नमस्कार मिपाकरहो,
पाककृती दालनामध्ये आतापर्यंत पाककुशल मंडळींचे पदार्थ पाहुन वाहवा करण्यात धन्यता मानत होतो. कधीकधी पदार्थ पाहुन जळजळ व अत्याचारही सहन केला जायचा. आपणही काहितरी करावे व येथे सादर करावे असे वाटायचे पण योग जुळुन आला नव्हता, असो. तर हा आमचा पहिलावहिला प्रयत्न, गोड मानुन घ्यावा हि विनंती.
भेंडी मसाला - Spicy Okra
साहित्यः
पाव किलो भेंडी
१/२ टीस्पून जीरे
अर्धा चमचा लसूण पेस्ट
१/२ टीस्पून लाल मसाला (घरी बनवलेला)
चिमुटभर हळद
२ टीस्पून बेसन पीठ
१/४ टीस्पून गरम मसाला
१ टीस्पून लिंबाचा रस
१ १/२ टीस्पून तळण्यासाठी तेल
सजावटीसाठी लाल व पिवळी सिमला मिर्च
मीठ चवीनुसार
पाकृ:
सगळ्यात आधी भेंडी स्वच्छ धुवून व पुसून घ्या. जर भेंडी नीट पुसुन घेतली नाही तर भाजी चिकट होईल. भेंडी मधुन कापुन घ्यावी. लाल व पिवळी सिमला मिर्च बारीक चिरुन घ्यावे.
तेल तापवुन घ्यावे. तेल गरम झाल्यानंतर जिरे तळावे. नंतर भेंडी ५ ते ७ मिनीटे चांगली परतुन घ्यावी.
त्यानंतर हळद, गरम मसाला व लाल मसाला, लसुन पेस्ट, चवीनुसार मीठ हे मिश्रण २ मिनीटे तळुन घ्यावे.
नंतर यामधे बेसन पीठ मिक्स करुन परतुन घ्या. कापलेली सिमला मिर्च यामधे मिक्स करुन ही भाजी चांगली मंद आचेवर ५ मिनीटे शिजवुन घ्यावी. लिंबाचा रस यावरुन पिळावा व सादर करावे.
प्रतिक्रिया
1 Jul 2012 - 11:36 pm | सूड
जिरं तळायचं ?? असो. भेंडीत डाळीचं पीठ पेरुन केलेली भाजी पहिल्यांदा बघतोय, एकदा करुन बघणेत येईल.
अवांतरः शेवटल्या फोटोत ठेवलेली लिंबाची फोड आधी पिळून मग सजावटीसाठी ठेवलीये का ?
1 Jul 2012 - 11:44 pm | मोहनराव
हो करुन पहाच छान लागतं.
पहिलावहिला प्रयत्न...यामधे खपवुन घ्या. ;)
1 Jul 2012 - 11:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मोहनराव, भेंडी मसाला छान दिसते आहे. करुन पाहीन.
च्यायला, नुसत्या चकत्या-चकत्याची लिबलिबित भेंडी खाऊन
भेंडी जवळ जवळ माझ्या चवदार आयुष्यातुन उतरली आहे.
-दिलीप बिरुटे
1 Jul 2012 - 11:56 pm | कुंदन
गुरुजी , मि पा वर पा कृ वाचुन अधुन मधुन करुन बघत जा की.
आमच्या तुलनेत तुम्हाला उन्हाळ्याची व दिवाळीची सुटी पण जास्त मिळते , ती जरा सत्कारणी लावल्यासारखे होईल. ;-)
2 Jul 2012 - 12:01 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आमच्या तुलनेत तुम्हाला उन्हाळ्याची व दिवाळीची सुटी पण जास्त मिळते , ती जरा सत्कारणी लावल्यासारखे होईल.
हम्म, आले का आमच्या सुट्ट्यावर. (आम्ही बोललो का कधी डॉलरचा भाव वाढतोय म्हणुन)
-दिलीप बिरुटे
2 Jul 2012 - 1:11 am | मुक्त विहारि
पहिलाच प्रयत्न असून पण चांगला जमला आहे.
2 Jul 2012 - 6:58 am | मराठमोळा
चांगला प्रयत्न आणि वेगळी पाकृ. :)
2 Jul 2012 - 8:45 am | प्रचेतस
झकास रे.
टमाट्यावर कलाकुसर पण मस्त केलीस. :)
2 Jul 2012 - 9:52 am | पियुशा
मोहनराव तुमचा पहिलाच प्रयत्न यशस्वी झाला

हे घ्या माझ्याकडुन
2 Jul 2012 - 9:59 am | गणपा
वेल्कम. :)
2 Jul 2012 - 11:08 am | सुहास झेले
बेस्ट बेस्ट... :) :)
2 Jul 2012 - 11:29 am | निवेदिता-ताई
मस्त, मस्त.... :)
2 Jul 2012 - 1:32 pm | मोहनराव
सूड, प्रा.डॉ.दिलीप बिरुटे, मुक्त विहारि , मराठमोळा, वल्ली, पियुशा, गणपा, सुहास झेले व निवेदिता-ताई सर्वांना धन्यवाद. :)
2 Jul 2012 - 3:52 pm | कपिलमुनी
घरी आलास कि जेवायला येतो ;)
( बाकी वहिनींनी शिस्त चांगली लावली आहे )
2 Jul 2012 - 5:18 pm | चिंतामणी
तु साहीत्य देताना म्हणलास की "सजावटीसाठी लाल व पिवळी सिमला मिर्च"
आणि पाकृमधे म्हणतोस की "कापलेली सिमला मिर्च यामधे मिक्स करुन ही भाजी चांगली मंद आचेवर ५ मिनीटे शिजवुन घ्यावी. "
म्हणजे नक्की काय करायचे? सजावट नाही होणार ही.
शिजल्यावर ही सिमला मिर्च भेंडीपेक्षा जास्त लागेल. आणि तिचाच फ्लेवर येइल.
मला वाटते की सिमला मिर्ची शिवायसुद्धा ही भेंडी चांगली लागेल.
2 Jul 2012 - 5:47 pm | मोहनराव
हो पण फक्त सजावट म्हणुन मिक्स करता येत नाही ना त्यामुळे जराशी शिजवुन घ्यावी. सिमला मिर्चचा कुरकुरितपणा चांगला वाटतो फक्त मिळमिळीत भेंडीपेक्षा.
2 Jul 2012 - 11:28 pm | पैसा
भाजीचा पहिला प्रयत्न चांगलाच जमला आहे.
चिंतूकाका म्हणतायत तशी सिमला मिरची न घालता पण ही भाजी मस्त लागते. चांगली परतून घेऊन आणि डाळीच्या पिठामुळे भेंडी सुकी होतेच.
3 Jul 2012 - 6:51 am | कौशी
करून बघावाच लागेल.
3 Jul 2012 - 6:51 am | कौशी
करून बघावाच लागेल.