रवा इडली

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in पाककृती
27 Jul 2012 - 5:15 pm

एकदम सोपी, अगदी आयत्या वेळी ठरवून करता येण्यासारखी ही रवा इडली:
साहित्य-
२ वाट्या रवा, १ वाटी दही, मीठ चवीनुसार, १ चमचा तेल, १/२ चहाचा चमचा खायचा सोडा
कृती-
तेलावर रवा हलका भाजून घ्या, रंग बदलू देऊ नका.
दही घुसळून घ्या.
रवा कोमट झाला की त्यात दही व मीठ घाला ,पाणी घाला. रवा पाणी शोषून घेतो त्यामुळे पाणी घालताना थोडे जास्त राहू द्या. हे मिश्रण कालवून साधारण अर्धा तास ठेवा.
इडली पात्राला तेलाचा हात लावून घ्या.
रव्यात सोडा घालून चांगले ढवळा व इडलीपात्रात घाला.
१२ ते १५ मिनिटे वाफवा.
आणि चटणी किवा सांबाराबरोबर किवा दोन्हीबरोबर खा.
चटणी-
१ वाटी खवलेला नारळ,अर्धी वाटी डाळं, ४-५ हिरव्या मिरच्या, पेरभर आल्याचा तुकडा, २ लसूण पाकळ्या, कोथिंबिर, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर हे सगळे थोडे पाणी घालून वाटणे. दही किवा ताक घालून सरसरीत कालवणे.
हवी असल्यास वरुन तेल, मोहरी, उडीदडाळ, कढिपत्ता यांची फोडणी घालणे.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

27 Jul 2012 - 5:19 pm | मदनबाण

वा... :)
सांबार इल्ले ?

कुंदन's picture

27 Jul 2012 - 5:24 pm | कुंदन

तोंपासु

उदय के'सागर's picture

27 Jul 2012 - 5:42 pm | उदय के'सागर

व्वा.... माझी आई असेच नाष्ट्यासाठी झटपट डोसे/धिरडे/उत्तपम करते... छान टोमॅटो, हि.मिरची, कांदा वगैरे घालुन ..खुप अवडतात मला ... रवाळ रवाळ असल्यामुळे मज्जा येते खातांना....

तुमच्या ईडल्या बाकी खूपच 'स्पाँजी' झाल्यात असं दिसतय... :) आणि त्याचा रंगही किती स्वच्छ दिसतोय... नक्कीच करुन पाहीन :)

जाई.'s picture

27 Jul 2012 - 6:01 pm | जाई.

वा! मस्तच

नाना चेंगट's picture

27 Jul 2012 - 6:05 pm | नाना चेंगट

सांबार हवेच हो..

कुंदन's picture

27 Jul 2012 - 6:38 pm | कुंदन

अन त्या नंतर फिल्टर काफि?

सन्जयखान्डेकर's picture

27 Jul 2012 - 6:15 pm | सन्जयखान्डेकर

हा रवा कशाचा? म्हणजे गव्हाचा की तांदळाचा? कारण बाजारात तांदलाचा रवाच इडली रवा म्हणुन मिळतो त्यासाठी विचारले.

स्वाती दिनेश's picture

27 Jul 2012 - 6:45 pm | स्वाती दिनेश

इडली रवा नाही, साधा गव्हाचा रवा- ज्याचा शिरा, उपमा करतो तो रवा..

कहर फटू आहे हा.

मी इडली खाणारच !

व्हेअर इज मिस्टर बिका ?

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Jul 2012 - 7:15 pm | बिपिन कार्यकर्ते

काय शिंची कटकट आहे.... असले धागे मी उघडत देखिल नाही... तर हाका मारून मारून बोलावतात **चे!

बोला काय म्हणणं आहे? का आठवण काढलीत?

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jul 2012 - 7:40 pm | परिकथेतील राजकुमार

मी सध्या फक्त बिकांच्या पैशाने इडल्या खाण्याचे व्रत घेतले आहे. त्यामुळे त्यांच्या नावानी कोंबलत* होतो.

*कोकलत + बोंबलत

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Jul 2012 - 7:50 pm | बिपिन कार्यकर्ते

थांब. लवकरच आपल्या भेटीचा योग येत आहे. कॉल करतो.

स्मिता.'s picture

27 Jul 2012 - 7:17 pm | स्मिता.

व्हेअर इज मिस्टर बिका ?

अरेच्चा! बिका आता इडल्या बनवून खाऊ घालायला लागले की काय? मी पण येते तुझ्यासोबत, फक्त इडल्यांचं निरिक्षण करायला....

स्वातीताई, झटपट इडल्यांची पाकृ आवडली. नक्की करून बघेन.

कुंदन's picture

27 Jul 2012 - 7:21 pm | कुंदन

त्याला नाही आवडल ईडली. त्याला आवडते पाव्-भाजी.
हो ना रे बिका...

सहज's picture

27 Jul 2012 - 8:13 pm | सहज

वरिजीनल इडली सारखीच ही रवा इडली दिसते आहे. क्लास!!

नंदन's picture

29 Jul 2012 - 9:32 am | नंदन

सहजरावांशी बाडिस! फोटो मस्त आलाय. पाकृ सोपी वाटते आहे, कधीतरी नक्कीच करून पाहीन (असं आता तरी म्हणतो :))

अत्रुप्त आत्मा's picture

27 Jul 2012 - 8:25 pm | अत्रुप्त आत्मा

हायला... ही तर इडलीचटणीची स्मायली तयार झाली की...! लै येक नंबर दिसतीये राव...!

खावांतर-फोटूच्या अपरिहार्य, विना-परवाना वापरा बद्दल अगाऊ क्षमस्व. ;-)

मस्त! अगदी हलकी झालेली दिसत आहे.
'झटपट इडली' या नावातच झटपट असल्याने फक्त चटणी असल्यास चालावे.
सांबार करण्याचा कंटाळा कधितरी चालू शकतो. :)

पैसा's picture

27 Jul 2012 - 9:22 pm | पैसा

१. इडल्या मस्त दिसतायत!

२. चटणीची पाकृ पण अतिशय आवडली.

३. ज्यांना झटपट सांबार पाहिजे असेल त्यांनी रात्रीच्या डाळीच्या आमटीत तयार सांबार मसाला घाला. काय असतील त्या भाज्यांचे तुकडे घाला. जास्त नखरे नकोत.

३. ज्यांच्याकडे सोडा नसेल त्यांनी इनो घ्या. :D

३. "पेरभर आल्याचा तुकडा" हे बर्‍याच वर्षांनी ऐकायला मिळालं, त्यासाठी धन्यवाद! पेरभर, चिमूटभर, उगीच एवढंसं, अशी मापं सांगणारी पट्टीची सुगरण आहे हे सांगणं गरजेचं नाही. स्वयंपाकघरात एक इंच आलं मोजायला फूटपट्ट्या कोण ठेवतो? :D

चतुरंग's picture

28 Jul 2012 - 1:09 am | चतुरंग

स्वातीतै, भन्नाट आलाय फोटू!!
अशा वाफाळत्या इडल्या मला चटणीसोबत तर आवडतातच शिवाय भरपूर साजूक तूप सोडून मेतकुटाबरोबरही खतरा लागतात! :)

(इडलीप्रेमी)रंगा

निवेदिता-ताई's picture

28 Jul 2012 - 9:07 am | निवेदिता-ताई

मेतकुटाबरोबर...भरपुर साजूक तूप घालून खायला तो काय गुरगुट्टा भात आहे काय??

आहा.. सकाळीच इडली-सांबार खाऊन आल्याने जळजळ झालेली नाही..
बाकी ह्या इडल्या झटपट बनतील आणि झटपट संपतील पण..

निवेदिता-ताई's picture

28 Jul 2012 - 3:43 pm | निवेदिता-ताई

स्वाती--- रवा कोण्ता घ्यायचा.... जाड का बारीक

मयुरपिंपळे's picture

29 Jul 2012 - 11:38 am | मयुरपिंपळे

;)

स्पंदना's picture

30 Jul 2012 - 7:43 am | स्पंदना

मी केल्या होत्या पण तुझ्यासारख्या टम्म नव्हत्या फुगल्या. काय सुरेख दिसताहेत. अगदी अश्श्याच उचलुन खाव्या!

लीलाधर's picture

30 Jul 2012 - 8:04 am | लीलाधर

सक्काळी सक्काळी आत्ताच गरमा गरम ईडली सांबार खाउन आलोय बघ आणि भरीस भर मस्तपैकी म्येंदू वडा ही होताच हो... काय पण फोटू आलाय १ नंबर आवडेश :)

लय भारी!
घरीच इडली ग्राईंडर असल्याने साग्रसंगीत इडल्या घरी अनेकदा होतात.. हे झटपट वर्जन करून पाहिले पाहिजे

स्वाती२'s picture

30 Jul 2012 - 7:06 pm | स्वाती२

मस्त!

गणपा's picture

2 Aug 2012 - 7:41 pm | गणपा

कधी येऊ खायला? :)

रेवती's picture

12 Aug 2012 - 4:25 am | रेवती

या प्रकाराने इडली मस्त झाली.
तू केलेली फारच शुभ्र पांढरी दिसतिये पण यावेळी माझ्याकडे असलेला रवा किंचित पिवळ्या रंगाचा होता म्हणून इडल्याही तश्या झाल्या. वरील साहित्यात पंधरा मध्यम आकाराच्या इडल्या झाल्या. सानिकेनं सांगितल्याप्रमाणे पोडी करून त्याबरोबर खाल्ल्या. एकदम भारी!

स्वातीताई, काल ह्या इडल्या करुन पाहिल्या. मस्त जमल्या. :)
सोपा, सुटसुटीत प्रकार दिल्याबद्दल धन्यवाद!