नमस्कार मंडळी,
महत्वाची सूचना: मुख्य पानावर सारखे माझे नाव आणि धागे दिसल्याने कुणाला त्रास होत असेल तर सॉरी.. :) काही गोष्टी अनिवार्य असतास. समजून घ्याल अशी मायबाप वाचकांकडून अपेक्षा.
कोळंबीचा हा माझा सर्वात आवडता प्रकार आहे. तंदूर कोळंबी नुसतं म्हंटल तरी तोंडाला पाणी सुटतं. पटकन साहित्य घ्या.
साहित्याचा अन कृतीचा फोटु न दाखवता हाटेलसारखं डायरेक्ट फायनल डिशच तुमच्या समोर ठेवणार हाय. :)
साहित्यः
१. पावशेर कोळंबी
२. एका लिंबाचा रस
३. लाल तिखट १-२ टे.स्पून
४. काश्मिरी लाल तिखट १ टे.स्पून
५. एक पळी वितळलेले बटर
६. आलं पेस्ट १ टे.स्पून
७. लसूण पेस्ट १ टे.स्पून
८. एव्हरेस्ट तंदूर मसाला २ टे.स्पून
९. मीठ चवीनुसार
१०. अर्धा कांदा उभा चिरून
कृती:
१. कोळंबी स्वच्छ धुवुन घ्या आणि धागा काढुन घ्या.
२. लिंबाचा रस, लाल तिखट, काश्मिरी तिखट, आल आणि लसूण पेस्ट, मीठ, तंदूर मसाला आणि बटर चांगले एकजीव करुन घ्या.
३. या मिश्रणात कोळंबी मरीनेट करा. कमीत कमी १ तास.
४. ओव्हन १५० डिग्रीवर प्री-हीट करा १० मिनिटे.
५. ट्रे वर अॅल्युमिनिअम फॉईल पसरवा.
६. आता फॉईलवर कोळंबी पसरवून ठेवा.
७. १८० डिग्रीवर फॅन फोर्स्ड मोडमधे १५-२० मिनिटे ठेवा. दर ५ मिनिटांनी कोळंबीची बाजू बदलत रहा. इथे जरा अंदाजानेच आणि लक्ष ठेवून वेळ किती ते ठरवा.
८. कांदा पाण्यात धुवुन घ्या. त्यात मीठ आणि थोडे काश्मिरी तिखट घाला.
९. कांदा, लिंबू आणि कोळंबी प्लेटमधे ठेवून सजवा आणि लुटा मस्त आनंद.
प्रतिक्रिया
12 Jul 2012 - 9:14 am | इरसाल
तुम्हाला नेमका गुरुवारच सापडला काय ? हे इथे टाकायला !
आज काय बोलु शकत नाय, बाकीची प्रतिक्रिया उद्या.
12 Jul 2012 - 9:43 am | पक पक पक
मस्त रे भाउ ,एक्दम झक्कास ,तोंडाला पुर आला... :tongue:
असले धागे असतील तर सारख सारख तुमच नाव असायला कोणाची काय हरकत असणार आहे हो... ;)
12 Jul 2012 - 10:18 am | शिल्पा ब
छान. कोणी करुन देणार असेल तर अजुन छान.
12 Jul 2012 - 10:22 am | पक पक पक
छान. कोणी करुन देणार असेल तर अजुन छान.
हो ! पण त्यासाठी तुम्हाला भाव खावा लागेल .मग तुमचे अहो करतील की ... :)
12 Jul 2012 - 12:00 pm | RUPALI POYEKAR
मस्तच...........
12 Jul 2012 - 12:14 pm | गणपा
चविष्ट.
कोलंबी थोडी मोठी असली तर अजुन मज्जा. मसाला व्यवस्थीत लागेल.
12 Jul 2012 - 2:50 pm | मोहनराव
बेस्ट. करुन खाण्यात येईल. धन्यवाद!
12 Jul 2012 - 3:43 pm | नाना चेंगट
तुझे लेख सतत बोर्डावर दिसतात म्हणून काही जण आणि जणी मिपावर यायचं बंद झाल्यात अशी माहिती मिळाली आहे.
13 Jul 2012 - 7:09 am | मराठमोळा
अरे वा बरं झालं!!! :)
बर्याच जणांचा कपटावाचून.... हे आपलं.. सुंठावावून खोकला गेल्यासारखं झालं असेल मग... ;)
12 Jul 2012 - 4:05 pm | प्रभाकर पेठकर
'तंदूर कोलंबी' म्हणजे चखन्याचा राजा. राजाच्या चरणी आमचा कुर्निसात.
12 Jul 2012 - 7:25 pm | स्पंदना
कोळंबी म्हंटल की निम्म्मी लढाई हरतो आपण तर ब्वा!
ईंटरेस्टिंग !
12 Jul 2012 - 9:10 pm | पक पक पक
कोळंबी म्हंटल की निम्म्मी लढाई हरतो आपण तर ब्वा!
लढाई कसली खाण्याची की करण्याची... ;)
12 Jul 2012 - 8:46 pm | जाई.
मस्तच
14 Jul 2012 - 3:23 pm | सानिकास्वप्निल
कोळंबी पाहून तोंडाला पाणी सुटलं
मस्तचं :)