मक्याचे आप्पे
१ वाटी कच्चे मक्याचे दाणे, एक उकडलेला बटाटा, चार पाच ब्रेड स्लाईस, आल लसूण मिरची पेस्ट, लिंबू रस एक चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, कोथींबीर
मक्याचे दाणे मिक्सरवर वाटून घेऊन त्यामध्ये , वरील सर्व साहित्य घालून, आप्पे पात्रात घालावे, मिश्रण पातळ नको व एकदम जाडे पण नकोए, हाताने आप्पे पात्रात घालता येईल एवढे ठेवावे. टोमेटो सोस बरोबर द्यावे, किंवा नारळाच्या चटणी बरोबर द्यावे.
प्रतिक्रिया
26 Oct 2012 - 9:27 am | इरसाल
छान पाकृ.
मोजुन सव्वाचार ओळीची टाकलीत.
पुढील वेळेस पाककृतीचे तपशील जरा विस्तारीत द्यावे व शक्य असल्यास बरोबर प्रत्येक पायरीचे किंवा अंतिम पदार्थाचे छायाचित्रही.
26 Oct 2012 - 10:26 am | neeta
नवीन मेबर आहे जरा सांभाळून घ्या. अजून शिकत आहे.
26 Oct 2012 - 11:11 am | मोदक
मिश्रणात भरपूर चीज अॅडवा आणि शॅलो फ्राय / डीप फ्राय करा - कॉर्न चीज बॉल्स तयार..
कॉर्न चीज बॉल्स मध्ये आख्खे मके असले तर जास्ती टेस्टी...
26 Oct 2012 - 5:28 pm | Mrunalini
पाकॄ चांगली आहे. करुन बघायला पाहिजे.
26 Oct 2012 - 6:48 pm | श्रद्धा शैलेश
छान आहे व सोपे आहे.
26 Oct 2012 - 7:02 pm | राघवेंद्र
विकान्ताला करुन बायकोला सरप्राइज देउ शकतो.