साहित्यः
१ वाटी पिवळी मुगाची डाळ धुवून, ३० मिनिटे भिजवणे. प्रेशर कुकरला लावून शिजवून घेणे
२ वाट्या बारीक चिरलेला पालक
१ छोटा कांदा बारिक चिरलेला
१ टोमॅटो बारीक चिरलेला
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
२ लाल सुक्या मिरच्या
कढीपत्ता
१ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून हींग
१ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण
१ टीस्पून बारीक चिरलेले आले
१/२ टीस्पून हळद
१ टेबलस्पून लिंबाचा रस
मीठ चवीनुसार
तेल / साजुक तूप
पाकृ:
एका भांड्यात तेल किंवा तूप गरम करून जीर्याची फोडणी करावी.
जीरे तडतडले की त्यात लाल सुक्या मिरच्या, हींग, कढीपत्ता घालावा.
त्यात बारीक चिरलेला लसूण , आले व हिरव्या मिरच्या घालून परतणे.
आलं + लसणाचा कच्चा वास गेला की त्यात कांदा घालून गुलाबी रंगावर परतणे.
कांदा चांगला परतला की त्यात टोमॅटो घालून तो मऊसर शिजवून घेणे.
आता त्यात बारीक चिरलेला पालक , हळद व मीठ घालून ५ मिनिटे शिजवणे.
त्यात शिजवलेली मुगाची डाळ व आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी काढणे.
उकळी आली की ५- ७ मिनिटे आणखीन शिजवणे.
लिंबाचा रस घालून मिक्स करणे.
आणखीन लसणाचा स्वाद हवे असल्यास वरुन थोडे अजून चिरलेले लसूण व लाल सुकी मिरचीची फोडणी ओतावी.
ही डाळ तुम्ही जीरा राईस, साधा भात, नान किंवा रोटी बरोबर सर्व्ह करु शकता.
प्रतिक्रिया
26 Jul 2012 - 6:09 am | सिद्धार्थ ४
ह्या शनिवारी करुन बघेन....
26 Jul 2012 - 7:32 am | स्पंदना
अच्छा ? मी तुरडाळीच करते.
चला करुन पाहु. बाकि भारी हौस हो तुला. बादलीभर डाळ्पालक!
26 Jul 2012 - 7:32 am | ५० फक्त
लेकाच्या हट्टापायी , त्याचा कसला हट्ट माझीच लहानपणीची स्वप्नं त्याच्या नावावर खपवतोय्,असली एक बादली आणली आहे घरी, तेंव्हापासुन रोज साधं वरण , आमटी, कढी सगळे पातळ पदार्थ त्या बादलीतुनच सर्व्ह होतात घरी, आता हा एक प्रकार करुन पाहेन.
26 Jul 2012 - 8:24 am | पिंगू
कुठल्याही डाळीवर लसुण आणि मिरचीची वरुन दिलेली फोडणी जाम आवडते. त्यामुळे हा प्रकार तर अतिशय आवडला आणि हा माझ्यासाठी तोंपासु आहे.
26 Jul 2012 - 8:44 am | निवेदिता-ताई
मस्तच.............नेहमीप्रमाणेच......
बादली आवडली, मी ही घेउन येते एक छोटी बादली, तेवढेच हॉटेलमध्ये जेवल्यासारखे वाटेल..:)
26 Jul 2012 - 9:29 am | चिंतामणी
टाकल्याने अनेकांना आनंद झाला असणारच.
असो.
बाकी नेहमीप्रमाणेच.
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXX
XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX
26 Jul 2012 - 10:06 am | मोदक
फोटो दिसले नाहीत... मजकूरही दिसला नाही.. म्हणून जळजळ झाली नाही. :-)
26 Jul 2012 - 10:08 am | सूड
मस्त !!
26 Jul 2012 - 11:07 am | Mrunalini
एकदम मस्त :)
26 Jul 2012 - 11:47 am | JAGOMOHANPYARE
आता अळुचे फतफते करा
26 Jul 2012 - 11:52 am | बॅटमॅन
बाकी काही असो हे नाव मात्र अतिशय गलिच्छ आहे !!!
26 Jul 2012 - 11:51 am | अत्रुप्त आत्मा
पहिला फोटू पाहिल्या पाहिल्या,एकदम गरमा/गरम भाताबरोबर,पापड/लोणचं घेऊन सुरवात करावी,असं वाटतय. ....
बाकी नेहमी प्रमाणे उरलेल्या सर्व गोष्टींसाठी आमचा तुम्हाला विनम्र शॅल्युट.
26 Jul 2012 - 3:30 pm | प्रभाकर पेठकर
नेहमी प्रमाणेच, चवदार, टेसदार, खमंग, पौष्टीक, क्षुधावर्धक, यज्ञकर्मातील समिधा..... इ.इ.इ. पाककृती. अभिनंदन.
26 Jul 2012 - 3:57 pm | जाई.
झकास !!
26 Jul 2012 - 4:01 pm | परिकथेतील राजकुमार
__/\__
सानिकातैचे घर असावे शेजारी.
27 Jul 2012 - 8:30 am | चिंतामणी
सानिकातैचे घर असावे शेजारी
हे ठिक. पण पुढे
रोज रोज शाकाहारी पदार्थच (पनीर आणि मश्रुम सोडुन) बनवावेत.
असे लिहून टाक.
27 Jul 2012 - 10:01 am | प्यारे१
व्हा बाजूला.... ;)
आम्हाला सगळं चालतंय वो सानिकातै, न-खरे नाहीत आमचे कसले. ;)
27 Jul 2012 - 11:39 am | परिकथेतील राजकुमार
सानिकातै बनवणार असेल तर आपण नॉनव्हेज देखील खाऊ.
26 Jul 2012 - 4:04 pm | इरसाल
मलाही कोणत्याही डाळीला लसुणाची फोडणी दिलेली जाम आवडते.
26 Jul 2012 - 4:35 pm | चिगो
आता इथे पालक शोधणे आले.. ;-)
27 Jul 2012 - 9:12 am | इरसाल
तुम्ही तुमच्या पालकांपासुन दुर आहात हे खरे पण नवे पालक शोधणे म्हंजे........
26 Jul 2012 - 5:24 pm | RUPALI POYEKAR
नेहमीप्रमाणे मस्तच
26 Jul 2012 - 7:16 pm | ऐकसयुरी
पाककृती मस्तच नेहमीप्रमाणेच.
26 Jul 2012 - 8:31 pm | रेवती
ग्रेट!
26 Jul 2012 - 9:37 pm | प्राजक्ता पवार
गरम भात आणि डाळ पालक , अगदी आवडता पदार्थ :)
27 Jul 2012 - 4:13 am | कौशी
आवडली
27 Jul 2012 - 4:13 am | कौशी
आवडली
30 Jul 2012 - 7:11 pm | स्वाती२
यम्मी! फोटो पाहून सकाळी ९ वाजताच भूक लागली.
30 Jul 2012 - 10:38 pm | पैसा
ती लसूण आणि सुक्या मिरच्यांची फोडणी बघूनच आत्मा थंड झाला...