सध्या पाकिस्तानी कलाकार व भारतीय कार्यक्रमात सहभाग ह्या विषयांवर बरेच काही लिहून येत आहे. त्या विषयी माझे मुक्त प्रकटन ह्यात मी अबुधाबी , युके , आणि जर्मनी मध्ये अनेक पाकिस्तानी नागरिकांना भेटलो व त्यांच्याशी संवाद साधला चर्चा ,वादविवाद खूप घातले. त्यांचा कडून भारताविषयी मत जहाल ,मवाळ मते कानावर पडली. ह्याच मुद्द्याला अनुरूप अशी चर्चासत्रे पाकिस्तानी प्रसारमाध्यमात घडतात. त्यांना भारतीय वाहिन्यांवर बंदी हवी आहे. कारण ह्यांच्या मार्फत हिंदू संस्कृती पाकिस्तानी घरांमध्ये झिरपत आहे. म्हणूनच ह्या विषयावर वेगळ्या दृष्टी कोनातून विचार मांडत आहे.
पाकिस्तान मधील सामाजिक व राजकीय स्तर हा आपल्या सारखा बहु त्रिस्तरीय आहे. तेथे सुद्धा प्रांतिक अस्मिता , शिया ,सुन्नी राजकारण व जहाल व मवाळ विचारधारा आहेत. तेथे चार प्रमुख वर्ग आहेत. एक सत्ताधारी ( जे अमेरिकेच्या पाठिंब्यावर टिकून आहेत ) दुसरा म्हणजे सर्वात प्रबळ तेथील आर्मी तिसरा म्हणजे आय एस आय हि गुप्तचर संघटना व चौथा म्हणजे मुल्ला आणि कट्टरपंथी ह्या चारही वर्गाचा एकमेकावर नियंत्रण व ताळमेळ नाही आहे. मुंबई हल्ला झाला तो ह्याच सर्व वर्गातील काही लोकांमुळे
. पण सर्व सामान्य पाकिस्तानी ( मी जे परदेशात वेगवेगळ्या देशात पहिले ते आपल्या देशातील ह्या चारही वर्गापासून प्रचंड नाराज आहेत.) आपला देश रसातळाला जात आहे हे त्यांना दिसत आहे. व भारताची प्रगती सुद्धा ( त्यांच्या मानाने दिसत आहे.). पाकिस्तान मध्ये मुल्ला आणि कट्टर पंथ आणि त्यांचे लष्कर व आय एस आय नेहमीच भारत द्वेष तेथील जनतेत पसरवतात व त्यासाठी अनेक लोणकढ्या थापा तेथील जनतेला सांगतात. की पाकिस्तान हा भारतापेक्षा सर्वच पातळीवर सरस आहे.
मात्र भारतीय वाहिन्या तेथील प्रमुख शहरे व गावांमध्ये पोहोचल्यामुळे ह्यांचे बिंग उघडकीस आले.
त्यांची जळजळ ह्या क्लिप मधून कळून येते.
.
कारण ह्या वाहिन्यांना तेथे जबरदस्त लोकप्रियता लाभली आहे. ह्यातून पाकिस्तानी सिनेमा व टिव्ही ह्यांची तुलना साहजिकच पाकिस्तानी माध्यमांशी तेथील जनता कळते. व भारत ह्या बाबतीत दर्जात्मक व आर्थिक दृष्ट्या पाक पेक्षा सरस आहे हे कळून चुकले आहे.( १०० कोटीचा व्यवसाय करणारा भारतीय सिनेमा त्यांना अचंबित करतो. ) तेथील नेते व अनेक मान्यवर भारताशी तुलना होऊ शकत नाही असे जाहीरपणे म्हणतात. आज तेथील लग्नात भारतीय गाण्यांचा बोलबाला आहे. मग भारताचा एवढा द्वेष का करतात. ( भारताशी वर्ल्ड कप मध्ये सामना हरल्यावर पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी आकाश पातळ एक केले तेव्हा शाहीद आफ्रिदीने वरील उद्गार काढले .पुढे त्याने मग सारवासारवी केली. पण त्यांच्या प्रश्नाला उत्तर त्यांच्या प्रसारमाध्यमांकडे नव्हते
. मी तू नळीवर अनेक क्लिप्स मध्ये पाकिस्तानमधील बॉलिवूड चे पाकिस्तानात मधील अस्तित्व कमी करावे कारण ते भारतीय हिंदू संस्कृती त्यांच्या मुलांवर लादत आहेत. भारतीय टिव्ही मालिका व हिंदू सण ह्यांचे त्यांच्या समाजात कसा प्रभाव पडत आहे हे त्यांनी अनेक घरात मुलाखती घेऊन स्पष्ट केले आहे. व काही पाकिस्तानी कलाकारांना भारतात संधी देऊन त्या बदल्यात पाकिस्तानी बाजारपेठ काबिज केल्याचा आरोप केला जातो. आज घरी गणपती ठेवणारा सलमान पाकिस्तानात सर्वात जास्त लोकप्रिय आहे.
जसा अमेरीका मोठी सुपर पॉवर आहे अशी प्रतिमा जगभर जनमानसात त्यांच्या सहजपणे पसरवली आहे. अमेरिकन ड्रीम हि कल्पना हॉलिवूड सिनेमांनी पसरवली. आहे. उदाहरणार्थ जगावर एलियन चा हमला व जगाचे रक्षण फक्त अमेरिकन करणार हा मक्ता त्यांच्याकडे आहे असे सतत दाखवले जाते. म्हणूनच की काय अमेरिकेलाच जगातील कोणत्याही समस्येत नाक खुपसण्याचे नैतिक अधिकार आहे असा गोड गैरसमज अमेरिकन जनतेमध्ये आहे. अमेरिकन ड्रिम हि कल्पना जगभरातील लोकांच्या गळी उतरवली आहे.
. प्रसार माध्यमे एखाद्या देशाची सांस्कृतिक बाजू जगापुढे मांडतात. भारतीय वाहिन्या पाकिस्तानात दाखवल्या जायला लागल्या व तेथील मुल्ला लोकांच्या खोट्या प्रचार जसे सर्व भारतीय मुस्लिमांचा खूप द्वेष करतात वगैरे हे पितळ उघडे पडले. आज मला भेटलेले अनेक पाकिस्तानी हे चकीतच होऊन भारतीय काय क्रम त्यातील सास ,बहु और साजीश अश्या अनेक गोष्टी पाकिस्तानात चवीने पहिल्या जातात असे आवर्जून सांगतात. आज भारताची पाकिस्तानात मध्ये नंबर एक चा शत्रू ही प्रतिमा कमी करून त्यांची जागा आज तालिबान व त्यांच्या अंतर्गत दहशतवादाने घेतली आहे. ह्यांचे श्रेय आपल्या थोड्याफार फरकाने आपल्या प्रसारमाध्यमांना जाते. त्यांच्या पाकिस्तानी संसद बुशा रेहेमान ह्यांनी पाकिस्तानात भारतीय वाहिन्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. कारण भारतीय सांस्कृतिक प्रदुषण त्यांची संस्कृती उद्ध्वस्त करीत आहे.
(आज हॉलिवूड सुद्धा इंग्लंड व ऑस्ट्रेलिया मधून काही कलाकारांना आपल्या देशात संधी ह्या साठी देतात. म्हणूनच आज युके मध्ये बॉण्ड सिनेमे सोडल्यास स्वतःचे सिनेमे चालत नाहीत सर्वत्र हॉलिवूड ची सत्ता आहे- आज पाकिस्तानातील श्रीमंत , मूठभर शहरी मध्यमवर्गीय व गावातील व शहरातील कनिष्ट मध्यम वर्ग ह्यांच्याकडे टिव्ही आहे .त्यांना मनोरंजनाचे एकमेव साधन भारतीय सिनेमे व टेलिव्हीजन आहे. तेथे कट्टर धर्मपंथीय विचारधारा वाढत आहेत. व पाकिस्तान चे तालिबान पंथीय राष्ट्र होण्यापेक्षा भारतीय संस्कृती चा प्रभाव असलेले राष्ट्र बनणे केव्हाही चांगले असा विचार करून तेथील सत्ताधारी वर्ग भारतीय वाहिन्यांना पाकिस्तानात खुलेआम परवानगी देत आहे. भले भारतात पाकिस्तानी वाहिन्या अधिकृतरीत्या दाखविण्यात सरकार तर्फे बंदी आहे.
भारतात जसा उच्चभ्रू वर्ग शरीराने भारतात व मनाने अमेरिकेत राहतो. व विंग्रजीतून "भिकार बॉलिवूड आणि महान ते हॉलिवूड" व अमेरिकन संस्कृती असा जयघोष आपल्या राहणीमानातून देतो. असाच वर्ग पाकिस्तानात सध्या भारताचा जयघोष करतो. भारताने जशी प्रगती केली तशी पाकिस्तान ने करावी भारताशी आर्थिक सहयोग करावा अशी पाकिस्तानी इतिहासातील प्रथमच अजब मागणी करतात.( त्यांना लिबरल म्हणून हिणवले जाते ) पण त्यांची ताकद पाकिस्तानात कूर्मगतीने वाढती आहे. आपल्या कलाकाराला भारतात मान मिळाला ह्याचा त्यांना केवढा अभिमान वाटतो हे मला स्वतःला कितीतरी पाकिस्तानी लोकांनी सांगितले आहे. आज भारतीय वाहिन्या त्यांच्या रटाळ डेली सोप मधून भारतीय संस्कृती आणि हिंदू परंपरा व सण ह्यांची पाकिस्तानात क्रेझ वाढवत आहेत. म्हणूनच भारतीय वाहिन्यांवर बंदी घालावी अश्या मागण्या व त्यावर चर्चा सत्र व पाकिस्तानात नेहमीच घडत असतात.
हज्ब ए हाल हा पाकिस्तानातील लोकप्रिय टोक शो वर भारतीय सांस्कृतिक आक्रमणाच्या विरुद्ध कशी गरळ ओकली जात आहे ते पहा. माझ्या मते त्यांच्या मूठभर लोकांना आपल्या कडे संधी देऊन आवळा देऊन कोवळा काढून घ्यावा. त्यांची तरुण व शिशू पिढी आता मोठी होणार तेच मुळी भारतीय संस्कृती सण ह्यांचे माहात्म्य मनात रूजवत. ह्या बाबतीत एक गोष्ट आठवली. सर्कशीत हत्तीण तिचे पिल्लू व साखळदंड .
मागे पाकिस्तानी व भारतीय लहान मुलांचा छोटे उस्ताद ह्या कार्यक्रमाच्या अंतिम सोहळ्यात पाकिस्तानी स्पर्धकांकडून भारतीय देवतांची गाणी गाऊन घेण्यात आली. ( ७.४१ पासुन ) किंवा ज्या सिंधी लोकांना पाकिस्तानातून बाहेर हाकलले त्यांचे गाणे गाऊन घेतले. भारतीय हिंदू संस्कृतींचे पाकिस्तानात वाढणारे प्राबल्य हा तेथे टोक शो चा आवडता विषय आहे. तरी आपल्या वाहिन्या व सिनेमे तेथे लोकप्रिय आहेत.
भारतीय सिनेमामुळे पाकिस्तानी थिएटर मालक जाम खुश आहेत.व दर्शक
भारतात बेकायदेशीर रीत्या बांगलादेशी राहतात ते येत्या ५० वर्षात तरी भारताबाहेर हाकलले जाऊ शकत नाही मग मूठभर पाकिस्तानी कलाकार आपल्याकडे येऊन काय मोठा फरक पडणार आहे. १९७१ साली पाकिस्तानी राजकारणी व पुढे लष्कराने बांगलादेशी जनतेवर प्रचंड अत्याचार केले तेव्हा बांगलादेश ची प्रसूती झाली. मुक्ती बाहिनी व रॉ ने फक्त सुईणीची भूमिका निभावली. आज पाकिस्तानी टिव्ही व सिनेमा जगत तेथील अशांत राजकारण व कट्टर पंथीय विचारधारा ह्यामुळे मरणपंथाला लागले आहे. तेथील नामवंत कलाकार भारतात कला सादर करतात.तेव्हा त्यांच्या ह्या उद्योगाच्या कबरीवर कफन चढविण्याचे काम भारतीय वाहिन्या करत आहेत हे पाहून खूप आनंद होतो.
प्रतिक्रिया
8 Sep 2012 - 11:18 am | अमोल खरे
अभ्यासपुर्ण लेख.
8 Sep 2012 - 11:25 am | स्पा
लेख आवडला
8 Sep 2012 - 11:52 am | मन१
चांगला की वाईट आत्ता म्हणू शकत नाही, पण आवेशात न येता मांडलेला वेगळा विचार.
मी इतरत्र लिहिलेले मनात आलेले प्रश्न....
.
असेच तिथले कलाकार फार फार मोठ्या प्रमाणावर येउ लागले तर चालेल का?
जे होते आहे ते शंभरपट कीम्वा हजारपट मोठ्या प्रमाणावर होणे हितावह आहे का? (म्ह्णजे संगीत, दूरचित्रवाणी,चित्रपट , अत्र तत्र सर्वत्र पाकिस्तानी कलाकारांचे प्राबल्य; अगदि सास बहू सिरिअलपासून ते खान मंडळींच्या मेनस्ट्रीम सिनेमापर्यंत) पुढील सर्व प्रश्न "हे सर्व मोठ्या स्केलवर झाले तर" ही शक्यता गृहित धरुन विचारले आहेत.
.
अमेरिकन उद्योग्-धंद्यातील सर्वोच्च वर्तुळात ज्यूंचा प्रभाव आहे तसा आपल्याकडे कलाक्षेत्रात त्यांच्या कलाकारांचा प्रभाव वाढू शकतो का? तसे झाल्यास त्यांचे भारताबद्दल अनुकूल मत होउन तिथले जनमत भारताविषयी मवाळ होण्यास मदत होइल की त्यांची भारतात पाकिस्तानवादी लॉबी तयार होइल?
हे असं भारत - पाक इंटिग्रेशन वाढणं भारताच्या फायद्याचं आहे की पाकिस्तानच्या? की दोघांच्याही फायद्याचं आहे?
ह्याने काही बाबतीत भारत कलाकारांकडून प्रभावित होइल, भारताचे अवलंबित्व वाढेल की भारत - पाक इथल्या काही प्रमुख घटकांचे परस्परावलंबित्व असेल?
.
सर्वात महत्वाचे म्हणजे
ह्यात भारताचा फायदा आहे का?
ह्यातून भारताचा कसा फायदा करुन घेता येइल? मुळात "भारताचा" म्हणजे कुणाचा फायदा?
नागरिकांची सुरक्षितता आश्वस्त होणे हा फायदा आहे का? ती नसणे हे नुकसान आहे का? त्याच नागरिकांवर खर्चासाठी बर्यापैकी रक्कम टॅक्स किंवा इतर मार्गाने "भारत सरकार" ह्या यंत्रणेला मिळणे हा "भारताचा फायदा" आहे का? काही भारतीय धनिकांचे पैसे अधिक वाढणे हा ही भारताताच फायदा आहे का? असा फायदा सहजसाध्य आहे की त्याची काही किम्मत मोजावी लागेल?
ती किंमत काय असेल ? ती वस्तूंची देवाण्-घेवाण, कलेचे आदान-प्रदान इतकीच मर्यादित आहे का?
जर नसेल तर अजून काय आहे? ती किंमत कुणाला द्यावी लागनार आहे?
ज्यांना ती द्यावी लागणार आहे त्यांच्यासाठी सरकारने किम्वा त्या कार्यक्रमवाल्यांनी(आशाबईंपासून सगळेच) स्वत:चा फायदा सोडवा का? (फायदा benefit = नफा profit असे नाही.)
.
साधारण २९-३० नोव्हेंबरला २००८ च्या आसपास जखम ओली असताना असाच प्रस्ताव असता तरी इतका स्वीकारार्ह असता का? नसेल तर फक्त दोन्-चार वर्षात काही मूलभूत फरक झाले आहेत का? कुठले fundamentals बदलले आहेत? भारत्-पाक संबंधांना कुठले नवे परिमाण मिळाले आहे? तेव्हा स्वीकारार्ह नसलेली गोष्ट आज स्वीकारार्ह कशी होउ शकते?
.
मुळात दोन देशांतल्या कलाकारांचे कार्यक्रम "कलाकारांचे कार्यक्रम" म्हणून पहावेत की "दोन देशांच्या अघोषित प्रतिनिधींचे " कार्यक्रम म्हणून?
(हा प्रश्न महत्वाचा आहे. इथे मी भेटलो की कुणीही लागलिच "क्यों रे राज ठाकरे के बारे में तेरा क्या खयाल है| सुना है वो बाहरवालो आने नही देता | हम क्यों आने दे फिर?(पक्षी:- "तू भोसडीच्या मराठी आहेस, मराठी प्रांतात यायला राज ठाकरे आम्हास मनाई करतो. (आम्ही) तुला हिंदी/पंजाबी प्रांतात का येउ द्यावे") असं पंजाबी अॅक्सेंट मधून विचारतो. ह्यावर अगणित पानं उत्तरं, प्रत्य्त्तरं चालू शकतात. "भय्ये मुंबै बेकायदेशीर घुसताहेत. त्यांना विरोध आहे. नागरीकरणावर ताण पडतो आहे. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात म्हणून भय्यांना विरोध आहे. कायदेशीर रित्या कुणी आलेले असेल तर मनसेच काय कुणाचा पप्पाही त्याला बोट लावू शकत नाही.मी इथे घुसखोरी केलेली नाही. बेकायदेशीर रहात नाही. कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण केलेले नाहित. झुंडीचा दबाव आणत मी इथे विविध सण(छटपूजा) साजरे करत शक्तीप्रदर्शन करीत नाही. शिवाय इथे येउन इथली भाषा शिकणारच नाही, बोलणारच नाही असा माजही मी दाखवलेला नाही.तुम्हा बहुतांश लोकांच्या सरासरी पेक्षा जरा जास्त्च हिंदितले quotes मी तोंडावर मारु शकतो. माझं आडनाव समजेपर्यंत मी मराठी आहे हे तुम्हाला माझ्या हिंदितून समजलं नाही, इतकी सर्वसाधारण , सर्वसमान्य धाटणीची हिंदी तरी मला नक्कीच येते. हे असं भय्यांच्या बाबत होत नाही, म्हणून त्याचा पॉलिटिकल अॅडावांटेज मनसेला मिळतो. मनसे ती पुरेपूर उचलते."
.
हे खरं उत्तर. पण भें** त्या पंजाब्याला मी उत्तर का देउ?
मी देणं लागतो का?
my foot. मी मनसे चा प्रवक्त नाही. राज ठाकर्यांचा वकीलही नाही. दिसला मराठी की " करून दाखव बरं मनसे चं समर्थन" हे असलं गचाळ टोनिंग आसपास आहे बर्याच प्रमाणात. दिसला मुस्लिम की लगेच "ओसामा बद्दल तुझं काय मत आहे? तू त्याला दहशतवादी मानतोस की नाही" असं कधी आडून आडून कधी उघड विचारायची कोण हौस लोकांना असते.(मनसे आणि ओसामाची तुलना केलेली नाही. एका समाजातील व्यक्तीला त्या आख्ख्या समाजतील (बाहेरच्यांच्या दृष्टीने)वादग्रस्त गोष्टींचा सतत जाब विचारत राहणे ह्या बिनडोक प्रवृत्तीचे उदाहरण दिले आहे.)
त्यामुळे कधी त्याला शांतपणे "क्या कह रह हो?" अस्म विचारतो. तो अजून उलगडून सांगू लगला तरी अजूनच मख्खपणे "वो ठिक है, लेकिन कहना क्या है" हे विचारतो, व त्यानं थकून नाद सोडून देइपर्यंत मी फक्त "अजून मोठ्यानं बोलता का जरा" हया पुलंच्या वाक्याची कॉपी मारतो बर्याचदा.(कारण मी उत्तर देउ इच्छित नाही. देणं लागत नाही. माज मला दाखवू नका.)
.
.
प्रत्येक कलाकार हा प्रथम देशाचा नागरिक असतो हे खरे का? की प्रत्येक नागरिकाच्या कलेची अभिव्यक्ती का काय म्हणतात ती पूर्ण स्वतंत्र आहे? ती तशी प्रत्येकाने ठेवली तर ते सर्वांसाठी सामायिक हितावह आहे का?
8 Sep 2012 - 1:21 pm | दादा कोंडके
धागा आणि मनोबांचा प्रतिसाद आवडला.
जिथे शक्य आहे तिथेतरी पाकिस्तानांन्या दूर ठेवलं पाहिजे. मग कलाकार असो वा क्रिकेट.
अवांतरः
कामानिमित्त माझा पण अमेरिका-युरोप इथं स्थाईक झालेल्या-काम करणार्या पाकिस्तानी लोकांशी संबद्ध येतो. आता पर्यंतच्या चर्चा/वाद-विवादातून मी एवढा निष्कर्श काढला आहे की त्यांच्यात बिगरइस्लाम लोकांविषयी का-कुणास ठाउक पण प्रचंड खदखद आहे. कितीही शिक्षण झालं असलं तरी विचार धर्मिक आणी बुरसटलेले असतात.
- उच्चशिक्षीत असलेल्या एक सहकार्यानं आर्मस्ट्राँगला चंद्रावर मक्केतली बांग ऐकू आल्याचा दाखला दिला होता.
- फ्रांन्स मध्ये उन्हाळ्यात रत्यावरच्या बायकांकडे अधाशासारखं बघणार्या एका पाकिस्तान्यानं 'त्यांना नागडं रहायची परवानगी आहे' पण 'आमच्या बायकांना कपडे घालायची परवानगी नाही' असं म्हणाला होता
अजूनही बरच काही पण नंतर.
8 Sep 2012 - 1:26 pm | मन१
- उच्चशिक्षीत असलेल्या एक सहकार्यानं आर्मस्ट्राँगला चंद्रावर मक्केतली बांग ऐकू आल्याचा दाखला दिला होता.
- फ्रांन्स मध्ये उन्हाळ्यात रत्यावरच्या बायकांकडे अधाशासारखं बघणार्या एका पाकिस्तान्यानं 'त्यांना नागडं रहायची परवानगी आहे' पण 'आमच्या बायकांना कपडे घालायची परवानगी नाही' असं म्हणाला होता
वारलो .मेलो...
9 Sep 2012 - 5:23 pm | दादा कोंडके
भारत-पाकने व्हिसा नियम शिथिल
इस्लामाबाद- भारत-पाकिस्तान व्हिसा प्रक्रियेत सुलभता आणण्याबद्दलचा आज करण्यात आलेला करार हा "भारत-पाक मैत्रीमधील नवे चिन्ह आहे', असे पाकिस्तानने सांगितले. दोन्ही देशांनी भूतकाळातील चुकांचे पाढे न गिरवता नव्या दमाने परस्परसंबंध सुधारणांचा नवा अध्याय लिहिण्याच्या, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांच्या भावनापूर्ण आवाहनाला भारताने आपला नेहमीचा संयत प्रतिसाद दिला.
http://www.esakal.com/esakal/20120909/5638726792341868487.htm
च्यायला वेड लागलय का या लोकांना?
9 Sep 2012 - 8:30 pm | निनाद मुक्काम प...
आपला शत्रू देश पाकिस्तान मधील सामान्य जनता किंवा त्यांचे नेते ह्यांची भारताबद्दल नक्की काय मत आहेत.
व दोन देशांमध्ये झारीतील शुक्राचार्य नक्की कोण आहेत ह्या बद्दल नेहमीच कुतूहल वाटायचे.
तेथून आलेले निर्वासित किंवा अनिवासी किंवा व्यापारासाठी किंवा इतर कारणास्तव युरोपात पर्यटक विसावर आलेल्या अनेक पाकिस्तानी लोकांशी मला संवाद साधायला मिळतो. ह्या संभाषणातून एखाद्या शो किंवा नेता किंवा तथाकथित विचारवंतांचे दाखले
मिळाले कि आंजा किंवा तू नळीवर त्या बद्दल क्लिप पहाणे किंवा वाचन करणे ह्यातून जी काही माहिती मिळते किंवा जे माझे मत बनते तेच येथे मी व्यक्त करतो.
चीन आपल्या ह्या दोन देशातील परंपरागत वैराचं फायदा घेत भारताला ईशान्य ते पूर्व असा पोखरत चालला आहे.
दोन्ही देश मनात आणले तरी भौगोलिक व सांस्कृतिक दृष्ट्या एकमेकांपासून लांब जाऊ शकत नाही.
भांडवलशाही व जागतिकीकरण हे जगभर पसरत आहे. तेव्हा नव्या युगात अगदी भाई बाही किंवा अमन की आशा नको पण जरा आपण मित्र होऊ शकत नाही तर शत्रू असलेच पाहिजे असा काही आग्रह नाही तेव्हा व्यावहारिक पातळीवर व्यावहारिक संबंध वाढवावे हे दोन्ही देशांच्या हिताचे आहे.
दहशतवादाची झळ हि पाकिस्तानला भारतापेक्षा जास्त प्रमाणात नजीकच्या काळात बसली आहे.
त्यांचे सैन्य दुभागलेले गेले आहे. आणि हेर संस्था सुद्धा-
देशाचे तालिबानीकरण होण्याचा धोका व अण्वस्त्र तालिबानच्या हातात जाण्याचा धोका तेथे निर्माण झाला आहे.
तेव्हा सध्याच्या काळात हीना व कृष्णा ह्यांच्यात झालेले करार भविष्य काळात दोन्ही देशांना फायद्याचे आहेत.
10 Sep 2012 - 12:21 am | दादा कोंडके
मला जागतीक अर्थकारण ओ की ठो कळत नाही. पण, पाकिस्तान बरोबर संबंध वाढवल्यानं आपल्या अर्थकारणाला अशी काय चालना मिळणार आहे की वाढत्या दहशतवादाची जोखीम स्विकारावी हे मला समजत नाही.
पाकिस्तान म्हणजे कुत्र्याचं शेपूट आहे. ते सरळ करण्याच्या भानगडीत न पडता देशातल्या मुस्लिमांना मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत असं मला वाटतं.
10 Sep 2012 - 3:04 am | निनाद मुक्काम प...
दादा
दोन देशात संबंध वाढवायचे ह्या बद्दल संकल्पनेचा घोळ होत आहे. भारत चीन व्यापारी संबंध वाढवू शकतो. भारत एकाच वेळी ज्यू राष्ट्र व इराण व त्याचा समान प्रतिस्पर्धी सौदी व इतर सुन्नी अरब राष्ट्रांशी व्यापार करू शकतो.(तर मग पाकिस्तानशी व्यापार का करू शकत नाही..
भारत पाकिस्तान व्यापारी संबंध , शक्यता , गरज , भविष्यातील संधी , अपरिहार्यता , मोस्ट फेवरेट नेशन ह्या सर्व मुद्द्यांचा समावेश असणारा लेख जमेल तेव्हा लिहीन).
पण सध्या एवढेच सांगतो १४ च्या निवडणुकीत जर भाजपा प्रणीत सरकार आले तरी हि व्यापारी प्रक्रिया चालू राहीन ह्या बद्दला खात्री असू दे.)
. फार पूर्वी १९ व्या शतकात १८ व्या शतकापासून इंग्रज साम्राज्य व रशिया ह्यांचा अफगाणिस्तान वर वर्चस्व ठेवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले गेले. ह्या काल खंडाला व त्यातील घडामोडींना ग्रेट गेम असे नाव इतिहासात दिले गेले. ह्या शेवट रशियाचे अफगाण मध्ये येणे व जातांना स्वताचे ,विघटन करून घेणे ह्यात झाला.
आता अमेरीका माघारी नंतर अफगाणिस्तानात अजून एका ग्रेट गेम प्रकरणाची सुरुवात होणार आहे. त्यात भारत ,रशिया , चीन , इराण , पाकिस्तान , व आखातातून सौदी आणि अर्थात अमेरीका व नाटो सारेच सामील आहेत. अफगाण चे भौगोलिक , महत्व ह्याला कारणीभूत आहे. २०१४ ला अमेरिकन सैन्य जर खरच अफगाण मधून गेले तर ह्या ग्रेट गेम २ ची अधिकृतरीत्या सुरुवात होईल.
रशिया व ब्रिटीश साम्राज्यात घडलेल्या ग्रेट गेम ची माहिती आंजा वर आहेच कारण तो भूतकाळ आहे. पण भविष्यात होणाऱ्या व सध्या प्राथमिक अवस्थेत असलेल्या नवीन पार्ट २ ग्रेट गेम बद्दल माल जमेल तेव्हा खरडेल. पण ह्याचा एक प्रमुख भाग म्हणून अमेरीकेला व युरोपला भारत व पाकिस्तान ने जुने व पारंपरिक वैर विसरून जाऊन नवीन शतकातील ह्या आंतरराष्ट्रीय घडामोडींना सामोरे जाणे. अपेक्षित आहे. म्हणूनच सरकार वाजपेयी ह्यांचे असो किंवा मनमोहन ह्यांचे भारत सरकार त्यांचे प्रतिनिधी, नेते पाकिस्तानात जातात व शांतीचे प्रयत्न करतात. व पाकिस्तान मधील सरकार त्याला प्रतिसाद देते.
मात्र आय एस आय व लष्कर व जिहादी संघटना हे प्रयत्न हाणून पाडतात कधी कारगील तर कधी ताज वर अतिरेकी हमला. आणि त्यांचे उद्दिष्ट आपल्याकडील अनेक जण पाकिस्तानशी सबंध नको असे म्हणून पूर्ण करतात. पाकिस्तानशी सरकारी पातळीवर सहकार्य वाढवले किंवा कमी केले किंवा व्यापारी संबंध वाढवले किंवा कमी केले ह्याचा अतिरेकी कारवायांची संबंध येत नाही. चीन व सौदी मधील पैशाने व अमेरीका विरोधी हवेमुळे मुस्लिम जगतातून येणाऱ्या पैशामुळे पाक मधील अतिरेकी संघटना उन्मत्त झाल्या आहेत. व आपल्या देणगीदारांना त्यांच्या पैशाचा विनियोग उत्तमरीत्या होत आहे हे दाखविण्यासाठी भारतात व जगभर दहशतवादी कृत्ये ह्या लोकांना नित्यनेमाने कराव्या लागत आहेत.
त्यामुळे ह्या लोकांचा सफाया त्यांना त्यांच्या भाषेत दिला पाहिजे. मात्र पाकिस्तान मधील ह्या गटांना भारत विरोधी वातावरण पाकिस्तानी जनतेत १९८० ते ९० च्या काळात जेवढे अभूतपूर्व मिळाले ज्यामुळे काश्मीर जिहाद त्यांना करता आला त्या प्रतीचे भारत द्वेषाचे राजकारण आता त्यांना पाकिस्तानात करता येत नाही आहे. भारत पाकिस्तान पेक्षा सर्वच बाबतीत पुढे निघून गेला आहे, व त्याची बरोबरी आता चीन शी आहे. ह्याची जाणीव पाकिस्तान मधील सर्वच घटकांना झाली आहे.
11 Sep 2012 - 12:46 am | दादा कोंडके
वरील प्रतिसादाल्या शब्दांचे अर्थ कळले पण वाक्यांचे नाही. ;)
जौदे. ह्या विषयातलं शष्प कळत नाही हे कबूल केलेलंच बरं. :)
11 Sep 2012 - 12:44 pm | मन१
दोन्ही देशांचे हितसंबंध (आर्थिक, व्यापारी,सामाजिक) आपसात गुंतलेले असले की प्रत्यक्ष युद्ध टळले जाते.(निदान टळावे अशी अपेक्षा आहे.)
त्यात दोन्ही देशांतील(प्रामुख्याने पाकम्धील)कट्टरपंथीय खोडा घालतात. पण त्यांची निरर्थकता हल्ली तिथल्या जनतेला जाणवू लागली आहे.
"ग्रेट गेम" वगैरेबद्द्ल निनाद किंवा इतर कुणी सविस्तर लिहितील तर बरं.
11 Sep 2012 - 9:20 pm | अर्धवटराव
>>दोन्ही देशांचे हितसंबंध (आर्थिक, व्यापारी,सामाजिक) आपसात गुंतलेले असले की प्रत्यक्ष युद्ध टळले जाते.(निदान टळावे अशी अपेक्षा आहे.)
-- बरेचदा असे व्यापारी हितसंबंधच युद्धाला कारणीभूत ठरतात.
अर्धवटराव
11 Sep 2012 - 11:36 pm | निनाद मुक्काम प...
म्हणून चीन विरुद्ध अमेरिका असे तिसरे महायुद्ध होणार अश्या वावड्या अधून मधून उठत असतात.(सध्या चीन व अमेरिकेचे एकमेकात एवढे व्यापारी संबध गुंतले आहेत की तुझ्याशी जमेना ,आणी तुझ्याविना करमेना अशी स्थिती निर्माण झाली आहे.
भारत व चीन व्यापार सुद्धा दरवर्षी वाढत चालला आहे.
म्हणून प्रत्यक्ष युद्ध होण्याची शक्यता कमी असली तरी ती होऊ नये म्हणून भारताने दाखवयाचे दात , अग्नी ५ ची निर्मिती केली.
अमेरिका व कांगारू सोडल्यास आता भारत इतर कोणत्याही खंडात पोहचू शकतो.
हे वास्तव आहे.)
पहिले महायुद्ध बाजारपेठेसाठी झाले.
तिसरे महायुद्ध हे बाजारपेठेसाठी केव्हाच सुरु झाले आहे.
दहशतवाद , एखाद्या देशाचा सत्तापालट करणे. बनावट चलनाद्वारे अर्थव्यवस्था दुबळी करणे किंवा देशांतर्गत धार्मिक ,तेढ निर्माण करणे किंवा फुटीरतावादी संघटनांना पाठबळ देणे.उदा
आय एस आय ने भारताविरुद्ध युद्ध पूर्ण जोरात सुरु केले आहे.
ह्याला उत्तर आपली रॉ पाकिस्तानात काय करत आहे हे देवाला ठाऊक.
एखाद्या देशातील बाजारपेठ मिळवण्यासाठी वाट्टेल त्या मार्गाचा उपयोग करणे.
संरक्षण साहित्याची जगभर विक्री व्हावी म्हणून जगभर दोन राष्ट्रात समस्या निर्माण करणे , व समस्या आधीच असतील तर त्या वाढतील कश्या ह्याची सोय करणे.
मात्र आव एखाद्या जागतिक शांतीदूताचा किंवा जागतिक पोलीसपाटील की करण्याचा आणणे असे युद्ध जागतिक बाजारपेठांमध्ये महासत्ता खेळत आहेत.
तिसरे महायुद्ध जनरेशन वॉर ४ च्या नियमानुसार लढले जात आहे.
मुठभर बहुराष्ट्रीय कंपन्या मालक व इतर सर्व त्यांचे ग्राहक व ह्यातील दलाल म्हणजे
राजकारणी , प्रसारमाध्यम
लोकशाही ची खरी व्याख्या पूर्वीपासून
व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी चालवलेला मोठा व्यापार म्हणजे लोकशाही
12 Sep 2012 - 12:16 am | दादा कोंडके
चर्चेमधून थोडंस कळत आहे. काहीही विचार न करता काही पुर्वग्रह किती पक्के असतात हे जाणवलं.
9 Sep 2012 - 1:12 am | बॅटमॅन
मनोबांची स्ट्रॅटेजी उत्तम आहे. विदेह-कोसल-कुरु-पांचाल आणि मगधातील लोकांपेक्षा पंचनदीय लोकच काहीवेळेस जास्त ऑब्नॉक्शस असतात असे माझेदेखील निरीक्षण आहे. अशा मूर्खांना निरुत्तर करण्यासाठी असे उपाय उत्तम असतात. तसेही पंचनदीय लोकांचे शून्यमास्तिष्क्य प्रसिद्धच आहे ;)
9 Sep 2012 - 5:12 pm | मन१
प्रतिसाद अवांतर आहे.
पण ज्या ष्टायलित दिलाय(सोळा महाजनपदातल्या काळाचा उल्लेख करत) ते खासच
( पूर्वीचा गोदातटीचा महारठिक प्रतिष्ठानवासी, दीडमास्तिष्क्य)
9 Sep 2012 - 5:57 pm | बॅटमॅन
धन्यवाद आणि अवांतराबद्दल सहमत :)
( कृष्णातटीचा कुंतलदेशीचा अर्धमस्तिष्किन् महारठिक-कार्णाटक मिरिञ्जवासी ) बॅटमॅन.
9 Sep 2012 - 8:16 pm | निनाद मुक्काम प...
अश्या दर्जेदार अवांतर अजून येऊ दे
8 Sep 2012 - 11:50 am | वेताळ
तुमच्यासाठी काय पन.....चा रिमेक तिकडे दाखवता येईल काय?
8 Sep 2012 - 12:09 pm | तिमा
'क' च्या बाराखडीतल्या सिरियल्सची चटक लावा त्यांना, म्हणजे लवकरच तिथेही अनेक 'चुडेल' स्त्रिया निर्माण होतील तर अनेक स्त्रिया 'कडवा चौथ' करायला लागतील!
8 Sep 2012 - 7:27 pm | उगा काहितरीच
चालेल चालेल ...हळु हळु भिनत जानारं विष आहे हो ते पण चविला गोग्गोड.... :)
8 Sep 2012 - 9:02 pm | निनाद मुक्काम प...
तुमचा प्रतिसाद वाचून एक जुनी आठवण ताजी झाली.
माझे लंडन मधील पंचतारांकित हॉटेलातील उमेदवारीचे दिवस होते. तेव्हा गेस्ट रिलेशन मध्ये मी कार्यरत होतो.
एके दिवशी दुबई मधील पाकिस्तानी उद्योजक ज्यांचे दुबईत खूप मोठे नाव आहे त्यांचे आमच्या कडे १ आठवडा वास्तव्य होते. लंडन मध्ये लग्नासाठी ते बाराती म्हणून आले होते. दिवसातून १० मिनिट या ना त्या कारणाने त्यांच्याशी माझा संपर्क व्हायचा.
त्या महिलांच्या बोलण्यात नेहमीच आपल्या सासू विषयी तक्रारी , व आपल्याकडे जसे घरगुती गॉसिप वर चर्चा होते तशीच होतांना दिसली.
तेथील पंजाब मधील लोक आपल्या पंजाबी लोकांशी पंजाबीतून सुसंवाद साधतात.
गोरो की बजानी हे हे त्यांचे लंडन मध्ये समाईक ब्रीद वाक्य असते. त्यांना भारतीय देलीसोप भयंकर आवडतात.
शशी थरूर ह्यांनी कांगारूंच्या देशात ह्या बाबतीत आपल्या भाषणात एक धमाल किस्सा सांगितला आहे.
अफगाणिस्तान मध्ये भारतीय वाहिन्या चे प्रसारण सुरु झाले आणि हिंदी चा गंध नसणारे अफगाणी नागरिक डेली सोप च्या प्रेमात पडले.
मला स्वतःला जर्मनीत एका अफगाण महिलेने तिने हिंदी हे भारतीय वाहिन्यांवरील कार्यक्रम पाहून शिकल्याचे सांगून थक्क केले होते.( मी बारावी पर्यंत मारे स्टार मुवीज पाहायचो पण इंग्रजीच्या नावाने बोंब होती.
त्यावेळी सास भी कभी बहु थी ह्या मालिकेने तेथे प्रचंड लोकप्रियता मिळवली होती त्यावेळी तेथे रात्री आठ वाजता रस्ते सुनसान पडलेले असायचे. अफगाण च्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक टेलीविजन ची विक्री झाली. ह्याचा सगळ्यात जास्त फायदा तेथील भुरट्या चोरांना झाला. ह्या अर्ध्या तासात तेथील रस्त्यावरील वाहनांच्या काचा तोडून आतील वस्तू लंपास करण्याचे प्रमाण वाढले. कहर म्हणजे चोरांनी कारच्या मागे धुळीने माखलेल्या काचेच्या तावदानावर लॉंग लिव तुलसी असे लिहून ठेवले होते.
भारतीय म्हणजे शांतता प्रिय , व मजेत आयुष्य जगणारे व परंपरा जपणारे अशी एक भूमिका अफगाण व पाकिस्तान मध्ये होण्यास ह्या वाहिन्यांचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्या टीवी वर भारताचा उल्लेख केल्याशिवाय त्यांचे पान हलत नाही. ह्याउलट भारतातील.टीव्हीवर देलीसोप , व सिनेमाच्या संबंधित अनेक कार्यक्रम किंवा विनोदी स्पर्धात्मक कार्यक्रमाची रेलचेल असते.
पाकिस्तानचा उल्लेख न करता भारतीय मनोरंजनाचा आस्वाद घेतात. व भारतीय सदैव पाकिस्तानच्या विनाशाची गोष्ट करतात, किंवा हा त्यांचा प्रमुख अजेंडा आहे हे मुल्ला लोकांचे बतावणी आता पाकिस्तानात चालत नाही.
तुम्ही चुडेल स्त्रियांचा उल्लेख केला ह्यावरून पाकिस्तानी टोक शो मधील घटनेची आठवण झाली
नवाब शरीफ व झरदारी ह्यांच्या पार्टी मधील महिला संसद एकमेकांवर आरोप करत होत्या. कोणत्या पक्षाच्या घोरणाने पाकिस्तानची वाट लागली. अमेरिकेच्या कच्छपी कोण लागले. पुढे वातावरण तापले आणि त्या दोन्ही एकेरीवर येऊन वादावादी करू लागल्या. ह्यात आश्यर्य म्हणजे झरदारी च्या पक्षातील खवातून जास्तच आक्रमक झाली. तिने आपल्या प्रतिस्पर्धी पंजाबी देखण्या सांसद ला म्हणाली.
तुम मुझे सियासत मत सिखाओ , मुझे लोगोने चुना हे. मे तुम्हारे जैसे बेडरूम के जरीये सिसासात मे कामयाब नही हुई हु. सदर विधान करणारी महिला सांसद झरदारी ह्यांच्या मंत्री मंडळात आजही मंत्री पद भूषवत आहे. ह्यावरून पंजाब मधील अनेक टोक शो मध्ये तिचा उल्लेख चुडेल करण्यात आला. ह्या मानाने आपल्याकडे राजकारणी निदान पडद्यावर तरी बरेच सोवळे असतात. दिग्गी राजा हून अनेक पटीने करामती राजकारणी वक्तव्ये करणारे तेथे आहेत.
सर्वांच्या प्रतिसादासाठी आभार
मन ह्यांच्या प्रतिसादावर माझे मत सवड मिळताच देईन.
9 Sep 2012 - 5:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लाँग लिव्ह तुलसी. हाहाहा. आणि तुम मुझे सियासत मत सिखाव ची गुप्तगु पाहुन मरायची वेळ आली. :)
अजुन असेच माहितीपूर्ण प्रतिसाद येऊ द्या.
-दिलीप बिरुटे
9 Sep 2012 - 10:47 pm | माझीही शॅम्पेन
+१००
वीडियो च्या खाली लोकानी दिलेल्या प्रतिक्रिया पहिल्यात तर खुर्चीतून खाली पडाल :)
9 Sep 2012 - 10:58 pm | बॅटमॅन
+१.
हेच म्हणतो.
पंचतारांकित दुनियेत वावरल्यामुळे असे विंट्रेस्टिंग प्रथमहस्त अनुभव तुम्हाला (निनाद यांना) बख्खळ आहेतच. ते मोकळे करावेत ही विनंती :)
9 Sep 2012 - 5:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बुशा रेहमानची मुलाखत वाचुन माझी हहपुवा झाली. :)
बाकी, भारतीय वाहिन्यांवरील विविध मालिका आणि कार्यक्रम आणि अधिकाधिक चित्रपट पाकिस्तानी नागरिकांनी पाहावेत म्हणुन माझ्या शुभेच्छा आहेतच. :)
-दिलीप बिरुटे
10 Sep 2012 - 12:34 am | आशु जोग
निनाद मुक्काम प...
निनाद तुमचा लेख आणि यु ट्युबवरील क्लिपही पाहीली
खूप चांगली नवीन माहिती मिळाली.
तुम्ही एक नवीन दालनच आम्हाला उघडून दिले आहे
10 Sep 2012 - 2:34 pm | ऋषिकेश
अभिनिवेशरहित नेटकं लेखन.. आवडलं!
दृकश्राव्य माध्यमांचा परिणाम कूर्मगतीने होत असला तरी दूरगामी असतो.
सध्या पाकिस्तान बरोबर होत असलेले वाणिज्य विषयक करार अगदी यामुळेच नसले तरी जनमानस तयार करण्यात वाहिन्यांचा खारीचा वाटा मान्य केलाच पाहिजे
11 Sep 2012 - 12:04 pm | मी_आहे_ना
असेच म्हणतो...अभ्यासपूर्ण लेखन आवडले...अजून अभ्यासपूर्ण प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत.