पाणी पुरी-
पुरी साहित्य-
रवा,मीठ,पाणी
स्टफिंग-
उकळलेला बटाटा, उकळलेले चणे,बारीक सेव
बारीक कापलेला कांदा,मीठ,हिरवी मिरची, (बारीक कापलेली),मीठ
उकडलेला बटाटा ,हिरवी मिरची आणि मीठ चवीनुसार एकत्र करून ठेवावी..
पाणीपुरीचे पाणी साहित्य--
अंदाजे पुदिना,कच्ची कैरी ,३-४ हिरव्या मिरच्या (झेपेल इतक्या) इ. मिक्सर मधून बारीक करून घ्यावे, आणि नंतर त्यात पाणी (अंदाजे जसे पाणीपुरीचे पाणी असते तसे)मिक्स करून त्यात काळे मीठ आणि जीरा पावडर मिक्स करावे.चव घेऊन प्रमाण कमी जास्त करावे (आवडीनुसार)
कृती-
प्रथम बारीक रवा आणि मीठ एकत्र करून घट्ट मळून घ्यावा आणि १५-२० मिनिट स्वच्छ ओलसर कापडात ठेवावा नंतर चपाती एवढा गोळा घेवून मोठी पातळ चपाती लाटावी व लहान वाटीने लहान पुरीच्या आकाराच्या जितक्या जमेल तितक्या लहान पुऱ्या कराव्या आणि तळून घ्याव्यात. तळलेल्या पुऱ्या थोडावेळ थंड होऊ द्याव्यात.
आता तयार पुरीत आलूचे मिश्रण,चणे,बारीक कापलेला कांदा बारीक सेव असे करून सर्व पुऱ्या तयार करून घ्याव्यात आणि एका वाटीत तयार पाणी….
मग काय खायला करायची सुरवात…
प्रतिक्रिया
1 Sep 2012 - 1:59 am | कौशी
गणपा ने सांगितले पण मला जमत नाही...
1 Sep 2012 - 7:22 am | स्पंदना
चिंचेची चट्णी चुठाय?
1 Sep 2012 - 8:27 am | कौशी
अरे हो ती राहिलीच .. माफ करा.
खरे तर पहिले लेखन आणि गड्बड टंकायची राहुन गेली.
चिंचेची चट्णी नेहमीप्रमाणे. (चिंच्,गुळ्, आणि खजुर )
1 Sep 2012 - 8:33 am | अत्रुप्त आत्मा