भिगवणचे परदेशी पाहूणे................

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in भटकंती
25 Dec 2012 - 1:01 pm

काल चुकून काही फोटो जनातले मनातले मधे टाकले. काही लोकांनी अपेक्षेने तो धागा उघडल्यावर त्यांचा अपेक्षाभंग झाला असेल. त्यांची क्षमा मागतो. माझ्यासारख्या तुलनेने नवीन मिपाकराला ते उदार अंतःकरणाने क्षमा करतील अशी आशा आहे. संपादकांना तो धागा येथे हलावायची विनंती केली आहे. श्रेष्ठ, जेष्ठ व मुरलेल्या मिपाकारांची परवानगी न घेता हा धागा भटकंती येथे टाकायचे धाडस करत आहे कारण कलादालन बरेच दिवस बंद आहे. त्याबद्दल मालक क्षमा करतील अशी आशा आहे. अर्थात त्यांनीही दटावल्यास असे धाडस पुन्हा होणार नाही याची सर्वांनी खात्री बाळगावी.....

मी फेसबूकवरही फोटो टाकतो व येथेही टाकतो ( माझ्या दृष्टीने चांगले) . त्यात फरक कसा करावा हे कळत नाही. जेष्ठ, श्रेष्ठांनी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती. ( क्रुपया फेसबूक वर फोटो टाकणे आणि येथे टाकणे यातील फरकाबद्दलच मार्गदर्शनाची अपेक्षा आहे हे लक्षात घेणे).

परवा भिगवणला गेलो होतो तेथे काढलेले काही पक्षांचे फोटो आहेत. खाली पक्षाची माहीतीही दिली आहे.

पुण्यापासून सोलापुरच्या रस्त्यावर ९० किमि. अंतरावर डाव्या बाजुला वळून परत उजवीकडे वळून साखरकारखान्याच्या रस्त्याला जावे. (पाटी आहे) तेथे उजनीच्या बॅक वॉटरमधे हे परदेशी पाहूणे आलेले आहेत. तेथील मासेमारी करणारे आपल्याला बोटीतून घेऊन जाऊन आपल्याला पक्षी दर्शन घडवतात. पक्षांवरचे पुस्तक जरूर घेऊन जाणे. नावाड्याबरोबर घासाघीस करावी.

सकाळी साधारणतः ५ वाजता निघावे म्हणजे पक्षी बघून झाल्यावर भुलेश्वरही बघता येईल.

चमच्या../ स्पूनबिल.......
याची चोच चमच्यासारखी असते म्हणून हे नाव पडले असावे. आपल्या येथे हे पक्षी युरोप किंवा रशियाच्या काही आशियाच्या भागातून येतात. दलदलीतील किडे हे यांचे मुख्य अन्न असते व घरटी बरीच मोठी असतात. उडताना हा पक्षी फार भव्य दिसतो.

टीट (ग्रेट इंडियन टीट)
चिमणीच्या आकाराचा हा पक्षी दिसायला अत्यंत देखणा आहे. झाडाच्या टोकावर हा कधी येत नाही. खालच्या फांद्यावर सतत वावर असल्यामुळे फोटो काढायला तसा अवघड. कडक वस्तू खायची आवड.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

Northern Shoveler (Anas clypeata)
बदक एवढे वेगाने उडते हे मला माहीत नव्हते.

काळ्या पंखाचा स्टिल्ट
काटकुळ्या पायाचा हा पक्षी आपले पाण्यातील प्रतिबींब पहात असतो. खरे तर तो भक्ष शोधत असतो. स्तब्ध पाण्यावर याचा वावर जास्त.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

ब्राउन हेडेड गल....याला असे का म्हणतात माहीत नाही. मला तर याच्या डोक्यावर तसा काही रंग दिसला नाही. पण पक्षांचे रंग व त्याच्या छटा हळुहळु बदलत जातात..कदाचित त्याच्या डोक्याचा रंग बदलायचा असेल.... एकदम गुटगुटीत..

यांच्या चोचीतील आतील भाग लाल भडक असतो व यांना सारखे तोंड उघडायची सवय असते. जणू ते सारखी जांभई देतात त्यावेळी जो लाल रंग पसरतो त्याची मजा औरच...

'कॉमन रेडशँक' (Tringa totanus).........पण संध्याकाळच्या प्रकाशात मला यांचे शांतपणे उडणे मोठे गुढरम्य वाटले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

पेंटेड स्टॉर्क......मला हा पक्षी रोहीत पक्षापेक्षा जास्त आवडतो कारण याचे शरीर अक्षरशः रंगविल्यासारखे दिसते. याच्या माने पर्यंत असलेली पिसे जणू काहे त्याने स्वतःला कशात तरी लपेटून घेतलए आहे असे वाटते.

त्याचे एक पोर्ट्रेट....

व शेवटी रोहीत...उडायच्या तयारीत.........

व उडल्यावर............
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आशा आहे माझा हा फोटोचा धागा आपण सहन कराल.......
जयंत कुलकर्णी.

प्रतिक्रिया

गणपा's picture

25 Dec 2012 - 1:13 pm | गणपा

क्लास फोटो.

अनुप कुलकर्णी's picture

25 Dec 2012 - 1:13 pm | अनुप कुलकर्णी

सुपर फोटोस! पेंटेड स्टॉर्कचे पोर्ट्रेट कमाल आले आहे... कुठली लेन्स? बॉडी?

आम्हीही परवा पेंटेड स्टोर्क च्या शोधात रंगनथित्तूला गेलेलो... पण गावले नाहीत :(

जयंत कुलकर्णी's picture

26 Dec 2012 - 8:23 am | जयंत कुलकर्णी

एखाद्या पक्षाचे फोटो काढायला मिळणे हे भाग्यच म्हणायला हवे. निसर्गाने किती प्रकारचे पक्षी जन्माला घातले आहेत हे बघून माझी टोपीच खाली पडते...........

बाबा पाटील's picture

25 Dec 2012 - 1:26 pm | बाबा पाटील

१++++++ झक्कास जयंतराव......

मदनबाण's picture

25 Dec 2012 - 2:03 pm | मदनबाण

शेवटुन ३ रा जास्त आवडला.

पैसा's picture

25 Dec 2012 - 2:10 pm | पैसा

फारच खास आहेत.

चेतन माने's picture

25 Dec 2012 - 2:28 pm | चेतन माने

फोटू झक्कास आले आहेत.
आशा आहे तुम्हाला आमची प्रतिक्रिया आवडली असेल. (असं लिहिल्याबद्दल क्षमा कराल अशी अपेक्षा आहे!!!)
काय राव मिपाकर म्हणजे काय तुम्हाला टीकाकारांची फौज वाटली!!! लिहित जा बिनधास्त :)

शैलेन्द्र's picture

25 Dec 2012 - 2:44 pm | शैलेन्द्र

काका, फोटो छान आहेत हे माहीत आहे, पण मला तरी इथे दिसत नाहीत.. माझ्या ब्राउझरचा लोचा आहे की काय ?

नि३सोलपुरकर's picture

25 Dec 2012 - 4:06 pm | नि३सोलपुरकर

काका,
मस्त फोटो.

मनराव's picture

25 Dec 2012 - 4:51 pm | मनराव

झक्कास फोटो काका........

अनुप कुलकर्णी's picture

25 Dec 2012 - 5:06 pm | अनुप कुलकर्णी

जयंतकाका
मला ते spot billed duck वाटत नाही. माझ्यामते Northern Shoveler (Anas clypeata) आहे.

सुधांशुनूलकर's picture

25 Dec 2012 - 11:28 pm | सुधांशुनूलकर

होय, अनुपजी, ते शॉवेलरच आहे. (मराठीत थापट्या).

बाकी जयंतराव, फोटो अगदी झकास. लगे रहो.
तुम्हाला ओळखता न आलेला पक्षी (थव्याचा फोटो) आहे 'कॉमन रेडशँक' (Tringa totanus).

सर्वांचाच,
सुधांशुनूलकर
निसर्गवेडा आनंदयात्री

तर्री's picture

25 Dec 2012 - 9:29 pm | तर्री

जयंतराव - मस्त .
उत्तम फोटो व समर्पक वर्णन सुध्दा !
लेखाच्या सुरवातिचे चिमटे पोहोचले !

जयंत कुलकर्णी's picture

25 Dec 2012 - 9:53 pm | जयंत कुलकर्णी

अहो चिमटे नाही ! बर्‍याच दिवसात मिपावर लिहिले नाही हेही खरे आहे. मी लिहिले नाही म्हणून तुम्ही रागावून ती प्रतिक्रिया दिली आहे हे मला समजते. खरे तर माझे लिखाण तुम्हाला आवडते असा मी त्यातून अर्थ काढला...पण मिपा पूर्णपणे सुस्थितीत आल्यावर युद्धकथांचा दहा कथांचा उपक्रम पूर्ण करणार आहे...(पाच झालेल्या आहेत).त्यात नॉर्मडीवर एक प्रदीर्घ लेखमाला असेल. कदाचित मग तुमचा राग निवळेल..........:-)

अभ्या..'s picture

25 Dec 2012 - 9:49 pm | अभ्या..

जयंतराव फोटो मस्त आले आहेत.
खूपच आवडले आहेत.

समयांत's picture

25 Dec 2012 - 10:08 pm | समयांत

फोटो चांगले आहे विशेषत: शेवटचे दोन
आता तुम्ही मिपावर रूळलेत.
अजून लिहा. आम्ही आहोतच.

आता तुम्ही मिपावर रूळलेत.

=))

अजून लिहा. आम्ही आहोतच.

+१ अगदी हेच म्हणतो.
भिऊ नका आम्ही तुझ्याच्या पाठीशी आहोत. :)

सूड's picture

25 Dec 2012 - 11:02 pm | सूड

टीटचा फोटो आवडला !!

सलिल २४'s picture

25 Dec 2012 - 11:08 pm | सलिल २४

मस्त.खूप पेशन्स लागत असतील नाही असे पक्षांचे किंवा प्राण्यांचे फोटो काढायला.युद्ध कथा वाचायला आवडतील.

जेनी...'s picture

25 Dec 2012 - 11:14 pm | जेनी...

लास्ट वन .
फोटुला माझ्याकुन एक पूस्प्गुच .

चित्रगुप्त's picture

25 Dec 2012 - 11:54 pm | चित्रगुप्त

पेंटेड स्टार्कचे पोर्टेट खरोखरच एकाद्या निष्णात कलावंताने रंगवलेल्या तैलचित्राच्या तोडीचे आहे.
तुमच्या 'क्रुसेड' वरील लेखमालेच्या पुढल्या भागांची प्रतिक्षा.

किसन शिंदे's picture

26 Dec 2012 - 12:02 am | किसन शिंदे

सर्वच फोटो अप्रतिम आहेत.

जयंत कुलकर्णी's picture

26 Dec 2012 - 8:27 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद ! योग्य ती दुरुस्ती केली आहे !

प्रचेतस's picture

26 Dec 2012 - 9:22 am | प्रचेतस

फोटो खूपच छान.
कॅमेरा आणि लेन्स कुठली वापरलीत?

राही's picture

26 Dec 2012 - 9:56 am | राही

शक्यतो कलादालनाकडे फिरकत नाही कारण त्यातले काही कळत नाही. पण तुमचे पेंटेड स्टॉर्कचे पोर्ट्रेट अप्रतिम आहे. वर चित्रगुप्तांनी म्हटल्याप्रमाणे खरोखर एखादे ऑईल-पेंटिंगच वाटते. चोचीचा डायगोनल अँगल साधल्यामुळे चित्र समतोल होऊन डोळ्याला उठाव मिळाला आहे.फार सुंदर.