काट्यानं काटा

बब्रुवान's picture
बब्रुवान in काथ्याकूट
10 Jun 2012 - 8:41 am
गाभा: 

'बब्र्या, कामुन आसा गपचिप बसलास ?' सडनमदी यंट्री घेत दोस्त म्ह्न्ला.

आडनिड टाईमाला आलेल्या दोस्ताला बघुन म्या म्हन्लं. 'पेपरवाले - च्यानेलवाले कवाधरनं त्या कसाबच्या नावानं दांगुडा घालुन र्‍हायलेत, त्याला जिता ठिवलाय, बिर्यानी खातो, खर्चा होतो. या ब्याग्राउंडवर काल त्या पुन्याच्या पोराने आजुक यका कसाबचा जीव घेत्ला, सिद्दीकी की कोन त्यो, अन तेबी डायरेक्ट अंडासेलमदेच ! कॉमन म्यान म्हन्तो बरच झालं, कसाबसारखं यालाबी सांबाळण्यापेक्षा काट्यानं काटा गेला. तिकल्ड्या साईडला फिलॉसॉफर लोकांनी तर ह्ये चुक हाये म्हन्तान्ना पार ह्युम्यानिटीलाबी क्वैश्वनमदे घेतलय. तु सांग दोस्ता जे झाले ते बरुबर का चुक ?'

म्या नॉनश्टॉप यवडं बोल्लो त्यानं दोस्त जरा शिरेस झाला भौतेक. म्हन्लां - 'बबर्‍या, बरुबर का चुक आसं तु डोक्यावर बसलेल्या येताळावानी ईचारु नकोस. आसं बरुबर चुक कायबी नसतय.'. पहिल्याच शेंटेन्समधे दोस्त फिलोसॉफीच्या मुडमदे गेला हे मी वळखलं. दोस्त पुढे म्हन्ला, 'ज्यांनी मारलं ती काय क्रांतिकारक म्हनुनसनी जेलात हाईत ? दादागिरी करत पार खुना दरोड्याला पोचलेली मान्सं ती, ते कह्याच देशप्रेम करुन र्‍हायलेत ! बाकी सिद्दीकी मेलं म्हंतोस तर ते काय बरुबर झालं न्हाई, शिश्टीमचा किती टाईम बर्बाद झाला, त्याह्याकल्डी किती ईन्फोर्मेशन किती इंपॉर्टंट आसन, त्याचं काय ?'

उल्टा क्वश्चन टाकुन दोस्त गप झाला. त्याला म्हन्लं 'गड्या तु आगदी आज फिलॉसॉफीच्या मुडमध्येच हाईस. यक सांग, आजच्या टाईमाला जी आजुक नवी अतिरेकी पोरं तयार होउन र्‍हाईलेत त्या दरभंगातल्या मदरश्यात, त्यांना या गोष्टीनं जानार्‍या मॅसेजचं काय ? '

दोस्त जरायेळ गप झाला, म्हन्ल 'झिरोत गेला की काय ?'. पटदिशी हुबा र्‍हायला न म्ह्न्ला 'सांजच्याला लाय्ब्ररीत ये मंग बोलु'.

दोस्त तर टांग मारुन गायब झाला, गड्याहो तुमी काय म्ह्न्ता ?

प्रतिक्रिया

गणामास्तर's picture

10 Jun 2012 - 9:07 am | गणामास्तर

तुम्ही नाव घेतलयं बब्रुवाहन, लिहीतांय बब्रुवान रुद्रकंठावार ष्टाईलने..
नक्की कोण म्हणायचं आपण?

बब्रुवान's picture

10 Jun 2012 - 9:15 am | बब्रुवान

कसं बदलायचं कानु ? मह्या खात्यात ते फकस्त 'परवलीचा शब्द' का काय म्हनुन र्‍हायलय .. वाहनचं वान कसं करायच कानु ?

बब्रुवान's picture

10 Jun 2012 - 5:36 pm | बब्रुवान

कोन्तरी बदल्ल रे भो. म्या म्ह्न्ल कामुन हुगडना खातं. संम्दे मेल बी हुडकले पुन्हा यकदा, नंतर कळ्ळं आप्लं नावच बदल्ल हाय. जमलं.

पैसा's picture

10 Jun 2012 - 10:10 am | पैसा

लायब्रीत बोलू! मोठ्यानं बोलू नगासा!!

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2012 - 1:54 pm | बिपिन कार्यकर्ते

स्वागत! ष्टाईल आवाल्डी!

बहुगुणी's picture

10 Jun 2012 - 3:54 pm | बहुगुणी

इश्टाईल आवडली, आणि वळखीचीही वाटली, आदुगर या वाटंनं आल्ता जनू :-)

{बाकी या अंडासेलमधल्या हत्येबद्दल एक 'कॉन्स्पिरसी थियरी'चा कीडा डोक्यात आला होता बातमी वाचूनः हे दोघं नेमके त्याच कोठडीत कसे पोहोचले, त्यांनी मोठा गुन्हा करून तिथे पोहोचणं यामागे यासीन भटकळचा आणि त्याच्या सूत्रधारांचा तर प्लॅन नसेल? उरलासुरला साक्षीदार नष्ट केला की ATS ची केस बोंबलली!.....

किंवा मी बहुतेक जरा जास्तच गुन्हेगारीविषयक सिनेमे बघत असेन :-))

चिंतामणी's picture

10 Jun 2012 - 6:01 pm | चिंतामणी

तुमच्याशी सेमत हाय.

बब्रुवान's picture

10 Jun 2012 - 6:04 pm | बब्रुवान

तसं बी आसन. लोकं तं राजनचं बी नाव घेउन र्‍हायले. ते राजन कह्याला इत्के कुटाणे करुन र्‍हायलय ईचारलं तर दाउदशी दुश्मनी म्ह्न्तात. दाउद जिता है का नाही इथुन सवालैत तर दुश्मनी गिश्मनी कोन करत बसलय ?

बब्रुवान's picture

10 Jun 2012 - 5:39 pm | बब्रुवान

थँक्यु बर्का. पन तुम्हास्नी काय वाटते ? मी बरुबर की दोस्त ? का आजुक काही येग्ळं ?

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2012 - 5:52 pm | बिपिन कार्यकर्ते

जगात चूक बरोबर असं काहीच नस्तं! सगळं सापेक्ष! तुम्ही हिकल्डे की तिकल्डे यावर सगळं अवलंबून आहे बघा! बाकी इथे नेहमीचे यशस्वी येऊ देत एकदा.... प्रश्न का विचारला असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला! ;)

बब्रुवान's picture

10 Jun 2012 - 5:59 pm | बब्रुवान

आसं बोल्ले मंजे आम्ही समोरच्याला फिलॉसॉफर म्ह्न्तो, तुम्ही दोस्ताच्या साईडचे.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2012 - 6:08 pm | बिपिन कार्यकर्ते

लोकशाहीय! कुनीपन कायपन बोलू शकतं! तुम्हाला तसं वाटतं तर तसं! कसं?

गणामास्तर's picture

10 Jun 2012 - 8:47 pm | गणामास्तर

सदर लेखनाची 'मराठवाडी' इष्टाईल व पात्र (बब्र्या आणि दोस्त) हे बब्रुवान रुद्रकंठावार यांचे आहेत.ते पत्रकार आहेत आणि बब्रुवान रुद्रकंठावार या नावाने लिहितात.

पण हे नवीन बब्रुवान कोण ?

बब्रुवान's picture

13 Jun 2012 - 10:04 pm | बब्रुवान

व्हयं. बरुबर हाये तुम्चं. म्या बब्रुवान रुद्रकंठवारांचा फ्यान म्हनुन तेच नाव घेत्लं.

जाई.'s picture

10 Jun 2012 - 4:01 pm | जाई.

=)) =))

शिल्पा ब's picture

10 Jun 2012 - 10:59 pm | शिल्पा ब

मेलं तं मेलं बेनं! आन ते येटीय्स वालं केस करुन्शान फुडं काय व्हनार होतं? दुनियेची चिंता करन्याबिगर कामं न्हाईत का तुम्हास्नी?

जे.पी.मॉर्गन's picture

11 Jun 2012 - 11:36 am | जे.पी.मॉर्गन

लेख, भाषेचा लहेजा आणि मांडण्याची पद्धत खूपच भारी. पुढील लेखनाच्या प्रतीक्षेत.

जे पी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jun 2012 - 12:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कधी कधी फिलॉसॉपी पेक्षा कॉमन मॅनला जे वाटतं तेच बरं आणि बरोबर आहे असा एक विचार मनात डोकावतो. पण, आरोपीला संपवण्याचं कारण देशप्रेम आहे, असं वाटत नाही. आणि असलं तरी इथे लोकशाही आणि न्यायव्यवस्था आहे आणि त्याचपद्धतीने पुढे गेलं पाहिजे. हं, आता न्यायपालिकेला लागणारा वेळ वगैरे आणखी एक वेगळाच विषय. तुम्ही तुमच्या दोस्ताबरोबर लायब्ररीत गेलेलं बरं.

बाकी, स्वगताची ष्टाइल आवडली.

-दिलीप बिरुटे

उत्तम धागा, एक महत्वाचा विषय वेगळ्या अन चांगल्या प्रकारे मांडलात त्याबद्दल धन्यवाद.

शकु गोवेकर's picture

12 Jun 2012 - 2:43 am | शकु गोवेकर

आता हाय का र बबरु,तु येड का खुळा हाय का,आरं बबर या, एक ध्यानामंदी घे,ह्या जगामंदी चांग ल लोक बी हाय ती आन ही दुनिया चांग ल्या लोकावर च चालू हाय्,तु कितिबी अन्याय सहन कर्,पर तुझा चांगुल पना सोडू नग्--जास्त मायति पाय जे अस् ली तर त्या साटी मला लिव --