वारूळ

पेशवा's picture
पेशवा in जे न देखे रवी...
19 Jul 2012 - 11:51 pm

पावलांचे मुंगळे निघाले
त्या वारुळातील योगी मंत्रामागून मंत्र उसवत राहील
तर नागवे होणाऱ्या शरीराची कुठली असेल पोळणारी जात?
मांडी घालून म्हणता येतात सहिष्णू शब्दरचना
त्याच वेळी निराकार जनावर वेटोळे (? ) घालून
रचत असते जहरोत्तम द्वंद्वगीत...
सहज मनाच्या गाभाऱ्यातील समईची जखम
रुंदावायला लागली की
एखादी पालखी हमखास येते
भोयांच्या खांद्यावरून अनेक समाप्तीच्या कथा पायउतार होतात
पाठ वळवून, ती धून ऐकण्यासाठी
देवळे मिटून घेतात शयनगृहाचे दरवाजे
असहायपणे हेलकावे घेत राहते बाहेर कडी
एक... दोन... तीन
अस्वस्थ कोपऱ्यातील एखादे पिवळे वय
स्वतःची कुरवाळू लागते..
ती भूक, नागडी नसते...
सर्व विझायला लागले की वाटांवर कुलुपे कशी लागतात?
रांगेतले सर्वजण एकाच खिडकीकडे पायांना मिठी घालून सरपटत राहतात...
एक एक अवयव खाटीक वेगळा करतो
वाहणारा स्राव आढेवेढे घेत नाही..
पाणलोटात जिवाच्या आकांताने मदत मागणाऱ्या कुणाची एक डॉक्युमेंट्री...
रीळ गुंडाळले जाते...
जाणिवा देखील
ह्या साऱ्यांच्या मागे एक वेडसर दिवा
तटस्थपणे
फडफडत असतो....

-पूर्वप्रकाशित

मुक्तक

प्रतिक्रिया

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2012 - 6:52 am | अत्रुप्त आत्मा

अर्धवटराव's picture

20 Jul 2012 - 7:38 am | अर्धवटराव

हा अक्खा श्रावण हि कविता (किंवा जे काहि आहे ते) समजुन घेण्यात घालवावी म्हणतो.

अर्धवटराव

झंम्प्या's picture

20 Jul 2012 - 9:49 am | झंम्प्या

वाचल्यावर असं वाटलं की मुंग्या चावल्या...

झक मारत प्रतिसाद द्यायला लावतात!

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2012 - 2:58 pm | अत्रुप्त आत्मा

प्रतिसाद द्यायला लावतात!

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jul 2012 - 12:43 pm | परिकथेतील राजकुमार

हे जे काय आहे ते वाचून डॉक्यात एक वेडसर दिवा फडफडला.

नाना चेंगट's picture

20 Jul 2012 - 2:58 pm | नाना चेंगट

मस्त कविता ! आवडली !

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jul 2012 - 5:20 pm | परिकथेतील राजकुमार

रसग्रहण करा.

त्यासाठी वारुळातल्या सगळ्या मुंग्या एकत्र कराव्या लागतील, त्या कशा कराव्या याबद्दल मार्गदर्शन करावे.

चिगो's picture

20 Jul 2012 - 5:23 pm | चिगो

भोयांच्या खांद्यावरून अनेक समाप्तीच्या कथा पायउतार होतात
पाठ वळवून, ती धून ऐकण्यासाठी
देवळे मिटून घेतात शयनगृहाचे दरवाजे
असहायपणे हेलकावे घेत राहते बाहेर कडी

माणसाला माणूस न मानणार्‍या दांभिक धर्मांधतेवर कडाडून प्रहार करणार्‍या ओळी..

अस्वस्थ कोपऱ्यातील एखादे पिवळे वय
स्वतःची कुरवाळू लागते..

व्वाह ! नवथर तारुण्याची सामाजिक सांस्कृतिक बंधनांनी होणारी कुचंबणा आणि त्यामुळे आत्मस्खलनासाठी केलेल्या प्रयत्नांतील व्याकुळता कवीने अत्यंत मार्मिकरीत्या दाखवली आहे.

सर्व विझायला लागले की वाटांवर कुलुपे कशी लागतात?
रांगेतले सर्वजण एकाच खिडकीकडे पायांना मिठी घालून सरपटत राहतात...
एक एक अवयव खाटीक वेगळा करतो
वाहणारा स्राव आढेवेढे घेत नाही..

मानवी जीवनाच्या असहाय्यतेवर याहून जास्त परीणामकारक भाष्य करणार्‍या ओळी वाचनात आल्या नाहीत.

पाणलोटात जिवाच्या आकांताने मदत मागणाऱ्या कुणाची एक डॉक्युमेंट्री...
रीळ गुंडाळले जाते...
जाणिवा देखील

कळले का? समाजाच्या, आणि त्याचवेळी मिडीयाच्या व्यावसायिक, माणुसकी-हिनत्त्वावर दोनच ओळींत ताशेरे ओढले आहेत कवीने..

अत्यंत थरारक कविता..

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2012 - 5:36 pm | अत्रुप्त आत्मा

चिगो...आपके रसग्रहण से हम चिंब चिंब भिगो ;-)

अर्धवटराव's picture

20 Jul 2012 - 9:59 pm | अर्धवटराव

आमचे श्रावणमासी श्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद.

अर्धवटराव

बहुगुणी's picture

20 Jul 2012 - 8:58 pm | बहुगुणी

शरदिनीताई परतल्या असं वाटलं :-)

वीणा३'s picture

20 Jul 2012 - 10:40 pm | वीणा३

अरे देवा!!!

स्पंदना's picture

22 Jul 2012 - 11:57 am | स्पंदना

मुंग्या आल्या....
हा अक्खा श्रावण हि कविता (किंवा जे काहि आहे ते) समजुन घेण्यात घालवावी म्हणतो.
वाचल्यावर असं वाटलं की मुंग्या चावल्या...
झक मारत प्रतिसाद द्यायला लावतात
प्रतिसाद द्यायला लावतात!
हे जे काय आहे ते वाचून डॉक्यात एक वेडसर दिवा फडफडला
मस्त कविता ! आवडली !
रसग्रहण करा…तोबताबड
त्यासाठी वारुळातल्या सगळ्या मुंग्या एकत्र कराव्या लागतील, त्या कशा कराव्या याबद्दल मार्गदर्शन करावे.
माणसाला माणूस न मानणार्‍या दांभिक धर्मांधतेवर कडाडून प्रहार करणार्‍या ओळी..
व्वाह ! नवथर तारुण्याची सामाजिक सांस्कृतिक बंधनांनी होणारी कुचंबणा आणि त्यामुळे आत्मस्खलनासाठी केलेल्या प्रयत्नांतील व्याकुळता कवीने अत्यंत मार्मिकरीत्या दाखवली आहे
मानवी जीवनाच्या असहाय्यतेवर याहून जास्त परीणामकारक भाष्य करणार्‍या ओळी वाचनात आल्या नाहीत.
कळले का? समाजाच्या, आणि त्याचवेळी मिडीयाच्या व्यावसायिक, माणुसकी-हिनत्त्वावर दोनच ओळींत ताशेरे ओढले आहेत कवीने..
अत्यंत थरारक कविता..
चिगो...आपके रसग्रहण से हम चिंब चिंब भिगो
आमचे श्रावणमासी श्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद.
अरे देवा!!!

अत्रुप्त आत्मा's picture

22 Jul 2012 - 4:16 pm | अत्रुप्त आत्मा

ते वाहतात जे ओझे, ते तुमचे माझे असते ॥>>>

चिगो's picture

22 Jul 2012 - 5:08 pm | चिगो

आमचा शिरसाष्टांग नमस्कार स्विकारावा.. :-)

प्यारे१'s picture

23 Jul 2012 - 11:11 am | प्यारे१

___/\___

रसग्रहण केलं की पेशवे नाराज होतात म्हणून-- नायतर --
हॅहॅहॅ म्हणजे रसग्रहण केलं असतं..

पेशवा's picture

23 Jul 2012 - 9:11 am | पेशवा

यकु काळजी नसावी ... येउद्या :-)