खुसखुशीत पाकळ्या

नूतन's picture
नूतन in पाककृती
2 Sep 2012 - 7:27 pm

संध्याकाळच्या चहाबरोबर तोंडात टाकायला खुसखुशीत व पौष्टिक पदार्थ
(हे प्रमाण दोन माणसांसाठी आहे)
साहित्यः
मोड आलेले मूग २ वाट्या
हिरव्या मिरच्या २-३
आलं २-३चकत्या
चिरलेली कोथिंबीर १ मूठ
मीठ चविनुसार
पावाचा चुरा जरुरीनुसार (अंदाजे १ वाटी)
उकडलेला बटाटा १ (मध्यम आकाराचा)
डाळीचे पीठ (बेसन) १ मोठा चमचा
पाणी जरुरीनुसार
तेल तळण्यासाठी

कृती

१) मिरची, आलं, कोथिंबीर व थोडं मीठ एकत्र वाटुन घ्यावे.
२) मूगात वाटण ओलसर होईल इतपत पाणी घालुन जाडसर वाटुन घ्यावे
३) एका भांड्यात (मायक्रोवेव्हला चालणार्‍या) वाटलेले मूग, हिरवं वाटण, कुस्करलेला बटाटा, बेसन आणि चवीनुसार मीठ घालुन मिश्रण कालवुन घ्यावे
४) मिश्रण मायक्रोवेव्ह मध्ये 'हाय' पॉवर वर एक मिनिट ठेवावे (वेळेचे गणित मिश्रण कितपत ओलं आहे त्यावर ठरवावे).
५) मिश्रण बाहेर काढुन गार होऊ द्यावे
६) मिश्रणात पावाचा चुरा आवश्यकतेनुसार घालुन घट्ट गोळा तयार करावा (मिश्रण ओलसर राहिल्यास पाक्ळ्या आतुन मऊ राहतात)
७) या गोळ्याचे दोन इंच लांबीचे रोल करुन ते कर्णरेषेत (तिरके) कापुन घ्यावे (यामुळे पाकळीसारखा आकार येतो आणि कुरकुरीत तळले जातात)
८) कढईत तेल चांगले तापल्यावर मध्यम आचेवर या पाकळ्या लालसर होईपर्यंत तळाव्यात
९) तळलेल्या पाकळ्या टिश्यु पेपरवर हलक्या हाताने टिपुन घ्याव्यात.
१०) गरमा गरम पाकळ्या टोमॅटो सॉसच्या बरोबर फुलाप्रमाणे मांडुन वाढाव्या
c2lr

प्रतिक्रिया

गणपा's picture

2 Sep 2012 - 7:38 pm | गणपा

भन्नाट दिसतायत पाकळ्या.

सुहास झेले's picture

2 Sep 2012 - 7:41 pm | सुहास झेले

भन्नाट...!!!

शुचि's picture

2 Sep 2012 - 8:02 pm | शुचि

मस्त!!!

गोंधळी's picture

2 Sep 2012 - 8:09 pm | गोंधळी

आयला आजचा रविवार खासचं.
धन्य झालो.

सानिकास्वप्निल's picture

2 Sep 2012 - 8:07 pm | सानिकास्वप्निल

बघूनच तोंडाला पाणी सुटले
चविष्ट !!

सस्नेह's picture

2 Sep 2012 - 9:35 pm | सस्नेह

सुरेख स्नॅक्स प्रकार. पौष्टिक अन झटपटही !

पैसा's picture

2 Sep 2012 - 9:56 pm | पैसा

खूपच छान प्रकार!

प्रास's picture

2 Sep 2012 - 10:47 pm | प्रास

.........................
तूर्तास....

शिल्पा ब's picture

2 Sep 2012 - 10:57 pm | शिल्पा ब

उद्या करुन बघते.

ज्योति प्रकाश's picture

2 Sep 2012 - 11:21 pm | ज्योति प्रकाश

मस्तच दिसत आहेत पाकळ्या.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Sep 2012 - 12:44 am | अत्रुप्त आत्मा

रविवार असून साजर्‍या जाहलेल्या शाकाहारी मोहोत्सवातील ही डिशपण अवडलेली आहे.... :)

प्रभाकर पेठकर's picture

3 Sep 2012 - 2:03 am | प्रभाकर पेठकर

अप्रतिम. लवकरच करून पाहिल्या पाहिजेत.

छानच दिसतायत.
सध्या मिपावर जोरदार खाद्यमहोत्सव चालू आहे.

कौशी's picture

3 Sep 2012 - 3:42 am | कौशी

रेसिपी आहे करुन बघणार.

कच्ची कैरी's picture

3 Sep 2012 - 8:12 am | कच्ची कैरी

रेसेपी वाचुन आईची आठवण झाली ,माझी आई पण मुगाच्या दाण्यांचा असाच काहीतरी प्रकार बनवायची त्याला आम्ही मुगाचे वडे म्हणायचो :)
बाकी रेसेपी आणि सादरीकरण दोघही मस्त !

आश's picture

3 Sep 2012 - 12:32 pm | आश

मस्तचं

प्राजक्ता पवार's picture

3 Sep 2012 - 4:21 pm | प्राजक्ता पवार

मस्तं !!

मृत्युन्जय's picture

3 Sep 2012 - 5:01 pm | मृत्युन्जय

खंग्री पाकृ एकदम. दिल बाग बाग हो गया

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

स्पंदना's picture

4 Sep 2012 - 6:49 am | स्पंदना

मस्त.

खडीसाखर's picture

5 Sep 2012 - 8:09 pm | खडीसाखर

खुप छान!

सुंदर सादरीकरण आणि अतिशय चविष्ट! दोन वेळा करुनही प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता.

बहुगुणी's picture

14 Jul 2016 - 4:55 am | बहुगुणी

हा प्रकार बहुतेक एअर फ्रायर मध्ये छान होईल.

अविनाशकुलकर्णी's picture

14 Jul 2016 - 3:58 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त...भन्नाट...एक शंका.श्यालो फ्राय केले तर चालेल का?

भिंगरी's picture

15 Jul 2016 - 4:40 pm | भिंगरी

छान!

विवेकपटाईत's picture

15 Jul 2016 - 5:30 pm | विवेकपटाईत

मस्त कृती आवडली. कोफ्ते पण बनविता येतात. टोमाटो आणि कांद्याची ग्रेवी. मस्त लागतात. एकदा सौ. ने केले होते.