साहित्यः
बटर - १ कप
पिठीसाखर - १/२ कप
ब्राउन शुगर - १/२ कप
अंडे - १
मैदा - १ कप
आक्रोड - १ कप (चिरुन)
चोकोचिप्स - १/२ कप
बेकिंग पावडर - १/४ टिस्पुन
मिठ - 1 pinch
कॄती:
१. मैदा व बेकिंग पावडर पिठाच्या चाळणीने चाळुन घ्यावे.
२. बटर वितळवुन घ्यावे. बटर गार झाल्यावर त्यात पिठीसाखर व ब्राउन शुगर मिक्स करुन घ्यावी.
३. त्यात १ अंडे फेटुन टाकावे. हे निट मिक्स झाल्यावर त्यात मैदा, बेकिंग पावडर व मिठ टाकावे.
४. हे सर्व मिश्रण एकत्र करुन त्यात १/२ कप आक्रोड व १/४ कप चोकोचिप्स टाकुन पुन्हा एकत्र करावे.
५. बेकिंग ट्रेला सिल्व्हर फॉइल लावावी व त्यावर बटर लावावे.
६. ट्रे मधे वरील मिश्रण टाकावे. वरतुन उरलेल्या आक्रोड व चोकोचिप्सने सजवावे.
७. हे सर्व होई पर्यंत ओव्ह्न १८० degree celcius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा.
८. १० मिनिटांनी ट्रे बेकिंग साठी ठेवावा. ब्लाँडि होण्यासाठी साधारणपणे २०-३० मिनिटे लागतात.
९. ब्लाँडिचा वरचा surface, crispy व्हायला हवा व ब्लाँडिमधे toothpick टाकुन बघितल्यावर, ती clean असली पाहिजे.
१०. २०-३० मिनिटांनी बाहेर काढल्यावर १० मिनिटे थंड होऊ द्यावी.
११. ब्लाँडि ट्रे मधुन बाहेर काढावी व त्याचे squares कापावेत.
१२. ब्लाँडि गार किंवा icecream सोबत serve कराव्यात.
प्रतिक्रिया
17 Nov 2012 - 6:34 am | तुषार काळभोर
सुंदर.
17 Nov 2012 - 8:29 am | कच्ची कैरी
अप्रतिम !!!!!
17 Nov 2012 - 3:28 pm | प्राजक्ता पवार
मस्तं !
18 Nov 2012 - 4:51 am | सानिकास्वप्निल
छान व सोपी पाकृ आहे :)
तोंपासू
फोटो तर अगदी झकास आलाय :)
24 Nov 2012 - 10:31 pm | आशिष सुर्वे
छान अन् सहज करण्याजोगी पाकृ
24 Nov 2012 - 11:49 pm | जागु
छानच.
25 Nov 2012 - 10:32 pm | पैसा
मस्त!