या वेळी मला आसाम च्या सिलचर येथे जाण्याचा योग आला. इंफाल चे काम आटोपल्यावर इंफाल ते सिल्चर येथे मी १०० आसनी विमानाने गेलो. हे अतर तसे २६० कि.मी चे पण रस्त्याच्या दुर्दशेमुळे खुप दगदगीचा हा मार्ग आहे. त्यामुळे विमानाने ४० मिनीटात पोचलो. विमानतळ हे सिलचर हुन ३२ कि.मी वर असल्याने मला घ्यायला मला घ्यायला उदय दास हे कार्यालयाचे व्यवस्थापक आले होते. जितका वेळ मला इंफालहुन सिलचर विमानतळावर यायला ला लागला त्यापेक्षा अधिक वेळ मला विमानतळावरुन सिलचर ला जाण्यास लागला. तेथे माझी भेट नागपुरचे राजेश देशकर यांचेशी झाली. राजेश हे सर्व प्रथम आले ते अरुणाचलातील चांगलांग या दुर्गम ठीकाणी. संघाचे काम करायला. तेथे त्यांनी रंगफ्रा चळवळीला उर्जितावस्र्था आणली. एकदा अशेच मी त्यांना काही आठवणी बद्दल आग्रह केला तेंव्हा ते म्हणाले " मी पहिले आठ दिवस झाडावर काढले कारण या काळी तेथे उल्फा संघटनेचे प्राबल्य होते. नंतर त्यांना आसाम रायफल नी अतिरेकी समजुन तुरुंगात टाकले. त्यावेळी तेथे जो मुख्य अधिकारी होता त्याने मला बोलावुन तुम्ही या भागात कां फिरत आहात असे विचारल्यावर व मी संघाचा प्रचारक आहे असे सांगितल्यावर त्याने जंगलात स्मशानाजवळ एक पडकी जागा होती ती राहण्यासाठी दिली. तेथे मी ६ महिने राहीलो. स्मशान असल्यामुळे कुणी त्या बाजुला फिरकत नसत. त्यांनी तिथुन च तेथील रंगफ्रा चळवळीसाठी काम सुरु केले. सध्या ते सिलचर मध्ये त्रिपुरा व आसाम च्या सिलचर विभागाचे सेवा कार्य बघतात.
दुसरे एक व्यक्तिमत्व मला भेटले ते म्हणजे शशीधर चौथाईवाले. ते देखील इशान्य भारतात संघाचे कार्य गेल्या ४० वर्षांपासुन करीत आहेत. सध्या त्यांनी सत्तरी गाठली असुन व तब्येतीमुळे फारसा प्रवास करीत नाहीत. व आपल्या अनुभवाबद्दल आसामी भाषेत पुस्तक लिहीण्यात मग्न आहेत. मी मराठी असल्यामुळे माझ्या तेथील निवासात ते रोज सकाळी मराठीत बोलण्यासाठी माझ्याकडे येत असत.
सिलचर हे मणीपुर, मिझोराम व त्रिपुरा या राज्याचे आर्थीक प्रवेशद्वार आहे. या राज्यातिल नागरीक सिल्चर ला बाजारासाठी येतात. येथे बंगाली भाषिक लोकांचे प्रभुत्व आहे. बराक नदीने वेढलेले असल्याने ब्रिटीश कालात येथे जल वाहतुकीने व्यापार होत असे. नदी किनारा हा दगडांनी बनवुन बंदर करण्यात आले असल्याने यास बंगालीत "शिलेर चोर" म्हणजे दगडांचा काठ असे म्हणत त्याचा अपभ्रंश होवुन सिलचर झाले.
बाजार पेठ असल्याने येथे दाट लोकवस्ती आहे. सिलचर हुन गोहाटी ला रेल्वेनि व रोड नी पण जाता येते. मी परतीचा प्रवास नाइट सुपर बसे ने केला. हा मार्ग अतिशय खडतर असुन मेघालयातुन जातो. दुर्गम अशा पहाडी मार्गाने जात असतांना अतिपावसामुळे रस्ता च्या रस्ता वाहुन गेल्याचे ठिकठिकाणी दिसत होते. संध्याकाळी ६ ला निघुन मी गोहाटीला सकाळी ९ ला सुखरुप पोचलो.
प्रतिक्रिया
27 Aug 2012 - 2:42 pm | गोंधळी
क्रमशः राहीले का लिहायचे ?
27 Aug 2012 - 3:15 pm | मी_आहे_ना
हेच म्हणतो..
28 Aug 2012 - 1:14 pm | वैनतेय
कधी? वाट पहातोय...
संघाच्या नावाने सदोदित खडे फोडणार्या आणि कुठल्याही फुटकळ गोष्टींचा संघाशी संबंध जोड्णार्या मंडळींनी एकदा तरी या भागात जाऊन यावे... ईथे काम करणे किती कठीण आहे ते कळेल. मी स्वतः आसाम, मणिपुर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये बरेच दिवस घालवले आहेत. फुकाच्या गप्पा नाहीत...
28 Aug 2012 - 1:50 pm | सृष्टीलावण्या
11 ऑगस्ट नंतर सुर बदलला असे ऐकून आहे. खाजगीत का होईना पण संघवाल्यांशी बोलताना, (धर्मांध मुस्लिमांपुढे) आता आपलं कसं व्हायचं... असा राग आलापायला सुरूवात केली आहे.
28 Aug 2012 - 2:51 pm | वैनतेय
पण मला एक कधीच कळत नाही, नेहमी अशी एखादी घटना घडण्याची वाट का पाहायाची? याचा अर्थ एवढाच "आपण एवढे संघटीत असावे कि कोणी वाकड्या नजरेने पाहू नये"
आजकाल disclaimer टाकावेच लागते, ऊगाच कोणच्या भावना दुखावु नयेत... ;)