काल लग्नाचा वाढदिवस होता म्ह्टलं नवर्यासाठी काहीतरी स्पेशल करुया. पाईनॅपल केक तर तयार झाला होता. साथ में कुछ झणझणीत मंगता था. थोडी पुस्तकं चाळली. खालच्या दुकानातून चिकन घेऊन आले. वेगळं काय करावं हा विचार होताच. आधी मॅरीनेशन तर करुन ठेवूया मग बघू पुढचं पुढे.
लग्गेच कृती सुरु केली. पुस्तकातली रेसीपी आणि माझी अक्कल ह्याचा छानसा(?) मेळ साधून सुपरहीट चिकन तयार झालं. अतिशय चविष्ट दिसणारं आणि लागणारं चिकन करायला अगदीच सोप्पंय.
साहित्य : मॅरिनेशन साठी
१ किलो चिकन,
३ टेबल स्पून टोमॅटो केचप,
लिंबाचा रस (साधारण २ लिंबांचा रस)(इकडे मोठी लिंबं रसदार मिळतात. त्यामुळे मी एकच घेतलं.)
२ टी स्पून लाल तिखट
मीठ
साहित्य : ग्रेव्हीसाठी
प्रत्येकी २ टी स्पून आलं, लसूण पेस्ट,
२ टेबल स्पून टोमॅटो प्युरी,
३ कांदे अगदी बारीक चिरुन,
२ अंडी फेटून,
१ टी स्पून हळद
२ टेबल स्पून हिरव्या मिर्च्या अगदी बारीक चिरुन,
१ टी स्पून बादशहा (किंवा कुठलाही) चिकन मसाला
तेल,
मीठ.
कृती :
चिकन स्वच्छ धुवून त्यातलं सगळं पाणी निथळवून टाका.
मॅरीनेशन चं सगळं साहित्य एकत्र करुन चिकन ला चोळून ठेवा. साधारण २ तास झाकून ठेवा.
एका कढईत ३ टेबल स्पून तेल तापत ठेवा आणि त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा परतवून घ्या.
कांदा सोनेरी रंगाचा झाला की त्यात टोमॅटो प्युरी घाला.
तेल सुटायला लागलं की त्यात आलं, लसूण पेस्ट घाला.
थोडं परतून नंतर त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिर्च्या घाला.
मग त्यात हळद आणि चिकन मसाला घाला.
थोडं परतवून त्यात चिकनचे मॅरीनेट केलेले तुकडे घाला.
सगळं मिश्रण मस्तपैकी परतवून झाकण ठेवा.
साधारण १५ मिनिटात चिकन शिजत आल्यानंतर त्यात १ कप पाणी घाला.
पुन्हा झाकण ठेवा आणि चिकन पूर्ण शिजवा.
झाकण उघडल्यावर मस्त रसरशीत चिकन तयार :)
पण थांबा पिक्चर अभी बाकी है... ;)
फेटलेली २ अंडी त्यात घाला. मस्तपैकी ढवळा.
गरम असल्यामुळे अंडी लगेच शिजतील. छान ढवळल्यामुळे अंडी एकाच ठिकाणी न राहता सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतील.
रश्श्याचं टेक्स्चर पूर्ण बदलेल पण घाबरु नका.
झाकण ठेवा ....आणखी एक वाफ काढा.
आता चिकन जालफ्रेझी एकदम तय्यर :)
एका छानशा भांड्यात काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरा. तोंडाला पाणी नक्कीच सुटणार.... :)
प्रतिक्रिया
27 Nov 2012 - 12:49 pm | पियुशा
क्या बात है .... चिकन अन अंडा याचा मांसाहारी लोकांना एकाच मेजवानीत लुफ्त घेता येइल .आवडेश :)
27 Nov 2012 - 12:49 pm | सस्नेह
झकास दिसते आहे.
मिपावर सध्या काय चिकन महोत्सव सुरु आहे की काय ?
27 Nov 2012 - 12:50 pm | गणपा
जयवी ताय लग्नाच्या वाढदिवसाच्या (थोड्या उशीराने) शुभेच्छा !!!
फोटु आणि पाकृ एकदम का ती आणि ल !
27 Nov 2012 - 1:16 pm | इरसाल
करावे म्हणतो एखाददिवशी
27 Nov 2012 - 1:33 pm | अत्रन्गि पाउस
झक्कास जमलय...
जाता जाता : 'जाल्फ्रेजि' म्हनजे काय ? व्युत्पत्ति काय त्याचि?
27 Nov 2012 - 3:31 pm | स्वाती दिनेश
चिकन जालफ्रेजी सॉलिड्ड दिसते आहे,
स्वाती
27 Nov 2012 - 3:56 pm | सुहास झेले
जबरदस्त पाककृती आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या उशिराने शुभेच्छा :) :)
27 Nov 2012 - 4:14 pm | सानिकास्वप्निल
वाह!
जयवीताई चिकन बघूनच ताव मारावासा वाटतोय .... कसलं भारी दिसतय अहाहा!
लग्नाच्या वाढदिवसाच्या बिलेटेड शिभेच्छा :)
27 Nov 2012 - 4:24 pm | स्मिता.
काय मस्त दिसतोय तो पहिलाच फोटो! एकदम लज्जतदार आणि झणझणीत दिसतंय.
27 Nov 2012 - 5:56 pm | पैसा
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
दिवाळीनंतर मिपावर कोंबडी सप्ताह सुरू झाला म्हणायचा!
27 Nov 2012 - 7:20 pm | कपिलमुनी
२ अंडी फेटून ?
गुगलले पण जालफ्रेजी मधे अंडी घातलेली रेशीपी सापडली नाही ..
तुमचे स्वत:चे अॅडिशन आहे का?
27 Nov 2012 - 8:14 pm | गणपा
मुनीवर्य नुसते फोटू काय पहाता? अधून मधून रेशिप्या वाचायचे कष्ट घ्या की. ;)
27 Nov 2012 - 8:24 pm | खान
तरीसुद्धा.
जालफ्रेझीमध्ये.
अंडं?
28 Nov 2012 - 6:21 pm | विश्वनाथ मेहेंदळे
आमच्यात घालतात... काही प्रॉब्लेम ???
(असे त्या म्हणू शकतात. म्हणत नाहीत हा त्यांचा मोठेपणा आहे)
28 Nov 2012 - 5:26 pm | कपिलमुनी
वाचल्याबिगार कल्ला का ? त्यामदी अंड हाये त्ये ..वाचलां मग शंका आली म्हणून गुगलला...
अंड्याने चवीमधे बराच फरक पडतो !! मंग ह्याला " चिकन जालफ्रेझी " म्हनायचा का ??
ह्या नवीन रेशिपीला चिकन जयवी अशे नाव देउन टाकू..
27 Nov 2012 - 9:26 pm | रेवती
अरे वा! रंग, सजावट सगळं जमलय. भारी.
आमच्यासारख्या शाकाहारींसाठी तुझी एखादी पाकृ येऊ दे आता जयुतै.
28 Nov 2012 - 7:27 am | दीपा माने
जयवीताई,फेटलेली अंडी घालुन केलेली चिकन पाकृ पाहुन तुमच्या कल्पकतेचे कौतुक वाटले. अशा कितीतरी पाकृ मुळ पाकृत थोडाच वेगळा टच देऊन करता येतील नाही? लग्नाच्या वाढ्दिवसाच्या शुभेछा.
28 Nov 2012 - 9:12 am | जयवी
तहे दिल से शुक्रिया यारो....... :)
तुमच्या शुभेच्छांमुळे अजूनही लग्नाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन चालू आहे असं वाटतंय ;)
जालफ्रेझी मधे अंडं....... ह्म्म्म...खरं तर असं नसतं....पण अंडं घातल्यावर चव आणि टेक्स्चर थोडं वेगळं झालं .घरातल्या सगळ्यांनी मनापासून ताव मारला एवढं मात्र खरं :)
ह्याला "चिकन जालफ्रेझी" न म्हणता दुसरं काहीतरी नाव ठेवावं म्हणतेय. एखादं खमंग, झणझणीत नाव सुचवा ना.
28 Nov 2012 - 5:27 pm | कपिलमुनी
"चिकन जयवी "
अहो डायरेक्ट सिग्नेचर डिश !!
28 Nov 2012 - 6:14 pm | जयवी
ह्म्म..... ऐसाईच कुछ रखना पडेंगा ;)
28 Nov 2012 - 6:35 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हे आधी केले असते तर, "केवळ जालफ्रेझीमध्ये अंडे घालून काय नवीन डीश होते का?" किंवा "वांगमयचौर्य(?)" वगैरे वगैरे कुजकट प्रतिसाद आले असते का हा विचार करण्यात मग्न आहे.
असो, पाकृ आवडली. करून(किंवा करवून) बघणार :-)
28 Nov 2012 - 9:32 am | ज्ञानराम
मस्त पाक्रु... लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,,
28 Nov 2012 - 10:25 am | ऋषिकेश
शॉल्लेट!
28 Nov 2012 - 2:23 pm | मालोजीराव
चिकन जालफ्रेझी अंडा मारके ;)
28 Nov 2012 - 4:23 pm | इरसाल
चिकन "जहाल" फ्रीझी
28 Nov 2012 - 4:24 pm | इरसाल
किंवा
चिकन "जहाल" एग्गी
29 Nov 2012 - 12:30 am | खान
जालफ्रेझीमध्ये अंडं घालण्यावरून जालावर उडालेली frenzy पाहून चिकन जालीय फ्रेंझी असं नाव सुचवतो.
एक्सपेरिमेंटेशन करण्यात वाईट काहीच नाही, उलट हौशी सुगरण्स असे प्रकार करूनच नवनवीन डिशेस शोधून काढतात. मी एकदा चिकन करी (टोमॅटो-बेस्ड) करताना आयत्या वेळी क्रीम संपल्याचं लक्षात आल्यावर चक्क अल्फ्रेडो सॉस वापरून दाटपणा आणला होता. आणि ते खाण्यायोग्य झालं होतं हे विशेष :)
(स्वघोषित बल्लवाचार्य) खान
30 Nov 2012 - 8:42 pm | गौरीबाई गोवेकर
छानच दिसतेय ग. केले पाहिजे एकदा