह  करा किंवा पिऊन टाका.

वर पिवळसर आणि खाली लाल अशा मस्त रंगाचे बे ऑफ पॅशन तयार आहे. :)

प्रतिक्रिया

नेहमीप्रमाणेच आकर्षक चित्र!

दिपक.कुवेत's picture

16 Mar 2013 - 8:52 pm | दिपक.कुवेत

काय रंग दिसतोय :). ह्या पॅशन नी पॅशनेट व्हायला झालय. सोत्रिजी एक लेखमाला मॉकटेल्स वर लिहा कि...काय आहे ईकडे वारुणी बॅन असल्याने निदान दुधाची तहान ताकावर त्याप्रमाणे कॉकटेल्स ची तहान मॉकटेल्सवर भागउ

सानिकास्वप्निल's picture

16 Mar 2013 - 9:59 pm | सानिकास्वप्निल

बे ऑफ पॅशन सॉल्लिड दिसतय :)

स्पंदना's picture

18 Mar 2013 - 4:25 am | स्पंदना

माझा टेबलक्लॉथ कुठाय?

सोत्रि's picture

18 Mar 2013 - 2:44 pm | सोत्रि

हा हा हा,
धुवायला टाकला होता. :)

-(स्वच्छता पाळणारा) सोकाजी

प्यारे१'s picture

18 Mar 2013 - 8:06 pm | प्यारे१

हा 'पंचे'करी दिसतोय! :P

अ‍ॅब्सोल्युट किती फ्लेवर्स मध्ये मिळते रे सोत्रिबुवा?

वत्सा प्यारे, तुजप्रत कल्याण असो.

1

- (साकिया) सोकाजी