Skip to main content

तुम्ही उर्जाबचतीसाठी काय करता?

लेखक श्रीरंग_जोशी यांनी सोमवार, 04/06/2012 12:01 या दिवशी प्रकाशित केले.
Operations Research च्या पुस्तकातील एक वाक्य - Optimized utilization of resources is service to humanity. महानिर्मिती कंपनीचे (पूर्वीच्या मराविमचा एक तुकडा) घोषवाक्य - 'ऊर्जेची बचत हिच ऊर्जेची निर्मिती'. दैनंदिन जीवनात आपण सगळेच पर्यावरणाच्या जपणुकीसाठी आपापल्या परीने काही उपाय करीत असतो. यामुळे कधी कधी आपले व आपल्या लोकांचे / कंपनीचे पैसेही वाचत असतात. सन्माननीय मिपाकरांना विनंती आहे की आपण वापरत असलेल्या क्लुर्प्त्या / उपाय येथे सांगाव्यात जेणेकरून इतरांनाही नवे काही तरी करता येईल. माझी काही उदाहरणे. १. अत्यावश्यक गरजा सोडून छपाई न करणे - या द्वारे कागद, शाई, वीज यांची बचत होते. आजकालच्या भ्रमणध्वनी यंत्रामुळे हे काम अधिकच सोपे झालेले आहे. २. शक्य असतील तेवढी सर्व बिले जालावरील सुविधांद्वारे भरणे. रोख रक्कम व चेकचा कमीत कमी वापर करणे. ३. गाडीने कुठेही लांबवर जात असताना जमेल तेवढी कामे जसे की खरेदी व इतर काही यांचे एकत्रीकरण करणे. म्हणजे पुन्हा पुन्हा इंधन व वेळ वाया जात नाही. ४. शिटी न होवू देता कुकरमध्ये अन्न शिजवणे - हा उपाय लोकसत्तेतील एका लेखात सुचविण्यात आला होता.कुकरची शिटी वाजली की जमलेला सगळा दाब वाफेवाटे बाहेर पडतो व दाब वाढण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होते. मला खात्री आहे की आपण याखेरीज बरेच काही करत असाल त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की या धाग्यावर त्याबाबत लिहून याबाबत अधिक जागृती कराल.

वाचने 36833
प्रतिक्रिया 127

प्रतिक्रिया

तुम्ही उर्जाबचतीसाठी काय करता?
टूकार भिकार लेखन शक्यतो डायरीतच लिहून काढतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हम्म! म्हणजे ऊर्जा बचतीसाठी कागद खर्ची घालायचा? काय हे? त्याऐवजी पाटी पेन्सिल वापरा कि हो!

मेणबत्त्या लाउन उर्जाबचत करतो.. वहीच्या ऐवजी कॉम्प्युटर वापरतो गाडीच्या ऐवजी सायकलवतो व्यायामाच्या निमित्ताने जिमात जाउन तिथेच आंघोळ उरकतो म्हणजे पाणिबचत होते अन्न शक्यतो कच्चेच खायचा प्रयत्न असतो त्याने -माझी उर्जाबचत, गॅसबचत, वेळबचत, झालंच तर पाणिबचत होते (भांडे घासावे लागत नैत ना!)

In reply to by शिल्पा ब

वहीच्या ऐवजी कॉम्प्युटर वापरतो
ह्याने नक्की कसली उर्जा बचत होते म्हणे ? मी तर शक्यतो जेवायच्या वेळेला बिकांच्या घरी किंवा चिंतामणी काकांच्या घरी उगाच चक्कर मारतो. मस्त फुकटचे जेवायला मिळते. त्यामुळे माझी खूपच उर्जा बचत होते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा गुरुजी - गुस्ताखी माफ असावी. मराठीमध्ये 'मस्त' हे विशेषण केवळ एका प्राण्यासाठी (बैल) वापरले जाते. जेवण पोटभर, रुचकर, स्वादिष्ट असू शकते, मस्त नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

>>मराठीमध्ये 'मस्त' हे विशेषण केवळ एका प्राण्यासाठी (बैल) वापरले जाते. कितीतरी कथाकवितांमध्ये हे विशेषण उत्फुल्ल,तरोताजा वैग्रे अर्थी वापरल्या गेले आहे तेदेखील लै आधीपासून. असा कोणताही हार्ड अँड फास्ट रूल नै की जो असा निर्बंध लादतो.

In reply to by बॅटमॅन

मान्य आहे असा कुठलाही कडक नियम नाहीये. 'मस्त' हे विशेषण हिंदी भाषेत सर्रास वापरले जाते. विशेषण म्हणून त्याचा वापर मराठीमध्ये गेल्या काही दशकांत सुरू झाला असावा. चि. वि. जोशी, ना. धो. ताम्हनकर अशा लेखकांच्या पुस्तकांत त्याचा वापर आढळत नाही. ढोबळ मानाने मस्त हा एक तत्सम शब्द आहे. (शुद्ध मराठीत) याचा वापर जरूर करावा परंतु शेवटचा पर्याय म्हणून. बाकी हे सर्व ज्याच्या त्याच्या मानण्यावर आहे. जाणकारांनी मार्गदर्शन केल्यास आनंद होईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

मराठीमध्ये 'मस्त' हे विशेषण केवळ एका प्राण्यासाठी (बैल) वापरले जाते.
ते बहूदा 'मस्तवाल' असे आहे. :) असो... तुम्ही एकदम मस्त माणूस आहात बघा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आता वही न वापरल्याने वृक्षतोड कमी होईल अन कॉम्युटर वापरल्याने पुढे सौर्यउर्जेवर चालणारे कॉम्प्युटर तयार करायला भाग पाडले जाईल ज्याने भरचपुर उर्जाबचत होईल..आम्हीपण भविष्यकालीन विचार करुन काम करतो म्हंटलं!

लेखातील आयटम नं.४ खुपच धोकादायक / प्रसंगी जेवावर बेतणारा ठरु शकतो.

In reply to by jaypal

श्री. जयपाल ह्यांचा हा प्रतिसाद अत्यंत अश्लील असल्याने ताबडतोब उडवल्या जावा. तसेच त्यांना समज देण्यात यावी.

In reply to by परिकथेतील राजकुमार

काय बोलताय पराशेठ ? ते चिन्ह नकारात्मक क्रुती दर्शवीत. उदा. नो पार्कींग्,नो हाँकींग, नो एंट्री ई. तुम्हाला यात नेमक काय अश्लील वाटल ?

शिटी न होवू देता कुकरमध्ये अन्न शिजवणे - जेव्हाही शिटी वाजणार असे जाणवते तेव्हा मी शेगडीची ऊर्जा कमी करतो. १ - २ मिनिटांनी पुन्हा वाढवतो. केवळ भात शिजवायचा असेल तर याची २ आवर्तने पुरेशी ठरतात असा माझा अनुभव आहे. यात कसलाही धोका नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

लेखात नमुद केल असतत तर गैर समज झाला नसता.

In reply to by jaypal

पुढल्या वेळी काळजी घेईन.

In reply to by श्रीरंग_जोशी

तुम्हाला उंदियो का काय तो पदार्थ करता येतो का ..? त्याला गॅस लागत नाही.. मड्क्यात काय शिजवायच आहे ते भरायच अन मड्क मुंड्क बांधुन खड्डयात घालायच नंतर खड्डा बुजवुन वरुन काट्क्या जाळायच्या त्या खड्ड्यावर्.गॅस पन वाचतो अन कचरा पण जळ्तो .हाय काय अन नाय काय. झाली कि नाय उर्जा बचत...? :) :) :)

In reply to by श्रीरंग_जोशी

शिटी न होऊ देता सुद्धा भात शिजवता येतो . शिटी होत असतानाच गॅस बंद करायचा ..वाफेवर शिजतो मस्त. माझी आज्जी तर चुलितल्या विस्तवावर चहा करणे ,दुध गरम करणे , तसच चुलिच्या दुसर्या भागावर .अलिकडच्या विस्तवाच्या धगीवर पाणि तापवने असली कामं करुन टाकायची .कितितरीच उर्जा वाचायची अश्याने .

@ श्रीरंग_जोशी शिटी न होवू देता कुकरमध्ये अन्न शिजवणे - जेव्हाही शिटी वाजणार असे जाणवते तेव्हा मी शेगडीची ऊर्जा कमी करतो. १ - २ मिनिटांनी पुन्हा वाढवतो. केवळ भात शिजवायचा असेल तर याची २ आवर्तने पुरेशी ठरतात असा माझा अनुभव आहे. यात कसलाही धोका नाही. अजुन एक आय्ड्या सान्ग्ते भाताबरोबर कुकरमध्ये डाळही लावत जा, बओर्बर काहि भाज्या शिज्वयाच्या असतील तर त्या ही लावत जा अजुन उर्जा बचत होइल ..

In reply to by पियुशा

हो हो नक्कीच भाताबरोबर इतरही पदार्थ मी शक्य / गरज असेल तेव्हा शिजवत असतो. माझ्या काही मित्रांनी भात सरळ मायक्रोवेव्ह मध्ये शिजवायला सुचविले आहे माझ्यामते त्यात ऊर्जा व वेळ अधिक खर्च होतो. आपले काय मत आहे?

In reply to by श्रीरंग_जोशी

माझ्या काही मित्रांनी भात सरळ मायक्रोवेव्ह मध्ये शिजवायला सुचविले आहे माझ्यामते त्यात ऊर्जा व वेळ अधिक खर्च होतो. आपले काय मत आहे? त्याने विजेची बचत नै होत तुम्ही कुकरच वापरा ते चांगले ऑप्शन आहे :) बादवे तुम्ही हापिसला कसे जाता ?

In reply to by पियुशा

सुदैवाने सध्याचे भाड्याचे घर हापिसापासून जवळच आहे. पाऊस किंवा बर्फ पडत असल्यास गाडी नेतो. काही वर्षांपूर्वी सायकल सुद्धा वापरली आहे हापिसात जाण्यासाठी.

In reply to by श्रीरंग_जोशी

सुदैवाने सध्याचे भाड्याचे घर हापिसापासून जवळच आहे. पाऊस किंवा बर्फ पडत असल्यास गाडी नेतो. अच्छा ,म्हण्जे आपण बाहेर देशी राहता तर ....? ;)

In reply to by शुचि

हो, सध्या माझे वास्तव्य अमेरिकेत आहे. भारतातील लोक उर्जाबचतीबाबत अमेरिकनांपेक्षा नक्कीच पुढे आहेत असे माझे निरीक्षण आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या उर्जाबचतीसाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरतो. आपणास कोणत्या प्रकारची उर्जाबचत अपेक्षित आहे हे कळल्यास उत्तर देणे सोपे होईल.

In reply to by श्रीरंग_जोशी

उन्हाळ्यात पंखा अथवा एअर कंडिशन लावण्या एवजी स्वतः भोवती गरागरा फिरा,थंड वाटेल व चक्कर येउन झोप देखिल लागेल. :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

दैंनंदिन जीवनातील विविध आवश्यक कामे करताना >>> मास्तरांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत .... बाकी जोशीसाहेब ....अतिशय उच्चकोटीचा वैचारिक प्रश्न आहे...तो आज वटपौर्णीमेच्या दिवशी आपण धाग्यारूपी गुंडाळल्याने त्याला चार चांद लागले आहेत ...बाकीचे चांद बिर्याणी खायला गेले आहेत...बिर्याणी व्हेज आणि नॉन व्हेज स्वरुपात मिळते....व्हेज बिर्याणी मध्ये हाटिलात हल्ली फक्त फ्लावर आणि गाजरं जास्त टाकतात....गाजर हा अतिशय हेल्दी पदार्थ आहे ...पदार्थ विज्ञानात मला गती नाही....गती ही हिरो होन्डा ला चांगली आहे...हिरो हा जॅकी श्रॉफ चा पिक्चर आहे...जॅकी श्रॉफ हा अशोक श्रॉफ ..आपल हे... सराफ चा भाउ असावा ...भाऊ चा रोल सत्या मध्ये चांगला झाला आहे ....सत्या हा माझ्या कंपनी मध्ये काम करतो... तो एकटा रहात असल्याने स्वता: कुकर मध्ये स्वयंपाक करतो ...हि झाली उर्जा बचत ...बचत खाते हे सर्व बँकामध्ये उपलब्ध आहे ...बँका मध्ये हल्ली खुप गैरव्यवहार चालतो....गैरव्यवहार ही तर आजकालची पध्दत झाली आहे...मिपावर डायरी लिहायची पण पध्दत झाली आहे... धन्यवाद

In reply to by सुहास..

>....अतिशय उच्चकोटीचा वैचारिक प्रश्न आहे...तो आज वटपौर्णीमेच्या दिवशी आपण धाग्यारूपी गुंडाळल्याने त्याला चार चांद लागले आहेत . = दे ढील... इथे हापसायला बरेच आहेत लेखकानं चेसुगुची उणीव भरून काढली आहे हे मात्र नक्की!

In reply to by संजय क्षीरसागर

धन्यवाद संजयजी. चेसुगू यांच्या लेखनाचा मीही चाहता आहे. परंतु त्यांची उणीव भरून काढण्याची माझी योग्यता नक्कीच नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

चेसुगू यांच्या लेखनाचा मीही चाहता आहे. परंतु त्यांची उणीव भरून काढण्याची माझी योग्यता नक्कीच नाही. >>> =)) =)) =)) हार्ट अटॅक चा अनुभव आला !!

In reply to by श्रीरंग_जोशी

>>परंतु त्यांची उणीव भरून काढण्याची माझी योग्यता नक्कीच नाही. खरंच !! तुम्ही त्यांच्याही एक पाऊल पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुमच्या लेखनाचा गप्पकन पंखा होऊन जावंसं वाटायलंय बघा.

आम्ही उर्जा बचतीसाठी काहीही करत नाही. कसे आहे आम्ही आपले जीव तोडून घरातले बल्ब हवे तेव्हा हवे तेवढेच लावणार, गाडीच्या ऐवजी शक्य असेल तिथे सायकल वापरणार, वगैरे वगैरे ! पण मॉलमधे ढाणढाण वीज जाळली जाणार, कार्पोरेटमधे सूर्यप्रकाश अडवून मोठमोठे लाईट लावले जाणार, बिनकामाचे पेट्रोल, डीझेल जाळले जाणार. बर हे कमी काय म्हणून जगाचे गुर्जीपणा आपल्याच कडे असल्याच्या आविर्भावात असलेली अम्रिका दनादन बॉम्ब टा़कणार, जाळपोळ करणार, उर्जा प्रचंड प्रमाणात खर्च करणार. मग मी आणि माझ्यासारख्यांनी वाचवलेल्या *टभर उर्जेने काय बचत होणार? ऑ !! सांगा तुम्ही !!!! त्यापेक्षा संपवून टा़कू एकदाचे आणि जाउ अश्मयुगात !!! किंवा संपलंच सगळं तर निदान नवे तरी पटकन शोधले जाईल !! नाही का? :) असो :)

In reply to by नाना चेंगट

नानांचा प्रतिसाद नेहमीच पटतो. पण स्वतःला वीजेचे बील भरावे लागते त्यामुळे मी कटाक्षाने वीजबचत करते म्हणजे इतरांनी चालू ठेवलेले दिवे स्वतः उठून/ धडपडत बंद करणे :( , एसी कमी वापरणे, गॅस बंद करुन शेवटची पोळी त्या धगीवर भाजणे :) आदि.

In reply to by नाना चेंगट

नाना - आपण मांडलेल्या विचारांची वास्तविकता पटते परंतु या (ऊर्जा - बचतीच्या) कामात खारीचा नाही तर मुंगीचा वाटा जर आपल्याला मिळत असेल तर प्रयत्न करायला हरकत नाही.

In reply to by श्रीरंग_जोशी

मुंगीचा काय खारीचा वाटा पण उचलु हो ! :) पण खारीने वाटा उचलतांना तिच्यासमोर आदर्श नल, नील, अंगद, सुग्रीव, जांबुवंत, हनुमान होते, पाठ थोपटायला श्रीराम होते. इथे आहे कुणी त्या लायकीचे? मग आपणच काय फुक्कट डोक्याला हेडेक करुन घ्यायचा? :) चालु द्या ! तुम्हाला पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा!! :)

महानिर्मिती कंपनीतिल भ्रष्टाचार,विजेचि चोरी व थकलेल्या बिलांची वसुली केली तरी वरील उपायांपेक्षा १० पट (?) फायदा होउ शकतो.

In reply to by गोंधळी

तुम्ही जे म्हणताय ते महावितरण ला लागू होते. काही वर्षांपूर्वी मराविम चे विभाजन होऊन ३ तुकडे करण्यात आले. १. महानिर्मिती २. महापारेषण ३. महावितरण वीजग्राहक म्हणून आपला सरळ संबंध केवळ महावितरणबरोबर येतो (जसे वीज जोडणी, देयके भरणे, सेवेबाबत तक्रार इत्यादी).

गॅसच्या ज्वाळा पातेल्याच्या परिघाबाहेर जाणार नाहित ह्याची काळजी घ्यावी. परिघाबाहेर जाणार्‍या ज्वाळेचा पातेल्यातील पदार्थ शिजण्यास उपयोग होत नाही. परिघा बाहेरील उष्णता वाया जात असते. तांदूळ, डाळी शिजवण्याआधी अर्धा तास भिजवून ठेवल्यातर लवकर शिजतात, गॅस कमी लागतो. जवळच्या अंतरासाठी वाहन वापरण्यापेक्षा चालत जावे. ...............इ.इ.इ.

In reply to by प्रभाकर पेठकर

तांदूळ व डाळी अगोदर भिजवून ठेवण्याची क्लुर्प्ती मीही वापरतो. बटाटे उकडायचे असल्यास त्यांचे २ किंवा ४ तुकडे करून मग कुकरमध्ये उकडतो. कधी कधी कुकर थोडा अधिक वेळ सुरू राहिल्यास बटाट्यांचा लगदा होऊन हा प्रयोग अंगाशीही येतो ;-)

काम करत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर अतिशय उर्जात्मक वाटते आणि ताबडतोब कामाला लागतो/लावतो. (प-या आता या मधे उगाच तुला हव तेवढच शोधुन बोंबा बोंब करु नकोस)

वीज बचत करण्याची मला खास करण्याची गरज वाटत नाही. आमच्याकडे जवळ जवळ सात तासांच लोड शेडींग असतं. वीज आल्यावर कोणकोणती प्राधान्याने कामं केली पाहिजेत त्यावर आमचा भर असतो. आजच बातमी वाचली की, श्री अजित पवार म्हणाले की, डिसेंबर २०१२ पर्यंत वीजभारनियमन बंद होईल. म्हणजेच वीज मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, मला वाटतं वीजबचतीसाठी प्रिपेड मिटर येणार होते ते यायला पाहिजेत. ३०० रुपयाचं व्हावचर मारलं की अमुक अमुक युनिट वीज वापरायला मिळेल, वीज बचतही होईल आणि योग्य वापरही होईल. >>>>शिटी न होवू देता कुकरमध्ये अन्न शिजवणे अन्न किती शिट्या वाजल्यावर शिजतं वगैरे यावर आम्हाला नेमकं काही सांगता येणार नाही. आमचा संबंध या महिन्यात गॅस लवकर संपला जरा गॅसचा वापर नीट करत चला एवढ्याचपूरता मर्यादित असतो. आणि आमच्याकडे या विषयावर कितीही तोंडाची वाफ दवडली तरी उर्जा बचत होईल असे वाटतच नाही. बाकी, लोकांकडेही हाच अनुभव असावा. पण, लोक अशा विषयावर मोकळं बोलत नाही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हे म्हणजे एकदम च भारी , ग्रीड मध्ये वेज नसली तरी व्हावचर मधुन वीज मिळणार म्हणजे कमालच की. चला डिसेंबर २०१२ ची वाट पाहुयात आता.

In reply to by कुंदन

मोठ्या साहेबांच्या वाढ-दिवशी राज्यातील जनतेला अभूतपूर्व अशी भेट (अर्थात १३ वर्षे वाट पाहिल्यानंतर).

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सात तास लोड शेडिंग ? कुठे रानात्-शेतात राहता की काय प्राध्यापकसाहेब ? सध्या महावितरणने विजहानी (distribution losses) वर आधारित लोड शेडिंग सुरु केल्यापासून फक्त शेती वाहिन्यांनाच इतके लोड शेडिंग होते. आमच्याकडे तर ब्वा आठवड्यातून सात तास असते लोड शेडिंग ...