कला ( काल नव्हे बरे, 'कला' -आर्ट : नीट समजून घ्या).

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in काथ्याकूट
22 Jul 2012 - 1:06 am
गाभा: 

कलासाधना म्हणजे 'वास्तव आणि कल्पना' यांच्या सहाय्याने काहीएक निर्मित करण्याची आपली क्षमता. (The ability to create something with help of a fact & fiction) आपली साधना जेवढी जास्त, तितका जीवनात तणाव कमी, तितकं जगणं सोपं.

अस्तित्वात 'कला' असं काही नाही, ज्याला आपण 'चित्र' म्हणतो तो निव्वळ `भास' आहे. आपण जर एकाद्या चित्राच्या मागल्या बाजूला गेलो, तर आपल्याला निव्वळ कॅनव्हास व फ्रेम दिसेल. आपल्या सर्वांना हे माहिती देखील आहे पण तो बोध आपण आचरणात आणत नाही.

कला वस्तुस्थिती मानणं ही आपली केवळ धारणा आहे (जस्ट अ कन्विक्शन) आणि अशा अनेक धारणा आपल्याला आपण बंधनात आहोत असा आभास घडवतात. 'कला' या अत्यंत बेसिक धारणेचं निरसन करण्याचा हा प्रयत्न.
____________________

या बोधाला अध्यात्मात कला - रहितता (आर्टलेसनेस) म्हटलंय आणि कलारहितता जाणणार्‍याला कलाज्जयी (कलेवर विजय मिळवणारा) म्हटलय. कलारहितता हा कलासिद्धीचा गुणविषेश मानला गेलाय आणि कलामुक्तीला असाधारण महत्त्व आहे. आर्टलेसनेस जाणणं हे दीर्घ आणि अथक साधनेचं फलित समजलं गेलय पण तो उलगडा व्हायला खरं तर कोणत्याही साधनेची गरज नाही.
___________________

कलानिर्मितीत प्रक्रिया, प्रसंग आणि घटना आहेत ही गोष्ट उघड आहे आणि त्यांची कलात्मकता मोजण्यासाठी आपण कला हे भासमान परिमाण वापरलय. आपण नेहमी कोणत्याना कोणत्या प्रक्रियेत मग्न असल्यानं कलेचा सतत वापर करतो त्यामुळे कला वास्तविक आहे अशी आपली धारणा झालीये.
______________________

कला ही कल्पना म्हणून नितांत उपयोगी गोष्ट आहे. या कल्पनेमुळे माणसाची अनेक प्रकारे सोय झालीये आणि जगणं सुखावह झालंय हे निश्चित पण कला ही वास्तविकता आहे असं वाटल्यामुळे मनावर कलेचं सतत दडपण आहे. कला भास आहे हे ज्याला कळतं तो कलेपासून मुक्त होतो! कलेपासून मुक्ती आणि कलाकारी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

एखादी गोष्ट कल्पना आहे असं कळलं की आपण ती वापरू शकतो पण ती खरी आहे असं वाटलं की मग तणाव सुरू होतो.
कला या कल्पनेतून व्यक्तिमत्त्व निर्माण होतं म्हणजे आपण स्वतःला कलाकार किंवा नकलाकार समजायला लागतो किंवा बाकीचे आपल्याला तसं समजायला लागतात; मग प्रत्येक वेळी चित्र काढताना आपली स्वतः विषयीची प्रतिमा आपल्याला सहजतेनं चित्र पूर्ण करणं मुष्किल करते. कलेच्या बाबतीत असा ताण दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना असतो, कलावंत व्यक्तीला स्वतःची कलाकारी टिकवायची असते आणि नकलाकाराला नक्कल चुकवायची असते.

कला कल्पना आहे अशी पक्की खूणगाठ एकदा मनात बसली की तुमच्या मनावरचं कलेचं दडपण एकदम नाहीसं होतं, तुमची सृजनशीलता पराकोटीची वाढते, तुम्हाला कोणत्याही ठिकाणी अनेक दृष्यं दिसायला लागतात.
________________________

कला भास आहे हा तुमचा अनुभव झाला, मनोमन खात्री पटली की दुसरी एक अद्भुत घटना आपसूक घडते: आपण स्वत: 'कलाबाधीत' आहोत हे तुमच्या लक्षात येतं, आपण अ-कला आहोत! ज्याला कला भास आहे हे कळलं त्याच्यावर कला-क्षेत्रातील घटनांचा परिणाम हळूहळू न्यून होऊ लागतो.

चित्रांची निर्मिती कलेत आहे त्यामुळे चित्र कलेपासून वेगळे आहे. आता तुम्हाला हे देखील लक्षात येतं की 'कला' चित्राला आहे, आपल्याला नाही, आपण सदैव एकसारखे आहोत, आपल्याला चित्र कळलं, मूर्ती पण कळली, आणि वास्तुकला देखील कळेल पण आपण जसेच्या तसे राहू!

कलेशी तादात्म्य कमी झाल्यामुळे तुम्ही कमालीचे उत्साही होता. याचा अर्थ तुमची क्षमता कमालीची वाढून एखादा मोनालिसा वा एकदम सिस्टीन चॅपेल रंगवेल, असा नाही पण कलात्मकता आणि तुमचा उत्साह याची गल्लत होणार नाही. असेल त्या क्षमतेनं, जमेल तसे चित्र तुम्ही उत्साहानं काढू शकाल. थोडक्यात आपण कलाकार नाही, असं वाटल्यामुळे येणारा निरुत्साह संपूर्णपणे नाहीसा होईल. कला ही कल्पना आहे हा बोध आपल्याला चिरतरुण करतो, कलेचा आपल्या चित्तस्थितीवर परिणाम होत नाही.
_______________________

कला हा भास आहे हे ज्यानं जाणलं त्याला हे देखील कळतं की प्रत्येक कलानिर्मितीपेक्षा आपण वेगळे आहोत, त्यामुळे चित्रे बघण्याची त्याची क्षमता कमालीची वाढते. प्रेक्षक या आध्यात्मिक शब्दाचा नेमका अर्थ तो आहे.

कलेपासून जेवढे आपण मुक्त तितके आळसाशी संलग्न होत जातो, म्हणजे किती वाजले? उठायची वेळ झाली, यापेक्षा झोप आली, की झोपणे, असं सरळ, साधं, नैसर्गिक जगणं सुरू होतं. कलेशिवाय जगणं किती सुखाचं आहे हे कळायला थोडा वेळ जावा लागतो पण एकदा त्यातली गंमत कळली की मग अनायासे आपण अस्तित्वाशी एकरूप होत जातो. आपल्याला केव्हा पहुडावं, केव्हा लोळावं, केव्हा झोपावं ते कळायला लागतं! जाणीव एकदम प्रगल्भ व्हायला लागते.
____________________

कलारहितता कळणं तुम्हाला `अवकाश' किंवा `स्पेस' या परिमाणाला उपलब्ध करतं. अवकाश हे स्वास्थ्याचं निधान आहे, कलेमुळे ताण आहे, अवकाशाशी संलग्न होणं तुम्हाला स्वस्थ करतं.

अवकाश हे अस्तित्वातलं सर्वात रहस्यमय परिमाण आहे, एका अर्थानं ते सर्वत्र आहे आणि दुसर्‍या अर्थानं ते इतकं अपरंपार आहे, इतकं सर्वव्यापी आहे की नक्की कुठेय ते दर्शवता येत नाही.

कला न करणारा आळस परिमाणाला उपलब्ध होतो असं म्हणणं ही तितकंस योग्य नाही, तो स्वत:च आळस होतो, कमालीचा निवांत होतो, या निवांतपणाला अध्यात्मात समाधी म्हटलय!

_____________________

पैसा निदान कल्पना तरी आहे पण कला तर निव्वळ भास आहे, अर्थात हे तुम्हाला जरी पटलं तरी इतरांना लगेच पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. हा विषय वादाचा नाही, बोधाचा आहे. तुम्ही लगेच त्यावर मानसिक उहापोह करु नका त्या उलगड्यात काही काळ जगा, कलारहिततेचं वेळीअवेळी स्मरण करत तिचा निवांतपणा, त्या बोधातून येणारं स्वास्थ्य उपभोगा.

जेव्हा तुम्ही या बोधातून काही दिवस जगाल तसा तुमच्या जगण्यात, हालचालीत आळशीपणा यायला लागेल. ओशोंचं एक अप्रतिम वाक्य आहे, ते म्हणतात : "कला आलस्य में बदल जाती है"

जेव्हा हा बोध तुमच्या आचरणात येईल तेव्हा मग तुम्हीही दुसर्‍याला एकदम बिनधास्तपणे सांगू शकाल की `अरे, कला हा निव्वळ भास आहे! ' आणि मग ते त्याला पटो न पटो तुम्हाला काहीही फरक पडणार नाही कारण तो तुमचा अनुभव झालेला असेल!
-----------------------------------------
प्रेरणा: http://www.misalpav.com/node/22262

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

22 Jul 2012 - 3:30 am | अर्धवटराव

इतकं साधं सरळ तत्वज्ञान आजवर कुठेच ऐकलं नाहि.

अर्धवटराव

बॅटमॅन's picture

22 Jul 2012 - 3:42 am | बॅटमॅन

भारी हो चित्रगुप्त. आवडेश ;)

मस्त मस्त लिहिलंय, धन्यवाद.

चौकटराजा's picture

22 Jul 2012 - 7:26 am | चौकटराजा

चित्रगुप्त साहेब , किती सोप्या भाषेत लिहिलं आहे आपण ! यालाच आपण चित्र भाषेत रिअ‍ॅलिझम म्हणतो ना ? आता पि़कॅसो, डाली, व्हअ‍ॅनगॉग या सर्व नद्या शेवटी अध्यात्म रूपी सागराला कशा मिळतात याचे विवेचन अशाच सोप्या भाषेत यावे हे नम्र निवेदन !

अन्या दातार's picture

22 Jul 2012 - 1:05 pm | अन्या दातार

सगळेच भास आहेत काय हे? ;-)
काल, कला, जग सर्वच आभास आहेत!

स्मिता.'s picture

22 Jul 2012 - 2:42 pm | स्मिता.

आजकाल मला जिथे तिथे भास व्हायला लागलेय. एकंदरीत माझं अस्तित्वच एक भास असल्यासारखं वाटतं.

पैसा's picture

22 Jul 2012 - 6:51 pm | पैसा

कलेच्या भासात्मकतेचं आकलन न झाल्यामुळे मस्तक कलेकलेने कलकलले.

मन१'s picture

22 Jul 2012 - 7:00 pm | मन१

भन्नाट.

राघव's picture

22 Jul 2012 - 9:16 pm | राघव

मस्त लिहिलंय..

राघव

काल रात्री लेख प्रकाशित केल्याकेल्या तुम्ही मला व्य. नि. करुन पोझिशन क्लिअर केली या तुमच्या उमदेपणाला दाद देऊन तुम्हाला अपेक्षित असलेला सविस्तर प्रतिसाद देतो:

स्वतः चित्रकार असल्यानं कलेची बरीचशी परिमाणं तुम्ही लेखाशी जुळवली आहेत, विषेशतः तुमचं हे विधान आवडलं :

>कला हा भास आहे हे ज्यानं जाणलं त्याला हे देखील कळतं की प्रत्येक कलानिर्मितीपेक्षा आपण वेगळे आहोत, त्यामुळे चित्रे बघण्याची त्याची क्षमता कमालीची वाढते. प्रेक्षक या आध्यात्मिक शब्दाचा नेमका अर्थ तो आहे.

पण साली ही अध्यात्मिकता काही औरच चीज आहे, सगळी वाक्य तुम्ही अ-कलेशी जुळवलीयेत पण एक (आणि एकच )अत्यंत महत्त्वाचं वाक्य जसंच्यातसं राहिलय :

अवकाश हे अस्तित्वातलं सर्वात रहस्यमय परिमाण आहे, एका अर्थानं ते सर्वत्र आहे आणि दुसर्‍या अर्थानं ते इतकं अपरंपार आहे, इतकं सर्वव्यापी आहे की नक्की कुठेय ते दर्शवता येत नाही.

असं म्हणतात की झेन मास्टर आपल्या चित्रात एकच उणीव ठेवतो, वर्षानुवर्ष साधक त्या चित्राचं अवलोकन करतात, अनेक पद्धतीनं चित्राचं रोज चिंतन करतात. चित्राचे वेगवेगळे अर्थ समायोजित करुन एका निर्विवाद अर्थाप्रत पोहोचण्याचा, गुरुला नक्की काय व्यक्त करायचय याचा वेध घेण्याचा प्रयत्न करतात. चित्र इतकं मोहक असतं की गुरुनं नेमकी कुठे मेख मारलीये ते कुणाला कळत नाही. एक दिवस एखादा सत्याप्रत पोहोचलेला साधक आश्रमात येतो , सहज ब्रश फिरवून ते चित्रं पूर्ण करतो आणि गुरुकडे पाहतो. गुरु आनंदानं शिष्याला मिठी मारतो आणि स्वतःचा रोब त्याला बहाल करतो कारण आता त्या गुरु-शिष्यात फरक उरलेला नसतो!

जोपर्यंत अधोरेखित वाक्य तुम्ही बदलू शकत नाही तोपर्यंत नक्कल बरोबर आहे पण अस्सल चीज गवसलेली नाही इतकंच नम्रपणे नमूद करतो!

आत्मशून्य's picture

23 Jul 2012 - 11:43 am | आत्मशून्य

चित्र इतकं मोहक असतं की गुरुनं नेमकी कुठे मेख मारलीये ते कुणाला कळत नाही. एक दिवस एखादा सत्याप्रत पोहोचलेला साधक आश्रमात येतो , सहज ब्रश फिरवून ते चित्रं पूर्ण करतो आणि गुरुकडे पाहतो. गुरु आनंदानं शिष्याला मिठी मारतो आणि स्वतःचा रोब त्याला बहाल करतो कारण आता त्या गुरु-शिष्यात फरक उरलेला नसतो!

पुण्यात झेन कोणी प्रॅक्टीस करतं का ? त्या प्रकारा विषयी कुतुहल आहे म्हणुन विचारलं.

संजय क्षीरसागर's picture

23 Jul 2012 - 11:57 am | संजय क्षीरसागर

पण साधकांचा वेळेअवेळी त्रास नको म्हणून हल्ली नेटवर झेन-प्रॅक्टीस करतो

कृपया वैयक्तीक घेऊ नका पण प्रांजळपणे बोलायचं तर तुमच्या लिखाणामुळे तुमच्या तत्वज्ञानाच्या पर्सेप्शनमधे फार गोंधळ आहे असं मला वाटतं आलंय ( अर्थात तो मुख्य मुद्दा नाही हवं तर) माझा गाढवपणा समजा ह्या प्रकाराला. पण तुमच्याबाबत हा गोंधळ माझ्याकडे आहे तो पर्यंत पण तुमच्याशी मैत्रीच्या नात्याने घेतलेली महत्वाची माहीती मग ती कुतुहलापोटी का असेना मला चुकीचीच वाटण्याची फार शक्यता आहे. इतर काही पर्याय आहे का ?

ओशो कम्युनला चवकशी करुन पाहा, ते सॉलिड कॉस्टली आहे (आणि एखादे वेळी ते लोक तुम्हाला माझाच पत्ता सांगतील!) . सध्या पुण्यात तरी दुसरा पर्याय नाही आणि मला जितकी माहिती आहे त्यावरनं जपानमधे कुणीही मास्टर नाही. एकहार्ट टॉल आपला दोस्त आहे पण तो झेन प्रॅक्टीस करत नाही.

आणि मजा म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आवडलीये आणि तुम्ही व्कोट केलीये ती कुठल्याही झेन पुस्तकातली नाहीये, मीच लिहिलीये!

चित्रगुप्त's picture

23 Jul 2012 - 12:56 pm | चित्रगुप्त

मुळात 'झेन' हे प्रकरण योगासनांसारखे कुणा गुरूकडून प्रशिक्षण घेण्याचे आहे का? 'समझ आचरण मे बदल जाती है' तर समज ही वाचनातून, स्वतःचे जीवनातील अनुभव, निरीक्षण, चिंतन यातून विकसित होऊ शकते, वा उपजतच असू शकते.
'झेन' हा शब्द 'ध्यान' वरून आलेला आहे, असे ऐकून आहे.

संजय क्षीरसागर's picture

23 Jul 2012 - 1:07 pm | संजय क्षीरसागर

झेन इरॅशनल प्रॅक्टीस आहे. तुम्हाला झेन वाचायचं असेल तर ओशोंची मला उपयोगी पडलेली तीन कमाल पुस्तकं आहेत : द ग्रास ग्रोज बाय इटसेल्फ, दि एम्प्टी बोट आणि वेन द शू फिट्स, बघा ट्राय मारुन.

चित्रगुप्त's picture

23 Jul 2012 - 2:03 pm | चित्रगुप्त

ठोका ठोका... पण सुरुवातीलाच झेन हा एक भास आहे की वास्तविकता, हे जरूर सांगा. :)

आत्मशून्य's picture

23 Jul 2012 - 2:59 pm | आत्मशून्य

आत्ता आत्ताच ते माणसात आलेत, ते बघवत नाय का ? काळ केवळ भास आहे वगैरे पुन्हा लिहायला बोलायला लागले तर ऐकवणार आहे का ते कोणाला ?

चित्रगुप्त's picture

23 Jul 2012 - 12:21 am | चित्रगुप्त

धन्यवाद.
हा माझा खट्याळपणा आहे फक्त. त्यात गंभीर असे काही नाही.
अवकाशाविषयीचे वाक्य इतके सटीक आहे, की त्यात खोडसाळपणा करण्याची मला इच्छा झाली नाही, म्हणून प्रयत्नही केला नाही.

संजय क्षीरसागर's picture

23 Jul 2012 - 11:04 am | संजय क्षीरसागर

सहमती आणि धन्यवाद!