कढी-गोळे

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
5 Sep 2012 - 1:33 am

DSC_00100001_1

गोळ्यांसाठी साहित्यः

चणा डाळ १ वाटी
आलं १ इंच
हिरव्या मिरच्या ३-४ नग
हळद १/२ लहान चमचा (टी स्पून)
मीठ चवीनुसार
खायचा सोडा १/२ लहान चमचा
जीरं १ लहान चमचा

गोळ्यांची कृती:

चणाडाळ ६-७ तास पाण्यात भिजत टाका. नंतर पाणी निथळवून मिक्सरवर, कमीतकमी पाणी वापरून, भरडसर वाटून घ्या. घरात खिम्याचे यंत्र (मिन्सिंग मशीन) असेल तर उत्तम. अजिबात पाणी न घालता त्यातून वाटून घ्या.
आलं + हिरव्या + मिरच्या एकदम बारीक चिरून किंवा खलबत्यात कुटून वाटलेल्या डाळीत घाला.
हळद, मीठ आणि जीरं घालून हाताने मिसळून एकजीव करून घ्या.

गॅस वर इ़डली पात्रामध्ये पाणी उकळत ठेवा. इडलीचे साचे घेऊन त्याला तेलाचा हात लावून घ्या. आता वरील डाळीच्या मिश्रणात सोडा टाकून हाताने मिसळून ह्या मिश्रणाचे लिंबापेक्षा किंचित लहान आकाराचे गोळे करून इडली साच्यात एका साच्यात ३ असे ठेवा. हे साचे कुकर मधील पाणी उकळले की त्यात ठेवा. एक सोडून एक असे कुकरमध्ये ठेवले की ते गोळ्यांना चिकटत नाहीत. वरून झाकण ठेऊन गोळे १५ ते १७ मिनिटे उकडून घ्या. असे करून सर्व गोळे उकडून घ्या आणि कुकरमधून काढून थंड करायला ठेवा.

कढी साहित्यः

दही २ डाव
चण्याचे पिठ २ मोठे चमचे (टेबलस्पून)
हळद १ लहान चमचा
आलं २ इंच
हिरव्या मिरच्या ३ नग
मीठ चवीनुसार
साजुक तुप २ मोठे चमचे
जीरं १ मोठा चमचा
कढीलिंब पाने २ डहाळ्या
हिंग १/४ लहान चमचा
कोथिंबीर सजावटीसाठी.

कृती:

दही +चण्याचे पिठ + हळद + मीठ एकत्र करून फेटून घ्या. त्यात आलं आणि मिरच्या बारीक चिरून किंवा खलबत्यात ठेचून मिसळा. त्यात पाणी घालून कढी बनवा. आता ही कढी मध्यम आंचेवर उकळायला ठेवा. गॅसवर ठेवल्यावर उकळी येई पर्यंत सतत ढवळत राहा नाहीतर कढी फुटण्याची शक्यता असते.
कढी शिजली की त्यात थंड केलेले गोळे घालून पुन्हा एक उकळी काढा.
आता गॅस बंद करा.
कढल्यात तुप तापवून त्यात जीरं, कढीलिंब आणि हिंग घालून फोडणी करा आणि ती कढीत ओतून लगेच झाकण ठेवा.
वाढायच्या वेळेस कोथिंबीरीने सजवा.

शुभेच्छा....!

प्रतिक्रिया

मन१'s picture

5 Sep 2012 - 1:50 am | मन१

ल्यप ल्यप.....

कुंदन's picture

5 Sep 2012 - 2:16 am | कुंदन

ओ काका,
दुबैत कधी टाकताय हाटेल ?

हेच विचारतो..

तिथे मी अर्ध्या पगारात पडेल ते काम करायला तयार आहे.

(मी दुबईत नाही, पण तुम्ही बोलवाल तेव्हा एका पायावर येईन. पगारा ऐवजी फक्त रोज तुमच्या खास पाककृतींचा नमुना चाखायला मिळाला तरी बास. :) )

बहुगुणी's picture

5 Sep 2012 - 2:18 am | बहुगुणी

अति-व्यग्रतेने उपाशी बसलोय राव ऑफिसात सकाळपासून, आणि त्यात हे असले धागे आणि जीवघेणे फोटो!!!
आता, अति-व्यग्रतेत मिपा पहायला कसं जमतं, असला अवघड प्रश्न विचारू नका बुवा;-)

तुषार काळभोर's picture

5 Sep 2012 - 8:03 pm | तुषार काळभोर

आयला, व्यग्र माणसं मिसळीच्या अड्ड्यावर येत्यात व्हय?
हितं फक्त टैमपासवाल्यांनी याचं...

दिल्लीत काही काळ असताना हा पदार्थ 'कढी - पकोडे' म्हणून खाल्ला होता. मस्त लागतो.

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2012 - 8:44 am | प्रभाकर पेठकर

पंजाबी कढी पकोड्यात चण्याच्या पिठाची (बेसनची) भजी तळून कढीत सोडली जातात. मराठी कढी गोळ्यात चण्याच्या डाळीचे गोळे तळून नाही तर उकडून कढीत सोडतात. असा गोळा भातात कुस्करून त्यावर कढी घालून खाण्यात मजा येते. चवीला आपले कढीगोळे उजवे आहेत असे मला वाटते. असो. तरी पण, पंजाबी कढी पकोडेही आवडतात.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Sep 2012 - 10:54 pm | निनाद मुक्काम प...

काका
असे काही पहिले की
ने मजशी ने ::
ही कविता आठवते:

जाई.'s picture

5 Sep 2012 - 10:54 am | जाई.

दिल्लीत काही काळ असताना हा पदार्थ 'कढी - पकोडे' म्हणून खाल्ला होता. मस्त लागतो.

हेच म्हणते. हॉस्टेलच्या मेसमध्ये दर गुरुवारी हा पदार्थ असायचा. वेगळी चव. मस्त लागतो.

काकांच्या पाककृतीला _/\_

इरसाल's picture

5 Sep 2012 - 12:11 pm | इरसाल

गुरुवारीच करायचे असा काहीसा प्रघात असावा. नायतर कंपनी कँटीन वाले पण गुरुवारीच बनवायचे. मात्र आम्ही कढीतल्या पकोड्याव्यतिरिक्त नुसते तळलेले पकोडे शेपरेट मागत असायचो.

काकांनी केलेले त्याबरहुकुम करुन बघावेच लागतील एकदा.

कौशी's picture

5 Sep 2012 - 6:17 am | कौशी

मला अतिशय आवडतात..
आणि तुम्ही खुप छान बनवले आहेत कढी गोळे.छानच

भरत कुलकर्णी's picture

5 Sep 2012 - 8:51 am | भरत कुलकर्णी

काका रॉक्स!!

प्रचेतस's picture

5 Sep 2012 - 9:03 am | प्रचेतस

खल्लास!!!!

अत्रुप्त आत्मा's picture

5 Sep 2012 - 9:50 am | अत्रुप्त आत्मा

झकासराव's picture

5 Sep 2012 - 9:58 am | झकासराव

:love:

जबरी

५० फक्त's picture

5 Sep 2012 - 11:05 am | ५० फक्त

लई भारी पाकृ, धन्यवाद.

ते पंजाबी स्टाईलचे कढी करुन त्यात भजी सोडणं आवडत नाहीच हे नक्की...

आई घरी करते ती गोळ्यांची आमटी अन सांड्ग्यांची भाजी बाकी आठवली हे सुद्धा नक्क्की.

कच्ची कैरी's picture

5 Sep 2012 - 12:00 pm | कच्ची कैरी

यम्मी !!!!!!

कवितानागेश's picture

5 Sep 2012 - 12:05 pm | कवितानागेश

:)
आवडता पदार्थ.

अन्या दातार's picture

5 Sep 2012 - 12:08 pm | अन्या दातार

डाळीच्या पिठात मुळा, कोबी, गाजर इ.इ. भाज्याही खिसून घातल्यावर मस्त लागतात. माझा आवडता प्रकार :) :)

सुहास झेले's picture

5 Sep 2012 - 2:35 pm | सुहास झेले

तोंडाला पाणी सुटले.... :) :)

सूड's picture

5 Sep 2012 - 3:09 pm | सूड

वा वा !! मस्तच !!

प्रभाकर पेठकर's picture

5 Sep 2012 - 3:17 pm | प्रभाकर पेठकर

मन१, कुंदन, गवि, बहुगुणी, मराठे, जाई.,इरसाल , कौशी, भरत कुलकर्णी, वल्ली, अत्रुप्त आत्मा, झकासराव, ५० फक्त, कच्ची कैरी, लीमाउजेट, अन्या दातार, सुहास झेले सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

कुंदन,

दुबईहून मस्कत कितीसं लांब आहे? पुण्या-मुंबई इतकच. ये नं मस्कतात. मस्त मजा करू. गविनांही यायचय, सर्वसाक्षींनाही यायचे आहे आणि धमाल मुलालाही यायचंय. अतृप्त आत्माही 'लिफ्ट' मागताहेत. मी तर म्हणतो एक मस्त 'आखाती कट्टा' करूया मस्कतात.

अन्या दातार,

कढी गोळे भाज्या घालूनही मस्त लागतील, जास्त पौष्टीक होतील. त्याला 'व्हेज. कढी मंचुरियन' असे नांव द्यावे.

अन्या दातार's picture

5 Sep 2012 - 5:00 pm | अन्या दातार

कढी गोळे भाज्या घालूनही मस्त लागतील, जास्त पौष्टीक होतील. त्याला 'व्हेज. कढी मंचुरियन' असे नांव द्यावे.

खल्लास! याला म्हणतात बिझनेस सेन्स! आम्ही आपलं कढीगोळे कढीगोळे करत भुरके मारत असतो. व्हेज कढी मंचुरियन म्हणल्यावर कसं अगदी टेबलावर कढीच्या बाऊलच्या शेजारी काटा आणि चमचा अवतीर्ण झाले बघा. :)

हा प्रकार कधी घरी करुन पाहिला नाही.
रुप रंग वर्णन पहाता एकदा करुन पहायला हवेत आता.

मोहनराव's picture

5 Sep 2012 - 4:18 pm | मोहनराव

काका आम्हाला वाचवा!! मेलो!

सानिकास्वप्निल's picture

5 Sep 2012 - 4:38 pm | सानिकास्वप्निल

कढी आवडत नाही त्यामुळे पास :(
पण फोटो खूप छान आला आहे :)

मदनबाण's picture

5 Sep 2012 - 4:45 pm | मदनबाण

यम्म यम्म... :)

पैसा's picture

5 Sep 2012 - 6:14 pm | पैसा

आणि तितकाच छान फोटो!

आवडती पाकृ.
फोटू फारच भारी!

खडीसाखर's picture

5 Sep 2012 - 8:12 pm | खडीसाखर

मस्त

प्राध्यापक's picture

5 Sep 2012 - 8:14 pm | प्राध्यापक

पाककृती आवडली,

नारायणगाव मध्ये खाल्लेल्या कढी वड्या ची आठवण झाली,त्यानधे फक्त गोळ्याएवजी बटाटेवडे टाकतात चव अप्रतीमच.

५० फक्त's picture

6 Sep 2012 - 8:22 am | ५० फक्त

+१ , कढी तीन ठिकाणी उत्तम मिळते असे मत आहे,

१. मयुर व्हेज, जेएम रोड
२. कैलास गार्डन, खेड शिवापुर
३. नारायणगावचा मिसळपाववाला.

नूतन's picture

5 Sep 2012 - 9:17 pm | नूतन

नक्की करुन पाहणार

प्यारे१'s picture

5 Sep 2012 - 10:54 pm | प्यारे१

ढासु.........!

सविता००१'s picture

6 Sep 2012 - 8:47 am | सविता००१

केले, केले, काल रात्री लग्गेच. उत्तम झाले.
काका, धन्स हो!

सस्नेह's picture

7 Sep 2012 - 9:15 pm | सस्नेह

समयोचित पाकृ.
पावसाळ्याच्या थंड हवेत गोळ्यांबरोबर कढी भुरकायला मस्त मजा येणार !

ही पहा.
जमलीय ना काका ?

प्रभाकर पेठकर's picture

8 Sep 2012 - 2:30 am | प्रभाकर पेठकर

अगदी मस्तं दिसते आहे. ( जीर्‍याची फोडणी दिली नाही का?) एकदम गरमागरम हादडायची. गरम कढीत आल्याची चव उठून येते.

मस्त फोटो! या शनिवारी नक्की करणार. धन्यवाद!

अर्धवटराव's picture

6 Sep 2012 - 9:38 pm | अर्धवटराव

माझा अत्यंत आवडीचा पदार्थ.

काका, (लहान तोंडी मोठा घास घेतोय... )
शतायुषी, धनारोग्य संपन्न व्हा... (आणि आम्हाला असच रसना तृप्तीचे धडे देत राहा :) )

अर्धवटराव

स्पंदना's picture

10 Sep 2012 - 2:15 pm | स्पंदना

चला आज रात्रीचा मेन्यु ठरला.
या हो गुरुवर्य कढीभात खायला.

बघा जमलेत का?

प्रभाकर पेठकर's picture

7 Sep 2012 - 9:45 am | प्रभाकर पेठकर

गणपा, मोहनराव, सानिकास्वप्निल, मदनबाण, पैसा, रेवती, खडीसाखर, प्राध्यापक, नूतन. प्यारे१, सविता००१, स्नेहांकिता, स्वाती२, अर्धवटराव, aparna akshay. सर्वांना मनापासून धन्यवाद.

अर्धवटराव,

सदिच्छांबद्दल वेगळे खास धन्यवाद. असाच लोभ असो द्यावा.

सहज's picture

7 Sep 2012 - 10:15 am | सहज

स्टीमर मधे गोळे शिजवले तरी चालावे ना?

प्रभाकर पेठकर's picture

8 Sep 2012 - 2:24 am | प्रभाकर पेठकर

होSSS! चालतील की. ते स्टिमच करायचे आहेत कुठल्याही पद्धतीने केले तरी चालतील.
भज्यांप्रमाणे तळून शिजवले तरी चालेल.

अमृत's picture

8 Sep 2012 - 10:08 pm | अमृत

.

सोडा किंचीत जास्त पडल्यामूळे लालसर दिसत होते पण चव छान लागत होती. पाकृ करीता धन्यवाद काका.

अमृत

दादा कोंडके's picture

8 Sep 2012 - 10:50 pm | दादा कोंडके

बंगळुरात जकसंद्र मध्ये डेल्ही पॉईंटात खाल्लेला कढीचावल आठवला. मलईदार दह्यात केलेली दाटसर पण किंचीत गोडसर कढी...आहा!

वर मी थोडी मिरचीपावडर पण भुरभुरवली होती.

प्रभाकर पेठकर's picture

11 Sep 2012 - 2:39 pm | प्रभाकर पेठकर

सहज, अमृत, दादा कोंडके, इरसाल मनापासून धन्यवाद.

अमृत, मस्तं केले आहेत कढीगोळे.

इरसाल,

व्वा..! तिखटाने अजून वेगळी रंगत आली आहे. प्रयोगशाळेत प्रयोग करीत राहा.

अमोल केळकर's picture

11 Sep 2012 - 3:57 pm | अमोल केळकर

खुपच छान पाककृती :)

अमोल केळकर