झटपट क्रिस्पी कोळंबी

jaypal's picture
jaypal in पाककृती
2 Jul 2012 - 2:04 pm

साहीत्य
ताजी कोळंबी (आकारमान मध्यम ते लहान. फार मोठी असल्यास तळताना क्रिस्पी होत नाहीत),कांदा,टोमेटो,ही चटणी, घरी केलेला/ विकतचा शेजवान सॉस, सोया सॉस,कॉर्न फ्लोअर,तळणासाठी तेल,बारीक चिरलेला लसुण(१ टी स्पुन), आल्याच्या काड्या,मिठ, हळद व लिंबु.
प्रथम ताजी कोलंबी आणुन तीच्यातील धागा काढावा(ही स्टेप ऑप्श्नल आहे).स्वच्छ करुन घ्यावी.
p

नंतर थोडे मिठ, हळद(पाव चमचा) ,लिंबु आणि वरील लाल चटणी लावुन सुमारे १५/२० मिनीटे मुरुद्यावी. घाई असल्यास ह्या मुरवण्याच्या प्रक्रियेला फाटा दिला तरी चालेल.
p1

कढईत तेल गरम करायला ठेवा आणि मुरलेल्या कोलंबी वर कॉर्न फ्लोअर टाकुन घोळवुन घ्या. आता कोळंबी एक एक करुन तापलेल्या तेलावर खरपुस डीपफ्राय करुन घ्या.( कॉर्न फ्लोअर पावडरने कोलंबीतील जास्तीचे मॉईश्चर कमी होउन क्रिस्पी होण्यास मदत होते.)
p2

घाई असल्यास ताबडतोब हाणायला सुरवात करा किंवा...............

तेलावर कांदा लालसर होईपर्यंत परतुन घ्या. यामधे टोमेटो,सोयासॉस(थोडासाच साधारण १ छोटा चमचा पुरे), अवडी प्रमाणे शेजवान सॉस (जास्ती स्पाईसी हवे असल्यास आवडी प्रमाणे लाल मिरची पावडर), बारीक चिरलेला लसुण (१ किंवा २ टी स्पुन आवडी प्रमाणे), आल्याच्या काड्या(ज्युलीअन्स) टाकुन एकजिव परतुन घ्या. या मिश्रणात तळलेली कोळंबी टाकुन हलकेच ढवळुन घ्या.(टॉस करा). प्लेट मधे सर्व्ह करताना पातीचा कांदा टाकुन गार्नीश करा.
आवड्त्या पेया सोबत लुटा लुत्फ क्रिस्पी कोळंबीचा.
p4

कोळंबीच्या ऐवजी व्हेजमिपाकरांनी पनीर घेतले तरी चालेल.

बेक व्हर्जन
मुरवलेल्या कोळंबीवर ऑलीव्ह ऑईल ,बारीक चिरलेला लसुण(१ किंवा २ टी स्पुन आवडी प्रमाणे), आल्याच्या काड्या,पातीचा कांदा तसेच हिरवी पात चीरुन टाकावी. या मिश्रणास अ‍ॅल्युमिनीयम फॉईल मधे ४/५ कोळंबीची एक आशी पुरचुंडी बांधुन ती निखा-यावर / ओव्हन मधे ७/१० मिनीटे बेक करावी.

प्रतिक्रिया

लै भारी.
पहिल्या फोटुत दिसणार्‍या शेपट्या नंतर गायब झाल्या. उत्क्रांती झाली म्हणावी काय? ;)
दुसरा फोटु लै भारी.
पण त्या सोयासॉस ने घोळ केला बग. थोडं काळवंडलं की रे. चवीचा प्रश्नच नाही. उत्तम असणार यात शंका नाही.

पहिल्या फोटुत दिसणार्‍या शेपट्या नंतर गायब झाल्या. उत्क्रांती झाली म्हणावी काय?
हाच प्रश्न विचारायला आलो होतो... गणपाभौंचे आभार!!.

मित्राच्या डब्यातला कोळंबी मसाला हादडून आलोय तरी चित्रे बघित्ल्यावर पाणी सुटला तोंडाला....

मलापण शेपट्या नाही आवडत. सो ऽ काढुन टाकलेल्याच छान लागत असणार.
मस्त जयपाल. तोंडाला पाणी सुटल्य बादलीभर.
एकतर त्या गणपाच्या धाग्यावरन तोंड निघेना त्यात आता ही भर. मिपा सोडाव का काय अस वाटल बघा.

मुक्त विहारि's picture

2 Jul 2012 - 3:25 pm | मुक्त विहारि

छान रेसिपी..

सानिकास्वप्निल's picture

2 Jul 2012 - 4:37 pm | सानिकास्वप्निल

कोळंबी म्हण्जे जीवकीप्राण आहे :)

मस्तचं आहे पाकृ :) दिसत पण चविष्ट आहे :)

मला असे वाटते की कोळंबी चा धागा काढावा म्ह़णजे पोटाला बाधत नाही .

कोळंबी चा धागा काढावा म्ह़णजे पोटाला बाधत नाही .
खरय!
शिवाय त्या धाग्यावर अवांतर मारामार्‍या, जातीय/धर्मीय दंगली व्हायची शक्यता पण कमी असते.
तसेच माझ्या मते कोळंबीच्या वैदीक, कुराणी, बायबली अशा वेगवेगळ्या रेशिपी नसाव्यात. त्यामुळे तो ही वाद संभवत नाही.
पब्लीक येउन फक्त बादल्या बादल्या लाळ गाळू प्रतिसाद देउन जाते.

तस्मात कोळंबीचा धागा काढावा, लाळ गाळणारास तोटा नाही.

प्रभाकर पेठकर's picture

3 Jul 2012 - 2:04 pm | प्रभाकर पेठकर

मला असे वाटते की कोळंबी चा धागा काढावा म्ह़णजे पोटाला बाधत नाही .

हा धागा म्हणजे कोलंबीची पचनसंस्था असते. ही जरा चिवट, पचयला कठीण असते. त्यात वाळूचे कण असण्याची शक्यता असते. त्यामुळे दातांखाली कचकच येऊन कोलंबी खाण्यातील आनंद उणावतो. सबब, काढून टाकावी.
त्यातही, जी कोलंबी लहान असते त्याचा धागा काढण्याची गरज भासत नाही. मोठ्या कोलंबीत मात्र धागा काढून टाकावा.

मोहनराव's picture

2 Jul 2012 - 4:39 pm | मोहनराव

झकास! कोळंबी आपला आवडता प्रकार आहे बुवा!

ही एक पाकृ.

आषाढ महीन्याचा परीणाम का?

बाकी पाकृ मस्तच आहे.

सर्व महीने सारखेच. नो भेदभाव प्लीज ;-)

सुहास झेले's picture

2 Jul 2012 - 5:29 pm | सुहास झेले

प्रचंड भारी... मला कोळंबी प्रचंड आवडते. पुढल्यावेळी घरी खाण्यासाठी बोलवा जयपाल साहेब... :) :)

आणि निरीक्षण रास्त आहे. त्या शेपट्या फोटोमात्र होत्या क्रुती करताना काढुन टाकल्या आहेत.
पुढिल रेसेपी शेपटी सकटची असेल. :-)

अर्धवटराव's picture

2 Jul 2012 - 11:12 pm | अर्धवटराव

आल्याच्या काड्या म्हणजे काय? सुंठ वगैरे सारखा काहि प्रकार का?

बाकी कोळंबी आवडत नाहि आपल्याला ( दुर्दैवी , कमनशिबी.. काय म्हणायचं ते म्हणा ) पण हि रेसिपी जबर्‍या असणार.

अर्धवटराव

jaypal's picture

3 Jul 2012 - 5:46 pm | jaypal

प्रतिसादा साठी धन्यवाद
संपुर्ण धागा नीट वाचल्यास आपल्या लक्षात यीईल की आल्याच्या काड्या म्हणजे आल्याचे ज्युलीअन्स/ उभे काप

पैसा's picture

2 Jul 2012 - 11:18 pm | पैसा

आणि पाकृ पण छान! मी खात नाही पण घरातून फोटो पाहून फर्माईश आली आहे!

सुनील's picture

2 Jul 2012 - 11:23 pm | सुनील

छान.

बेक्ड वर्जनमध्ये ७-१० मिनिटे बेक करण्यासाठी ओवनचे तपमान किती असावे?

jaypal's picture

3 Jul 2012 - 5:52 pm | jaypal

ओवनच्या तापमानाचा मला अंदाज नाही हो.
मी कोळश्यावर / निखा-यावर पुरचुंडी बेक केली होती.

कौशी's picture

3 Jul 2012 - 6:53 am | कौशी

आवडली.

मराठमोळा's picture

3 Jul 2012 - 2:56 pm | मराठमोळा

मस्तच हो जयपाल शेट.

उद्या नक्की करुन बघतो.. :) तुमच्या पाकृ देखील जरा हटकेच असतात :)