साहित्य:
१) खजूर (बिया काढून)
२) चिंच (जेवढे खजूर घ्याल त्याच्या १/४, जास्त आंबट नको)
३) गूळ (खजूराच्या १/२)
४) चाविपूरत मीठ आणि लाल तिखट
५) चिमूटभर हिंग (हिंगाने चटणीला छान वास येतो)
कृती -
वरील सर्व साहित्य एका पसरट भांड्यात घेवून पाण्याबरोबर जवळपास २०-२५ minutes मंद आचेवर शिजवावे
जेणेकरुन खजूर आणि चिंच एकदम मऊ शिजून निघतील.
थंड झाल्यानंतर mixer मधून बारीक करून घ्यावे...आणि आवश्यक तेवढे पाणी मिसळावे .
झाली खजुराची चटणी तयार.
जास्त झाली तरी Refrigerator मध्ये ठेवू शकता, बरेच दिवस टिकते सॉस- जॅम सारखी.
पाणी पुरी, भेळ पुरीच्या गाड्यावर, गोड चटणी म्हणून वापरतात ती हीच चटणी असते
सौ स्मिता चौगुले
प्रतिक्रिया
12 Feb 2013 - 1:49 pm | केदार-मिसळपाव
एक प्रश्न आहे.. खजूर वापरावा कि खारिक?
12 Feb 2013 - 2:00 pm | स्मिता चौगुले
खजूर वापरणे सोईचे ठरेल..खारीक कडक असते, ती शिजायला बराच वेळ लागेल..:)
आणि जर खारीकच वापरायची असेल तर ती ७-८ तास पाण्यात भिजवून वापरली तर चालू शकेल (खारीक वापरण्याचा प्रयोग मी कधी केलेला नाही )
12 Feb 2013 - 2:39 pm | bharti chandanshive१
खुपच छान
12 Feb 2013 - 5:18 pm | स्मिता चौगुले
धन्यवाद..
12 Feb 2013 - 5:18 pm | स्मिता चौगुले
धन्यवाद..
12 Feb 2013 - 5:23 pm | अनामिका
यात काळे मिठ घातल्यास चव अजून छान लागते
12 Feb 2013 - 5:30 pm | स्मिता चौगुले
काळे मीठ तर तिखट पाण्यांत घालतात न?
12 Feb 2013 - 5:42 pm | अनामिका
असेच काहि नाही चट्णी मधे घातले कि चटणीचा स्वाद उत्तम होतोच आणि चिंचे मुळे आलेला आंबटपणा बाधत नाही
12 Feb 2013 - 5:45 pm | स्मिता चौगुले
नवीन आणि उपयुक्त माहिती समजली... धन्यवाद..:)
12 Feb 2013 - 5:53 pm | परिकथेतील राजकुमार
अनवट पाककृती.
13 Feb 2013 - 8:31 am | स्मिता चौगुले
अनवट ??
13 Feb 2013 - 2:19 pm | त्रिवेणी
तुम्ही पाणी पुरी घरी करत असाल तर plz त्या पाण्याची ही रेसीपी द्या.
चटणी आवडली.
13 Feb 2013 - 4:39 pm | स्मिता चौगुले
मी नवीन धागा उघडला आहे आणि त्यात पाणी पुरीची संपूर्ण पाकृ दिली आहे.. :)
15 Feb 2013 - 4:33 pm | प्रियाकूल
फार दिवसापासुन ह्याची पाकृ हवी होती. माझ्या सोलापूरच्या बहिणीनी सांगितली होती पण विसरले होते मी. धन्यवाद.
2 May 2013 - 1:37 pm | अनिता ठाकूर
पाणीपुरीच्या पाकृचा node द्यावा ही विनंती.
2 May 2013 - 2:07 pm | स्मिता चौगुले
http://www.misalpav.com/node/23927