Skip to main content

ऊखाणे नवीन पीढीचे

लेखक neeta यांनी गुरुवार, 20/12/2012 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
जपानी कलात्मकतेच्या प्रतिसादांवरुन बर्‍याच जणांनी सुचविले यात तुमची कलात्मकता काय आहे तुम्ही तर नुसते फोटो डकवलेत. आता मिपाकरांची कल्पनाशक्ती बघूया. मी लिहीलेले काही नवीन उखाणे देत आहे. तेच तेच जुने उखाणे ऐकून कंटाळा आलाय, नवीन पीढी लग्नात कसे उखाणे घेईल ते वाचा आणि तुम्हीही त्यात नवीन भर टाका. लग्नाच्या आहेरात आई वडिलांनी दिला मला ब्लैक बेरीचा मोबाईल ------रावांच नाव घेते आता मी फेसबुकवर अपडेट करीन माझा प्रोफाईल डी व्ही डी प्लेअर मध्ये सी डी घालते वाकून -----रावांच नाव घेते सर्वांचा मान राखून पुढे तुमच्या कल्पना----------

वाचने 24016
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

डी व्ही डी प्लेअर मध्ये सी डी घालते वाकून
हे वाचल्यानंतर पुढचं वाचेपर्यंत नाही नाही त्या ओळी सुचल्या हो... असो. आमचा एक उखाणा. लगीन झाल्याची वर्दी दिली फेसबूक वॉल अपडेट करून, आणि ___रावांशी काडीमोड घेते ट्वीटर वर ट्वीट करून....

In reply to by दादा कोंडके

लगीन झाल्याची वर्दी दिली फेसबूक वॉल अपडेट करून, आणि ___रावांशी काडीमोड घेते ट्वीटर वर ट्वीट करून....

In reply to by दादा कोंडके

'ऊ' खाणे हे नवीन पीढीचे ---कडून धडे गिरवीन शुद्धलेखनाचे. मिपाकरांच्या तोंडी लागून पाय घसरुन पडले ---रावांचा हात धरुन थोबाडपंथी झाले

आम्ही सामूहिकरीत्या मेलो असे म्हणायचे आहे का?(बायकांनी जोहारबिहार करून सामूहिकरीत्या मरण्याची पद्धत होती म्हणे एके काळी)

फेसबुकची वाल आणि ट्वीटरची ट्वीट आहे माझ्या आवडीची, आणि .......... चे नाव घेतो, ती राणी आहे माझ्या प्रितीची !!!

मिपाकरांनी पहील्याच चेंडुवर केलं मला एल्बी... त्याच मेल्यांचं नाव घेऊन ही भरवते दुसरी जिल्बी... नेता :-b

रोज रोज चढत जाते मी बुद्धीची नवं नवी पायरी.. .... रावांचे नाव घेते, फाट्यावरती मारुन डायरी.

In reply to by परिकथेतील राजकुमार

तू कशाला रे कुणा रावाचं नाव घेतोस? राणीचं तरी घ्यायचं होतंस...

In reply to by स्मिता.

ते नाव मी त्यांना घेण्यासाठी सुचवले आहे.

माझा मित्र PLC, SCADA प्रोग्रामिंगमधे होता तो म्हणाला मला जेवताना घास भरवायच्या वेळेस घेण्यासाठी एखादा उखाणा सुचव.. मी सुचवलं: "अमुकतमुक कंपनी मधे प्रोग्राम करतो PLC, SCADA अमकीतमकीचं नाव घेतो आतातरी जेवायला वाढा..!!"

आता मिपाकरांची कल्पनाशक्ती बघूया.
हे राम.. मारलात दगड..?

टु इज कंपनी, थ्री इज क्राउड ु टु इज कंपनी, थ्री इज क्राउड .......... च नाव घेतो वाटुन भारी प्राउड. !!!!! =)) =))

आयटीची नोकरी म्हणजे जणू पैशाचे झाड ...रावांच्या फोनमधे ६४ जीबीचे कार्ड

In reply to by ५० फक्त

"अ गुड गर्लफ्रेंड सेव्स हंड्रेड जीबी स्पेस ऑन हर बॉयफ्रेण्डस पीसी" शेअर इफ यू अग्री. असं चेपू वर वाचल्याचे स्मरते. :)

साखरपुड्याला मिळाली डायमंडची रिंग ***राव वापरतात मायक्रोसॉफ्ट बिंग! वाघ असतो शूर आणि हरीण असते भित्रं *** रावांचे फेसबुकवर हजारो मित्रं ! जशी बढती मिळाली तसे नशीब फळफळले *** रावांचा आयपॅड बघून सगळे जळफळले!

*** राव पार्टीमधे पिऊन झाले टाईट बघा एचवन मिळवला उद्या आमची फ्लाईट !

आकाशात उडालं हॅलीकाप्टर आमचे ... राव बाई लै चाप्टर... उखाण्यांच्या धाग्यावर पुरुषांचीच जास्त गर्दी झालीय .. या सगळ्या पोरी गेल्यातरी कुठे म्हणायचं,,,,

**** च नाव घेतो परत विचारु नका काय, आता तुच माझी करीना कपुर आणि तुच माझी ऐश्वर्‍या राय. फुलात फुल शेवंती, फुलात फुल शेवंती मी तुझा वीरु आणि तु माझी बसंती B-)

आय टीच्या विश्वात क्लाऊडची हवा. xxरावांचा टॅब्लेट पी.सी. मला हवा.

नाव घ्येते ऐका हं ............ ;) " नारळात पाणी अन संग्रामची देवयानी" "चुलिवर वरण अन आभाचा करण " "गवतावर माशी अन अर्णव ची खुशी " "सिंहाची गर्जना अन मानवची अर्चना " "देवची किर्ती अन यशची आरती " "सरदेशमुख घराण्याची राणी ती सोहमची कल्याणी " लग्नाची नाती काही केल्या कळेना ;) नाव कुणाच घ्याव ?नाव घेणारा मिळेना " ;)

In reply to by पियुशा

@कुणाच घ्याव ?नाव घेणारा मिळेना ">>> =)) बाप रे...! =)) पिवशा पिवशा घाईला आली,आधीच नाव घेऊन मोकळी झाली. ;-)

"अबक" वाचतो मटा "कखग" च्या पायात बाटा "टठड" ला दाखवला अंगठा "क्षयझ" चं नाव घेते "बभम" ला करून टाटा

नुसते फोटो डकवण्यावरुन मिपावर माजला एवढा काहुर... ....रावांच नाव घेते, दया जरा सबुर...

नेटवर झालेत इंटरनेट हिंदू चिक्कार. माझे **राव कधीच होणार नाहीत बेकार. चिरोटाचंद्र गुहा

फेसबुका वरती हायेत मला शंभरावर फ्रेण्ड फेसबुका वरती हायेत मला शंभरावर फ्रेण्ड ....रावांच्या आन् माझ्या पिरमाचा हाय येगळाच ट्रेंड