धुक्यात हरवली वाट...

सोत्रि's picture
सोत्रि in कलादालन
2 Oct 2012 - 12:21 pm

मागच्या महिन्यात कोडाईकनालला जायचा योग आला. ऑफिसमधल्या सहकार्यांसोबत एक रात्र मुक्कामी सहल केली. कोडाईकनाल छानच आहे. मस्त 8-10 डिग्री तापमान होते. प्रचंड प्रमाणात धुक्याची दुलई पसरलेली सर्व सभोवतालावर. त्यावेळी मागच्या पोस्टमधल्या भुछत्रांचे फोटो काढून परत येताना ही धुक्याची दुलई अतिशय दाट झाली आणि धुक्यात हरवली वाट...

जरी फोटोंमधले हे सर्व वातावरण अगदी रम्य आणि उन्मादक असले तरीही एक उदासी होती तेव्हा तिथे माझ्या मनात. हे सर्व फोटो इथे टाकताना काही फार छान फिलींग मात्र नाहीयेय. कारण विचारताय? बरं सांगतो... कारण इतक्या छान रोमॅन्टीक ठिकाणी ह्या धुक्यात हरवलेल्या वाटेवर हातात हात गुंफून फिरायला बायको बरोबर नव्हती :( सगळे मद्रासी अण्णा बरोबर होते, काहीतरी पांचट जोक्स करत, तेही तमिळ मध्ये :(

असो, पण त्याने ह्या धुक्यात हरवलेल्या वाटेवरची उन्मादकता कमी होत नाही नक्कीच!

हे ठिकाण

प्रतिक्रिया

वपाडाव's picture

2 Oct 2012 - 12:35 pm | वपाडाव

सौदिंडीया भ्रमण जोरावर... चालु द्या...

परिकथेतील राजकुमार's picture

2 Oct 2012 - 1:13 pm | परिकथेतील राजकुमार

चित्रे जबराच आहेत.

मात्र सोत्रि अण्णामध्ये 'डायरीयाचे' जंतू आढळले असल्याचे निरिक्षण नोंदवतो. ;)

सोत्रि's picture

2 Oct 2012 - 10:42 pm | सोत्रि

पराण्णा भावना पोहोचल्या!
'डायरिया'चे जंतू मारण्यासाठी 'रॉयल चॅलेंज' ह्या औषधाचा एक्स्ट्रा स्ट्रॉन्ग डोस घेण्यात आलेला आहे. :-)

- ( एक किरकोळ जंतू ) सोकाजी

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Oct 2012 - 1:20 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

खुपच सुंदर फटू...
आवडले.

प्रभाकर पेठकर's picture

2 Oct 2012 - 1:36 pm | प्रभाकर पेठकर

वॉव... हाऊ रोमँटिक...! कोडाईकॅनॉल सहल निश्चित करावी लागणार. बायको (अर्थात, स्वतःची) तर बरोबर असावीच पण ब्लॅक लेबल रोमँटिझम म्हणजे मलई विरहित लस्सी!

अवांतरः छायाचित्रांमध्ये तो अन तोच पणा (वातावरणाचा) जाणवतो आहे. फक्त ४-५ छायाचित्रांनी ह्याहून सुंदर परिणार साधता आला असता.

प्रभाकर पेठकर's picture

2 Oct 2012 - 1:39 pm | प्रभाकर पेठकर

कृपया, 'ब्लॅक लेबल शिवाय रोमँटिझम म्हणजे मलई विरहित लस्सी' असे वाचावे.

किसन शिंदे's picture

2 Oct 2012 - 4:09 pm | किसन शिंदे

शेवटची दोन तीन वाक्य वाचून ते सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहीलं आणि मोठमोठ्याने हसणार्‍या ७-८ मद्रासी अण्णांच्या घोळक्यात गरीब चेहर्‍याने उभे राहिलेले सोकाजी नाना डोळ्यासमोर आले आणि खुदकन हसू आलं. :D

खुशि's picture

2 Oct 2012 - 5:09 pm | खुशि

सुन्दर फोटो. पत्नी बरोबर नन्तर कधितरी.

>>> पत्नी बरोबर नन्तर कधितरी.>>> कुणाच्या? अन कोण?

बाकी :: आमचे सोत्रिअण्णा बघुन घेतील काय करायचं ते...

फर्क तो पडता है भइ, रेल्वे क्रॉसिंग पे हमेशा सावधानी रखो :D

सोत्रि's picture

3 Oct 2012 - 7:36 am | सोत्रि

पूजाशी सहमत होण्यावाचून गत्यंतर नाहीयेय, बायकोचा वावर असतो मिपावर. नाहीतर वप्याचा आॅप्शन विचार करण्यासारखा आहे :-D

-(रेल्वे क्राॅसिंगला घाबरणारा) सोकाजी

५० फक्त's picture

3 Oct 2012 - 8:08 am | ५० फक्त

वप्या ऑप्शनला, आणि सोकाजी तुम्ही ?

बाकी, इकडं आलात की एकदा पहाटे निघुन लवासाच्या नेचर ट्रेलला जाउ, व्यवस्था करतो मी.

वपाडाव's picture

3 Oct 2012 - 4:50 pm | वपाडाव

मी सरळसोट आहे... वरील विधानांशी माझा काहीएक संबंध नाही...
"I am only responsible for what I say not for what you understand !!!"

जाई.'s picture

2 Oct 2012 - 9:11 pm | जाई.

सुंदर!!!!!!!!

... कारण इतक्या छान रोमॅन्टीक ठिकाणी ह्या धुक्यात हरवलेल्या वाटेवर हातात हात गुंफून फिरायला बायको बरोबर नव्हती

फोटो आणि शेवट दोन्ही उत्तम!

मी_आहे_ना's picture

3 Oct 2012 - 7:05 pm | मी_आहे_ना

मस्त फोटो!

सुहास..'s picture

4 Oct 2012 - 8:22 pm | सुहास..

लय भारी !

शुचि's picture

4 Oct 2012 - 8:47 pm | शुचि

फारच सुंदर फोटो.