डाळिंब - गुलकंद आईसक्रिम

दिपक.कुवेत's picture
दिपक.कुवेत in पाककृती
16 Mar 2013 - 4:31 pm

ice cream

५० राव हे आईसक्रिम नी त्यांनी भरलेले मोठे बाउल खास तुमच्याकरिता :)

साहित्यः
१. क्रिम - २५० मिली.
२. डाळिंबाचे दाणे - २ कप
३. साखर किंवा मध - डाळिंब/गुलकंदाच्या गोडानुसार कमी / जास्त
४. गुलकंद - २ मोठे चमचे
५. सजावटिकरिता आपापल्या आवडिचे ड्राय फ्रुट्स/डाळिंबाचे दाणे/थोडा गुल़कंद ई.

कॄती:
१. डाळिंबाचे दाणे काढुन मिक्सर मधे थोडं पाणी घालुन बारिक वाटुन घ्या. आता गाळण्यातुन हा रस गाळुन घ्या.
२. क्रिम मधे आवडिप्रमाणे साखर/मध घालुन सॉफ्ट पीक्स फॉर्म होईस्त व्हिप्ड करा किंवा हल्ली रेडिमेड व्हिप्ड क्रिम सुध्धा मिळतं
३. आता त्यात डाळिंबाचा रस, गुलकंद घालुन व्यवस्थित मिक्स करा
४. वरिल मिश्रण हवाबंद डब्यात ओतुन डिप फ्रिजर मधे ठेवा
५. आईसक्रिम पुर्ण सेट झालं कि आपापल्या आवडिचे ड्राय फ्रुट्स/डाळिंबाचे दाणे किंवा थोडा गुल़कंद घालुन सर्व करा. खास छोट्यांसाठि वरुन चॉकलेट सॉस घालुन सर्व करा.

टिपा:
१. क्रिम व्हिप करणं म्हणजे एका ठरावीक वेळेपर्यत पातळ क्रिम सॉफ्ट पिक्स फॉर्म होईस्त ढवळणं/बीट करण/घुसळणं. सॉफ्ट पिक्स म्हणजे क्रिम घट्ट झाल्यावर ते बोटांवर थांबल पाहिजे...खाली ओघळता कामा नये. पण ह्यात फार वेळ आणि शक्ति खर्च होते म्हणुन क्रिम डायरेक्ट ब्लेंडर मधे सुध्धा घुसळु/फिरवु शकता. पण फक्त वरिल घनता येईस्त फिरवा. जास्त वेळ फिरवल तर त्यातुन क्रिम वेगळं होईल.

२. भारतात गुलकंद छान मिळत. ईकडे जे मिळत ते सेंटेड असत म्हणुन कुठलाहि ईसेन्स घालण्याआधी बघा आणि मग घाला

३. डाळिंबाचा छान गुलाबी रंगाचा रस तयार होतो पण क्रिम मधे मिसळल्यावर तो अगदि फिकट होतो म्हणुन जर गुलाबी रंग मिळाला तर अगदि एक ते दोने थेंब घाला म्हणजे आईसक्रिम दिसायला आणि खायला मोहक / आकर्शक दिसेल.

प्रतिक्रिया

धनुअमिता's picture

16 Mar 2013 - 4:41 pm | धनुअमिता

अप्रतिम दिसत आहे आईस्क्रिम. असे वाटते की लगेच खावी.
वाचनखूण साठवून ठेवली आहे. करुन बघण्यात येईल.

अक्षया's picture

16 Mar 2013 - 4:42 pm | अक्षया

छान दिसते आहे आईस्क्रिम !!
धन्यवाद.

सानिकास्वप्निल's picture

16 Mar 2013 - 4:58 pm | सानिकास्वप्निल

आईस्क्रीम व फोटो भन्नाट दिसत आहे.
तुमच्या ह्या हटके पाकृसाठी तुमचे अभिनंदन :)
आता उन्हाळ्यात नक्की बनवून बघेन.

वामन देशमुख's picture

16 Mar 2013 - 5:08 pm | वामन देशमुख

क्या बात है दीपकभाई!

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2013 - 5:10 pm | अत्रुप्त आत्मा

वेड लावणारा प्रकार आहे... डाळिंबाचा रस, गुलकंद हे मिक्शचरच जबराट आहे. चविचा फक्त अनुभव नव्हे तर नीट सराव झाला,तरच असं कॉम्बिनेशन सुचू शकतं. :-) खाण्या आधीच चव येतीये तोंडात... http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/lick-lips.gif

@ भारतात गुलकंद छान मिळत. >>> हे तर खरच,पण तरिही मी आमच्या फुलांच्या मार्केटयार्डमधून गावठी गुलाब टोपलीनी आणून पत्री खडिसाखरेबरोबर उन्हात केलेल्या गुलकंदाची तोड कश्यालाच येत न्हाई.
तोच गुलकंद आणी तिकडूनच आणलेली गणेश राजा डाळिंब वापरून अता आईस्क्रीम करून बघणार!!! केल्यावर फोटू टाकिन याच ठिकाणी http://www.sherv.net/cm/emoticons/eating/smiley-eating-icecream.gif

आज तुझ्या ह्या स्मायलीं आणि प्रतिसादाने माझा अत्रुप्त जीव सुखावला रे. खरचं गावठी गुलाबच्या गुलकंदाची चवच न्यारि...येत्या तळपत्या उन्हात नक्कि बनब आणि सांग कस झालं ते :)

अत्रुप्त आत्मा's picture

16 Mar 2013 - 5:34 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yes-yes-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yes-yes-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/yes/yes-yes-smiley-emoticon.gif

पैसा's picture

16 Mar 2013 - 6:42 pm | पैसा

नेहमी वेगळी प्रतिक्रिया काय द्यावी कळत नाही!

आदूबाळ's picture

16 Mar 2013 - 9:40 pm | आदूबाळ

चायला! तोंपासु!

कसले भारी दिसतेय हे आईस्क्रीम!

वाव दीपू काका आईसक्रीम भारीच :)

ह्या उन्हाळ्यात खाऊन बघण्यात येइल :P :D

चिगो's picture

16 Mar 2013 - 11:25 pm | चिगो

लै भारी आईसक्रीम, दिपकजी.. आता इथे गुलकंद शोधणे आले..

निवेदिता-ताई's picture

16 Mar 2013 - 11:48 pm | निवेदिता-ताई

मस्त्,मस्त...

वा... छानच दिसते आहे आईसक्रिम.. मी कधी केले नाही अजुनआईसक्रिम.. ह्या उन्हाळ्यात करुन बघेल.

nishant's picture

17 Mar 2013 - 3:16 am | nishant

अहाहा... काय दिसतय ते आईस्क्रिम!!!

५० फक्त's picture

17 Mar 2013 - 8:00 am | ५० फक्त

लई लै धन्यवाद, आज पुन्हा पाश्चरजीकडे जावं लागेल, चला आजचा मेन्यु ठरला, गार्डन वडापाव आणि पाश्वरजी.

यशोधरा's picture

17 Mar 2013 - 8:49 am | यशोधरा

मस्त!

मदनबाण's picture

17 Mar 2013 - 9:16 am | मदनबाण

मस्त! :)
मला स्वतःला आईसक्रीम फार फार आवडते,मग ते फालुदा मधे घातलेले असो वा फॅमेली पॅक ! :)

(आईसक्रीम प्रेमी):)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Mar 2013 - 10:50 am | डॉ सुहास म्हात्रे

आईस्क्रीम म्हणजे जीव की प्राण... म्हणून असले जीवघेणे आईस्क्रीम पाहून आय स्क्रीSSSSSSSSS म +D

अरे काय रे.......तुझा उन्हाळा सुरु झाला सुद्धा का :)
फोटू एकदम ज ब रा ट ....... !!!!!!!!!!

ज्योति प्रकाश's picture

17 Mar 2013 - 3:25 pm | ज्योति प्रकाश

फोटू व आईस्क्रिम जबरदस्त.आता करून बघणे आलेच.

सुहास झेले's picture

17 Mar 2013 - 3:54 pm | सुहास झेले

जबऱ्या...... !!!

सुरेख! पण आमच्या इथे कालपासुन कडाक्याची थंडी सुरु झाली ना? तरीही वाचन्खुण साठवुन ठेवते झालं.

दिपक.कुवेत's picture

17 Mar 2013 - 5:56 pm | दिपक.कुवेत

मनापासुन शुक्रिया :)

फिर मिलेंगे इसी जगह....इसी समय

स्वाती दिनेश's picture

17 Mar 2013 - 8:58 pm | स्वाती दिनेश

आइसक्रिम छानच दिसते आहे,
स्वाती

फोटो फार छान आहेत. नुसत्या क्रिमच आयस्क्रीम होते का?

चला उन्हाळा सुरु झाला आहे. आता आईसक्रीम चाखणे आलेच.

कच्ची कैरी's picture

18 Mar 2013 - 12:19 pm | कच्ची कैरी

नविनच प्रकार कळला आईसक्रिमचा ! छान असावा

स्मिता.'s picture

18 Mar 2013 - 5:04 pm | स्मिता.

फोटो बघूनच जीव वेडावला. थंडी कमी झाली की नक्की करून बघणार.

स्मिता चौगुले's picture

18 Mar 2013 - 5:12 pm | स्मिता चौगुले

मस्तच... तोपासू... नक्की करुन बघणार..:)

दीपा माने's picture

19 Mar 2013 - 7:21 am | दीपा माने

फारच छान पाकृ दिलीत. दोन दिवसावर स्प्रिंग सिझन आलाय तरी बाहेर बर्फ पडतोय. तरीही बर्फात फिरत आईसक्रिम खाणारे न्युयॉर्कला आहेत. सध्या बाजारात मोठी मोठी डाळिंबंपण यायला लागलीत. नक्कीच हे आईस्क्रिम करण्यात येईल.

दिपक.कुवेत's picture

19 Mar 2013 - 11:08 am | दिपक.कुवेत

निदान मी तरी आईसक्रिम साठि ॠतु बघत नाहि....दिसला चांगला फ्लेवर कि हाण!....मग उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा असो. अर्थात कुवेत मधे फक्त दोनच ॠतु....प्रचंड उन्हाळा आणि तितकाच हिवाळा. बाकि गुलाबी थंडित आईसक्रिम खायची मजा काहि औरच आहे :)