आजीच्या गोष्टीमधली खार

कौस्तुभ आपटे's picture
कौस्तुभ आपटे in जे न देखे रवी...
17 Feb 2013 - 11:26 am

आजीच्या गोष्टीमधली खार
आठवते मला फ़ार फ़ार
इवलेसे डोळे, मीच मीच खुळे
शेपुट करडी झुपकेदार!

ससेभाऊ टेलर, उंदीरमामा बेकर
मास्तरीण चिंमणाबाई, न्यायाधीश माकड
प्राण्यांची सभा, नी शेपट्यांचा त-हा
असे सारेच किस्से मजेदार
आजीच्या गोष्टीमधली खार

गोष्टीतून आजी दूर दूर नेई
जात जाता अंगणात, आम्हा येई गाई
दादाचे डोके, कुरळे कुरळे
त्यात मधेच फ़िरे तीचा हात
आजीच्या गोष्टीमधली खार

गीत -कौस्तुभ

बालगीत

प्रतिक्रिया

पैसा's picture

17 Feb 2013 - 12:38 pm | पैसा

खारुताई आवडली!

स्पंदना's picture

17 Feb 2013 - 3:48 pm | स्पंदना

छान!

दादा कोंडके's picture

17 Feb 2013 - 4:17 pm | दादा कोंडके

खडबड गीत आवडलं नाही.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Feb 2013 - 5:12 pm | अत्रुप्त आत्मा

सुखद :-)