उत्सव

जयवी's picture
जयवी in जे न देखे रवी...
14 Feb 2013 - 7:51 pm

मागे वळता दिसते जेव्हा
संसाराची चौकट हसरी
नकळत होते कशी अचानक
पापण्यांची या झालर भिजरी

आठवणी नव नवलाईच्या
लख्ख काही अन्‌ काही पुसटशा
काही गाफिल, सावध काही
चुकार अन्‌ लडीवाळ जराशा

कधी उतावीळ, कधी अनावर
शांत डोह कधी उगाच डचमळ
आवरतांना सावरतांना
सैरावैरा उठते मोहळ

आठवात त्या भिजतांना मग
काळ जरासा थांबून जातो
तुझ्यासवे या जगण्याचा मग
उत्सव होतो... उत्सव होतो.

जयश्री अंबासकर

शृंगारकविता

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

14 Feb 2013 - 8:10 pm | मदनबाण

सुरेख...

जाता जाता :--- हल्ली माझं टाळक अंमळ बाद झालं आहे,च्यामारी शिर्षक वाचुन "त्या" उत्सवची आठवण झाली. ;)

मलाही. उत्सव म्हटलं म्हणजे सांज ढले, आणि मन क्युं बहका रे बहका हेच आठवलं!!

क्रान्ति's picture

14 Feb 2013 - 9:18 pm | क्रान्ति

सुंदर कविता! शेवटच्या ओळी अगदी कोरून ठेवाव्यात अशा!

बहुगुणी's picture

14 Feb 2013 - 9:23 pm | बहुगुणी

आवडली कविता.

जयवी's picture

15 Feb 2013 - 3:39 pm | जयवी

शुक्रिया :)

शुचि's picture

15 Feb 2013 - 7:28 pm | शुचि

वा! फारच सुंदर!

जयवी's picture

17 Feb 2013 - 11:57 am | जयवी

धन्यवाद :)