अंडाकरी - काय सुधारणा करता येईल

शुचि's picture
शुचि in पाककृती
29 Jun 2012 - 2:40 am

खरं तर हा प्रश्न व्यनि मधून काही सुग्रणींना व बल्लवाचार्यांना विचारता आला असता पण जास्तीत जास्त ,मोलाचा सल्ला मिळावा या आशेने, धागा काढण्यात आला आहे.

कालांतराने धागा उडविल्यास हरकत नाही.

४ जुलाई - अमेरीकेचा वाढदिवस. सध्या अमेरीकन मंडळींच्या बारबेक्यू, पार्ट्यांना ऊत आलेला आहे. आमचे ऑफीस यात मागे नाही. आमच्याकडे ३ जुलईला पॉटलक आहे. मी अंडाकरी व बीटाची कोशिंबीर घेऊन जाणार आहे.

पैकी बीटाची कोशींबीर मला खूपच छान येते पण अंडाकरी तितकीशी म्हणजे येते पण वेल ....

मी पुढील पद्धत वापरते -

(१) कांदा, गरम मसाला (लवंग, वेलदोडा, मिरी, शहाजीरे, बडीशोप) तेलावर परतून घेणे, तमालपत्र तेलात टाकणे
(२) शेवटी तीळ व तिखट घालून खरपूस भाजणे, तीळ जळू न देणे, हवा असल्यास चवीपुरता बाजारातील "अंडाकरी मसाला" घालणे
(३) मग हे मिश्रण टोमॅटो घालून परतणे.
(७) हे सर्व मिश्रण आणि आले-लसूण पेस्ट मिक्सरमधून सरसरीत काढून परत भांड्यात झाकण ठेऊन उकळवणे.
(८) एक ऊकळी आल्यावरती अंडी घालणे व मीठ घालणे व नीट परत उकळी आणणे.

यात आणखी काय सुधारणा करता येईल. कृपया सुचवावे. आभारी राहीन.

(१) मी पियुचा अंडाकरीचा धागा पाहीला. खूप छान आहे. पण मला खोबरे टाळायचे आहे.

प्रतिक्रिया

बारबेक्यू पद्धतीने अंडाकरी करता येइल काय ?
नाहीतरी बॅकयार्ड मध्ये बारबेक्यू स्टेक, चिकन चे छान छान सुगंध येत असतात जाता येता. :) :)

नॉर्मल भारतिय पद्धतीने जमू दे पहील्यांदा मग प्रयोग करता येतील :)

रोहन कुळकर्णी's picture

29 Jun 2012 - 3:14 am | रोहन कुळकर्णी

शेवटी हाफ अण्ड हाफ घालुन २ मिनिट गरम करा...मस्त चव येते...

शुचि's picture

29 Jun 2012 - 3:19 am | शुचि

चुकून कॉफी/चहा च्या धाग्यावरचा प्रतिसाद इथे टाकलात काय? की स्माइली राहीली? की आपलं असच?

रोहन कुळकर्णी's picture

29 Jun 2012 - 3:24 am | रोहन कुळकर्णी

हाफ & हाफ अथवा क्रीम....खाओ तो जानो!!

अहो हाफ अँड हाफ खाल्ल आहे पण खरच घालू का? थोड घालायचं का? ह्म्म करून पाहीन धन्यवाद. :) :) .... मस्त सूचनावण

सुहास..'s picture

29 Jun 2012 - 3:20 am | सुहास..

जाहीरात म्हणा हवे तर ...http://misalpav.com/node/13909 ...दुसरा पार्ट !

बाजी शुचीमामी , ती फोटोतली स्मायली आवडली ;)

मस्त आहे रेसिपी. माझ्या सासूबाई असे अंडे वरून घालूनच करतात. सुपर्ब लाग्ते ती अंडाकरी. पण मला भीती वाटते. मी उकडून घालणार आहे. धन्यवाद सुहास.

रेवती's picture

29 Jun 2012 - 3:52 am | रेवती

मी खात नसले तरी अंडाकरी बाकीच्यांना करून घालते. ती कृती देते.
सुके खोबरे मूठभर भाजून, आख्खा गरम मसाला थोड्या तेलात परतून, आवडत असल्यास थोडे ओले खोबरे ब्राऊन रंगावर भाजून, उभा चिरलेला कांदा तपकिरी रंगावर परतून, आवडत असल्यास टोमॅटो कांदा परतल्यावर त्यात परतणे. लाल तिखट टोमॅटोमध्ये परतून. हे सगळे थोडे पाणी वापरून बारीऽऽऽक वाटणे. आता किंचित तेलावर बे लिव्हज आणि हे प्रकरण घालणे, परतणे, आणखी हवे असल्यास तिखट, गरम मसाला घालून पाणी आवश्यकतेप्रमाणे घालून उकळणे. मीठ, कोथिंबीर घालून उकळी आली की नारळाचे अर्धीवाटी दूध घालणे पण जास्त न उकळणे (आधी ओला नारळ घालण्याची पायरी यामुळे गाळली जाऊ शकते). इथपर्यंत मी चव घेते. पुढे अंडी उकडून त्याचे उभे दोन भाग करून करीमध्ये घालणे. फार आधी घालून ठेवल्यास त्याचे पिठले बनते. ;)
यानंतर जास्तीची करी उरली तर दुसर्‍या दिवशी तांदूळ अर्धातास धुवून ठेवणे. पातेल्यात भात शिजण्यासाठी लागणार्‍या पाण्याच्या प्रमाणाच्या निम्मे पाणी घालून भाज अर्धाकच्चा असताना करी घालणे व पूर्ण शिजवणे. ;)
तुला शुभेच्छा!

रेवती तुझा प्रतिसाद वाचून माझा आत्मविश्वास डळमळीत होतो आहे थोडा थोडा ...... आत्ता तीळ घालून करून पाहते. मला खोबरे टाळायचे आहे :( बाकी तुझी पाकृ वापरते.

तुला आत्मविश्वास वाटेल तीच पद्धत फॉलो कर. ऐनवेळी हे आत्मविश्वास प्रकरण फार दगा देतं. पाहुणे यायच्यावेळी माझ्या साध्या साध्या आमट्या, भाज्या बिघडल्यात अनेकदा.

रेवती आताच ३ अंड्यांची बनवली. मस्त बनली. फोटो टाकते थोड्या वेळातच. फक्त तीळ आणि खसखस दोन्ही घातले ते व्यवस्थित बारीक झाले नाही :( जरा खरबरीत राहीले.

मीही सेम रेवा आज्जीन्सारखीच बनवते ...
मस्त चव लागते .
सुके खोबरे मस्ट ..
मी नारळाचं दुध नाहि घालत .
बाकि शुचि तुझ्या अंडाकरीला शु भेच्छा ;)

पण नारळाच्या दूधाने जरा "मेलो" होते ग बाकी काही नाही.

शुचि's picture

29 Jun 2012 - 6:03 am | शुचि

कुंदन's picture

29 Jun 2012 - 2:15 pm | कुंदन

जबरा जमलेली दिसतेय पा कृ.
मस्त मसालेदार अंडाकरी-चपाती अन बरोबर कांदा-टोमॅटो तोंडी लावायला .... बघुयात कधी योग येतोय ते....

आज गुरुवार आहे की गं :(
कसली सेक्सी दिसतेय अंडाकरी :P
:D

शुचि's picture

29 Jun 2012 - 6:23 am | शुचि

काय ग पूजा :) ..... मला चूकाच दिसताहेत ...... इतकी घाई झालेली की कोथिंबीर बघ किती जाडी ठेवलीये :(

कोथिंबीर तू त्यादिवशी बारीक चिरू शकतेस. जे काही खरबरीत वाटण झालय तेही बारीक करू शकतेस. या काही गंभीर चुका नाहीत. फोटू छान आलाय.

शेवटी खाणारे त्या पोटातच घालणारेत.

बाकी , शुचि मामीना पा कृ मध्ये पाहुन डोळे पाणावले.
बीटाची कोषिंबीर कशी करतात , जरा पा कृ द्याल का?

बीटाची पुढील कोशिंबीर अफलातून लागते व करावयास फार फार सोपी आहे -
(१) बीट उकडून कीसून घेणे
(२) त्या कीसात, दही, दाण्याचे भरड कूट, हिरव्या मिरचीचे अतिशय बारीक काप (जे की खाता यावेत असे), साखर व मीठ घालून
चट्टामट्टा करणे :)

एक करावे - उकडताना पाणी थोडे ठेवावे व तेच पाणी कोशिंबीरीत घालावे. छान सरसरीत तर होतेच वर मुख्य म्हणजे जीवनसत्त्वे राहतात.

सर्व अनुभवी काकवा आणि काकांनी या सर्वातून बेस्ट काँबीनेशन ओळखून एक अनोखी पाकृ निर्माण करावी असे सुचवतो. :)
ज्याचा आम्हा सर्वांना फायदा होईल. :)

मी_आहे_ना's picture

29 Jun 2012 - 11:01 am | मी_आहे_ना

अंडी उकडल्यानंतर तळून घ्या आणि नंतर "करी" मध्ये घाला. (पार्टीच्या आधि एकदा "ट्रायल" म्हणून करून बघा, आम्हाला तरी अशी आवडतात)
(अवांतर-आता आठवण काढलीच आहे आणि हवा पण मस्त आहे तर बायकोला "मस्का" मारणे आले)
;)

हो माझी मैत्रिण सांगत होती अंडी तेलावर थोडी सोनेरी परतून घ्यायला. धन्यवाद. करून पाहीन.

गणपा's picture

29 Jun 2012 - 1:40 pm | गणपा

अंडी उकडल्यानंतर तळून घ्या

मुळात हा ज्याच्या त्याचा आवडीचा प्रश्न आहे पण पर्सनली मला उकडली अंडी अश्या बैदाकरीत आवडत नाहीत. आणि तळुन तर नाहीच नाही. वरच आवरण चिवट (रबरा सारखं) होत.

अगदी हीच शंका मला होती की वरचे आवरण थोडे चिवट होईल का? धन्यवाद गणपा भाऊ शंकेचे निराकरण केल्याबद्दल .

मी_आहे_ना's picture

29 Jun 2012 - 2:04 pm | मी_आहे_ना

होय गणपाभाऊ, अंडयांचा बाहेरचा पापुद्रा चिवट होतो खरा, पण तोही खायला मजा येते. तुम्ही म्हणलात तसं "ज्याच्या त्याच्या आवडीचा प्रश्न आहे". मला तर पोळी नसेल तरी त्या वरच्या "लेयर"मुळे नुसतं चमच्यानी अंडं (करीसोबत) खायला आवडतं :)

नाना चेंगट's picture

29 Jun 2012 - 1:46 pm | नाना चेंगट

वैदिक पद्धतीने बनवा.

सांजसंध्या's picture

29 Jun 2012 - 2:07 pm | सांजसंध्या

आधी जेव्हां अंडं खात होते तेव्हां करी लपथप ( घट्ट) बनवून त्यात उकडलेल्या अंड्याचे बारीक काप टाकून मग ते तव्यावर कांदा टाकून परतून घेतलं कि खमंग होतं असं खाणारे म्हणतात... :)

धन्यवाद पण कांदा कच्चा नाही रहात का? शिजतो का?

आनंदी गोपाळ's picture

30 Jun 2012 - 10:04 pm | आनंदी गोपाळ

सोबत किंवा जेवणाआधी अ‍ॅपेटायझर म्हणून २-३ पेग सोत्रींची 'जामुन्टिनी' वा तत्सम कोंबड्शेपूट (कॉकटेल) द्या.
ज्याचे नांव ते सुपर्ब अंडाकरी झाली आहे असे खाणारे सांगतील. (त्यात करी ऐवजी फोडणीचे वरण असले तरि ;) )

अहो ऑफीसच्या पार्टीमध्ये तसलं काही चालत नाही.
____________________________

परंपराचा अंडाकरी मसाला आणला आहे.