साहित्य-
उरलेले पिठले- मी 1 ½ वाटी घेतले,
जिरे – ½ चमचा
तीळ- ½ चमचा
ओवा- ½ चमचा
गव्हाचे पीठ- आवशकतेनुसार
मीठ- चवीनुसार
तेल- तळण्यासाठी
कृती-
पिठल्यात जिरे, ओवा, तीळ, मीठ घालावे. या सर्व साहित्यात मावेल इतके गव्हाचे पीठ घालून घट्ट मळावे. 10-15 मिनिटे झाकून ठेवावे.
कढईत तेल कडकडीत गरम करून पुर्या तळाव्यात.
(मी उरलेले पिठले बाजरीच्या पिठ + चवीपुरते मीठ मिक्स करून मळून घेते व त्याची भाकरी करते, ते जास्त छान लागते)
प्रतिक्रिया
11 Jan 2013 - 3:32 pm | किसन शिंदे
ते वडे असतात ना, तसं दिसतंय. छान लागत असावंच. एकदा प्रयत्न करून पहायला हवाय.
11 Jan 2013 - 4:32 pm | स्पंदना
मी कुचुन "वेडे" वाचल.
11 Jan 2013 - 4:22 pm | Mrunalini
उरलेल्या पिठल्याचा एकदम मस्त उपयोग केलाय. :)
11 Jan 2013 - 4:27 pm | सूड
वाह वाह !!
11 Jan 2013 - 4:33 pm | स्पंदना
मला शिळ पिठल, त्यातल्यात्यात ते पातळ असेल तर फार आवडत तसच खायला. शिळ्या पातळ पिठल्यात कच्च शेंगातेल घालुन खाणं म्हणजे स्वर्ग सुख.
11 Jan 2013 - 4:36 pm | गवि
सर्वकाही तसंच, पण पातळ ऐवजी वडी होईल असं फ्रीजमधून काढलेलं कालचं पिठलं इतकं आवडतं की ते खायची संधी सोडून त्याची पुरी ऑर अदरवाईज करण्याचा विचारही मनाला शिवत नाही.
पण पाकृची आयडिया झकास आहे.
7 Feb 2013 - 4:25 pm | सुहास झेले
अगदी अगदी.... :) :)
11 Jan 2013 - 4:43 pm | त्रिवेणी
प्रतिसादासाठी सर्वांचे आभार
11 Jan 2013 - 5:14 pm | अत्रुप्त आत्मा
दुप्पारच्या छा संगाट लै झ्याक लागतील बगा...!
11 Jan 2013 - 5:14 pm | मन१
आवडेश.
दह्याचं पिठलं माझं फेव्हरिट.
तेसुद्धा ह्या पाकृ मध्ये चालून जावं असं वाटात्य.
बहुतांश वेळी आमच्याकडे तव्यवरचं दह्यातलं पिठलं उरतच, कारण पहिल्यांदा आमची उडी पडते ती काळसर्-आंबूस "खरवड" खाण्यावर. बाकी सब बाद में. तेच खाउन अर्ध पोट भरतं नि शेवटी पिठलं थोडंसं उरतच.
आता करुन पाहतो घरी हा प्रयोग मातोश्रींच्या मार्गदर्शनात.
11 Jan 2013 - 5:18 pm | पैसा
पुरी/भाकरी दोन्ही प्रकार छान होतील.
11 Jan 2013 - 7:17 pm | अनन्न्या
पुय्रा केल्यात म्हणजे डाळीचच असणार! छान दिसतायत पुय्रा!!
11 Jan 2013 - 7:20 pm | त्रिवेणी
हो हो चण्याच्या पिठाचे
11 Jan 2013 - 7:44 pm | गणपा
तुमच्याकडे पिठलं उरतं ?
भाग्यवान आहात. :)
11 Jan 2013 - 7:51 pm | रेवती
खुसखुशीत झालेल्या दिसतायत पुर्या. छानच.
11 Jan 2013 - 8:06 pm | शुचि
पिठलं खूप दिवसात केलेले नाही. करीन म्हणते. अपर्णासारखच मलादेखील पातळ पिठलं आवडतं. मस्त कांदा मिरची, चिंचकोळ घातलेलं.ख्नारळ/खोबरं मात्र तितकसं आवडत नाही पिठल्यात.
13 Jan 2013 - 5:07 pm | प्रभाकर पेठकर
अरे! मग, भाकरीची पाककृती द्यायची होती आणि 'एक वेगळा प्रकार' म्हणून पुर्यांची पाककृती द्यायची. असो. दोन्ही करून पाहिले पाहिजे.
13 Jan 2013 - 6:30 pm | निवेदिता-ताई
छान छान.... पण असे प्रकार करेपर्यंत पिठले उरतच नाही.....ताज्या पिठल्याचेच करुन पहायला हवेय..!!!!!!!!!!!!!!
14 Jan 2013 - 2:58 pm | क्श्मा कुल्कर्नि
पीठल उरण अशक्यच आहे !!
7 Feb 2013 - 1:31 pm | गौरीबाई गोवेकर
नविनच प्रकार. आवडला.
7 Feb 2013 - 4:35 pm | ऋषिकेश
शिळं पिठलंच अत्यंत आवडत असल्याने पाकृ बर्याचदा पास होईलसं दिसतंय.
पण ऐडीयाची कल्पना आवल्डि