वेदीवर या राही मी स्थिर

हिटलर's picture
हिटलर in काथ्याकूट
30 Jan 2013 - 9:17 pm
गाभा: 

कुणाच्याही वैयक्तिक भावना दुखावण्याचा हेतू नाहीय पण नथुराम गोडसेंनी गांधीहत्या का केली याची काही कारणे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहेत.

देशभक्ती हे पाप असे जर l तर मी पापी घोर भयंकर l
मात्र पुण्य ते असेल, माझा नम्र तरी अधिकार तयावार
वेदीवर या राही मी स्थिर ll धृ ll

द्रौपदीस छळले दुष्टांनी l कुरुतीर्थी लढले भीमार्जुन
न्हाली रुधिराने वसुंधरा l अन्यायाचे हो परिमार्जन
सीतेसाठी श्रीरामांनी l लंकेवर केले रणकंदन
मात्र आज या नव्या भारती l अबला हतबल सबलावाचून
अबलांचा तो करुणार्तस्वर l सह्याद्रीच्या ये कानावर
वेदीवर या राही मी स्थिर ll १ ll

न्यायासाठी आप्तांशीही लढणे l मागे फिरणे नाही
होता संभ्रम धनुर्धराला l स्फूर्तिप्रद हरी गीता गाई `
ठाई ठाई खला मारिले त्याने, जग कल्याणापायी
केले का हो पाप तयाने ? आपण म्हणतो नाही ! नाही !
समजा असले ! कृष्णार्पण ते ! कर्ता तो अन निमित्त मी तर
वेदीवर या राहो मी स्थिर ll २ ll

भू विभाजने कष्टी झाले त्या व्रणीतांचे करण्या सांत्वन
फास घेतला गळ्याभोवती l परी नाही विचलित माझे मन
दुष्टांना देणे सहायता l ठरते अत्याचारा इंधन
काया जरी हि वडिलोपार्जित l रक्षा कायेची माझे धन
धन ते टाका सिंधूमध्ये अखंडत्व देशा आल्यावर
वेदीवर या राही मी स्थिर ll ३ ll

प्रतिक्रिया

पिंपातला उंदीर's picture

30 Jan 2013 - 9:21 pm | पिंपातला उंदीर

इंटरनेट नाझी

आजानुकर्ण's picture

30 Jan 2013 - 9:55 pm | आजानुकर्ण

नथुराम गोडसे किंवा कवितेचे प्रकाशक यांनी या संकेतस्थळावर ही कविता टाकण्यास परवानगी दिली आहे का? अन्यथा ते लेखनचौर्य ठरेल.

-१ असहमत आहे. साहित्यिकाच्या मृत्यूनंतर केवळ ६०वर्षे प्रताधिकार कायदा लागु असतो. आता ही कविता प्रताधिकार मुक्त आहे.

बाकी हा धागा आणि कविता अत्यंत हास्यास्पद, अनुचित आणि खोडसाळ आहे याबद्दल सहमती

मन१'s picture

1 Feb 2013 - 12:05 pm | मन१

कविता नथुराम रचित आहे म्हणून हास्यास्पद, अनुचित आणि खोडसाळ आहे का?
नथुरामचा कॉंटेक्स्ट काढून वाचता येइल का?
तशी वाचल्यास कशी वाटते?

कविता नथुराम रचित आहे म्हणून हास्यास्पद, अनुचित आणि खोडसाळ आहे का?

कविता ज्या घटनेनंतर लिहिली गेली आहे त्यानंतर अशी कविता प्रत्यक्ष खुन्याने लिहिणे हे मलातरी हास्यास्पद, अनुचित आणि प्रसंगी खोडसाळ वाटते. (हा धागा तसा आहे याबद्दल दुमत नसावे)

नथुरामचा कॉंटेक्स्ट काढून वाचता येइल का?

नाही वाचता येणार

तशी वाचल्यास कशी वाटते?

गैरलागू

विकास's picture

1 Feb 2013 - 9:50 pm | विकास

कविता नथुराम रचित आहे म्हणून हास्यास्पद, अनुचित आणि खोडसाळ आहे का?

त्यात गांधीहत्येचे जस्टीफिकेशन असल्यास नक्कीच अनुचित आहे. कारण गांधीहत्येस एका अर्थी "देशभक्ती जर पाप असे तर..." असे त्यात म्हणलेले दिसते.

जर गांधीहत्या हा कॉन्टेक्स्ट नसला तर ती कविता नथूरामची असली तरी गैर वाटणार नाही. पण मग तसे करण्यासाठी त्यातील काही ओळी बदलाव्या लागतील, उ.दा.

न्यायासाठी आप्तांशीही लढणे l मागे फिरणे नाही (कुठला न्याय? )

ठाई ठाई खला मारिले त्याने, जग कल्याणापायी, केले का हो पाप तयाने ? आपण म्हणतो नाही ! नाही ! (गांधीजी खल होते?)

दुष्टांना देणे सहायता l ठरते अत्याचारा इंधन (जर ५५ कोटी हाच मुद्दा त्याचा त्यावेळेस असला, तरी त्यावर उत्तर गोळ्या झाडणे?)

मन१'s picture

1 Feb 2013 - 12:09 pm | मन१

हापोथेटिकल केसः-
नथुरामने ही कविता खुनापूर्वी कित्येक दिवस प्रकाशित केली असती, आणी तेव्हा तुम्ही ती वाचली असती तर तुम्हाला ठीक वाटली असती का? खरच इतकी वाईट ही कविता आहे का?

ऋषिकेश's picture

1 Feb 2013 - 4:07 pm | ऋषिकेश

हायपोथेटिकल उत्तरे:

नथुरामने ही कविता खुनापूर्वी कित्येक दिवस प्रकाशित केली असती, आणी तेव्हा तुम्ही ती वाचली असती तर तुम्हाला ठीक वाटली असती का?खरच इतकी वाईट ही कविता आहे का?

सांगता येत नाही. मुळात भारतीय इतिहासात नथुराम याचे अस्तित्त्वच फक्त एका क्षणाचे आहे. त्याच्या आधी तो काय होता त्याला फारसे महत्त्व नाहिच

अनुराधा१९८०'s picture

1 Feb 2013 - 9:56 pm | अनुराधा१९८०

नथुराम यांचे तुमच्या मते अस्तित्व एक क्षणाचे असले तरी माझ्या सारख्या अनेकांसाठी ते खुप महत्वाचे आहे.

नथुरामांनी फक्त एक च चुक केली, ज्या माणसाला नंतर सगळ्या देशानीच अव्हेरला असता त्याला हुतात्मा केले.

नन्दादीप's picture

1 Feb 2013 - 11:14 pm | नन्दादीप

+१

नथुराम हा शिखंडीचीच आवृत्ती होय. त्याने पराक्रम तरी काय केला तर स्वतःच्या आजोबांच्या वयाच्या देवतुल्य निशस्त्र व्यक्तीमत्वावर गोळ्या झाडुन त्यांचा खुन केला,आणी अनुराधाबाई तुम्ही असल्याच समर्थन करता?

वेताळ's picture

2 Feb 2013 - 12:46 pm | वेताळ

नथुरामाने गांधीहत्या करण्या अगोदर कोणते सामाजिक कार्य केले होते ह्याच्या बद्दल अनुराधा बाई काही माहिती देवु शकाल काय?

अनुराधा१९८०'s picture

2 Feb 2013 - 2:29 pm | अनुराधा१९८०

वेताळ बाबा - मी कुठे म्हणले की नथुरामांनी सामाजीक कार्य केले होते. काहिच्या काही माझ्या नावावर खपवताय. मी वर लिहिले च ना की गांधीवध करुन पण चुक च केली. मेल्यामुळे सगळी पापे धुवुन निघाली आणि हुतात्मा पण मिळाले.

नथुराम यांचे तुमच्या मते अस्तित्व एक क्षणाचे असले तरी माझ्या सारख्या अनेकांसाठी ते खुप महत्वाचे आहे.
ह्यावरुन मला वाटले नथुरामचे अस्तित्व समाजासाठी खुप महत्वाचे होते.त्याने एकच कार्य केले अन त्यात त्याने एका समाजाची पुर्ण वाट लावली.गांधी हत्येनंतर झालेल्या दंगलीला नथुराम जबाबदार नाही का?

अनुराधा१९८०'s picture

2 Feb 2013 - 3:57 pm | अनुराधा१९८०

नथुराम ला कल्पना नव्हती की महाराष्ट्र इतका जातीयवादानी किडलेला असेल. दंगलीमुळे ज्या समाजाची वाट लागली त्या समाजाचे डोळे उघडले आणि तो फक्त स्वतापुरते बघायला लागला. हे तसे long term मधे चांगले च झाले.

वेताळ's picture

2 Feb 2013 - 4:11 pm | वेताळ

नथुराम माथेफिरु नव्हता,त्याने साहित्यनिर्मिती केली.तो विचारवंत होता. खुप विचारांती त्याने निर्णय घेतला कि गांधी वधाशिवाय देशाला तरणोपाय नाही म्हणुन शेवटचे टोकाचे पाउल उचलुन गांधी हत्या केली. ह्याचे पुढे काय परिणाम होतील ह्याचा त्याने विचार केला असला पाहिजे.महाराष्ट्र जातियवादाने किडलेला आहे हे देखिल तुम्हा आम्हा सारख्या उच्चवर्णियानी म्हणावे हे आश्चर्यकारक आहे.जे आपण जोपासतो तेच उगवते. असो.एकाद्या नेत्याची हत्या होते तेव्हा त्याचे अनुयायी त्याला मारणार्‍या समाजाचे नामोनिशाण मिटवण्याचा प्रयत्न करतो हे पुर्वी पासुन घडत आहे. ते काय गांधी हत्येनंतर चालु झाले हे म्हणणे सयुक्तिक नाही.

अखंड हिंदुस्थान हीच त्याची मागणी होती म्हणून ?
त्याने केलेल्या कृत्याचा जरूर निषेध करू शकता. लोकशाहीत हा अधिकार आहे आपल्याला.
पण बिनबुडाचे आरोप करणं हे देखील गांधीवादात येत का ?
छत्रपति शिवाजी महाराज, महाराणा प्रताप हे पथभ्रष्ट देशभक्त होते अस अहिंसावादी मिस्टर गांधीच मत होत.
मग नथूरामच काय घेऊन बसलात गांधी भक्तांसाठी ती एक अतिशय क्षुद्र व्यक्ती आहे.

आजानुकर्ण's picture

1 Feb 2013 - 10:09 pm | आजानुकर्ण

माहितीबद्दल आभारी आहे

कपिलमुनी's picture

5 Feb 2013 - 12:49 am | कपिलमुनी

कुत्रा तंगडी वर करून कुठेही मुततो त्या प्रमाणे गैरलागू आहे
( उपमा अलंकार आहे , वैयक्तीक टीका नाही)

तर्री's picture

30 Jan 2013 - 10:02 pm | तर्री

कविता आवडली ....

..पण गांधीजींच्या प्रसन्न छायाचित्राच्याच खाली, आणि या 'राष्ट्रनायकाला श्रध्दांजली' अशा शब्दांना लगटून असलेल्या या कवितेचं उद्धरण हे नक्कीच खटकलं (अगदी धागालेखकाचा तसाच हेतू नसणार याची जाणीव असूनही), तसंच -अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे वगैरे मान्य करूनही- आजच्याच दिवशी हा धागा टाकणं हे अनौचित्यपूर्ण आणि खोडसाळपणाचं वाटलं हेही नम्रपणे नमूद करू इच्छितो.

विकास's picture

30 Jan 2013 - 10:08 pm | विकास

योग्य शब्दात योग्य प्रतिक्रीया.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2013 - 9:40 am | llपुण्याचे पेशवेll

१००% सहमत. असाच औचित्यपूर्ण निषेध अन्य ठीकाणी देखील होईल ही आशा.

मन१'s picture

31 Jan 2013 - 11:16 am | मन१

devil's advocate बनूनः-
नथुरामला ज्या दिवशी फाशी दिली गेली त्या दिवशी त्याचा फोटो एखाद्या संस्थळावर लागेल काय?
कारण त्याने वैयक्तिक फायद्यासाठी काही केलें नाही, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही नाही आणि केले ते काही प्रमाणात मातीशी इमान राखण्याच्या भावनेतूनच केले असे मानणारा एक गट आहे.
तर त्या गटातील लोकांनी संस्थळावर फोटो टाकला जावा अशी मागणी करावी काय?
समजा ते झालं तर त्याच्या फोटोअच्या खाली कुणी "दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल" ह्या कवितेचं रसग्रहण टाकलं तर त्यास तुम्ही अनौचित्यपूर्ण म्हणाल का?

नितिन थत्ते's picture

1 Feb 2013 - 4:24 am | नितिन थत्ते

>>नथुरामला ज्या दिवशी फाशी दिली गेली त्या दिवशी त्याचा फोटो एखाद्या संस्थळावर लागेल काय?

फोटो नाही पण .....

पिंपातला उंदीर's picture

1 Feb 2013 - 4:13 pm | पिंपातला उंदीर

धन्यवाद या संदर्भाबद्दल. अनेक लोकांच ३ वर्षात मत-परिवर्तन zआलेल दिसताय. त्यावेळेस आडून आडून नथुराम च समर्थन करणारे अनेक लोक आज गांधीजी याना भाव-विभोर वैइगेरे श्रध्ांजली अर्पण करताना दिसत्यात आज ; )

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Feb 2013 - 3:44 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

याच मन:परिवर्तन गांधीजींचा फार विश्वास होता. याच संस्थळावर क्लिंटन, ऋषिकेश इत्यादी लोकांनी आपलं गांधीसंदर्भात मतपरिवर्तन झाल्याचं नोंदवलं आहे. मी ही या दृष्टीने त्याच पंथातली.

तर हे मनपरिवर्तन कधीही होऊ शकतं. त्याबद्दल उपरोध व्यक्त करणं योग्य वाटत नाही.

नगरीनिरंजन's picture

2 Feb 2013 - 6:41 am | नगरीनिरंजन

सहमत आहे. गांधीजींच्या तत्वज्ञानात ही एक फार चांगली सोय आहे.
मी त्यांची पुस्तके वाचल्यावर मला कळलं की गांधीजी हे किती थोर राजकारणी होते ते.आजच्या औद्योगिक नागरसंस्कृतीस गांधीजींचे विचार अगदी पोषक आहेत.
साध्या साध्या प्रसंगांमधून गांधीजींचे तत्वपालन दिसते.
उदाहरणार्थ, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकात त्यांनी सांगितलेला एक प्रसंग पाहा. गांधीजी प्रवासाला निघाले. त्यांनी रेल्वेचे थर्डक्लासचे तिकीट काढले (साधेपणा). तब्येत थोडीशी बरी नव्हती म्हणून ते सेकंड क्लासमध्ये जाऊन बसले (सविनय कायदेभंग), अर्धा प्रवास झाल्यावर टीसीने त्यांना पकडले आणि पूर्ण प्रवासाच्या सेकंड क्लासच्या व थर्डक्लासच्या तिकीटाच्या किंमतीतला फरक दंड म्हणून आकारला. परंतु, केवळ अर्धाच प्रवास सेकंड क्लासने केला म्हणून अर्धाच दंड भरण्यावर अडून बसले (सत्याग्रह) आणि हे सगळे चालू असताना त्यांनी टीसीवर एकदाही हात उचलला नाही (अहिंसा).
हे असे करायला फार धैर्य लागते. आज गांधीजींच्याच स्वतंत्र देशाचा नागरिक असूनही हे असे काही करण्याची माझी हिंमत नाही. ती यायला फार मोठी साधना लागेल.
डेरिक जेन्सन नावाचा एक वाट चुकलेला पर्यावरणवादी लेखक आहे. त्याने 'एन्डगेम' नावाचे एक पुस्तक लिहीले आहे आणि त्यात त्याने सिव्हिलायझेशनची काही मूळ तत्वे मांडली आहेत.
त्यातले एक तत्व असे आहे की नागरसंस्कृतीत खालच्या माणसाने केलेली हिंसा अक्षम्य असते पण वरच्या माणसाने खालच्या माणसाची हिंसा केली तर ती नुसती क्षम्यच नाही तर स्वीकारार्ह आहे. (उदाहरणांसाठी मूळ पुस्तक पाहावे).
भारतामध्ये आधुनिक आणि औद्योगिक नागरसंस्कृतीचा विकास होण्यासाठी गांधीजींने शिकवलेल्या अहिंसेचा फार मोठा वाटा आहे. तरीही अजूनही अनेक माओवादी, नक्षलवादी किंवा धर्मांधळे लोक हातात शस्त्र घेतात आणि आपल्यापेक्ष वरच्या वर्गातल्या लोकांविरुद्ध हिंसा करतात. त्यांचेही लवकरात लवकर मनःपरिवर्तन होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना! तसे झाले तर ती बापूजींना एक खरी श्रद्धांजली ठरेल.

नगरीनिरंजन's picture

2 Feb 2013 - 6:50 am | नगरीनिरंजन

'गांधीजींने' ही टंकनचूक आहे. ते 'गांधीजींनी' असे वाचावे.
'आपल्यापेक्ष' हे 'आपल्यापेक्षा' असे वाचावे.

मिपावर प्रतिसाद स्वसंपादनाची सोय मिळेपर्यंत असहकार आंदोलन करण्याची मी हाक देत आहे. हा प्रतिसाद वाचणार्‍याने त्यानंतर स्वसंपादनाची सोय मिळेपर्यंत मिपावर एकही अक्षर लिहू नये असे मी आवाहन करतो. गांधीजींना श्रद्धांजली म्हणून हे आंदोलन यशस्वी करून दाखवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Feb 2013 - 6:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गांधीजींचं सर्वच तत्त्वज्ञान मला ग्राह्य वाटत नाही. उदा: हा सेकंड क्लास-थर्ड क्लासचा प्रसंगही देता येईल. पण त्यापुढच्या काळात कायदेभंग केल्यानंतर तर जी शिक्षा होईल ती भोगायला ते तयार असत. याला मनःपरिवर्तन म्हणता येईल.

एकंदर गांधींजींचे समाजातल्या हलक्या मानलेल्या लोकांकडे (दलित, स्त्रिया इ.) बघण्याचा दृष्टीकोन दया, अनुकंपा अशा प्रकारचा होता. मला तो ही पटत नाही.

अजूनही अनेक माओवादी, नक्षलवादी किंवा धर्मांधळे लोक हातात शस्त्र घेतात आणि आपल्यापेक्ष वरच्या वर्गातल्या लोकांविरुद्ध हिंसा करतात. त्यांचेही लवकरात लवकर मनःपरिवर्तन होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना! तसे झाले तर ती बापूजींना एक खरी श्रद्धांजली ठरेल.

उद्या राजकारणी आणि/किंवा सरकारी बाबूंनी आपल्याकडे नसलेली जादूची कांडी फिरवल्यामुळे माओवादी, नक्षलवादी किंवा धर्मांधांचं खरोखरच मनःपरिवर्तन झालं तर त्यांच्याबद्दल उपरोध व्यक्त करण्यापेक्षा त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं आपल्याहीसाठी शहाणपणाचं असेल.
नाहीतर शिवाजीचा राज्याभिषेक का झाला या चर्चा आणि शिवजयंतीची सुट्टी खरोखरच वांझोटी म्हणावी लागेल.

नगरीनिरंजन's picture

2 Feb 2013 - 7:05 am | नगरीनिरंजन

माओवादी, नक्षलवादी किंवा धर्मांधांचं खरोखरच मनःपरिवर्तन झालं तर त्यांच्याबद्दल उपरोध व्यक्त करण्यापेक्षा त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं आपल्याहीसाठी शहाणपणाचं असेल.

अर्थातच. पण ती भविष्यातली शक्यता झाली. मुळात त्यांचं मनःपरिवर्तन होऊन साध्या माणसापासून शस्त्र हाती घ्यायची वेळ का आली याचा विचार आत्ता करणे आवश्यक आहे.
गांधीजींच्या नावाचा उदोउदो करणारा समाज, त्यांचे विचार ज्या बाबतीत (localization, स्वयंपूर्ण खेडी, कुटीरोद्योग) योग्य वाटतात त्याच्या अगदी उलट वागतोय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Feb 2013 - 7:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुळात त्यांचं मनःपरिवर्तन होऊन साध्या माणसापासून शस्त्र हाती घ्यायची वेळ का आली याचा विचार आत्ता करणे आवश्यक आहे.

सहमत आहे. ते समजल्याशिवाय मनःपरिवर्तन कसं होईल हे समजणंही कठीणच आहे.

गांधीजींच्या नावाचा उदोउदो करणारा समाज, त्यांचे विचार ज्या बाबतीत (localization, स्वयंपूर्ण खेडी, कुटीरोद्योग) योग्य वाटतात त्याच्या अगदी उलट वागतोय.

या बाबतीत माझा पूर्ण पास. तुम्ही बोला, मी ऐकते आणि समजणार नाही तिथे प्रश्न विचारते.
गांधीजींचं अहिंसा तत्त्व म्हणून मान्य असणार्‍यांना गांधीजींचं अर्थशास्त्र किंवा सनातनी हिंदू विचार न पटणं हे ही शक्य आहेच. गांधीसमर्थक गांधीभक्तच असतील असंही नाही.

नगरीनिरंजन's picture

2 Feb 2013 - 8:49 am | नगरीनिरंजन

गांधीसमर्थक गांधीभक्तच असतील असंही नाही

तेच.
बहुतेकवेळा सोयीस्कर अशाच विचारांचाच अधिकृतपणे पुरस्कार केला जातो असा माझा समज झाला असल्याने उद्वेग वाटतो. बाकी काही नाही.

क्लिंटन's picture

2 Feb 2013 - 7:34 am | क्लिंटन

गांधीजींच्या नावाचा उदोउदो करणारा समाज, त्यांचे विचार ज्या बाबतीत (localization, स्वयंपूर्ण खेडी, कुटीरोद्योग) योग्य वाटतात त्याच्या अगदी उलट वागतोय.

मला स्वतःला गांधीजींविषयी आदर असला तरी त्यांची काही मते--कुटीरोद्योग, ब्रम्हचर्य वगैरे पटत नाहीत. अर्थात त्यामुळे त्यांच्याविषयीच्या आदरात काही कमी होत नाही.पण एखाद्या व्यक्तीविषयी आदर वाटत असला किंवा बरीचशी मते पटत असली तरी सगळी मते पटलीच पाहिजेत असे थोडीच आहे?

नगरीनिरंजन's picture

2 Feb 2013 - 8:40 am | नगरीनिरंजन

मलाही त्यांचे बरेचसे विचार पटत नसले तरी आदर आहेच. त्याचप्रमाणे सावरकर, भगतसिंग आणि इतर सशस्त्र क्रांतिकारी लोकांबद्दलही आदर आहेच.
पण दुर्दैवाने सहिष्णुतेचा दावा़ करत असलो तरी सगळ्यांना समान वागवणे होताना दिसत नाही. गांधींचे (आणि एकतर्फी अहिंसेचे) प्रस्थ अंमळ जास्तच झाले आहे.

५० फक्त's picture

2 Feb 2013 - 10:55 am | ५० फक्त

+ १००, जे जे जिथुन चांगले वाटेल, पटेल आणि पचेल ते ते तिथुन तिथुन घ्यावं या माझ्या वैयक्तिक मताचा मला पुर्ण आदर आहे.

नगरीनिरंजन's picture

31 Jan 2013 - 11:56 am | नगरीनिरंजन

आजच नव्हे तर सध्याच्या काळात कधीही ही कविता अनुचितच आहे. देशभक्तीच्या या कल्पना आता खुळचटपणात जमा होतात आणि कविता हास्यास्पद वाटते.
एक माणूस म्हणून गोडसेंबद्दल मात्र वाईट वाटते, ज्या कल्पना आज खुळचट वाटतात (तेव्हाही बहुतेकांना वाटत असतील कदाचित) त्यावर प्राणपणाने निष्ठा ठेवून त्यांनी स्वतःचे आयुष्य वाया तर घालवलेच पण मृत्युनंतरही 'माथेफिरू' म्हणवून घेण्याची वेळ आणून ठेवली.

चेतनकुलकर्णी_85's picture

1 Feb 2013 - 9:13 pm | चेतनकुलकर्णी_85

आणि गांधी वध करणारा माणूस जर निळ्या किंवा हिरव्या झेंड्या खालचा असता तर त्यालाही समस्त देशाने असेच माथेफिरू म्हणून झिडकारले असते का हो?

ज्या कल्पना आज खुळचट वाटतात (तेव्हाही बहुतेकांना वाटत असतील कदाचित)

बाकी अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पाहणे हे जर खुळचट पणाचे लक्षण असेल तर आजकाल बाहेरच्या देशात जाऊन चाकरी करणे अति शहाणपणाचे लक्षण आहे का?

अनुराधा१९८०'s picture

1 Feb 2013 - 9:57 pm | अनुराधा१९८०

आणि गांधी वध करणारा माणूस जर निळ्या किंवा हिरव्या झेंड्या खालचा असता तर त्यालाही समस्त देशाने असेच माथेफिरू म्हणून झिडकारले असते का हो? >> +१०००००००००००००००००

वेताळ's picture

2 Feb 2013 - 12:54 pm | वेताळ

मग भगवा दहशतवाद म्हटले कि तुमची का फाटते.गुन्हेगारी कृत्याला रंग द्यायचा का प्रयत्न करता?
गांधी हत्येचे समर्थन करताच येत नाही.

श्री गावसेना प्रमुख's picture

2 Feb 2013 - 3:58 pm | श्री गावसेना प्रमुख

मग भगवा दहशतवाद म्हटले कि तुमची का फाटते
सभ्यता की सारी सीमाये पार हो गयी है

नगरीनिरंजन's picture

2 Feb 2013 - 6:18 am | नगरीनिरंजन

आजकाल बाहेरच्या देशात जाऊन चाकरी करणे अति शहाणपणाचे लक्षण आहे का

अति नसले तरी शहाणपणाचे लक्षण आहे. आपले पंतप्रधानही नुकतेच म्हणाले की जास्तीत जास्त लोकांनी परदेशात जाऊन काम करावे म्हणजे देशाला परकीय चलन मिळेल.
त्याचं काय आहे की देशातच राहणार्‍या देशभक्त लोकांना देश महासत्ता व्हावा म्हणून देशी/परदेशी गाड्या घेऊन चालवायच्या असतात आणि त्या गाड्यांना परदेशी तेल लागते आणि ते तेल मिळवायला परदेशी चलन लागते. अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न पाहण्यातच सगळा वेळ जात असल्याने देशांतर्गत देशभक्तांना निर्यात वाढवायला फुरसत मिळत नाही म्हणून मग आपल्या बिचार्‍या पंतप्रधानांवर काही नाही तर किमान माणसे तरी निर्यात करू असे म्हणायची वेळ येते.

आळश्यांचा राजा's picture

30 Jan 2013 - 10:51 pm | आळश्यांचा राजा

खोडसाळ धागा आणि हास्यास्पद कविता.

कवितेत हास्यास्पद काय आहे?

कवितानागेश's picture

31 Jan 2013 - 12:18 am | कवितानागेश

नथुराम गोडसेंनी कधीही गांधीजींचा इतका द्वेष केला नसेल, जितका तथाकथित नथुरामभक्त करतात !

मरणान्तानि वैराणि.......|

विकास's picture

31 Jan 2013 - 1:41 am | विकास

नथुराम गोडसेंनी कधीही गांधीजींचा इतका द्वेष केला नसेल, जितका तथाकथित नथुरामभक्त करतात !

पहीला मुद्दा किती वास्तव आहे अथवा नाही याची कल्पना नसली, तरी, या वाक्यातून व्यक्त केलेल्या भावनेशी सहमत!

१) की "त्याने हिंदुधर्मीयांच्या रक्षणासाठी व त्यांच्यावर फाळणीकाळात झालेल्या अत्याचाराच्या बदल्यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात सर्वोच्च स्थान असलेल्या नेत्याचा खुन केला" असं वाटतयं, हेच ?

२) की त्याला गांधी कर्तुत्वात महान न्हवते, त्यांच्या आंदोलनात अजिबात ताकत न्हवती, इंग्रजांना त्यांचा धाक वाटावा असे सर्वोच्च नेतृत्व न्हवते, त्यांची विचारसरणी व वागणुक देशाला स्वातंत्र देण्यासाठी अतिशय कुचकामी होती, इंग्रजांना पराकोटीची मदत करणारी होती, थोडक्यात आज गांधि द्वेश्टे महात्मा गांधिची जी किंमत करतात तिच किंमत इंग्रज गांधिची करत होते ? किंबहुना महात्मा गांधी त्यांच्या खिजगणीतही न्हवते ? असं काही म्हणायचं आहे ?

जर नथुरामला मुद्दा क्रमांक दोन बद्दल काही संदेश कवितेतुन द्यायचा नसेल तर आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची पुण्यतिथी असताना त्यांनी स्वातंत्र्य मिळवायला काय केलं याचे गोडवे/पोवाडे गायले पाहिजेत. स्वातंत्र्याची पहाट दिसल्या नंतर भारतीय धर्मांधांकडुन कसं शेण खाल्ल गेलं, नेमके कोणते अत्याचार कोणावर कसे झाले यावर चर्चेचा आज नक्किच दिवस न्हवे.

स्वातंत्र्यानंतर भारतियांनी जे शेण खाल्लं त्याची कारणमिमासां करण्याची नेमकी हि वेळही न्हवे. ज्यांनी परक्यांविरुध्द उत्कृष्ट लढा दिला त्यांचे त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कार्याबद्दल पुण्यतिथी दिवशी फक्त कौतुकच झाले पाहिजे, अन्यथा तो भारत देशाचा अपमान होय, एक प्रकारे राष्ट्रद्रोहच. आणि त्यांच्या ज्या वर्तनाचा आपल्यांना जो काही त्रास झाला त्यावर विचारमंथनाला ३६५ दिवस आहेतच की अगदी मस्त कमानी उभारुन फ्लेक्स लावुन ही कविता भारतियांच्या समोर आणुया, पण ते उरलेले ३६५ दिवस. आजचा दिवस हा परकीयांना कशी माघार घ्यायला लावली त्याचं कौतुक करण्याचाच होयं. धागा खरं तर अप्रकाशित केला जावा.

अनुराधा१९८०'s picture

1 Feb 2013 - 10:09 pm | अनुराधा१९८०

आजचा दिवस हा परकीयांना कशी माघार घ्यायला लावली>>> कसली माघार आणि काय? भारतात एकावेळी १ लाख इंग्रज पण नसायचे ( हे खरे आहे अतिशयोक्ती नाही ). त्यांनी जे काही राज्य केले ते संपूर्ण पणे भारतीय सैन्य आणि भारतीय पोलिसांच्या बळावर. सैनिकांच्या मनात आले असते तर एका क्षणात इंग्रजांना राज्य सोडावे लागले असते. त्यामुळे जो काही so called लढा करावा लागला तो भारतीय लोकांविरुद्ध.

नितिन थत्ते's picture

2 Feb 2013 - 10:11 am | नितिन थत्ते

गांधींचेच विचार तुम्ही सांगताय असं नाही वाटत तुम्हाला?

जसे भारतात एका वेळी १ लाखाहून अधिक इंग्रज नसायचे तशीच भारतीय सैन्य आणि भारतीय पोलीस यांची संख्याही फार नसायची (१० कोटी जनतेच्या तुलनेत). भारतीय इंग्रजांना 'सहकार्य' करतात म्हणून इंग्रज राज्य करू शकतात हेच तर गांधी सांगत होते. त्यासाठीच असहकार वगैरे चळवळी.

भारतीयांनी सहकार्य न करण्याची अंतिम परिणतीच 'नाविकांच्या बंडाच्या' रूपाने पहायला मिळाली. नाविकांच्या बंडामुळे स्वातंत्र्य मिळाले असे नाही. कारण नाविकांचे बंड झाले तोवर स्वातंत्र्य हे अगोदरच 'जस्ट राउंड द कॉर्नर' होते. कदाचित त्या बंडाने प्रक्रियेला वेग आला असू शकेल.

जहालमतवादी नेते लोकमान्य टिळक ह्यानी खरेतर जनतेचा ब्रेनवॉश करायला हवा होता व इंग्रजांविरोधात आघाडी उघडुन भारत स्वतंत्र्य करायला हवा होता. त्याच्या चुकीचे खापर तुम्ही गांधीजीच्या माथी का मारता आहात.गांधीजी नी दुसरा मार्ग निवडला आणि तो यशस्वी केला.

आनन्दिता's picture

31 Jan 2013 - 4:15 am | आनन्दिता

सहमत... धागाकर्त्याने आपल्या नावाला जागायला वर्षाचे बाकीचे दिवस वापरावेत.. !!

बोलघेवडा's picture

31 Jan 2013 - 6:30 am | बोलघेवडा

अतिशय अप्रस्तुत आणि खोडसाळ विकृत धागा. मरणानंतर वैर संपत / संपवावं असं आपली संस्कृती सांगते. संपादक महोदयांनी कृपया लक्ष द्यावे. हा धागा अप्रकाशित करण्यात यावा. जमल्यास हिटलर यांचे सदस्यत्व काढून घ्यावे हि विनंती.

गांधींशी माझ वैर नाहीय. पण नथूराम यांनी गांधीहत्या का केली हे देखील लोकांना कळल पाहिजे. तो कुणी माथेफिरू नव्हता. कवितेत गांधीना उद्देशून एकही अपशब्द नाहीय.ज्या दिवशी हि घटना घडली तो दिवस मला योग्य वाटला हा धागा प्रकाशित करण्यासाठी. गांधींचा अवमान करण्याचा हेतू नाही हे स्पष्ट करतो.

विकास's picture

31 Jan 2013 - 9:54 am | विकास

कवितेत गांधीना उद्देशून एकही अपशब्द नाहीय.
म्हणून अपकृत्य अर्थात गोळ्या झाडणे चालते का?

तो माथेफिरू नसेल कदाचीत पण शस्त्रहीन व्यक्तीची आणि ते देखील देशभक्ताची (शत्रूची नाही) हत्या करणारा, म्हणूण खुनी नक्कीच होता. त्यामुळे त्याचे कुठल्याही प्रकारचे समर्थन असमर्थनीय आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

31 Jan 2013 - 11:01 am | परिकथेतील राजकुमार

तो माथेफिरू नसेल कदाचीत पण शस्त्रहीन व्यक्तीची आणि ते देखील देशभक्ताची (शत्रूची नाही) हत्या करणारा, म्हणूण खुनी नक्कीच होता. त्यामुळे त्याचे कुठल्याही प्रकारचे समर्थन असमर्थनीय आहे.

अधिकारहीन सदस्यांची मते, ही एखाद्या अधिकार्‍याला खोडसाळ वाटतात म्हणून अधिकाराचा वापर करून उडवली जातात तेंव्हा ते समर्थनीय असते काय?

येथे म्हणल्याप्रमाणे : "येथे एक खुलासा करणे आवश्यक आहे की सल्लागार हे संपादक नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी संपादकीय विषयावर चर्चा न करता अन्य विषयांबाबत त्यांचा सल्ला घेऊ शकता." :-)

परिकथेतील राजकुमार's picture

1 Feb 2013 - 10:59 am | परिकथेतील राजकुमार

विकासशेठ माफी करा बरं का. तो प्रतिसाद तुम्हाला उद्देश्यून नाही, तर तुमच्या वाक्यांची मदत घेऊन अधिकारी लोकांना प्रश्न विचारायचा प्रयत्न होता. प्रतिसादाखाली खुलासा करण्याचाच राहून गेला. अर्थात हा प्रतिसाद लिहिताना तुम्ही 'सल्लागार' आहात हे बिलकूल देखील डोक्यात नव्हते.

विकास's picture

1 Feb 2013 - 9:41 pm | विकास

नो प्रॉब्लेमो! :-)

अनुराधा१९८०'s picture

1 Feb 2013 - 10:02 pm | अनुराधा१९८०

गुन्हेगारा ला फाशी ही शिक्षा भारतात अजुन चालू आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Feb 2013 - 10:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अधिकारहीन सदस्यांची मते, ही एखाद्या अधिकार्‍याला खोडसाळ वाटतात म्हणून अधिकाराचा वापर करून उडवली जातात तेंव्हा ते समर्थनीय असते काय?

एकदम बरोबर प.रा.शेठ :)...आपल्याकडे रिकामटेकडे कार्यकर्ते आहेतच अधिकाराचे गैरवापर करणारे.

सुनील's picture

1 Feb 2013 - 11:39 pm | सुनील

रिकामटेकडे कार्यकर्ते

ऑक्झिमोरॉन आवडून गेला ;)

बाकी, "काश्मिर" होण्याचे पोटेन्शियल ह्या धाग्यात आहे. तेव्हा पॉपकॉर्न घेऊन बसावे, हे उत्तम!!

अनुराधा१९८०'s picture

1 Feb 2013 - 9:59 pm | अनुराधा१९८०

ते देखील देशभक्ताची (शत्रूची नाही)>> दिल को खुश करनेको गालिब ये खयाल अछा है. :-)

५० फक्त's picture

2 Feb 2013 - 10:59 am | ५० फक्त

दिल को खुश करनेको गालिब ये खयाल अछा है.

व्याकरणदृष्ट्या हे वाक्य ' दिल खुश करनेको गालिब ये खयाल अच्छा है' असं असायला हवं होतं बहुधा.

अवांतर - तेच तेच वाद घालुन कंटाळा आल्यानं मराठी संस्थळांवरच्या हिंदित लिहिलेल्या उर्दुचं व्याकरण' या विषयावर वाद सुरु करावा ही इच्छा आहे म्हणुन हा प्रतिसाद.

चिगो's picture

2 Feb 2013 - 1:56 pm | चिगो

व्याकरणदृष्ट्या हे वाक्य ' दिल खुश करनेको गालिब ये खयाल अच्छा है' असं असायला हवं होतं बहुधा.

माझ्या ऐकण्यात हे "दिल को खुश रखनेको गालिब ये खयाल अच्छा हैं" असं आहे..
( संदर्भ : "इक बराम्हण ने कहा हैं, के ये साल अच्छा हैं" ही जगजीतसिंगानी गायलेली गझल.. आणि त्यात "बराम्हण" असंच म्हटलंय.." )

बाकी कविता पटली नाही.. आणि वर ज्यांनी ज्यांनी "गांधीजींना देशाने अव्हेरले असते" असे म्हटले आहे, ते पटवून देऊ शकतील का? आणि "गांधीवाद्यांची" बिलं गांधींच्या नावाने फाडणं, म्हणजे "डार्विनच्या माकडांचा नंगानाच" टायपातलं होणार.. ;-)

गांधींजींची म्हणुन जी तीन माकडं आहेत त्यांचा आणि डार्विनचा काही संबंध आहे काय ?

बोलघेवडा's picture

31 Jan 2013 - 8:06 am | बोलघेवडा

एखाद्या माणसाची हत्या झाल्यावर, त्याच्या पुण्यतिथीला तुम्ही श्रद्धांजली वाहणार कि त्याचा खून करणाऱ्याच मनोगत लिहिणार? मनोगत लिहियाला ना नाही. पण आजच हा दिवस मात्र खचितच श्रद्धांजली वाहून स्मरण करण्याचा आहे. तो संकेत तुम्हाला पाळता आला नाही. तुम्ही एका सार्वजनिक संस्थळावर लिहित आहात हे भान सुटू द्यायला नको होते.

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2013 - 9:50 am | llपुण्याचे पेशवेll

तो ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीचा प्रश्न नसावा का? एखाद्याला तो त्या मृत व्यक्तीच्या तथाकथित कर्तृत्वाला स्मरण्याचा दिन वाटेल तर एखाद्याला तो त्या व्यक्तीप्रमाणे कसे वागू नये हे स्मरण करण्याचा असेल. काय करायचे हे ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीवर अवलंबून. म्हणूनच बाळ ठाकरे गेल्यावर (आमच्या दृष्टीने) खोडसाळ)विधाने करणार्‍या फारूख ढोंडी या कन्येस आम्ही काही केले नाही. नंतर तथाकथित सर्वोच्च न्यायालय (का कुठले न्यायालय) यांनी पोलिसांना दोषी ठरवल्यावर तथाकथित अभिव्यक्ती वाल्यांनी जो काय जल्लोष केला त्यावरही आम्ही काही केले नाही. त्यामुळे इथेही काही करणार नाही. धागाप्रवर्तकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करून टंकुमटंकुम अन्यथाटंकुम याच न्यायाने धागाप्रवर्तकाचा त्याच्या दृष्टीने प्रबोधनाचा हक्क मान्य करून पुढे गेलो.

आजानुकर्ण's picture

31 Jan 2013 - 9:54 am | आजानुकर्ण

आमच्या दृष्टीने) खोडसाळ)विधाने करणार्‍या फारूख ढोंडी या कन्येस आम्ही काही केले नाही.

असे काही करण्याचे काही विशेष अधिकार आपणाकडे आहेत काय की ते आपण जाणूनबुजून वापरले नाहीत?

llपुण्याचे पेशवेll's picture

31 Jan 2013 - 9:57 am | llपुण्याचे पेशवेll

असो, असे काही विचारण्याचा अधिकार आपल्याकडे आहे असे मला न वाटल्याने पास.

आजानुकर्ण's picture

31 Jan 2013 - 10:03 am | आजानुकर्ण

धन्यवाद. उत्तर मिळाले. :)

बन्या बापु's picture

1 Feb 2013 - 11:59 am | बन्या बापु

सर्व सन्मानीय सदस्यांची आधी माफी मागून मग आपला विचार मांडत आहे..

गांधी, सावरकर, गोडसे आपल्या पचनी पडले आहेत असा गोड गैरसमज करून उगाच नको ते फाटे फोडण्यात काहीही हशील नाही.

मुळात आपल्या कबुलीजबाबात गोडसे ह्यांनी "गांधी वधाची" कबुली दिली आहे, "गांधी हत्येची" नाही. गोडसे ह्यांनी महात्मा गांधीचे कर्तुत्व कमी लेखले नाही. हिंदू राष्ट्राच्या त्यांच्या संकल्पनेला गांधींचे फाळणी पुरस्कृत धोरणाने तडा गेला म्हणून हे अप्रिय कार्य त्यांनी केले अशी नोंद दिलेल्या जबानीत दिसून येते.

गांधी हत्येची निंदा करून आणि गोडसे द्वेष करून गेल्या ५० वर्षात भारतातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाने देशाचा किती उद्धार केला आहे हे जगजाहीर आहे. त्यात शब्दांची भर घालण्यात अर्थ नाही.

पेशवे म्हणाले त्या पुढे जाऊन असे म्हणेन कि आपण कितीही मोठे लेखक झालो तरी गांधी, सावरकर, गोडसे आणि समकालीन legends बाबत आपण भाष्य करणे योग्य ठरणार नाही. त्यांच्या विचारांचे रसग्रहण करता आले तरी आयुष्य सार्थकी लागेल.

युध्य जिंकण्यासाठी अर्जुनाने स्वकीयांचा वध केला म्हणून तो नराधम ठरत नाही....... उगाच शब्दाला शब्द जोडून अर्थहीन तर्क करणे मला तरी चुकीचे वाटते.

बन्या बापु.

अवांतर:

माझ्या छटाकभर वाचनात आलेले गांधी जेवढे मला प्रिय आहेत, तेवढाच आदर मला गोडसे आणि विशेषतः त्यांच्या सावरकर भक्ती बद्दल ही आहे.

खिक्
गांधी, सावरकर, गोडसे आणि समकालीन legends बाबत आपण भाष्य करणे योग्य ठरणार नाही
गांधी, सावरकर समजू शकतो पण त्या महापुरूषांच्या जोडीला तो गोडसे!! वाचून डोळे पाणावले आणि कीव करावीशी वाटली.

बन्या बापु's picture

2 Feb 2013 - 9:23 am | बन्या बापु

आपल्या देशात व्यक्ती आणि मत स्वातंत्र्य आहे.. प्रत्येक नाण्याला दसरी बाजू असतेच.. आपण कितीही नाकारली तरीही...

अप्रतिम's picture

2 Feb 2013 - 10:10 am | अप्रतिम

सहमत आहे.कसाब आणि अफजल गुरुचि पण दुसरी बाजू आहे.

बन्या बापु's picture

2 Feb 2013 - 10:37 am | बन्या बापु

असणारच.. त्याशिवाय कोणीही उठून आत्मघात करणार नाही..

जसे गांधी आपल्याला प्रिय तसे कायदेआझम त्यांना..

आपल्या संसदभवनात कायदेअझामांचा फोटो आहे.. त्यांच्याकडे गांधींचा आहे का मी बघायला गेलो नाही.. पण कुतूहल जरूर आहे.

आजानुकर्ण's picture

1 Feb 2013 - 10:07 pm | आजानुकर्ण

गांधी हत्येची निंदा करून आणि गोडसे द्वेष करून गेल्या ५० वर्षात भारतातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाने देशाचा किती उद्धार केला आहे हे जगजाहीर आहे. त्यात शब्दांची भर घालण्यात अर्थ नाही.

गेल्या ५० वर्षात देशाचे नेमके काय वाईट झाले आहे ते जगजाहीर असूनही मला कळलेले नाही याचे आश्चर्य वाटले. निदान जगजाहीर असल्याचे तुम्ही सांगता म्हणजे तुम्हाला माहीत असेलच. तेव्हा हे नक्की काय वाईट झाले आहे ते कळेल काय? त्याच कालावधीच्या दरम्यान स्वातंत्र्य मिळालेली आफ्रिका व आशियातील इतर राष्ट्रे, व विशेषतः आपले शेजारी देश यांच्या तुलनेत भारत पुढे आहे की मागे?

तुम्ही सावरकरांचा उल्लेख केला, व त्यांच्याबद्दल आदर वाटतो हेही लिहिले आहे. सावरकरांचे देशभक्तीव्यतिरिक्त एक दुसरे कार्य म्हणजे मराठीची भाषाशुद्धी. तुम्ही प्रतिसादात कर्तुत्व किंवा युध्य हे शब्द लिहिले आहेत, ते सावरकरांना निश्चितच खटकले असते असे वाटते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

1 Feb 2013 - 10:53 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

गेल्या ५० वर्षात देशाचे नेमके काय वाईट झाले आहे ते जगजाहीर असूनही मला कळलेले नाही याचे आश्चर्य वाटले.

डोळ्यांवरची कवचकुंडल काढली तर काय चाल्लय ते दिसेल की...सत्तेसाठी कसली कसली गणितं जमवतं आहेत हे तुम्हाला जर जगजाहीर असुन माहीत नसेल तर औघड आहे बघा. :)...!!

शुद्धलेखनातील चुका दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

संदर्भ गोडसेंना असलेल्या सावरकर भक्तीचा होता, माझ्या नाही..

राहिला प्रश्न तुम्ही विचारलेला.. गेल्या ५० वर्षात न सुटलेली काही कोडी:

- आजही भारतातील प्रत्येक गावात, घरात वीज नाही.
- आजही भारतात लोकांना वापरासाठी पाणी मिळत नाही.
- महासत्ता असलेला भारत अजून "Infrastructure " मध्ये मागे आहे.
- श्रीमंत अजून श्रीमंत आणि गरिबाने २६ रुपयात जेवावं असे महासत्तेच्या महामंत्रांना वाटता आणि ते जाहीरपणे त्याची समर्थने करतात.
- आपल्या महासत्तेत ५५ Billionaires आहेत, ज्यांची प्रत्येकाची असेट व्हयालू ३.४ Billion $ आहे आणि तरीही ७५०,००० हून अधिक बांधव ह्या महासत्तेत दरदिवशी उपाशी झोपी जातात ( त्यांच्या कडे पर्याय नसतो).

आणि हे सर्व घडत असताना आपण आपली बरोबरी आफ्रिका, इंडोनेशिया सारख्या देशांची करतो आणि म्हणतो कि बघा आमची महासत्ता किती पुढे गेली आहे.

लहानपणी शिक्षक एक सुविचार सांगत त्याचा अर्थ तेवढा लक्ष्यात आहे " आपल्या प्रगतीचे मोजमाप आपल्याहून कमी असलेल्यांशी करू नये. त्याने गर्व वाढतो, आपल्याहून प्रगत असेल्यांशी तुलना करा, त्याने प्रगती करण्याची जिद्द नक्कीच वाढेल"

असो..

शुद्धलेखनात प्रगती करण्याचे सर्व प्रयत्न करेन.. आणि ह्या प्रतिसादात इंग्रजी शब्द वापरल्या बद्दल क्षमस्व...

बन्या बापु

ताजा कलम :

विषयांतर होते आहे तरीही महासत्तेचे प्रगती पुस्तक आणि त्यावर तज्ञ मंडळीचे विचार तूनळी (youtube ) वर "Many Securities + P sainath " असे शोधल्यावर उपलब्ध आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2013 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या प्रगतीचे मोजमाप आपल्याहून कमी असलेल्यांशी करू नये. त्याने गर्व वाढतो, आपल्याहून प्रगत असेल्यांशी तुलना करा, त्याने प्रगती करण्याची जिद्द नक्कीच वाढेल"

अहाहा सुंदर.

बाकी........माझी उत्तरं

- आजही भारतात लोकांना वापरासाठी पाणी मिळत नाही. (चूक)
- महासत्ता असलेला भारत अजून "Infrastructure " मध्ये मागे आहे. (चूक)
- श्रीमंत अजून श्रीमंत आणि गरिबाने २६ रुपयात जेवावं असे महासत्तेच्या महामंत्रांना वाटता आणि ते जाहीरपणे त्याची समर्थने करतात. (चूक)

-दिलीप बिरुटे

सर

अभ्यास वाढविण्यासाठी काही संदर्भ दिलेत तर चुका कमी होतील..

आपला नम्र

बन्या बापु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Feb 2013 - 11:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बन्या बापू, माझ्याकडे कोणतेही संदर्भ नाही. म्हणून माझं व्यक्तिगत मत असं म्हटलं.

मला वाटतं वीज जवळ जवळ सर्व गावात वीज पोहचली आहे. आता ती चोवीस तास नसेल. एखाद्या गाव किंवा एवढ्या मोठ्या भारतात पाचेक टक्के अशी गावे असतील जिथे वीज पोहचत नाही. वीज न पोहचण्याची कारणं वगैरे ते वेगळं. आपण सरळसोट विधान करतो म्हणून आपल्याला तसं वाटतं अर्थात माझ्या विधानालाही कोणतेही संदर्भ नाही.

राहीलं "Infrastructure " चं आपण म्हणालात तसं आपण तुलना कोणाशी करायची. एक दोन प्रगत राष्ट्रांची की आपण गेल्या पाच पन्नास वर्षात आपल्या सोबत असलेल्या राष्ट्रांची ? आपण तुलनेत बरे आहोत. [संदर्भ नाही]

२६ रुपयात अगदी जेवणाची 'थाळी' मिळणार नाही. पण, पोटात काही ढकलण्यासाठी नक्कीच पुरे आहेत, असे वाटते. अर्थात हा विचारही तसा व्यक्तिसापेक्ष असा आहे.

'महासत्तेचे प्रगती पुस्तक आणि त्यावर तज्ञ मंडळीचे विचार काय आहेत, हे समजून घ्यायला नव्या धाग्यावर वाचायला नक्कीच आवडेल.

-दिलीप बिरुटे

बन्या बापु's picture

2 Feb 2013 - 11:18 am | बन्या बापु

सर
ह्याबाबत आपले दुमत..

वादासाठी वाद ना घालता फक्त एवढेच की वाचनात आलेले "World HRD report ", WHO ने केलेले सर्वेक्षण आणि त्याचे निकाल, तसेच काही जर्मन मित्रांनी एका NGO साठी केलेले सर्वेक्षण आणि Koln मध्ये त्यावर झालेला परिसंवाद ( ज्याला Planning comission चे काही माजी अधिकारी उपस्थित होते ह्यात कुठेही मी वर दिलेली माहिती चुकीची आहे असा संदर्भ मला मिळाला नाही.

बाकी सर्वात सोपा आणि विचार करायला लावणारा संदर्भ तू नळी वर आहेच.

आपला नम्र

बन्या बापु

सुजित पवार's picture

2 Feb 2013 - 2:15 pm | सुजित पवार

वीज पोचलि पन मिळत नाहि..१२-१५ तास लोड शाडिन्ग...

युध्य जिंकण्यासाठी अर्जुनाने स्वकीयांचा वध केला म्हणून तो नराधम ठरत नाही....... उगाच शब्दाला शब्द जोडून अर्थहीन तर्क करणे मला तरी चुकीचे वाटते.

नथुराम गोडसे ला अर्जुन अन त्याने केलेल्या क्रुत्याला महाभारताच्या युद्धाची महान उपमा देण्याआधी हा विचार जरुर करा की नथुराम ज्या प्रकारच्या विचारसरणी चे प्रतिक आहे त्या लोकां ची संख्या टिचभर ही नव्हती.. याऊलट ज्या गांधींना त्याने भ्याडपणे मारले ते उरलेल्या सर्व देशासाठी (यात करोडो हिंदू अन मुसलमान दोन्ही येतात) एका देवापेक्षा कमी नव्हते.. प्रचंड मोठ्या समुदयाच्या भावनांना गांधींबरोबरच तिलांजली मिळत असेल तर तसं करणार्याने त्याला वध वगैरे सारखी कितीही सोज्वळ नाव दिली तरीही तो एक 'भ्याड खुन च' होता हे सत्य बदलणार नाही.. यात जर कोणी गोडसेप्रेमी त्याची देशभक्ती शोधत असेल तर सर्व भारतीयांना स्वातंत्र्यलढ्यात आणणार्या गांधींना देशभक्तांमधे सर्वात अग्रणी मानलं गेलंच पाहीजे. अन त्यांचा खून कधीही समर्थनीय होऊ शकणार नाही!!

काळा पहाड's picture

1 Feb 2013 - 11:59 pm | काळा पहाड

संख्या टिचभर

बरोबर आहे. ज्या लोकांच्या हत्येला अप्रत्यक्षपणे गांधी कारणीभूत ठरले, त्या लोकांमध्ये सुद्धा 'त्या' प्रकारच्या विचारसरणी चे लोक टिचभरच होते. त्यामुळे नथुराम ला त्यांची बाजू घेऊन आत्मघात करायची काहीच गरज नव्हती. किंबहुना हा धडा नथुराम नंतरच मिळाला आहे की अशा लोकांनी मेल्यास टिचभर लोकांचे काहीच जात नाही. त्या उरलेल्या करोडो लोकांनी खुशाल मरावं. नव्हे, त्यांनी मेलंच पाहीजे. कारण तीच त्यांची लायकी आहे.

५० फक्त's picture

2 Feb 2013 - 11:02 am | ५० फक्त

खरोखरीच डोकं सुन्न करणारा प्रतिसाद.

आनन्दिता's picture

3 Feb 2013 - 8:16 am | आनन्दिता

या प्रतिसादाला प्रत्युत्तर देऊन मी माझ्या शब्दांचा अपमान करुन घेणार नाही..

वसईचे किल्लेदार's picture

1 Feb 2013 - 10:16 pm | वसईचे किल्लेदार

हा हा हा ... आरं ते हिटलर पल्लं काड्या टाकुन ... नं आपु कनाला तरास करुन झयाचा?
पौना भेटल्यावं बगु कि मंगशेक!

विकास's picture

1 Feb 2013 - 10:25 pm | विकास

असं बर्‍याचदा होते आणि मग मला पुलंनी "म्हैस" लिहून कसा द्रष्टेपणा दाखवला हे जाणवते.

बाबा पाटील's picture

1 Feb 2013 - 11:33 pm | बाबा पाटील

सैतानाचे उदात्तीकरण कशासाठी ? आधीच देशात बाहेरचे हल्ले कमी होत आहेत म्हणुन अश्या प्रवृतींचे स्तोम माजवले जात आहे का ?

अनुराधा१९८०'s picture

1 Feb 2013 - 11:45 pm | अनुराधा१९८०

पाटिल - तुमचा सैतान वेगळा आणि आमच्या साठी सैतान वेगळा.

अनुराधा१९८०'s picture

1 Feb 2013 - 11:47 pm | अनुराधा१९८०

नथुरामांसारख्या प्रवृत्तीला वाईट ठरवण्याच्या राजकारणा मुळेच देशात बाहेरचे हल्ले होत आहेत.

नथुराम नुसता वाइट नाही तर एक विकृती आहे.आणी विकृतींकरिता उपचारांची गरज आहे

बाबा पाटील's picture

1 Feb 2013 - 11:49 pm | बाबा पाटील

देश तरी नक्की एकच आहे ना ? मी तरी हिंदुस्थानातच राहतो, आनी देशविघातक कृत्य करणारा प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठीतरी सैतानच......

वेताळ's picture

2 Feb 2013 - 1:14 pm | वेताळ

नथुराम,कसाब आणि अफजल गुरु हे एकाच माळेचे मणी आहेत.याचे लोक कौतुक कसे काय करु शकतात कळत नाही.

बॅटमॅन's picture

2 Feb 2013 - 4:08 am | बॅटमॅन

आईचा घो त्या नथुरामी कवितेच्या. हा धागा पाहून आधी करमणूक झाली, नंतर मात्र किळस आली. असो. आमची उन्नती अजून झाली नसल्याचेच हे लक्षण आहे असे म्हंतो आणि इनो घेऊन गपगुमान बसतो तेच्यायला.

परिकथेतील राजकुमार's picture

2 Feb 2013 - 10:28 am | परिकथेतील राजकुमार

आईचा घो त्या नथुरामी कवितेच्या.

'मिपावरती लोकशाही नाही' असे म्हणणार्‍यांसाठी ही प्रतिक्रिया म्हणजे एक चपराक आहे.

स्पंदना's picture

2 Feb 2013 - 8:14 am | स्पंदना

काय झालयं आता स्वातंत्र्य मिळालय. ते ही तुम्हां आम्हाला झळ न पोहोचता. मग उरल काय? तर उचलली जीभ अन लावली टाळ्याला. ते करायला काही विषेश श्रम पडत नाहीत. असेल एव्हढी रग तर उतरा सक्रिय राजकारणात, सोडा तुमच्या ऐषोआरामाच्या एमएनसी नोकर्‍या अन करा थोडा फार प्रय्त्न त्या महात्म्याच्या अंगावरच्या पंचाच्या सुताशी तरी बरोबरी करण्याचा. मग बघु. उगा कुठेही काहिही घरबसल्या कॉपी पेस्ट करता येतं म्हणुन लिहायच आपलं. नुसता वाचाळ्पणा.

बन्या बापु's picture

2 Feb 2013 - 10:45 am | बन्या बापु

अगदी बरोबर अपर्णाताई ...

पण काय गम्मत आहे न.. आपला मध्यमवर्ग ( पांढरपेशा समाज ) अश्या झगडणाऱ्या लोकांना वेड्यात काढतो हो.. आणि जी समाजव्यवस्था ( दुर्व्यवस्था म्हणायचे होते ) गांधीवादी सरकारने करून ठेवली आहे ना, त्यात ओवैसी सारखे निवडून येतात आणि तेच येऊ शकतात.

लोकशाही मध्ये यथा प्रजा तथा राजा हा न्याय लागू होतो.

दे दि हमे आझादी बिन खड्ग ढाल ? असं असेल तर ज्यांनी देशासाठी बलिदान दिल ते व्यर्थ ठरेल.
देश तोडून मागितला आपण दिला..... पण गांधी हट्टामुळे हा विषवृक्ष मुळासकट कापून न टाकता त्याला खतपाणी घातलं कॉंग्रेसने. द्रष्टेपणा नव्हता मिस्टर गांधींकडे. म्हणून हि अधोगती चाललीय.
विश्वरूपम हा कमल हसन यांचा सिनेमा मी अद्याप पाहिलेला नाही पण censor boardne ज्या सिनेमाला हिरवा कंदील दाखवला आहे त्याला विरोध करणारे हे कोण?
उद्या हिंदुद्वेष्ट्या ओवेसीने केलेल्या भाषणासाठी हे लोक राष्ट्रपती परितोषीकाची पण मागणी करतील.
हि अतिशयोक्ती नाहीय. हिंदुनी आता किती सहिष्णू असाव याचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.
आओ जाओ घर तुम्हारा हे बंद झालं पाहिजे. सर्वधर्मनिरपेक्ष असं काही असेल तर समान नागरी कायदा तरी व्हायलाच पाहिजे.

ह्म्म... रोचक चर्चा चालु आहे.
मला व्यक्तीश:गांधींचे सर्वच विचार पटत नाही,त्यात अंहिंसा हा विचार ! आत्म संरक्षण हा प्रत्येक प्राण्याचा (मनुष्या सकट) अंगिभूत गुणधर्म आहे असे मला वाटते,आणि अश्या क्षणी ( आत्म संरक्षण करतना) हिंसा होउ शकते.
समोरचा शस्त्र घेउन तुमचे मुंडके उडवायला आला आणि तुम्ही त्याचे मनःपरिवर्तन होईल असे विचार घेउन बसलात तर तुंमचे शिर धडावेगळे व्ह्यायला क्षणाचाही विलंब लागणार नाही.(क्वचितच एखादा अपवाद असु शकतो.)
जेव्हा मोठ्या प्रमाणात हिंदुंवर अत्याचार होत होते,हिंदु स्त्रीयांवर बलात्कार होत होते तेव्हा गांधींजींनी हिंदुंना सांगितले की तुम्ही विरोध करु नका,स्त्रीयांनी बलात्कार करणार्‍याला विरोध करु नये असे त्यांनी म्हंटले !
संदर्भ :-
6th July, 1926, edition of the Navajivan, Gandhi wrote: “He would kiss the feet of the (Muslim) violator of the modesty of a sister” (D Keer, Mahatma Gandhi, Popular Prakashan, p. 473). Just before the partition, when both the Hindu and Sikh women were being raped by Muslims in large numbers in West Punjab, Gandhi advised them that if a Muslim expressed his desire to rape a Hindu or a Sikh lady, she should never refuse him but cooperate with him. She should lie down like a dead with her tongue in between her teeth, advised Gandhi (Lapierre and Collins, p. 479).
आज जेव्हा हिंदुस्थानात स्त्रीयांवर बलात्कार होत आहेत,तेव्हा बलात्कार्‍याला फाशी किंवा त्याचे लिंग कापुन टाकण्याची भाषा केली जाते,पण मग गांधींजींची तत्वे लागु करायची झाली तर्,पहिले त्याचे मनःपरिवर्तन केले पाहिजे आणि त्याला फाशी देता कामा नये,कारण ती हिंसा ठरेल.

स्वामी श्रद्धानंद यांनी शुद्धी यज्ञा द्वारे मुसलामान झालेल्या हिंदुंना परत हिंदु करण्यासाठी शुद्धी यज्ञ सुरु केला होता,त्यांचा खुन अब्दुल रशीदने केला,त्याला गांधींजींनी हाक मारली "भाई अब्दुल रशीद" मग मला प्रश्न पडतो अशी हाक नथुराम गोडसेला गांधीवादी मारु शकतील का ?
तसेच मीर आलम याने 10th February 1908 रोजी गांधींजींना मारले (लाथा बुक्यांनी / काठ्यांनी) आणि त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. या व्यक्ती बद्धल कुठेही विरोध झाल्याचे मला ठावुक नाही.

आता गांधींजींच्या सत्याचे प्रयोगचा उल्लेख वरती एका प्रतिसादात आला म्हणुन काही इतर माहिती इथे देतो...

Sarla devi
(फोटो जालावरुन घेण्यात आलेला आहे.)
गांधीजींचे अनेक स्त्रीयांशी संबंध असल्याचे म्हंटले जाते,त्यात एक नाव आहे सरला देवी.ही रविंद्रनाथ टागोरांच्या मोठ्या बहिणीची मुलगी.
सरलादेवी शिवाय गांधीजींचे इतर काही स्त्रियांबरोबर संबंध असल्याचेही बोलले गेले. यात ब्रिटिश एडमिरलची मुलगी मेडेलीन स्लेड, सुशीला नायर आणि दोन मानसकन्या मनु तथा आभा गांधी यांचे नाव आहे.
सत्याचे प्रयोग हे गांधींच्या कुटुंबियांना आणि आश्रमातल्या लोकांना आवडत नव्हते !
Satyache pryog
या प्रयोगात त्यांच्या "मानस कन्या"सुशीला नायर आणि मनु यांच्या सोबत नग्न होउन अंघोळ करणे,झोपणे असे प्रयोग केले.
आता मला एक प्रश्न पडतो की त्यांना "मानस कन्या" म्हणणे आणि आणि याच कन्यांबरोबर असे "सत्याचे" प्रयोग करणे हे कुठल्या तत्वात बसते ? शिवाय आधार घेण्यासाठी अनेक पुरुष मंडळी असताना त्यांना या दोघीच का लागायच्या ? ( हा खोडासाळपणे विचारलेला प्रश्न नाही याची कॄपया नोद घेतली जावी.)

काही संदर्भ :- Bharat: An Untold Story
Gandhi's Mindless Appeasement of Muslims and the Partition of India
मुलाने विरोध केला नसता तर गांधीजींचे झाले असते दुसरे लग्न!

***
माझ्या गांधींचा काही विचारांनाच विरोध आहे,आणि मी गांधी द्वेष्टा नाही. कुठल्याही व्यक्तीचा मग ते गांधींजी असोत वा नथुराम गोडसे यांच्या सर्व बाबी आणि विचार समजुन घेण्याचा माझा हा प्रयत्न आहे.

चेतनकुलकर्णी_85's picture

2 Feb 2013 - 7:36 pm | चेतनकुलकर्णी_85

आता मला एक प्रश्न पडतो की त्यांना "मानस कन्या" म्हणणे आणि आणि याच कन्यांबरोबर असे "सत्याचे" प्रयोग करणे हे कुठल्या तत्वात बसते ? शिवाय आधार घेण्यासाठी अनेक पुरुष मंडळी असताना त्यांना या दोघीच का लागायच्या ?
कारण महिलांची सहनशक्ती हि पुरुषां पेक्ष्या जास्त असते असे गांधी ने म्हंटले होते असे इतिहासाच्या पुस्तकात वाचलेले आठवते...
त्यांही हे अनुमान ह्याच प्रयोगावरून काढले असावे असे वाटतेय.....!!!

गदर पार्टीचा इतिहास,अभिनव भारत संघटना,अनेक क्रांतिकारकांची चरित्रे,बंगाल्यातली चळवळ,लाहोर,धाका,मेरठ इथली आंदोलने/कट याविषयीची माहिती,१८५७ च्या १००,१२५,१५० व्या स्मरण वर्षानिमित्त प्रसिद्ध झालेले अनेक विशेषांक मुद्दाम मिळवून वाचले आहेत.याशिवाय काँग्रेस प्रणीत चळवळीचे गोषवारे,मथितार्थ,इतिहास,अन्वयार्थही वाचले आहेत.हे सर्व आणि मी नथुराम,गांधीहत्या आणि मी,५५ कोटी,सहा सोनेरी पाने,वगैरे सर्व वाचल्यानंतर असे मत बनले आहे की सशस्त्र क्रांतिकारकांचे देशप्रेम जाज्ज्वल्य आणि वैय्यक्तिक चारित्र निष्कलंक होते याबद्दल शंकाच नाही आणि ते आदरणीय आहेतच.पण एकूणच त्यांची दूरदृष्टी कमी पडली.त्यांना या प्रश्नाची व्याप्ति समजली नाही असेही म्हणता येईल.तुरळक इथेतिथे एखाद्या इंग्रज अधिकार्‍याची हत्या करणे,तुरळक बाँबस्फोट करणे,एखादे जहाज मद्रास किनारपट्टीवर पाठवून त्यातून मद्रास किनारपट्टीवर मारा करून संपूर्ण मद्रास इलाका ताब्यात येईल अशी अपेक्षा करणे(वीणा गवाणकर यांच्या नाही चिरा नाही पणती या पुस्तकात या केविलवाण्या घटनेचे तपशीलवार वर्णन आहे.)हे सर्व प्रकार इंग्रज सत्तेला आव्हान देण्याइतपत पुरेसे नव्हते.हिटलर आणि जपानशी कॉमन कॉझ (हातमिळवणी?)करणे हे अदूरदृष्टी आणि मुत्सद्दीपणाच्या अभावाचे ठळक उदाहरण आहे. शिवाय रक्तरंजित विरोधाला इंग्रज हिंसेने उत्तर देऊ शकत होते.गांधीजींच्या अहिंसात्मक विरोधाला सामोरे जाताना मात्र ते गडबडले.सशस्त्र क्रांतिकारक देशातल्या संपूर्ण जनतेची सहानुभूती अथवा पाठिंबा मिळवू शकले नाहीत.उलट गांधींची चळवळ कान्याकोपर्‍यातल्या माणसाला सामावून घेऊ शकली,त्याच्यापर्यंत पोचू शकली,त्याचा आत्मसन्मान जागृत करू शकली म्हणून ती स्वातंत्र्यासाठीची प्रमुख चळवळ मानली गेली.सशस्त्र क्रांतिकारक नेहमीच एकांडे राहिले. आर्थिक चणचण,गुप्तहेरांचा ससेमिरा दोघांनाही सोसावा लागला.पण गांधीजींसाठी सामान्य गृहिणीने गळ्यातले मंगळसूत्र,हातांतल्या बांगड्या काढून दिल्या.हे प्रेम, हा पाठिंबा सशस्त्र चळवळ मिळवू शकली नाही.व्यापक रणनीती आणि दूरदृष्टीचा अभाव तसेच जनतेची सहानुभूती आणि पाठिंबा मिळवू न शकणे यामुळे हा लढा एकंदर स्वातंत्रचळवळीत प्रमुख स्थान मिळवू शकला नाही.देशभक्ती आणि शौर्य होते पण विवेक आणि धैर्य(पेशन्स्)कमी पडले (असे माझे मत आहे).

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2013 - 2:59 pm | बिपिन कार्यकर्ते

अतिशय सुंदर प्रतिसाद! वाह!

सुजित पवार's picture

2 Feb 2013 - 2:09 pm | सुजित पवार

गांधीं बद्दल आदर आहेच पन गोडसे यान्चा तितका द्वेश हि नाहि वाटत.
गांधीं एक व्यक्ति आनि त्यान्चे स्वातंत्र्य मिळन्यातिल योगदान या २ वेगळ्या बाबि आहेत. असहकार चळवळ किवा तत्सम मार्गाने स्वातंत्र्य मिळवुन दिले असते तर त्यान्च्या बद्दल अजुन जास्त आदर असता.
बाकि कसाब नि गोडसे यान्चि तुलना अमान्य. कसाब १ पुर्न समाजाच्या विरुद्ध तर गोडसे १ व्यक्ति विरुद्ध.
१९२२ मधे चौरी_चौरा नन्तर असहकार आन्दोलन का मागे घेतले? समाज स्वातंत्र्य उपभोग्न्यास योग्य नाहि म्हनुन? कि स्वताच्या तत्वा पेक्शा स्वातंत्र्य कामि किमतिचे वाटले?

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2013 - 3:10 pm | बिपिन कार्यकर्ते

"स्वताच्या तत्वा पेक्शा"

इथेच चूक.... ती तत्त्वं, स्ट्रिक्टली स्पिकिंग, त्यांनी शोधलेली नव्हती तर निरनिराळ्या विचारवंत आणि तत्त्वज्ञांच्या विचारांचा अभ्यास करून स्वीकारलेली होती... हे एक.... दुसरे म्हणजे ती तत्त्वे प्राणपणाने जपतच स्वातंत्र्य मिळवायचे आहे हा त्यांच्या लढ्याचा कॉर्नरस्टोन होता. स्वातंत्र्य थोडे उशिरा मिळाले तरी चालेल पण समाज अनुचित सवयी / अनाचार / अनैतिकता यांपासून दूर राहिला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. आणि आपल्याबरोबर लढणार्‍या प्रत्येकाने हे मान्य करूनच मग आपल्याबरोबर यावे असेच त्यांचे म्हणणे होते. चौरीचौरानंतर गांधीजींच्या निर्णयाशी विरोध दाखवत चालू ठेवायचे होते आंदोलन कोणीही! तसेही गांधीजींच्या विचारांना विरोध करून अथवा ते न स्वीकारता, आपापल्या मार्गाने लढणारे क्रांतिकारक व इतर पंथांचे लोक होतेच की... पण सत्य हेच आहे की जन-आंदोलनाच्या मार्गाने एखादे ध्येय साध्य करण्यासाठी जो जनाधाराचा रेटा लागतो तो उभा करणे (त्या काळात) केवळ गांधींनाच जमले... असो... "स्वताच्या तत्वा पेक्शा" या शब्दांत गांधीजी स्वार्थी होते वगैरे अशा अर्थाने बोलल्यासारखे वाटले म्हणून लिहिले...

(गांधीजी हट्टी होते वगैरे नेहमीचे आक्षेप खरेही आहेत.. पण चौरीचौर्‍याच्या वेळेसतरी त्यांचा हट्ट तत्त्वासाठी होता... आणि एका प्रमाणात हट्टीपणा असल्याशिवाय मोठे काही साध्यही करता येत नाही.)

सुजित पवार's picture

2 Feb 2013 - 3:30 pm | सुजित पवार

समाज अता परिपक्व आहे? स्वतन्त्र्या मिळताना त्यान्च्या लढ्यातिल प्रत्येकाला त्यान्चि तत्वे मान्य होति?
स्वातन्र्त्य हे आपनाला दुसर्या महायुध्या मुळे मिळाले असेच मला वाट्ते. या पेक्शा १९२० दरम्यान मिळले असते तर खुपच आदर वाढला असता...
१९३९ मधे सुभाषचंद्र_बोस यान्च्या काँग्रेस अध्यक्श पदा साठि का विरोध केला? केला ते केला त्याताहि त्यान्चा उमेदवार ति निवड्नुक हारला सुद्धा.

अहिंसेने देशाच्या सीमा आखता येत नाहीत. त्या तलवारीनेच आखता येतात. नेहरू-गांधी यांच्या अहिंसेच्या प्रयोगांमुळे जन्नत ए काश्मीर चा जहन्नुम ए काश्मीर झालाय. मी गांधीद्वेष्टा नाहीय पण कोणतीही व्यक्ती राष्ट्रापेक्षा मोठी असूच शकत नाही. समोरचा गोळ्या झाडतोय आणि आपण त्याच्यावर पुष्पगुच्छ उधळायचे? हि अहिंसा? अश्या दुर्बलांच्या अहिंसेचा काडीमात्र उपयोग होत नाही. आज अमेरिका जगातील सर्वश्रेष्ठ राष्ट्र आहे कारण सर्वात जास्त शस्त्रसाठा त्यांच्याकडे आहे. आज अमेरिकत शांतता आहे ( भारतापेक्षा तरी नक्कीच शांतता आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे) गांधीवध झाला नसता त्तर हैदराबाद आज स्वायत्त राष्ट्र झालं असत. हिंदुस्थानातच दुसरं पाकिस्तान.

हिटलर's picture

2 Feb 2013 - 2:40 pm | हिटलर

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते.

सुरेश भट

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2013 - 2:55 pm | बिपिन कार्यकर्ते

गांधीजीही महत्त्वाचे नाहीत आणि नथुरामही नाही.... खरं महत्त्व याचं आहे की आपण काय शिकतो त्यांच्याकडून... कोणाकडून सकारात्मक अर्थाने शिकता येतं कोणाकडून नकारात्मक अर्थाने... शिकणं महत्त्वाचं... बाकी मूळ कवितेवर आमचा हा उतारा.... ;)

वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीर पराई जाणे रे ।2।

पर दुःखे उपकार करे तोये, मन अभिमान न आणे रे ।।
सकल लोक मां सहुने वन्दे, निन्दा न करे केनी रे ।।
वाच काछ मन निश्चल राखे, धन-धन जननी तेरी रे ।।

वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीर पराई जाणे रे ।2।

समदृष्टि ने तृष्णा त्यागी, पर स्त्री जेने मात रे ।।
जिहृवा थकी असत्य न बोले, पर धन नव झाले हाथ रे ।।
मोह माया व्यापे नहि जेने, दृढ वैराग्य जेना तन मा रे ।।
राम नामशुं ताली लागी, सकल तीरथ तेना तन मा रे ।।
वण लोभी ने कपट रहित छे, काम क्रोध निवार्या रे ।।
भणे नर सैयों तेनु दरसन करता, कुळ एको तेर तार्या रे ।।

वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीर पराई जाणे रे ।2।

सुजित पवार's picture

2 Feb 2013 - 3:32 pm | सुजित पवार

+१...

हिटलर's picture

2 Feb 2013 - 3:11 pm | हिटलर

मिस्टर गांधीना इतरांच्याच वेदना, भावना समजत होत्या. हिंदुंवर अत्याचार झाले तरी हिंदुनी प्रतिकार करू नका अस सांगून समाजाला षंढ बनवल. अन्यायावर प्रतिकार हेच उत्तर असत मग तो हिंदुवर होवो किंवा मुसलमानांवर पण नाही आम्हाला महात्मा बनायचं होत आपण किती सहिष्णू, धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवायचं होत. गांधीवाद हा फक्त कागदावरच ठीक आहे. पण ह्या कॉंग्रेसने तो लोकांच्या रक्तात भिनवला आणि त्याच जोरावर त्याचं दुकान चाललय. आणि देश कुठे चाललाय हे तर आपण उघड्या डोळ्यांनी बघतोच आहोत.

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Feb 2013 - 3:17 pm | बिपिन कार्यकर्ते

भाई हिटलर, शांत व्हा! :)

हिटलरचे विचार मला आवडत नाहीत म्हणुन ,मी पण नथुरामाचाच मार्ग स्विकारु का ? मज्जा येईल ना !

हिटलर's picture

3 Feb 2013 - 9:22 am | हिटलर

बाबा पाटील आपण खरे गांधीभक्त शोभता... गांधीवध झाल्यानंतर अहिंसक गांधीभाक्तानी केलेली हिंसाच सांगते कि गांधीवाद तेव्हाच संपला.

टंकनदोष आहे.

बाबा पाटील's picture

3 Feb 2013 - 1:36 pm | बाबा पाटील

हिटलर आपली पाटीलकी आहे.आमच्या भाषेत अशीच उत्तरे मिळतात....

हिटलर आपली पाटीलकी आहे.आमच्या भाषेत अशीच उत्तरे मिळतात....

बंर्र, ओबीसी मध्ये जायला बघणारे पाटील की आत्महत्या वाले पाटील?

बाबा पाटील's picture

4 Feb 2013 - 11:43 am | बाबा पाटील

आम्ही आमच मुळ कधीच सोडत नाही,आणी काळ्या आईला सोडुन आत्महत्या तर कधीच नाय,नांगर आणी औत आमचा पिढीजात वारसा आहे आणी वेळ आली की त्याच्या तलावरीपन बनवता येतात्.....

श्रिया's picture

2 Feb 2013 - 4:54 pm | श्रिया

नथुराम गोडसेंचा विरोध गांधीजींच्या विचारांना होता. विचारांची लढाई विचारांनीच लढावी ह्या सूत्राचे महत्व भारतीय समाजालाही समजले होते. पण गोडसेंनी हे सूत्र नाकारून विचार करणार्‍या व्यक्तीची हत्या केली, ह्याचे समर्थन कसे होऊ शकते?
व्यक्तिद्वेषातून हत्येचा आधार घेत विचार संपविण्याचा प्रयत्न त्यानी केला पण गांधीजींच्या विचारांची हत्या करू शकले नाहीत.तसेच ह्या हत्येचे समर्थन करणारे गांधीजींचा फाळणीला पाठिंबा व पाकिस्तानला दिलेले काही कोटी ही कारणे सांगतात, पण गोडसेंनी १९३५ साली सुद्धा असाच प्रयत्न केला होता. त्यामागे गांधीजींचा वाढता करिश्मा व सर्व समाज स्तरातून मिळणारा पाठिंबा हेही कारण असु शकते.

काळा पहाड's picture

2 Feb 2013 - 5:29 pm | काळा पहाड

पण गोडसेंनी हे सूत्र नाकारून विचार करणार्‍या व्यक्तीची हत्या केली, ह्याचे समर्थन कसे होऊ शकते?

विचार अव्यक्त नसतात. ते व्यक्ती पासूनच जन्मतात. गेलाबाजार पुढचं नुकसान तर टळलं गेलं! काय माहिती या माणसाने पुढे आणि कशा कशा बाबतीत इमोशनल ब्लॅकमेल केलं असतं. या हत्येने उलट काँग्रेस ने व त्या वेळच्या सरकारने निश्बासच सोडला असेल. साप भी गया, लाठी भी नही टूटी. त्यांना आता एक महात्मा नावाचं चलनी नाणं मिळालं आणि विरोध करणार्‍यांचा पण बंदोबस्त करता आला.

गांधीजींच्या विचारांची हत्या करू शकले नाहीत

ते काम काँग्रेस ला करण्यासाठी राखून ठेवलं आहे.

त्यामागे गांधीजींचा वाढता करिश्मा व सर्व समाज स्तरातून मिळणारा पाठिंबा हेही कारण असु शकते

"टिचभर लोक सोडून" हे लिहायला विसर्लात वाटतं.

श्रिया's picture

2 Feb 2013 - 5:56 pm | श्रिया

विचार अव्यक्त नसतात. ते व्यक्ती पासूनच जन्मतात. गेलाबाजार पुढचं नुकसान तर टळलं गेलं! काय माहिती या माणसाने पुढे आणि कशा कशा बाबतीत इमोशनल ब्लॅकमेल केलं असतं.

तुमचा मुद्दा गांधीहत्येचे समर्थन करणारा वाटला, म्हणून एक प्रश्न, आत्ताच्या राजकारण्यांना आणि सो कॉल्ड समाजकारण्यांना कस रोखायला पाहिजे तुमच्यामते?.
यातल्या काहींचे विचार आणि कृती ही तर गांधीजींच्या विचारांपेक्षा देशासाठी कितीतरी भयानक आणि विध्वंसक आहे.

काळा पहाड's picture

2 Feb 2013 - 9:21 pm | काळा पहाड

यात समर्थन वगैरे काही प्रकार नाही. त्या वेळच्या सरकारने गांधीजींच्या मनमानी पणाला रोखण्याचं काम केलं नाही. मानवतावाद आणि प्रांतवाद या कायम एकमेकांच्या विरूद्धच उभ्या असणार. कारण दुसर्‍या प्रांताचे लोक पण मानव या कॅटेगेरीत येतात. एका ठराविक मर्यादे पर्यंत मानवता ठीक आहे, पण त्या पुढे सगळे उपाय वापरावे लागतात. गांधीजींचा मानवतावाद हा अतिरेकी प्रकारचा व राष्ट्रधर्माच्या आड येणारा वाटतो. त्यांचा हेकेखोरपणा, अहिंसे वर तत्वाचा मुलामा देऊन ते तत्व कटाक्षाने पाळणे, भारत सरकार वर पैसे देण्यासाठी दबाव आणणे हे महत्म्याला चालतात, पण ज्याला देश चालवायचा आहे, त्याल नाही. असा कोणीही अडथळा पोलादी पंज्याने दूर करणे ही शासनाची जबाबदारी असते. अमेरिका व इस्रायल या देशात हे तत्व कटाक्षाने पाळले जाते. कुणीही देशापेक्षा मोठा असू शकत नाही. परकीय तर नाहीच, पण कोणताही नागरिक सुद्धा नाही. देशांना आपल्या शत्रूंच्या नेत्यांच्या हत्या घडवाव्या लागतात आणि ते मुळीच चुकीचे नाही. विचार करा. गांधीजींनी जर सरकार वर दबाव आणला असता की सियाचीन ग्लेशीयर पाकिस्तान ला द्या नाही तर आमरण उपोषण करतो. तर? तर भारत सरकार ला झुकावं लागलं असतं. गांधीजी एककल्ली तर होतेच, पण अतिशय पॉवरफूल सुद्धा होते. या माणसाने सुभाषचंद्र बोस नावाच्या अतिशय हुशार माणसाला काँग्रेस अध्यक्षपणाचा राजीनामा द्यायला लावला होता. कारण? एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत म्हणून. जवाहर्लाल तडजोडीला तयार होते, सुभाष नव्हते. त्यामुळे पुढे आंतरराष्ट्रीय प्रश्न निर्माण झाल्यावर काय माहिती गांधीजींनी काय भूमिका घेतली असती? महात्म्यांची गरज लोकांना असते, देशाला नसते.

सुजित पवार's picture

3 Feb 2013 - 5:58 pm | सुजित पवार

छानच रितिने तुम्हि हे सर्व व्यक्त केले...

सुजित पवार's picture

2 Feb 2013 - 7:52 pm | सुजित पवार

गांधीजींचि तत्वे नि त्याचे फायदे सान्गु शकता आपन? जगातला कोनता देश ते सर्व पाळ्तो?

श्रिया's picture

2 Feb 2013 - 5:55 pm | श्रिया

विचार अव्यक्त नसतात. ते व्यक्ती पासूनच जन्मतात. गेलाबाजार पुढचं नुकसान तर टळलं गेलं! काय माहिती या माणसाने पुढे आणि कशा कशा बाबतीत इमोशनल ब्लॅकमेल केलं असतं.

तुमचा मुद्दा गांधीहत्येचे समर्थन करणारा वाटला, म्हणून एक प्रश्न, आत्ताच्या राजकारण्यांना आणि सो कॉल्ड समाजकारण्यांना कस रोखायला पाहिजे तुमच्यामते?.
यातल्या काहींचे विचार आणि कृती ही तर गांधीजींच्या विचारांपेक्षा देशासाठी कितीतरी भयानक आणि विध्वंसक आहे.

श्रीगुरुजी's picture

2 Feb 2013 - 10:26 pm | श्रीगुरुजी

समजा नथुरामने गांधीजींना मारले नसते व गांधीजी अजून ६-७ वर्षे जगले असते, तर भारतात नक्की काय फरक पडले असते? म्हणजे भारतात त्यामुळे नक्की काय वाईट्/चांगले झाले असते?

माझ्या मते १९४८ ची ब्राह्मणांविरूद्धची दंगल नक्की झाली नसती. पण त्याव्यतिरिक्त अजून कोणत्या घटना घडल्या असत्या/नसत्या?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

3 Feb 2013 - 7:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

"देशोधडीला लागणे" हा वाक्प्रचार नीट समजला असता मग.

+१००००००००००००००००