संकेतस्थळांचे उपयोग - मिपा सदस्यांना विनंती

विकास's picture
विकास in काथ्याकूट
27 Jun 2008 - 4:24 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

सर्वप्रथमः "मिपाचे मालक/विश्वस्त तात्या यांच्याशी चर्चा करूनच मी हा प्रस्ताव मांडत आहे व सदर चर्चाप्रस्तावास मिसळपाव डॉट कॉम या संस्थळाचा पूर्ण पाठिंबा आहे. सबब, सदर प्रस्ताव ही मिपाचीच अधिकृत घोषणा आहे असे समजावे!"

आपण सर्वचजणं मिपावर येण्याचा आणि गप्पाटप्पा मारण्याचा आनंद मनापासून घेत आहोत. प्रत्येकाचे प्रत्येकाशी पटत नसेल, वादविवाद घडत असले अगदी तात्यांच्या हाताच्या टपल्यापण खाल्या तरी बहुतांशी सर्वजण पुन्हपुन्हा येत राहतात. मिपाचे हे यश वृद्धींगत होवोत ही मनःपूर्वक शुभेच्छा!

तर अशाच एका चर्चेत (छोटा डॉनने चालू केलेल्या चर्चेत) मी काही मुद्दे मांडले. विषय होता भारताबाबत आणि आपण एकत्र राहू का नाही, समाजाची अवस्था वगैरे आणि मूळ लेखाचा मथळा होता: इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता त्यावर मुक्तसुनीत यांनी मला काही खरडले... त्यांचा मूळ मुद्दा होता मिपासारखी संकेतस्थळे या संदर्भात काय करू शकतात? याला उत्तर देणे प्रतिसादा इतके सोपे नव्हते म्हणलं विचार करतो... तर नंतर परत गेल्या एका वादामधील माझ्या प्रतिसादावर त्यांनी मला आठवण करून दिली. मग काही गोष्टी खरडल्या, तात्यांना व्य.नि.ने विचारल्या आणि मुक्तसुनीत यांच्यापण त्यासंबंधात सुचना घेतल्या.

हे सर्व सांगायचे (नमनाला घडाभर तेलाचे) कारण काय? - तर संकेतस्थळातील देवाणघेवाणितून विरंगुळा जसा होवू शकतो तसाच काही भरीव गोष्टी करण्यासाठीपण एकमेकांना न बघता देखील उपयोग होऊ शकतो हे यातून दिसून येते. तर आता जे आमची निरोपानिरोपी झाली ती खाली मी देतो. मूळ कल्पना मुक्तसुनीत यांची, संकेतस्थळ तात्यांचे, मी फक्त निमित्त...

मिपाला गणेश चतुर्थीला वर्ष पूर्ण होईल. इथे इतकी माणसे येत असतात ते वास्तवात भेटून कट्टे करत असतात या कट्ट्यांचाच उपयोग त्या त्या कट्ट्यातील मेंबरांनी काहीतरी स्थानिक गरज असलेल्या गोष्टींना मदत करण्यासाठी केला तर एक चांगला पायंडा पडेल. याचा अर्थ त्यांनी टिपी करू नये असा अजिबात नाही. पण त्याचबरोबर काहीतरी सामाजीक जाण ठेवली गेली त्यातून काही उपक्रम (संकेतस्थळ नाही बरं का!) तयार झाला राबवला गेला तर बरेच काही साध्य होईल. कुणाचे काहीतरी चांगभले होईल तर कुणाला तसे करण्याची नकळत सवय लागेल. यात कोणी काय करावे, कुणाबरोबर करावे हा ज्याचा/जीचा/त्याचा/तिचा प्रश्न असेल आणि स्वभावाप्रमाणे त्यांनी काहीतरी करावे. कुठल्याही चांगल्या/प्रामाणिक संस्थेबरोबर काम करावे - पैसे देऊन अथवा बौद्धीक दान देऊन किंवा अजून कशातरी पद्धतीने. त्यात राजकारण नसावे -कुठल्याही विचारांच्या संस्थांना एखाद्या विशिष्ठ प्रोजेक्टसाठी मदत करता येईल, कधी कधी शाळांना अथवा गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांची अथवा अजून कसली मदत करता येईल. कुठल्या संस्थेकडून होते ह्याने काही फरक पडत नाही - सर्व लोकगंगेला मिळाल्याशी कारण... संस्था प्रामाणिक आणि ट्रॅकरेकॉर्ड असलेली असावी, त्यातून कुठलाही भेदभाव तयार होऊ नये इतकीच काय ती प्रामाणिक इच्छा/अट असावी...

किंवा

अजून एक शक्यता : ज्याला काही एक विशिष्ट सामाजिक कार्य/प्रोजेक्ट करायचा आहे त्याने/तिने मिपावर एक पोस्ट टाकावे. आपल्या प्रोजेक्टची माहिती सविस्तर कळवावी. शेवटी आपल्या कॉन्टॅक्ट पर्सनचे नाव-पत्ता-फोनसकट डीटेल्स कळवावेत. ज्या ज्या मिसळपावकराला काही मदत करायची असेल त्याने त्याने एका विशिष्ट मुदतीमधे ती करावी. योग्य तसा निधी जमा झाल्यावर त्या संस्थेला जाऊन ती मदत सुपूर्त करण्यात यावी. या सगळ्याचा छायाचित्रांसकट वृत्तांत त्या त्या माणसाने मिपावर छापावा....

आणि हो असा एखादा प्रकल्प केलाच तर तो होण्यासाठी मिपा हे संकेतस्थळ कारणीभूत ठरले (कारण येथे भेटलेल्या सदस्यांच्या कट्ट्यातून होत असल्याने) असे जाहीरपणे म्हणायला/सांगायला विसरू नये अशी प्रेमळ अट.

म्हणले तर यात तसे कमी लॉजिस्टीक्स असेल. कोणी येथे येऊन गैरफायदा घेणार नाही ना अशी काळजी वाटू शकेल आणि त्यात काही चूक नाही. म्हणून च ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या सेवाभावी संस्था आणि फोकस्ड प्रॉजेक्ट्सचा विचार व्हावा. नुसत्या हृदयाने नाही तर डोक्याने विचार करूनच ज्याला/जीला जो प्रकल्प आवडेल/मानवेल त्याला/तिने स्वेच्छेने मदत करावी. ती मदत काही ठिकाणि पैशाने असेल पण काही ठिकाणि व्हॉलेंटिअरींग/सेवा पद्धतीची पण असू शकते.

यात अमुकने केले म्हणजे मला पण तितकेच केले पाहीजे असे प्रेशर आणायचे नाही आणि घेयचे नाही. पण हा प्रकल्प संसर्गजन्य होण्यासाठी (म्हणजे एकमेकांकडून प्रेरणा घेऊन) ज्याने असे काही केले ते येथे जाहीरपणे सांगावे. यात पब्लिसिटी आहे, एका हाताने केलेले दान इतर हातांना कळून त्यांना पण तसे करावेसे वाटायला लावणे हा उद्देश राहूदेत...

११५ वर्षांपूर्वी लोकमान्यांनी त्याकाळाला साजेसा आणि गरजेप्रमाणे राजकीय कारणांसाठी सार्वजनीक गणेशोत्सवाचा प्रारंभ आणि उपयोग केला. आता राजकारण नाही पण समाजकारणासाठी करता आला, जिथे असेल तिथे, यथाशक्ती तर काही तरी चांगला पायंडा पडेल असे वाटते.

आपले विचार समजून घेयला आवडतील.

प्रतिक्रिया

बेसनलाडू's picture

27 Jun 2008 - 4:57 am | बेसनलाडू

उत्तम उपक्रम. यात सक्रीय सहभागी व्हायला आवडेल.मात्र भौगोलिक मर्यादांमुळे प्रत्यक्ष अंगराबते न होता उपक्रमाची रूपरेषा,नियोजन आणि आर्थिक मदत या मार्गांनी सहभागी होता येईल.
(उपक्रमी)बेसनलाडू

दोन प्रकल्प मनात आकार घेत आहेत;त्याबद्दलची सविस्तर रूपरेषा सवडीने तयार करून येथे टाकतो.तूर्तास त्यांचे थोडक्यात स्वरूप येथे सांगतो -

  1. अपत्य दत्तक योजनांबद्दल सामाजिक जागरूकता आणि उत्तेजन - उपवर/विवाहोत्सुक तरुण-तरुणींमध्ये तसेच नवविवाहित जोडप्यांमध्ये अपत्य दत्तक घेण्यासंबंधीं जागरुकता निर्माण करणे,माहिती पुरवणे - कायदेशीर प्रक्रिया,संबंधित संस्था आणि इतर आवश्यक माहिती ,आणि दत्तक प्रक्रियेला उत्तेजन देणे
  2. कचरा व्यवस्थापन - ओल्या व सुक्या कचर्‍याची विभागणी,विल्हेवाट,पुनर्वापरयोग्य कचर्‍याचे व्यवस्थापन यांबद्दल जागरुकता,माहितीचे आदानप्रदान,उत्तेजन आणि सक्रीय पाठपुरावा

(कल्पक)बेसनलाडू

इनोबा म्हणे's picture

27 Jun 2008 - 1:21 pm | इनोबा म्हणे

१)अपत्य दत्तक योजनांबद्दल सामाजिक जागरूकता आणि उत्तेजन -
२)कचरा व्यवस्थापन

दोन्ही कल्पना उत्तम. सहभागी व्हायला नक्कीच आवडेल. सविस्तर रुपरेषा लवकरात लवकर टाकावी,अशी विनंती.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

संदीप चित्रे's picture

27 Jun 2008 - 5:07 am | संदीप चित्रे

जशी जमेल तशी मदत करायला नक्कीच आवडेल.
सध्या, सामाजिक कार्यासाठी कार्यक्रम सादर करणार्‍या, एका म्युझिक गृपचा सदस्य आहेच.
अधिक माहितीसाठी पहा http://www.hidden-gems.com
----------
बेसनलाडू -- दत्तक घेण्यासंबधी योग्य सूचना.
नवीन जोडपी / विवाहोत्सुक जोडप्यांइतकेच आवश्यक आहे घरच्या मोठ्या लोकांना प्रोत्साहन देणे जेणेकरून एखाद्या जोडप्याने दत्तक घेतल्यास त्यांना योग्य ती सपोर्ट सिस्टीम उपलब्ध असेल.

--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------

प्रियाली's picture

27 Jun 2008 - 5:11 am | प्रियाली

केवळ वेबपेजवर न राहता अंमलात येण्यासाठी अनेक शुभेच्छा!

विसोबा खेचर's picture

27 Jun 2008 - 6:42 am | विसोबा खेचर

विकासरावांनी मांडलेल्या प्रस्तावाशी पूर्ण सहमत आहे...

कोणी येथे येऊन गैरफायदा घेणार नाही ना अशी काळजी वाटू शकेल आणि त्यात काही चूक नाही. म्हणून च ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या सेवाभावी संस्था आणि फोकस्ड प्रॉजेक्ट्सचा विचार व्हावा.

हेच म्हणतो..

विकासराव,

महत्वाचा अन् मला काळजी वाटणारा मुद्दा इतकाच की मिपाच्या नावाखाली यात कुठेही आर्थिक गैरव्यवहार होता कामा नये/होऊ नये याची मात्र काळजी घेतली पाहिजे. कारण 'पैसा आला की भल्याभल्यांची बुद्धी फिरते' हेच मला मुंबईने शिकवले आहे! आणि म्हणूनच एक मिपाकर उदय सप्रे यांनी नुकताच एक पुस्तक प्रकाशनाचा प्रस्ताव मांडला होता त्यावरही मला महाराजांबद्दल आत्यंतिक प्रेम व आदर असूनदेखील 'मिपाचा' यात काहीही संबंध असणार नाही असा सावध प्रतिसाद नाईलाजास्तव द्यावा लागला होता!

तरी प्रत्येकाने केलेली मदत ही त्याची/तिची वैयक्तिक मदत असावी/असेल व त्याचे संपूर्ण श्रेय त्या व्यक्तिचेच असेल. त्याचे श्रेय मिपाला न मिळता मिपा फक्त निमित्तमात्र ठरले तरी उत्तम! परंतु 'मिपाच्या नावाखाली अमूक अमूक रक्कम गोळा केली गेली अन् ती संबंधित संस्थेला पोहोचलीच नाही!' असं कधीही, केव्हाही होता कामा नये!!!

यात कुणावर अविश्वास आहे असं नाही, परंतु दुनिया पाहिल्यामुळे काही पाऊलं सुरवातीपासूनच फार सावधपणे टाकावी लागतात!

असो, स्पष्ट लिहिल्याबद्दल क्षमस्व, परंतु विकासराव, आपण माझा मुद्दा समजू शकता अशी आशा करतो..

बाकी प्रस्ताव नक्कीच चांगला आहे.

चला, लगे हाथ मी माझ्याकडून लगेच एक घोषणा करून टाकतो व या प्रस्तावास शुभारंभाचा होकार भरतो..! :)

घोषणा अशी की,

जेव्हा जेव्हा मिपाकर मंडळी कट्टा भरवतील तेव्हा तेव्हा माझ्याकडून १०१ रुपयांपासून ते 'अबक' रुपयांपर्यंत (माझ्या त्या त्या वेळच्या ऐपतीप्रमाणे!) मी माझं श्रद्धास्थान असलेल्या महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेस मी देणगी देईन अन् त्याची पावती स्कॅन करून इथे प्रसिद्ध करीन.

ही पावती इथे प्रसिद्ध करण्यामागे आपण म्हणता त्याप्रमाणे जाहिरातीचा भाग नाही, तर इतरांनीही त्यापासून काही स्फूर्ती घ्यावी हाच विनम्र हेतू असेल...

असो....

आपला,
तात्या अभ्यंकर,
स्वयंसेवक, भाऊबीज निधी
महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे.

मुक्तसुनीत's picture

27 Jun 2008 - 6:49 am | मुक्तसुनीत

तात्या जेव्हा हिंगण्याकरता फंड-रेझिंग करतील तेव्हा माझ्याकडून रुपये १०,०००/- लागू . पैसे तात्यांपर्यंत चेकने पोचवण्याची जबाबदारी माझी.

तात्या , संमेलन-कम-फंडरेझिंगच्या कार्यक्रमाच्या तारखांची थोडी पूर्वकल्पना द्यावी ही विनंती.

बहुगुणी's picture

28 Jun 2008 - 12:20 am | बहुगुणी

एक सर्वांना दिसेल असा प्लेजिंगचा फलक "आजच्या देणग्यांची प्रतिज्ञा" म्हणून सुरू करावा, त्यावर जस-जसे प्रकल्प येतील तस-तसे देणगी देऊ इच्छिणारे 'मिपा'कार यांच्या नावांची नोंद व्हावी. प्रत्येक प्रकल्पाच्या पुरस्कर्त्याने सुयोग्य 'अन्तिम दिन' जाहीर करावा, त्या तारखेचीही नोंद या फलकावर असावी. ती तारीख ओलांडल्यावर पुरस्कर्त्याने आपला संपर्काचा पत्ता/दूरध्वनी क्र. त्या त्या देणगी प्रतिज्ञकांना व्य. नि. द्वारे कळवावा. आणि अखेर विवक्षित मुदतीनंतर (follow up date, प्रकल्प प्रगती दिनांक, ही देखील फलकावर अंतर्भूत असावी) या देणग्यांमुळे झालेली प्रकल्प प्रगती जाहीरपणे 'लिंक' च्या द्वारे व्यक्त करावी.

उदाहरणार्थः

प्रकल्प देणगी अन्तिम दिन देणगी देऊ इच्छिणारे 'मिपा'कार प्रकल्प प्रगती दिनांक देणग्यांमुळे झालेली प्रकल्प प्रगती

मला स्वत:ला, हिंगण्याकरता मदत करण्याशिवाय, डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांची पत्नी मंदाकिनी आमटे यांच्या कार्यातही हातभार लावावासा वाटतो, इतरांनीही यात मदत करावी अशी विनंति. या दोन्ही प्रकल्पांसाठी प्रत्येकी ५००० रु. देणगी मी देउ करतो. आमटे यांच्या कार्यात मदत कशी पोहोचवायची ह्याची माहिती जाणकारांनी कळवावी. (आमटे यांचे कार्य)

विकास's picture

27 Jun 2008 - 7:19 am | विकास

तरी प्रत्येकाने केलेली मदत ही त्याची/तिची वैयक्तिक मदत असावी/असेल व त्याचे संपूर्ण श्रेय त्या व्यक्तिचेच असेल. त्याचे श्रेय मिपाला न मिळता मिपा फक्त निमित्तमात्र ठरले तरी उत्तम! परंतु 'मिपाच्या नावाखाली अमूक अमूक रक्कम गोळा केली गेली अन् ती संबंधित संस्थेला पोहोचलीच नाही!' असं कधीही, केव्हाही होता कामा नये!!!

अगदी मान्य. मला यापेक्षा वेगळे अपेक्षित नव्हते, पण नीट लिहीले गेले नाही. मिपा निमित्तमात्रच असेल फक्त उल्लेख करण्याचा हेतू इतकाच की त्यातून इतरांना संकेतस्थळाचा असाही उपयोग होऊ शकतो याची जाणीव करून देणे. म्हणूनच म्हणले की ट्रॅक रेकॉर्ड असलेल्या (आणि अजून म्हणायचे राहीलेले पण रजिस्टर्ड) सेवाभावी संस्थेला असली देणगी सरळ जाउदेत.

यात कुणावर अविश्वास आहे असं नाही, परंतु दुनिया पाहिल्यामुळे काही पाऊलं सुरवातीपासूनच फार सावधपणे टाकावी लागतात!

हे असेच स्पष्ट असूदेत. त्यात काही गैर नाही तर त्याची गरज आहे. इतरांना पण विनंती काही यात काही तॄटी होऊ शकत असल्यास/वाटत असल्यास त्या अवश्य सांगा. यात व्यक्तिगत काहीच नाही आणि घेणारपण नाही. या संदर्भात मी आज पर्यंत सावधपणे वागत आलो आहे - संस्थेसाठी काम करताना अथवा चालवताना...

सहज's picture

27 Jun 2008 - 6:53 am | सहज

संपुर्ण अनुमोदन.

विचारमंथन सुरु झाले आहेच.

लवकरच मुर्त स्वरुप यावे.

भडकमकर मास्तर's picture

27 Jun 2008 - 10:00 am | भडकमकर मास्तर

योग्य आहे...
हेच म्हणतो...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jun 2008 - 9:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रस्ताव चांगला आहे, काय करता येऊ शकते त्याची एकदा मनात बांधणी करतो आणि मग योगदान आणि सहभागाबद्दल ठरवतो.
मिसळपाव सदस्य सामाजिक जवाबदारीचे भान ठेवतात, किती आनंदाची गोष्ट !!!

छोटा डॉन's picture

27 Jun 2008 - 9:51 am | छोटा डॉन

मी विकासरावांनी मांडलेला प्रस्ताव व त्यामागची त्यांची भुमीका यांच्याशी संपुर्णपणे सहमत आहे.
बर्‍याच दिवस मी सुद्धा असाच विचार करत होतो की "ह्या व्यासपीठावरुन समाजासाठी" काही करता येईल का ?
च्यायला ह्या नोकरीमुळे इतर कामासाठी अजिबात वेळ भेटत नाही. पण सामाजीक अस्वस्थता स्वस्थही बसु देत नाही. मग त्याला नुसतेच "लेख" म्हणून काही खरडणे पुरेसे नाही ह्याची जाणीव होतीच. काहीतरी करणे जरुरीचे आहे.

"क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे" हे म्हणतात तेच खरे. असो, विकासरावांनी सुरवात केली आहे त्याला माझा पाठिंबा !!!
तात्यांची "सावधपणाची" सुचना पटण्यासारखी आहे.
बाकी सर म्हटल्याप्रमाणे "मिसळपाव सदस्य सामाजिक जवाबदारीचे भान ठेवतात, किती आनंदाची गोष्ट !!! " असेच म्हणतो.

याबरोबरच अजुन एक गोष्ट मनात आहे ती म्हणजे "मिपाकरांचा एक मास्टर डेटाबेस" बनवणे. त्यात इच्छुकांचे "संपर्क, व्यवसाय, आवडी, समाजकार्य करण्याची इच्छा" याचा समावेश करणे शक्य आहे. त्याचा उपयोग खुप ठिकाणी होऊ शकतो.
सध्या आपले "मिपाकर" जगभर अनेक भागात पसरले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, अनेक कौशल्य बाळगुन आहेत व अनेक ठिकाणी याची एकमेकांना मदत होऊ शकते.
कुणाला परदेशवारीच्या वेळी, देशांतर्गत प्रवास व तेथील हवी असल्यास व्यवस्था, शिक्षण, कला, संगीत, पाककला .... इ.इ. असा अनेक गोष्टीत आपण एकमेकांना मदत करु शकतो. असे म्हणतात की "एक मराठी माणुस दुसर्‍या मराठी माणसाला मदत करत नाही" हे कुठेतरी मनाला बोचते. पाहु, आपण त्यासाठी काही करु शकतो का ? आमच्या "बेंगलोर कट्ट्यावर" ह्या गोष्तीबद्दल सांगोपांग चर्चा झाली व त्यावेळीच मी हा धागा टाकणार होत पण तो कट्टा वेगळ्याच कारणाने गाजल्याने हा विषय विस्मॄतीत गेला.
याबद्दल आपली मते कळल्यास मला "थोडा अभ्यास" करुन "प्रपोजल " तयार करता येईल ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा's picture

27 Jun 2008 - 12:10 pm | धमाल मुलगा

वा!

तिकडे संपादकीय आणि इथे विधायक कार्यांसाठी पावले उचलण्याची चर्चा! दोन छान गोष्टी एकाच दिवशी. सुंदर.

विकासराव,
अतिशय उत्तम विचार.
इथे आपण केवळ मराठी साहित्य, चर्चा (आणि आमच्यासारख्यांच्या बाबतीत टवाळक्याही ;) ) साठीच जमतो असे नव्हे तर आपल्यामध्ये तयार झालेली ही एकी अशा विधायक कामांसाठी वापरली जावी हा विचार अतिशय स्तुत्यच.

अभय बंग व राणी बंग ह्यांच्याही कार्याला हातभार लावण्याची संधी आपल्याला ह्या निमित्ताने मिळू शकते. लवकरच त्याबद्दल मी इथे माहिती प्रकाशीत करेन.

छोटा डॉन ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे, आपले मिपाकर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी गेले असता, जर तेथील आपल्या ओळखीच्या (आंतरजालीय ओळख का होईना), व्यक्तिंशी संपर्क साधू शकल्यास काही मदत मिळू शकल्यास (घाबरु नका, आर्थिक नव्हे.) ते सोयीचे पडेल. उदा. मी जर इंग्लंडला गेलो तर छोटी टिंगीशी संपर्क साधून कुठे स्वस्तात घर मिळू शकेल इ.इ. गोष्टी विचारुन घेऊ शकेन.
ह्यातुन नक्कीच असलेले ॠणानुबंध वृध्दींगत होतील असे मला वाटते.

तात्या,नीलकांत ह्यांनी ह्या मास्टर डेटाबेसबद्द्ल जरुर विचार करावा अशी माझी त्यांना विनंती आहे.
अर्थात आपली माहिती पुरवायची की नाही, हा प्रश्न वैयक्तिक असेलच.

असो, विकासरावांचे अभिनंदन, त्यांनी अशा विषयावर चर्चाप्रस्ताव मांडल्याबद्दल.
मी ह्यात मनापासुन सहभागी होण्यास इच्छुक आहे.

आपला,
ध मा ल.

आनंदयात्री's picture

28 Jun 2008 - 12:27 am | आनंदयात्री

असेच म्हणतो.

(सहमत) आनंदयात्री

मयुरयेलपले's picture

27 Jun 2008 - 10:47 am | मयुरयेलपले

नमस्कार मिपाकरहो...
आपला उपक्रम नक्किच स्तुत्य आहे .. पण आमचि जात विद्यार्थाचि त्यामुळे आर्थिक मदत आजुन दोन वर्ष तरि शक्य नाहि पण स्वयंसेवक म्हनुन महाराष्ट्रात कुठेहि उपस्थित राह्यला अम्हि तयार आहोत..(सुट्टित)
आपला मयुर

अन्जलि's picture

27 Jun 2008 - 12:37 pm | अन्जलि

उपक्रम अगदि स्तुत्य आहे. यथाशक्ति मदत करायला नक्किच आवडेल. एक विचार मनात आला म्हनुन लिहिते आज काल आपण श्राध वगेरे करत नाहि म्हन्जे दर् वेळी रजा घेण शक्य नस्ते म्हनुन मनात असुन सुध्हआ आपण करु शकत नाहि तर त्या त्य्या दिवशि आपण पूर्वज्याच्या नावाने देणगि दिल्यास ति गरजु लोकनपर्यन्त पोचवु शकु. जसे वास्त्ल्य साथि कोनाला मदत कराय चि असेल तर मि ति मदत पोच्वु शकेन कारन ति सन्स्था मझ्या घरापासुन जवल आहे. क्रुपया माझा मुद्दा लक्शात घ्या लिहिताना चुका होत अस्ल्यामुले खुप स्पस्ट करता येत नाहिय. तुम्चे विचार ऐकाय्ला आवडतिल.

अरुण मनोहर's picture

27 Jun 2008 - 3:05 pm | अरुण मनोहर

हे फार स्तुत्य सामाजिक कार्य हातात घेत आहोत. परदेशातून जर काही सहकार्य लागले तर सांगा. मदत करायला आवडेल.

प्रगती's picture

27 Jun 2008 - 7:33 pm | प्रगती

आम्हाला पण "सलोनी लायब्ररी" तर्फे सामाजिक कार्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याची इच्छा आहे.
"मिपाकरांचा एक मास्टर डेटाबेस" बनवणे. त्यात इच्छुकांचे "संपर्क, व्यवसाय, आवडी, समाजकार्य करण्याची इच्छा" याचा समावेश करणे शक्य आहे" छोटा डॉन यांच्याशी सहमत.
ज्याप्रमाणे श्रीयुत संदिप चित्रे हे जसे सामाजिक कार्यासाठी काही कार्यक्रम सादर करतात त्याचप्रमाणे आपणही काही कार्यक्रम करु शकतो का? मला माहीत आहे की या गोष्टी थोडया अवघड आहेत पण आपण यावर काही विचार करु शकतो का?

सखाराम_गटणे™'s picture

27 Jun 2008 - 11:40 pm | सखाराम_गटणे™

मी ऐका NGO (maimarathi.org) साठी काम करतो.
आपण ते ऐक माध्यम म्हणुण वापरु शकतो.
कारण त्याच्यांकडे सगळे पायाभुत सुविधा तयार आहेत.

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

विकास's picture

28 Jun 2008 - 12:18 am | विकास

सर्व वाचकांना आणि प्रतिसादांबद्दल धन्यवाद!

आपल्याला आलेले प्रतिसाद वाचताना लक्षात आले असेल की अगदी सहजपणे काही चांगली कामे होऊ शकतात.

दत्तक योजना
कचरा व्यवस्थापन
हिंगण्याचा भाऊबीज फंड
मराठी माणसाची मराठी माणसाला मदत
डेटाबेस आणि नेटवर्कींग
मायमराठी.ऑर्ग

अशा अनेक कल्पना तात्काळ पुढे आल्या. यात काही स्वतःच पाळायचे नियम लक्षात असुद्यात ही विनंती:

  1. मिसळपावचा उल्लेख करून पैसे मागायचे नाहीत
  2. अनेकदा इमेल वर पैशाची मागणी करणार्‍या येतात - (अमुक आजारी आहे, तमुकचा पाय मोडला वगैरे) अशा विनंत्या कोणी कुणाला फॉरवर्ड करू नये आणि येथे पण पोस्ट करू नयेत
  3. स्वतःचे अनुभव अवश्य सांगा - चांगले आणि वाईटही पण वाईट सांगायचाच असला तर स्वतःचाच सांगा आणि तसे स्प्ष्ट आणि सभ्य शब्दात सांगा. अमुक म्हणाला वगैरे नाही. कारण कितीही झाले तरी नकळत एखाद्या संस्थेला यातून उगाच बदनामी मिळू शकेल. ह्या गोष्टी नाजूक असतात आणि त्या तशाच हाताळल्या तर इप्सित साध्य होऊ शकेल.
  4. राजकारण आणायचे नाही. भारतीय पद्धतीत अनेक विचारांच्या सेवाभावी संस्था कार्यरत आहेत - समाजवादी, साम्यवादी आणि हिंदूत्ववादी. पण आपण मदत करतोय ते केवळ एखादा प्रकल्प चांगला वाटला म्हणून इतकेच डोक्यात ठेवावे आणि त्यावरून वाद निर्माण करू नयेत. (मिशनरी संस्थापण आहेत ज्या धर्मांतराला प्रोत्साहन देत नसतील त्यांच्यापुरते मर्यादीत ठेवले तर बरे होईल पण तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे.)
  5. संस्थेची व्यवस्थित माहीती, त्यांचे काम वगैरे पाहून मदत करा. मदत नुसती पैशानेच होऊ शकते असे समजू नका!

पुढचे दिड-दोन दिवस मला मिपा अथवा संगणकाला "ऍक्सेस" नसेल. तेंव्हा एखाद्या प्रतिसादास उत्तर दिले नाही तरी गैरसमज करून घेउ नका!

परत एकदा धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

28 Jun 2008 - 12:24 am | विसोबा खेचर

मिसळपावचा उल्लेख करून पैसे मागायचे नाहीत

हा सर्वात महत्वाचा मुद्दा...!

धन्यवाद विकासराव..

तात्या.

गैरसमज..
प्रेषक विसोबा खेचर ( शुक्र, 03/21/2008 - 13:58) .
जगामध्ये मराठी माणसाला काहितरी करताना (एखादी सणसणीत शिवी द्याविशी वाटते! ) खवी लागते.
गैरसमज होतो आहे. मी मराठी माणसाला काहीतरी करताना पाहून शिवी द्याविशी वाटते असे कुठेही लिहिलेले नाही. कृपया इकडचे अर्थ तिकडे चिकटवू नका!
आपण जर का मुबंई जवळचे असाला तर आपण माझ्या लेखातील खेरेपाना पाहान्यास आवश्क्य आमच्या संस्थेस भेट्द्या....
नक्की देईन!
व मराठी तून लेखलिहुन अनुदान मिळवून दाखवा हे आपणास विनम्र अह्वावन करीत आहे.
ते जमेलसं वाटत नाही कारण माझ्या सर्व श्रद्धा पुण्याच्या महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेस वाहिलेल्या आहेत त्यामुळे इतर अनेक सामाजिक संस्थांच्या कार्यात इच्छा असूनही भाग घेणे मला शक्य होत नाही. तरीही कधी सवड मिळाल्यास मी आपल्या संस्थेला अवश्य भेट देईन व माझ्या कुवतीप्रमाणे यथाशक्ति मदतही करीन. याहून अधिक, म्हणजे लेख लिहून अनुदान वगैरे मिळवणे मला शक्य होईलसे वाटत नाही.

असो, आपल्या कार्याला अनेक शुभेच्छा!
जाता जाता -
मराठी संस्थळांवर मराठीतच लिहिण्याचा आग्रह असणे आणि लोकांना तसा आग्रह करणे फारसे गैर नाही एवढा मुद्दा मात्र अवश्य लक्षात घ्या, ही विनंती!
आपल्या संस्थेस माझ्या अनेकोत्तम शुभेच्छा!
आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
स्वयंसेवक, भाऊबीज निधी,
महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्था, पुणे.

विसोबा खेचर's picture

28 Jun 2008 - 9:10 am | विसोबा खेचर

नाईक साहेब,

माझे पूर्वीचे लेखन इथे प्रसिद्ध करण्याचे प्रयोजन समजले नाही! प्रतिसादाच्या सुरवातीला आपण 'गैरसमज' असे लिहिले आहे. कुठला गैरसमज?

विकासरावांनी जो चर्चाप्रस्ताव मांडला आहे त्यावर तुमचं वैयक्तिक अन् स्वतंत्र मत काय ते लिहा की! माझाच पूर्वीचा प्रतिसाद इथे उद्घृत करण्याचा हा काय प्रकार आहे??

तात्या.

बेसनलाडू's picture

9 Jul 2008 - 2:06 am | बेसनलाडू

टाईम्स ऑफ इन्डियाने टीच इन्डिया उपक्रम चालू केला आहे.
संबंधित बातमी येथे वाचा. हा प्रत्यक्ष सहभागातून आणि आयुष्यातल्या थोड्या वेळाच्या समर्पणातून साकार होणारा उपक्रम आहे.
उपक्रमाबाबत अधिक माहिती येथे मिळेल.
या उपक्रमाशी संबंधित,उपक्रमाच्या सुरुवातीची प्रेरणा ठरलेली शिक्षणहक्क विधेयकाबाबतची बातमी येथे वाचा. शिक्षणहक्क विधेयक येथे वाचता येईल.
ज्यांना या उपक्रमात प्रत्यक्ष सहभागी होऊन स्वेच्छासेवा (वॉलन्टिअरिंग) स्वरूपाचे काम करणे शक्य असेल,त्या मिपाकरांनी या स्तुत्य उपक्रमात निश्चित सहभागी व्हावे आणि मिसळपाव या संकेतस्थळाचा या उपक्रमासाठी पूरक म्हणून कसा फायदा होईल,याचा विचार करावा,ही नम्र विनंती.
(उपक्रमी)बेसनलाडू

शिप्रा's picture

9 Jul 2008 - 4:34 pm | शिप्रा

मि नविन सभासद आहे. रोज येथिल लेखन वाचते. आधि वाटल होते कि फक्त चहाट्ळ्पणा चालतो. :) :) पण वरिल विचार वाचुन मिपा चि फॅन झाले.
खुप खुप शुभेच्छा

सर्किट's picture

9 Jul 2008 - 11:44 pm | सर्किट (not verified)

आधि वाटल होते कि फक्त चहाट्ळ्पणा चालतो.

चहाटळपणा ? छे ! आम्हाला कुठे दिसला नाही तो ?

- (मि पण मिपाचा फ्यान) सर्किट

शिप्रा's picture

10 Jul 2008 - 11:23 am | शिप्रा

मि चहाटळ लोकांबद्ल नव्हते बोलत. त्यामुळे तो तुम्हाला दिसायचा प्रशनच नाहि...