लंडन ऑलिंपिक उद्घाटन सोहळा २०१२ - आइल्स ऑफ वंडर
आयुष्यात प्रत्यक्षात पाहीलेला मी हा पहिलाच सर्वात मोठ सोहळा, अगदी डोळे दिपून गेले भव्य रोषाणाईने.
एक-दीड महिन्यापासून रोज... अगदी न चुकता ऑनलाईन तिकिटे मिळवण्याचा प्रयत्न सुरु होता, खरं तर तिकिटे एखाद्या खेळाची मिळावीत असा कल होता...अशी संधी पुन्हा-पुन्हा मिळणार नव्हती :) लॉन-टेनीसची तिकिटे मिळाली तरीही मन प्रयत्न करायचे सोडायलाच तयार नव्हतं . अचानक.. हो हो अगदी अचानक , अनपेक्षीतपणे ऑलिंपिक उद्घाटन सोहळ्याची तिकिटे विक्रीसाठी ऑनलाईन दिसली (तशी ती आधीपासूनच होती पण किम्मत बघता खिशाला परवडण्यासारखी नव्हती) आणी मागचा-पुढचा, किमतीचा (तरी ही महाग पण परवडेल अशी ;) ) विचार न करता सरळ विकत घेऊन टाकली. आम्हाला तर आकाश ठेंगणं झाल्यासारखे वाटले, बस वाट बघु लागलो होतो २७ जुलाईची.
शेफिल्डवरुन आम्ही लंडनला दुपारीच पोहोचलो, हॉटेलला चेक-इन करुन , सामान टाकून आम्ही स्ट्रार्डफोर्ड ला जायला निघालो, तिथेच ऑलिंपिक पार्क उभे केले आहे. सर्वत्र गर्दीच गर्दी होती. वातावरणात एक प्रसन्नता, उत्सुक्ता होती. सुरक्षा व्यवस्था इतकी चांगली होती सगळे सुरळीत झाले. अम्हाला वाटले होते स्टेडियमच्या आत जायलाच भल्या मोठया रांगेत तासंतास उभे राहावे लागते की काय पण तसे न होता स्टेडियमला आम्ही पावणे पाचलाच पोहोचलो. सोहळा सुरु व्ह्यायला अजून चार तासाचा अवकाश होता पण इतका उत्साह होता की चार तास काय आणखीन आठ तास थांबायची तयारी होती आमची. थोडेसेच स्वस्त तिकिट असल्यामुळे रेट्रीक्टेड व्ह्यु असा होता, सोहळ्याचा भाग म्हणून मैदानात विशाल वृक्ष उभं केलं होतं त्यामुळे थोडासा अडथळा येत होता, पण त्याने आमच्या आंनदाला, उत्साहाला काहीच फरक पडला नव्हता, जे मिळाले त्याने आम्ही भारावून गेलो होतो.
सोहळा इतका झोकात सुरु झाला आणी आम्ही पुढचे तीन तास खिळून बसून बघू लागलो, ८० हजार लोकांची संख्या आणी हा जल्लोष मी शब्दात ही व्यक्त करु शकत नाही. गेले दोन रात्री आम्ही बस त्या सोहळ्याच्या भव्य उत्सवात कसे रमलो होतो तेच आठवत आहोत, एक अविस्मरणीय असा अनुभव जो आमच्या मनावर अगदी मोहिनी घालून गेला आहे.
मी काढलेले काही फोटो इथे देत आहे, आशा आहे तुम्हाला ते आवडतील :)
स्टेडियमला जाताना....
स्ट्रार्डफोर्ड ऑलिंपिक पार्क
सोहळ्यापुर्वी दिसणारे आतील मैदान....
खचाखच भरलेले स्टेडियम....
प्रेक्षाकांनी भाग घेऊन व्हेव केलेले सील्क
ब्रिटनची ग्रामीण संस्कृती (ब्रिटिश कंट्री साईड)
औद्योगिक क्रांती
ब्रेडली विग्गिन्स टुर दी फ्रांस चा विजेत्याने घंटानाद करुन सोहळ्याला आरंभ केला
नॅशनल हेल्थ सर्विस
ब्रिटिश पॉप म्युझिक व फिल्म
युनियन जॅक
रोषणाई पाहून डोळ्याचे पारणे फिटले
अॅथलिट परेड
भारत संघाचे आगमन :)
ग्रेट ब्रिटन चे आगमन
आतषबाजी
ऑलिंपिक क्वाड्रन
ऑर्बिट
अविस्मरणीय असा भव्य-दिव्य सोहळा....
प्रतिक्रिया
30 Jul 2012 - 12:15 am | मोदक
झकास फोटो.. आवडले. :-)
बादवे त्या 'ऑर्बीट' चे नाव "आर्सेलरमित्तल ऑर्बीट" आहे. ;-)
30 Jul 2012 - 8:53 am | स्पंदना
हो ना!
मित्तलनी टेकओव्हर केलीय आर्सेलर. पण त्ये मित्तल भारताला कंटाळल्यात हो. काय्बी शानपण चालत न्हाय म्हणत्यात या नेत्यांपुढ.
30 Jul 2012 - 12:30 am | संजय क्षीरसागर
धन्यवाद!
30 Jul 2012 - 3:33 am | रेवती
भारी, त्रिवार भारी!
फोटू पाहून आमचेही डोळे दिपले.
30 Jul 2012 - 8:23 am | लीलाधर
येक नंबर बघा :)
30 Jul 2012 - 8:52 am | पिंगू
छान सोहळा टिपला आहे..
30 Jul 2012 - 8:54 am | प्रचेतस
मस्त.
फोटो आवडले.
30 Jul 2012 - 9:19 am | इरसाल
नशीबवान, भाग्यवान आहात.
तो डॅनियल क्रेग आला वरुन उडत ते पाहीलं की नाही ?
30 Jul 2012 - 10:26 am | ऋषिकेश
वा! आखों देखा हाल आवडला! फोटोही अंतराचा विचार करता अतिशय सुंदर आणि स्पष्ट आले आलेत.
संपूर्ण भारतीय पथकाचा फोटो मी प्रथमच पाहतोय. इथे दुरदर्शनवर भारतीय चमुचे दर्शन काही सेकंद होते तर पेपरांमधे केवळ पहिल्या एक -दोन रांगा दिसताहेत.
अनेक आभार!
ऐसीअक्षरेवर "ऑलिंपिक Live!" या धाग्यात ऑलिंपिक मधे होणार्या घटना अपडेटवल्या जातील. हाफीसातून ज्यांना थेट प्रक्षेपणाचा आनंद लुटता येणार नाही त्यांच्यासाठी म्हणून दुवा देतोय. जाहिरात वाटल्यास तसे समजावे ;)
30 Jul 2012 - 1:57 pm | कपिलमुनी
बंद करा की ओ !!
हवा तर इथे एक धागा काढा ;)
30 Jul 2012 - 10:31 am | जाई.
टीव्हीवर पाहिला होताच
तुझे फोटो अतिशय छान आलेत
30 Jul 2012 - 10:49 am | झकासराव
छान फोटो.
नशीबवान आहात प्रत्यक्ष सोहळा पहायला मिळण म्हणजे... :)
30 Jul 2012 - 11:06 am | जेनी...
मस्त फोटो आहेत,:)
30 Jul 2012 - 11:06 am | मृत्युन्जय
झक्कास.
बाकी भारतीय पथकाबरोबर ती येडी बया कशी घुसली हे काही कळेना झालय.
इतर कुठल्याही खेळाडुन तिच्या असण्याला आक्षेप कसा घेतला नाही?
कुठल्याही पदाधिकार्याने तिला थांबवले कसे नाही?
असे येड्यासारखे त्या खेळाडुंमध्ये घुसताना त्या बयेला स्वतःला लाज कशी नाही वाटली?
असे राजहंसाच्या घोळक्यात मध्येच कावळा उडताना बघुन लै चिडचिड झाली राव.
30 Jul 2012 - 11:23 am | शिल्पा ब
मस्त. भारतीय पथक काय करतंय बघुया. सानिया नेहवालने काही केलं तरच थोडीफार आशा आहे. तिच काय ती चांगल्या खेळाचं सातत्य दाखवतेय.
31 Jul 2012 - 3:08 am | संदीप चित्रे
>> सानिया नेहवालने काही केलं तरच थोडीफार आशा आहे.
सायना नेहवाल म्हणायचंय का?
सानिया (मिर्झा)कडून आशा ठेवायचे दिवस कधीच संपलेत :)
31 Jul 2012 - 9:16 am | स्वानन्द
येस्स. सायना कडून भर्पूर अपेक्षा आहेत. तसंच विजिंदर सिंग आणि सुशील कुमार सुद्धा पदक मिळवतील असं वाटतंय. बघूया.
31 Jul 2012 - 10:46 am | शिल्पा ब
हो सायनाच...चुकीनी मिष्टेक झाली.
सानिया अन पदक ? ते पण ऑलिंपिक्समधे ? मी असं लिहिन असं कसं वाटलं तुम्हाला !
31 Jul 2012 - 6:22 pm | मृत्युन्जय
सानिया (मिर्झा)कडून आशा ठेवायचे दिवस कधीच संपलेत
आता तिच्याकडुन तिच्या सासू सासर्यांनी अपेक्षा ठेवायच्या फक्त ;)
30 Jul 2012 - 11:39 am | विजुभाऊ
धन्यवाद. एकदम आंखो देखा हाल बघायला मिळाला.
स्टेडियम मध्ये असताना तुमच्या मनात जे रोमाम्च आले असतील ते वेगळेच.
30 Jul 2012 - 11:50 am | अक्षया
मस्त.
फोटो आवडले. :)
30 Jul 2012 - 3:17 pm | ५० फक्त
लई भारी, धन्यवाद.
30 Jul 2012 - 3:57 pm | मदनबाण
झक्कास्स्स्स्स ! :)
31 Jul 2012 - 9:20 am | मूकवाचक
+१
30 Jul 2012 - 10:17 pm | आत्मशून्य
बरं वाटलं. चायनात ऑलंपिक झालं त्यावेळी कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला यापुढे संयोजन व त्यांच्या दिमाखदार सोहळ्यात आपल्या संमृध्दीचे प्रदर्शन वगैरे झेपणार नाही, पांढरा हत्ती वगैरे मुक्ताफळं ऐकु येत होती... त्यामानाने सध्याच्या वातावरणात इतका दिमाखदार सोहळा सुरेखच. मजा आली.
31 Jul 2012 - 3:06 am | संदीप चित्रे
फोटो झकास आले आहेत.
सोहळा प्रत्यक्ष पाहिलात म्हणजे भाग्यवान आहात.
31 Jul 2012 - 9:01 am | अत्रुप्त आत्मा
खत्तरनाक
31 Jul 2012 - 9:44 am | अमोल केळकर
मस्तच. इथे फोटो दिल्याबद्दल अनेक धन्यवाद
आणि आपले अभिनंदन :)
अमोल केळकर
31 Jul 2012 - 6:17 pm | मदनबाण
या सोहळ्याचे अजुन सुंदर फोटो इथे पाहता येतील...
http://www.boston.com/bigpicture/2012/07/olympics_2012_opening_ceremoni....
31 Jul 2012 - 8:33 pm | प्रभाकर पेठकर
झ़कास छायाचित्रं. प्रत्यक्ष सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे समाधान लाभले. धन्यवाद.
31 Jul 2012 - 10:44 pm | पैसा
ही पाकृ पण नेहमीसारखीच लाजवाब! ;)