नमस्कार मंडली,
नावा वरुन कळलच असेल या रेसीपीत मिंट (पुदिना) महत्वाचा घटक आहे. चला तर साहीत्य बघुया(प्रमाण आपल्या आवडी वर सोडतो ;-))
आकाराने मध्यम ते मोठी ताजी कोळंबी(स्वच्छ धूवुन आणि धागा काढुन), पुदिना, हिरवी मीरची, मिठ, ऑलीव्ह ऑईल (अथवा आवडी प्रमाणे दुसरे कोणतेही खाद्य तेल),कोथिंबीर, लिंबु, सफेद / काळी मिरी आणि लसुण .
एका खलबत्त्या मधे कोळंबी वगळता उर्वरीत साहित्य घ्या.........
लसुण, पुदिना भर्पुर, हिरवी मीरची, कोथिंबीर(साधारण पुदीन्याच्या निम्मी),मिठ (मी मुद्दाम खडा मिठ वापरल आहे.साध मिठ आणि खडा मिठ चवित फरक पडतो ), सफेद / काळी मिरी आणि ४ त ५ चमचे ऑलीव्ह ऑईल आता या मिश्रणात साधारण आर्धा लिंबु पिळा आणि चांगल एकजिव लगदा/ गो़ळा होई पर्यंत ठेचा.
कोळंबीला पाठीच्या बाजुने खोलवर चिर घ्या आणि तयार चटणी या कोळंबी मधे भरा. (मसाला मिरची मधे मसाला भरतो तस)
आता ही चटणी / वाटण लावलेली कोळंबी साधारणतः कमितकमी आर्धा तास ते २ तास मुरवत ठेवा. मुरवणे महत्वाचे आहे शक्यतो ही स्टेप गाळु नका.
आता तवा घ्या आणि तो थोडा तापला की त्यावर या मुरलेल्या कोळंब्या सजवा आणि वरुन एक झाकण ठेवा. (वरुन किंवा बाजुने वेगळ तेल सोडल नाही तरी चालेल.)
या अश्या.....
अंदाजे ८/१० मिनीटे झाकण ठेउन दोन्ही बाजुनी शेकुन घ्या. आवडी प्रमाणे डेकोरेशन करुन सर्व्ह करा "प्रॉन्स विथ मिंट मॅजीक"
टिपा = १) सुरवातीस तेल कमी घ्या जास्त कोरड वाटत असेल तर गरजे प्रमाणे नंतर देखिल घालता यीईल
२) शक्यतो खडा मिठ वापरा.
३) मी ३ वेळा ही चटणि केली आहे. प्रथम खलबत्त्या मधे दुस-या वेळेस मिक्सर आणि खलबत्त्या मधिल चटणिची चव सगळ्यांना आवडल्याने तिस-या वेळी खलबत्ताच.
४) कोथिंबीर आणि पुदीना यांची केवळ पाने नवापरता काड्या देखिल जरुर वापराव्यात. या काड्यांधेच जास्ती रस ,स्वाद आणि सुवास असतो हे अनुभवातुन शिकलो आहे.
५) कोळंबीचा धागा काढुन धुतल्यावर टिश्यु पेपरने पुसून जमेल तेवढी कोरडी करुन घ्या. मॅरीनेशन चांगल होत. तसच कोळंबी लहान न घेता मोठीच घ्या आणि वरील साल तशीच ठेवा. शेलोफ्राय /शेकणं झाल्यावर ही साल आपोआप वेगळी होते. वरील साली मुळे कोलंबीचा फ्लेवर/स्वाद वाढतोच शिवाय तव्याला नचिकटल्यामुळे कोळंबी करपत देखिल नाही.
६) पुदीना चटणी रोजच्या जेवणात तोंडी लावण म्हणुन सुद्धा छान लागते. माझ्या मुलाने प्रयोग म्हणुन ब्रेड वर ही चटणी लावली वरून चिज किसुन टाकले आणि मायक्रो मधे टोस्ट केला . प्रयोग ईतका भन्नाट रीत्या यशस्वी झाला की उरलेली चटणी आणि आर्धा ब्रेड जाग्यावर खल्ल्लास. ;-)
७) पुदीना चटणी करताना आवडत असल्यास कढीपत्याची पाने देखिल टाकु शकता.
प्रतिक्रिया
5 Jul 2012 - 5:50 pm | कुंदन
पा कृ
>>काड्या देखिल जरुर वापराव्यात.
मागे ह्याच मुद्या वरुन लोकांनी माझ्या धाग्यावर फार राळ उडवली होती , तेंव्हा पासुन आम्ही काड्या फक्त सारतो.
>>या काड्यांधेच जास्ती रस ,स्वाद आणि सुवास असतो हे अनुभवातुन शिकलो आहे.
घ्या टिकाकारांनो , शिका जरा अनुभवातुन
5 Jul 2012 - 5:56 pm | jaypal
टिकाकारांना त्यांच काम करु द्याव अन आपण आपल काम फत्ते कराव. कस्स्स?
कुणी निंदा अथवा वंदा आमचा स्वहिताचा धंदा.
5 Jul 2012 - 6:03 pm | अत्रुप्त आत्मा
आमी गवताळ ,त्यामुळे बाकी बोलू शकत नाय,पण ते डार्क हिरवं त्या पांढर्यावर अतीडार्क वाट्टय... आणी दिसताना एखाद्या रान-सापाची वेटोळी तळल्या सारखं वाट्टय.
भ्या...वाटायलय बगून...!
5 Jul 2012 - 6:19 pm | गणपा
पाकृ आणि टिपा लै भारी रे.
लेका कुंद्या काड्या वापरायला ना नाही रे. उलट मी म्हणतो की कोथिंबिरीची मुळं ही धुवुन वापरावीत.
पण त्या काड्या मुळं वाटुन/बारिक चिरुन घेतलीत तर ठिके. तुझ्या त्या रेशीपीत काड्याच काड्या दिसत होत्या. ;)
5 Jul 2012 - 6:31 pm | कुंदन
गंपा सेठ ,
आपले काय ठरलेय ?
तु माझ्या पा कृ मध्ये काड्या दाखवायच्या नाहित , अन मी तुझ्या पा कृ मध्ये हाडे दाखवणार नाही.
5 Jul 2012 - 7:17 pm | jaypal
तुम्ही "तो" काडीयुक्त फोटो दाखवल्यावर कळल की टिकाकारांची टिका योग्यच होती.
कुंदन भाऊ काड्या सारण,टाकण किंवा घालण ही पण एक कला आहे हो ;-)
6 Jul 2012 - 4:00 am | शुचि
खी: खी: केवढ्या काड्या हो कुंदनशेख !!!
6 Jul 2012 - 12:50 pm | बॅटमॅन
कुंदनशेख? उसंडु की पर्पझन-डू?
7 Jul 2012 - 1:38 am | शुचि
तुम्हाला माहीत नाही? कुंदन दुबईतील बडे शेख आहेत .... मराठी शेख ...... खी: खी: =))
7 Jul 2012 - 2:16 am | बॅटमॅन
अस्तील ब्वॉ. मोठी लोकं ;)
5 Jul 2012 - 7:15 pm | शुचि
सुरेख!!! चव मस्तच असणार शंकाच नाही.
5 Jul 2012 - 7:21 pm | मुक्त विहारि
अजून एक चवदार पाक्-क्रुती..
5 Jul 2012 - 7:45 pm | स्वाती२
भारी पाकृ!
5 Jul 2012 - 8:24 pm | सोत्रि
ह्याची जोडी व्हाईट वाइन बरोबर एकदम मॅजिकल असावी असे वाटतेय, एकदा ट्राय करून पहायला हवे!
स्वगत: सोक्या, आता विरारला बाय रोड जाता जाता जयपालाकडे थांबणे आले!
- (मॅजिकल) सोकाजी
6 Jul 2012 - 1:21 am | कौशी
आवडली.. आणि हो खलबत्ता पण खासच आवडला.
6 Jul 2012 - 4:13 am | सुनील
चखणा म्हणून मस्तच!
कोथिंबीर आणि पुदीना यांची केवळ पाने नवापरता काड्या देखिल जरुर वापराव्यात. या काड्यांधेच जास्ती रस ,स्वाद आणि सुवास असतो हे अनुभवातुन शिकलो आहे.
कोथिंबीर (आणि मेथी) काड्यांसकट वापरायची हे आळशीपणातून शिकलोय ;)
तसच कोळंबी लहान न घेता मोठीच घ्या आणि वरील साल तशीच ठेवा
साल तशीच ठेवली तर मॅरिनेट कसं होईल? मसाला सगळा सालीवरच राहील, नाही का?
6 Jul 2012 - 12:51 pm | jaypal
आहो कोळंबीला बरोबर मधे चिर घेतली आहे व त्या मधे चटणी भरली आहे.
म्हणजे चटणी भोवताली कोळंबीचा गर आणि त्या भोवती कोलंबीची साल असेल.
लेख आणि फोटो क्र.२व३ परत एकदा नजरेखालुन घालावा ही विनंती.
7 Jul 2012 - 1:46 am | शुचि
शुचि उवाच - मी चिक्कूपणातून शिकलेय ;) आंबाही सालासकट खाणारे आम्ही :P
6 Jul 2012 - 6:22 am | मराठमोळा
मस्तच हो जयपालशेट,
एकदा बैठक जमवुया मग :) सोत्रिंना बरोबर घेऊन.. काय बोल्ता?
6 Jul 2012 - 12:45 pm | jaypal
सोकाजीराव ममोची फर्माईश ऐकली का?
खुब जमेगा रंग जब मिल बैठेगे हम तीन. :-)
7 Jul 2012 - 1:09 pm | सोत्रि
नेकी और पुछ पुछ... :)
- ( बैठकोत्सुक ) सोकाजी
6 Jul 2012 - 11:13 am | सुहास झेले
वाह वाह.... फोटोग्राफी, पाककृती ...
बढियां हैं ;)
6 Jul 2012 - 11:52 am | JAGOMOHANPYARE
बटाटा किंवा वांगी वापरुन केले जाईल.
6 Jul 2012 - 1:05 pm | प्रभो
दादूस, कधी येऊ?
6 Jul 2012 - 1:37 pm | सानिकास्वप्निल
का ओ का असे करता?? कोळंबी म्हण्जे सगळ्यात आवडता प्रकार :)
मिंट मॅजिक आत्ता करावीच लागणार :)
पाककृतीसाठी धन्यवाद :)
6 Jul 2012 - 3:42 pm | परिकथेतील राजकुमार
गवताळ असल्याने रेशीपी बाद.
फटू जयप्याच्या नावाला साजेसे नाहीत त्यामुळे निषेध !
7 Jul 2012 - 2:59 pm | कुंदन
>>गवताळ असल्याने रेशीपी बाद.
आं ...कोळंबी गवताळ कधीपासुन झाली म्हणायची?
7 Jul 2012 - 12:53 pm | तुषार काळभोर
चिकन वापरून केले जाईल...
(मिपावर "चिकन वापरून केल्या जाईल..." असे लिहिले पाहिजे, असो...)