"एकटेपणा"...हा किती ओळ्खीचा वाटतो...
रोज रात्री मला अन्धारात येऊन भेटतो..
मग आथवते ती शान्तता..जी सतत माझ्या सोबत असते...
अनधारात चालू असते किड्यान्ची किरकिर..
तेवध्यात ऐकू येतो कोणीतरी बोलल्याचा आवाज...
आजू बाजूला बघितल्यास तिथे कोणीही नसत..
सोबत असतो तोच तो "एकटेपणा".........(१)
रात्री-बेरात्री पडलेल असते ते चान्दण...
किती सुरेख दिसते त्यात,बागेतल्या फुलान्ची मान्डणी..
मध्येच येते ती वारयाची झुळुक..जी कानात काही सान्गू इछिते..
पण काहीच बोलत नाही माझ्याशी रुसल्यागत..
न बोलता निघून जाण्याने मी दुखावतो...
परत ती माझ्याशी बोलण्याची वाट पाहतो....
वाट बघताना सोबत असतो तोच तो "एकटेपणा".....(२)
हीच गोश्ट निर्माण करते मनात काही प्रश्न..
"का माणसाबरोबर नसत सतत त्याच हसण..?"...
सगळ काही असण्यापेक्शा परवडत काहीच नसण...
पण ह्या सगळ्या प्रश्नान्ची उत्तर द्यायला कोणीच नसत..
सोबत असतो...
तोच तो...
"एकटेपणा"............(३)
रात्रीने पानघरलेली अस्ते अन्धाराची चादर...
कारण ती करते सरव तारयानची कदर..
ह्याचवेळी...ह्याचवेळी...चमकतात ते असिमीत बलाड्य तारे..
त्यान्च्या सोबत मी अनुभवतो ते सन्थ गार वारे..
त्याच वारयाने जवळील झाडे एकत्र हलतात..
जणू काही ते माझ्या नशीबाकडे बघून हसतात...
अशा वागणूकीच्यावेळी जवळ अस्तो...
तोच तो "एकटेपणा".......(४)
बघायचे आहे मला प्रुथ्वी बाहेरील रहस्यमयी जग...
पार करायचे आहेत मला ते असिमीत ढग..
वाटत मग मिळेल का तिथे 'मला' आवडणारा जग..?
नसेल जिथे असमानतेची धग...
वाटत नाही मला असेल तस फारस..
नेहमी प्रमाणेच...
सोबत असेल तोच तो...
"एकटेपणा".........(५)
तेवढयात विचार करत असताना जवळ्च अचानक हालचाल झाली...
मनात भिती निर्माण झाली..!!!
कोण...कोण असेल आसपास...???
मग मला कळ्ल ती हालचाल म्हणजे होती माझीच सावली..
पुन्हा एकदा माझी फजिती झाली....
आधी होता...आताही आहे...पुढेही असेल...
तोच तो "माझा एकटेपणा".....(६)
प्रतिक्रिया
2 Jan 2013 - 5:39 pm | आर्णव
वा!
कधीही एकटा न पडु देणारा हा एकटे पणा हताळणयाची पध्दत आवडली.
2 Jan 2013 - 7:29 pm | अत्रुप्त आत्मा
मस्त...! एकटेपणा कुठेकुठे आणी कसा रिलेट होतो,ते फार अचुक पकडलय तुंम्ही. तिसय्रा कडव्यावर तर फिदा हाय आपण. --^--^--^--