अलिबागचा " सूर्यास्त "

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
14 Jan 2013 - 6:52 pm

रविवारचा दिवस. काय बी टेंनशन न घेण्याचा दिवस. टी व्ही वरचा काहीतरी कार्यक्रम पहात कोचावर लोळत पडलो होतो. दुपारी पावणेदोनचा सुमार. दारावरची बेल वाजली. एक मिपाकर " हुकमी एक्का" दारात हजर.
"लवकर तयार व्हा काका ! आपल्याला लोण्यावळ्याचा पुढे एक स्पॉट वर जायचेय ! येता काय ? "
म्या काय बोलणार ? लोणावळा म्हण्जे फार काय लांब नाही असा विचार करून तयार झालो, दोनच्या सुमारास कॅमेरा, ट्रायपॉड, पिण्याच्या पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडलो.

.

वार्‍यावर एकमेकांशी बोललेले काही ऐकू येत नव्हते तरी हुकमीएक्याच्या बडबडीला मी " हो हो बरोबर " असे काही म्हणत " संवाद " चालू ठेवला होता. लोणावळा मागे टाकत हुक्का ची मोसा घाटात " अमृतांजन" पुलाजवळ आली.
मग ड्युक साहेबाच्या लम्बुळक्या नाकाचा फटू काढणे आले.

दुपारी साडेतीनच्या सुमारास पेणात पोहोचलो. एका बर्‍यापैकी हॉटलात खादाडी करून कॉफी पिउन निघालो
पावणे सुमारास अलिबाग येथे विचारत विचारत किनार्‍यावर पोहोचलो. पर्यटनाचे बाबतीत गेल्या दोन वर्षात मी अगदी " उपाशी" असल्याने समिंदराकडे पाहाता १४० किमी .पिल्यन सीट वरून आल्याचे समाधान वाटले. असल्या मोसा वरून
मागे बसून येणे म्हणजे सीटला( गाडीच्या नव्हे आपल्या ) विदाउट मेडीसिन अनेस्थेशिया देण्यासारखे असते.मिनिटात त्या " भूली" तून सुटका झाली. ओहोटीच्या ओल्या वाळूतून चालत निघालो.
.
समोर अलीबागचा फोर्ट.. हवशे, नवशे ( काही गवशे सद्धा ) आपपल्या परीने मजेत वाळूत चालत जात मजा लुटत होते. घोडागाडीतून रपेट करीत होते. काही किनार्‍यावरील विक्रेत्यांचा संसार चालण्याची सोय पाहत खात होते.
.
गोल्ड गोल्ड गोल्ड मकेन्नाज गोल्ड

"अरे पण तुला अगदी समुद्रात सूर्य बुडण्याचा फोटो येथे घेताच येणार नाही कारण या फोर्टने बरेच क्षितिज ऑक्यूपाय केले आहे ! मी हुक्का ला म्हणालो.
" आपण लांब पर्यंत चालत जाऊन तो अँगल मिळतो का पाहू चला ! " हुक्का .
तिकडे सहा वीस चा सुमार होत आला. माझा ट्रायपॉड त्याच्या कॅमेर्‍याला लावून हुक्काचे " मॅन्यूअल मोड" चे प्रयोग सुरू झाले.
.
माझ्या कॅमेर्‍याने आपण "शेवटच्या घटका मोजत आहोत" चे संकेत एल सीडी वर द्यायला सुरूवात केली. मग लांव जाऊन " अँगल" शोधणे गेले उडत असा विचार करून मी ही कॅमेर्‍याला आदेश दिला. " मरण्यापूर्वी दहा जणांना तरी मार लेका ! " ते दहा जण हे असे आहेत.
.
.
.
.
.
.
.
मावळत्या दिनकरा अर्घ्य तुज.........
साडेसहाला निघालो परतीच्या वाटेवर. वाटेत एका पुलावर हुक्काने " स्लो " स्पीड शटरचा वापर करून एक्स्पेस वे वरील गाड्यांचा टेल लॅम्प ट्रेस फोटो काढण्याचे मनावर घेतले. घाटात आल्यावर पुन्हा लखलखत्या खोपोलीचे फटू .व मग रात्री पावणे अकराला घरी.

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

14 Jan 2013 - 7:04 pm | सस्नेह

ओहो, काय सुरेख आलेत फोटो.
मला 'मॅकेना'ज गोल्ड' आवडलं..

मी-सौरभ's picture

14 Jan 2013 - 7:14 pm | मी-सौरभ

फोटो पिकासावर नाहीत का काका???
फ्लिकर दिसत नाहि हापिसात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jan 2013 - 7:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वॉव. काय भारी फोटो आलाय.

अनुप कुलकर्णी's picture

14 Jan 2013 - 7:32 pm | अनुप कुलकर्णी

छान फोटू! पण काही फोटोंचा आस्पेक्ट रेशो चुकीचा वाटतोय :-|

चौकटराजा's picture

14 Jan 2013 - 7:47 pm | चौकटराजा

आस्पेक्ट रशो चुकीचा वाटतो नाही आहेच ! इथे आपण फोटो डकविताना किती पिक्सल बाय किती पिक्सल दिले की इथे फार मोठा व फार लहान फोटो येणार नाही व आस्पेक्ट रेशो ही ओरिजिनल राहील यात मी इथे तरी अज्ञ आहे. कुणी याच धाग्यात शिकवले तर पुढे सुधारणा करता येईल .

श्रीरंग_जोशी's picture

17 Jan 2013 - 9:45 pm | श्रीरंग_जोशी

छायाचित्रे सुरेख आहेत.

चित्रे प्रकाशित करताना वापरण्यासाठी हि क्लृप्ती मी पूर्वी सुचवली होती. मूळ लांबी रुंदीचे गूणोत्तर न बदलत लांबी रूंदी कमी केल्यास चित्र येथे प्रमाणबद्ध वाटेल.

चौकटराजा's picture

18 Jan 2013 - 9:11 am | चौकटराजा

रंगा , धन्स ! फुडल्या येळंला येचटीयेमेल !

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jan 2013 - 1:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

१. "इमेज डायलॉग बॉक्स" मध्ये फक्त रूंदीचा आकडा टाकला तरी चालतो. ऊंचीच्या आकड्याची जागा रिकामी ठेवा. ऊंची आपोआप आस्पेक्ट रेशो प्रमाणेच येते व चित्र प्रमाणशीर दिसते.

२. लेखनाच्या रूंदीबाहेर जाण्यार्‍या हाय रिझोलुशन चित्रांना लहान करण्याकरिता ६८० रूंदी योग्य आहे.

३. रूंदी-ऊंची न टाकताही जर चित्र लेखनाच्या रूंदीच्या आत बसत असेल तर ते तसेच टाकणे बरे. कारण जास्त रूंदी टाकून मोठे बनवण्याच्या प्रयत्नात चित्र पिक्सलेट होऊन अस्पष्ट होते.

चौकटराजा's picture

20 Jan 2013 - 3:13 pm | चौकटराजा

तीन ही फंडे लक्षांत ठेवतो ! अनेक धन्यवाद !

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2013 - 9:19 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/sunny-emoticon-3264.html

अत्रुप्त आत्मा's picture

15 Jan 2013 - 9:20 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/happy/sunny-smiley-emoticon.gif

शुचि's picture

15 Jan 2013 - 9:26 pm | शुचि

वर्णन व फोटो आवडले.

दिव्यश्री's picture

15 Jan 2013 - 10:07 pm | दिव्यश्री

फारच सुरेख आले आहेत फोटोज.
ही अशी निसर्गाची विविध रूपे पाहून खूप प्रसण्ण वाटते...:)

प्रचेतस's picture

15 Jan 2013 - 11:01 pm | प्रचेतस

फोटो सुंदर आलेत.

सूड's picture

18 Jan 2013 - 10:45 am | सूड

सूर्यास्त तसा अलिबागचाच दिसतोय !! छान छान !!

हुकुमीएक्का's picture

19 Jan 2013 - 11:24 pm | हुकुमीएक्का

राजेसाहेब फोटो मस्तच आलेत बर... फोटो क्र. २ आणि ५ तर अप्रतिम आहेत . . .

चित्रगुप्त's picture

20 Jan 2013 - 3:33 pm | चित्रगुप्त

वाहवा, बहोत खूब.
मोसावर मागे बसून दूर भटकायला जाणं वगैरेंना सलाम.

सौरभ उप्स's picture

21 Jan 2013 - 11:26 pm | सौरभ उप्स

खूप चान .... दुसरा फोटो क्लासच कि ओ.......