पुण्यात स्फोट?

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in काथ्याकूट
1 Aug 2012 - 8:53 pm
गाभा: 

पुण्यात स्फोट?

प्रतिक्रिया

पुष्करिणी's picture

1 Aug 2012 - 8:56 pm | पुष्करिणी

हो, ३ ..
बालगंधर्व जवळ. बेवारशी पिशवी तपासणीसाठी घेउन जाणारा जखमी. एक कचरापेटीत , मॅकडोमॉल्ड जवळ आणि एक देनाबँकेसमोर सायकलवर .

इरसाल's picture

1 Aug 2012 - 8:57 pm | इरसाल

सीरियल ब्लास्ट

शैलेन्द्र's picture

1 Aug 2012 - 8:57 pm | शैलेन्द्र

Four low-intensity blasts took place on Pune's Junglee Maharaj Road on Wednesday evening.

One bomb was kept in a cycle carrier, one in a dustbin and the other close to a local bank. The three explosions took place near Dena Bank, Bal Gandharv Theatre and McDonald's, according to media reports.

A fourth blast has been reported from Garware Chowk. There have been no reports of casualties.

Home Minister Sushilkumar Shinde was supposed to visit Bal Gandharv Theatre this evening.

These are not terror blasts but an act of mischief, according to the Pune police.

All the blasts occurred within a radius of one kilometre.

Following the blasts, the city witnessed several traffic snarls.
Click here!

Junglee Maharaj Road is a popular hangout for youngsters

More details are awaited

अर्धवट's picture

1 Aug 2012 - 9:14 pm | अर्धवट

चारही स्फोट अतिशय कमी क्षमतेचे होते.
जंगली महाराज रस्त्याच्या आसपास

झी २४ तास च्या निवेदनानुसार ४ ठिकाणीच बॉम्बस्फोट झाल्याचे वृत्त आहे.
ही ती ठिकाणे:

अर्धवटराव's picture

1 Aug 2012 - 9:33 pm | अर्धवटराव

एखाद्या मोठ्या घातपाताची हि पुर्वतयारी असावी काय? कमि तिव्रतेचे स्फोट घडवुन डॅमेज भलेही कमि झाला, पण दहशत तर मोठीच पसरेल ना :(

अर्धवटराव

सचिन कुलकर्णी's picture

1 Aug 2012 - 9:36 pm | सचिन कुलकर्णी

मालक, जरा गुगलिंग करून पहिले असते किंवा दूरचित्रवाणीवर बघितले असते तर उत्तर मिळाले असते, हं, दुसरे काही म्हनावायचे असल्यास थोडे describe करायचे ना..

शैलेन्द्र's picture

2 Aug 2012 - 2:37 pm | शैलेन्द्र

साहेब, चुक झाली, माफी असावी..

मस्त कलंदर's picture

1 Aug 2012 - 9:43 pm | मस्त कलंदर

जागृत मुंबईकर या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे बाँब चे वेगवेगळे प्रकार असतात. काही फक्त हाताळल्याने फुटू शकतात, तस्मात हलकासा धक्काही पुरेसा ठरू शकतो. काही प्रकाशामुळे जागृत होतात, काही विशिष्ट कालावधीनंतर(टायमर) फुटू शकतात तर काही दुरून नियंत्रित केले जाऊन हवे तेव्हा जागृत करता येतात. त्यामुळे संशयास्पद वस्तू दिसल्यास ती उचलून पोलिसांकडे नेऊ नये, तीवर विजेरीचा झोत टाकू नये. सरळ पोलिसांस कळवावे. इतर गोष्टी आठवतील तसे एकत्रित करून लिहिन, पण संशयास्पद वस्तूच्या बाबतीत काय करावे हे पटकन आठवले, ते लिहिले.

स्वानन्द's picture

1 Aug 2012 - 10:22 pm | स्वानन्द

चांगली माहिती. धन्यवाद.

माहितीपूर्ण श्रेणी देत आहे :)

थोडक्यात मुंबई स्पिरीट सारखं पुणे स्पिरीट सुद्धा होणार तर!

काय माहीत आता स्पिरीट होतंय का हवेत विरतंय ते !!

पुण्याचे स्पिरीटच काढायला आलो होतो... धन्यवाद शिल्पा.
पण धम्या आणि पर्‍या मुळे पुण्यात किती 'स्पिरीट' शिल्लक राहिले असेल हा ही एक संशोधनाचाच विषय आहे.

मनुष्य हानी झालिय का?

विचित्र घडलं ,मुंबईच्या सीरिअल स्फोटांची आठवण झाली
:(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2012 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक जखमी. जखमीवरच संशय व्यक्त केल्या जात आहे.

-दिलीप बिरुटे

प्रभाकर पेठकर's picture

2 Aug 2012 - 1:25 am | प्रभाकर पेठकर

झी २४ तासचा बातमीदार म्हणतो आहे, 'स्फोटात एक किरकोळ माणूस जखमी झाला आहे.'

खरं पाहता ते वाक्य 'स्फोटात एक माणूस किरकोळ जखमी झाला आहे.' असे असणार.

निदान मराठी वाहिन्यांनी तरी, मराठी बातम्या देताना, अशा गंभीर चुकांकडे 'किरकोळ' समजून दुर्लक्ष करू नये.

हेच म्हणतो. काल बातम्या पाहात असताना आइकलं, कैच्याकै प्रकरण होतं. पुण्याची मेयरबै तर नुसती प्राँप्टिंगवर बोलत होती, धड बोलता पण येत नव्हतं तिला. आद्।इ म्हणाली ५ ठिकाणी स्फोट झालेत, मग नंतर कोणीतरी सांगितलं की ५ नाही ४, तर लगेच "हां, ५ नाही ४च ठिकाणी झालेत म्हणून." दोन्हीही केसेस लै डोक्यात गेल्या.

कमी तीव्रतेचे स्फोट हे काय गौडबंगाल आहे ?

१५ ऑगस्ट तणावात जावा म्हणून ?
टीम अण्णा व रामदेवबाबास लगामासाठी कारण म्हणुन ?
की इतर काही शक्यता आहेत ?

स्फोटांची कमी तीव्रता असणे खरोखर चिंतेची बाब का आहे ?

स्पंदना's picture

2 Aug 2012 - 5:09 am | स्पंदना

आमचे बरेच प्रिय मिपाकर पुण्याचे असल्याने अतिशय काळजी लागली आहे.
१५ ऑगस्ट, गणपतित जरा जपुन हं !
काळजी घ्या.

वर मस्तकलंदरन अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे.

त्यावरुन शंका येतेय.
हे जाणुनबुजुन केलेले आहे किंवा नाटक आहे. काही मुद्द्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी.
आणखी म्हणजे.......
१.जर कचरापेटीत बॉम्ब फुटला तर ती पेटीला काहीच कसे झाले नाही.
२.मीडियावाल्यांना माणसांपेक्शा ती सायकल नवी होती याचे जास्त दु:ख झालेले वाटत होते.
३.मनुश्य हानी नाही झाली हे उत्तम पण मागील इतिहास पाहता हे खटकते आहे.

*तरी सुद्धा पुणेकरांनी काळजी घ्यावी *

इरसाल बर्‍याच अम्शी सहमत.
हे स्फोट सुशीलकुमार शिंदेंच्या स्वागतार्ह असावेत.
किंवा आसाम / पॉवर क्रायसेस यांसारख्या मुद्द्यावरून मिडीयाचे / जनते लक्ष उडून दुसरीकडे जावे यासाठी केले असावेत अशी शंका व्यक्त केली जात आहे. पुण्यात खळबळ माजवायचीच तर बरीच महत्वाची ठिकाणॅ आहेत. जं म रस्ता हे फारसे योग्य ठिकाण नव्हे.

जं म रस्ता हे फारसे योग्य ठिकाण नव्हे.

का बरे.. दावणगिरी लोणी स्पंज डोसा वगैरे अत्यंत महत्वाची ठिकाणं आहेत त्या रस्त्यावर... (तो स्टॉल सुखरुप आहे ना .. ?!)

बरं ऑन अ सिरियस नोट.. असंही असू शकतं की ज.बेकरी आदि उच्च्भ्रू ठिकाणीच घातपात होईल असं गृहीत धरुन शांत राहू नये, इनफॅक्ट जं.म. रस्त्यासारखा आम आदमीचा साधासुधा रस्ताही आता सुरक्षित नाही असा दहशतवादी संदेश देण्यासाठीही मुद्दाम अशी निवड असू शकते.. (नाउ वी हॅव्ह एन्टर्ड युअर होम.. असा..)

काकाका असते तर त्याने एकादी लेख मालिकाच लिहली असती.

सदर स्फोटात केव्ळ एकच मनुष्य किरकोळ जखमी झाला आहे असे कळते.. सुदैवाने सर्व पुणेकर असलेले मिपाकर सुखरूप आहेत याचे समाधान आहे..

चिरोटा's picture

3 Aug 2012 - 12:29 pm | चिरोटा

जं.म. रस्त्यासारखा आम आदमीचा साधासुधा रस्ताही आता सुरक्षित नाही असा दहशतवादी संदेश देण्यासाठीही मुद्दाम अशी निवड असू शकते

दहशतवादी संदेश देणार? त्यापेक्षा ते माणसेच मारतील की ४/५! आणि बॉम्बस्फोट कधीही कोठेही करता येवू शकतो त्यासाठी दहशतवाद्यांच्या संदेशाची काय गरज?

बाँबच्या जोडणीत दोष असल्याने स्फोट व्हावा तसा झाला नाही; तसेच बाँबची क्षमता मोठ्या स्फोटाची होती, असे सकाळमधील बातमी सांगते.

मदनबाण's picture

17 Aug 2012 - 5:15 pm | मदनबाण

परत लो इंटेसिटीचा स्फोट झाला...

http://www.firstpost.com/india/minor-explosion-in-pune-suburb-injures-ch...