जालावरील संक्षिप्त शब्द

सध्या आपण आंतरजालावर खूप शब्दांची संक्षिप्त रूपे वापरतो.
जसे
१) व्य. नि. / विरोप = व्यक्तिगत निरोप.
२) ह. ह. पु. वा. = हसून हसून पुरे वाट
३) पु. ले. शु. = पुढील लेखनाला/स शुभेच्छा.

यातील काही शब्दांचे पूर्णार्थ माहीत नसल्यास बरेच वेळा प्रतिसादांचा अर्थे समजत नाही.
तरी आपण वापरत असलेले संक्षेप येथे नोंदवावे यासाठी हा धागा सुरु करत आहे.

प्र क टा आ म्हणजे काय?

प्र का टा आ म्हणजे

प्रतिसाद काढून टाकला हे.
(प्रतिसादी)बेसनलाडू

अरे मला

अरे मला वाटत होते की हा काही प्रकट आभाराचा प्रकार आहे कि काय?

विद्याधर

ह घ्या

लकेच घ्या.
(हलका)बेसनलाडू

खवः खरड

खवः खरड वही
खफः खरडायचा फळा

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला Smile)

जालावरील आणखी काही संक्षिप्त (विक्षिप्त) शब्द

बेला - बेसनलाडू
पिडा - पिवळा डांबिस
धमु - माल मुलगा
छोटि - छोटी टिंगी
केसु - केशवसुमार
(कृपया अहघ्या (अत्यंत हलके घ्या)) Smile

चतुरंग

अहघ्या????????

अहघ्या.....चा अर्थ,
अत्यंत हलकटपणे घ्या.!!! असा पण अर्थ लागू शकतो कि..... Wink

(अत्यंत ह.) अभिज्ञ.

मग बरं झालं ना

मी पुढे कंस लिहिला, पण खरं तर ह्या बाबतीत मी 'अभिज्ञ' होतो! Wink

चतुरंग

मस्त विषय

हघेहेसानलगे = हलकेच घ्या हे सांगणे न लगे.

खकेरुचापुपुमो !

खर्चकेलेल्यारुपयाचापुरेपूरमोबदला ! Smile

चू भू द्या घ्या

चूभूद्यावी/द्या घ्यावी/घ्या.
(बिनचूक)बेसनलाडू

विरोप म्हणजे व्यक्तिगत निरोप नव्हे

विरोप म्हणजे व्यक्तिगत निरोप नव्हे! विरोप = विद्युत निरोप = इलेक्ट्रॉनिक मेल (ई-मेल)
(सुधारक)बेसनलाडू

ह.भ.प. ,

ह.भ.प. :- ळूच जी ळवणारा
भापो : भावना पोहोचल्या
स्वलाकन : स्वता:ची लाल करुनघेऊ नये

कुबड्या खविस

तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

अजुन

अजुन ऐक

ह.भ.प.: हरभरे भरडण्यात पटाईत
ह.भ.प.: हरी भक्त परायण (फक्त अती सात्वीक लोकांसाठी)

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला Smile)

अजून ह.भ.प.

ह. भ. प. = हळूच भलतीकडे पाहणारे Wink
--(निरिक्षक) लिखाळ.

आणखी एक ह.भ.प.

ह.भ.प. : _गून _डवा पळाला....
ता.क. ह्.घ्या.

ह.भ.प. कुबड्या खवीस


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

अजुन काही ....

हा माझा आणि तात्यांचा फेवरीट ....
" आ. का. का. क. ना. हे. ज. जा. आ." म्हणजे " आम्हाला काव्यातले काहीही कळत नाही हे जग जाहीर आहे"

हा धम्याचा ...
"क. ठ. हा. मा. घे. स्मा." म्हणजे " कपाळावर ठप्पकन हात मारुन घेणारी स्मायली" ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भारी

आहेत रे एक्दम्.....जबराट!

हहडोपा, हहमुव, हहपोदु

हहडोपा - हसून हसून डोळ्यात पाणी
हहमुव - हसून हसून मुरकुंडी वळली
हहपोदु - हसून हसून पोटात दुखले