सोपी, स्वस्त व केव्हाही करता येणारी पाव भाजी

सदानंद ठाकूर's picture
सदानंद ठाकूर in पाककृती
6 Sep 2012 - 8:17 pm

पाव भाजी म्हटले कि ब-याच भाज्या वगैरे तयारी लागते, पण अगदी कमी साहित्यातही हि करता येते, पटकन होते व चांगलीसुध्दा लागते.

साहित्यः ३ ते ४ कांदे, ३ ते ४ टॉमॅटो, २ ते ३ बटाटे, २ टे.स्पू. पा.भा.मसाला, मस्का किंवा गोडे तेल, २ टे.स्पू. बॅडगी मिरचीचे लाल तिखट, मीठ चवीनुसार, आले मिरची पेस्ट (नसली तरी अडत नाही).

कृती:
प्रथम पॅनवर मस्का किंवा तेल तापवून त्यात बारीक चिरलेला कांदा परतावा, असल्यास आले मिरची पेस्ट घालावी बारीक चिरलेला टॉमॅटो वर घाला, एका भांड्यात पा.भा.मसाला + बॅडगी मिरचीचे लाल तिखट + मीठ पाणी घालून कालवावे व ते मीस्रण वरील भाजीत मिक्स करुन घोटावे नंतर उकडलेले बटाटे बारीक कुस्करुन घालावेत चांगले मिक्स करावे. आवश्यकतेनुसार पाणी घालून ढवळा. भाजी तयार. असल्यास कोथींबीर पेरावी.

पाव, पोळी किंवा भाकरी बरोबर चांगली लागते.

१० ते १५ मिनीटात तयार होते, सारे साहित्य घरात असतेच.

प्रतिक्रिया

पैसा's picture

6 Sep 2012 - 9:02 pm | पैसा

कृती सोपी आहे, पण फोटो कुठेत?

मुक्त विहारि's picture

7 Sep 2012 - 10:07 pm | मुक्त विहारि

करुन बघिन...

जमल्यास पुढच्या वेळेस फोटो टाका...

पक पक पक's picture

8 Sep 2012 - 7:49 pm | पक पक पक

च्यायला ह्ये लै झाक हाये... मस्त :) आमची कार्टी दर दोन दिवसाआड पाव भाजीचा हट्ट करत असते..आता रोज करुन घालतो तिला कंटाळा येइ पर्यंत... :bigsmile: