साहित्यः
१ किलो मटण
३ ते ४ टोमॅटो
४ कांदे
लसुण पाकळ्या ५-६
वाटण : आल एक इंच, लसुण पाकळ्या १ गड्डा, मुठभर कोथिंबीर, पुदीना, २ मिरच्या.
हिंग अर्धा चमचा
हळद १ ते दिड चमचा
मसाला ३ चमचे (तिखटाच्या आवडीवर कमी जास्त करू शकता)
गरम मसाला १ चमचा
मिठ २ चमचे
२ मोठे बटाटे
२ ते ३ पळ्या तेल
पाककृती:
मटण स्वच्छ धुवून त्याला वरील वाटण चोळून मुरवत ठेवा.
तोपर्यंत कांदा चिरुन घ्या, लसूण पाकळ्या ठेचुन घ्या.
बटाट्याच्या मोठ्या फोडी करा.
टोमॅटोची मिक्सरमध्ये प्युरी बनवून घ्या.
आता कुकरमध्ये तेल गरम करून त्यात प्रथम लसुण पाकळ्यांची फोडणी द्या व लगेच कांदा घालून तो बदामी रंगाचा होईपर्यंत शिजवा.
शिजलेल्या कांद्यावर टोमॅटोचा रस टाकुन परतवा २-३ मिनीटे शिजूद्या.
नंतर हिंग, हळद, मसाला, गरम मसाला घालून ढवळा.
ह्या मिश्रणावर मटण व बटाट्याच्या फोडी टाका.
परतून त्यावर मिठ टाका व परत एकजीव करा.
रस्सा किती हवा त्याच्या जरा कमीच पाणी टाका. नंतर मटणाचे थोडे पाणी सुटते.
कुकरचे झाकण लावुन १५ मिनीटे शिजवत ठेवा.
वाफ गेली कि झाकण काढा. (हा फोटो अर्धे मटण संपल्यावर काढलेला आहे. वासाने आणि भुकेने विसरले होते.:हाहा:)
प्रतिक्रिया
29 May 2012 - 12:37 pm | इरसाल
जबर्दस्त आहे. करावीच लागणार
29 May 2012 - 2:41 pm | कवितानागेश
हे तर अंडे घालून पण करता येइल! ;)
29 May 2012 - 2:49 pm | सुहास..
घाल घाल , जमेल त्या पाकृ मध्ये अंडे घाल ...
पाकृ मस्तच ;)
मी सेम टु सेम वांगे घालुन बनवायचो कोणे एके काळी ..आता...आता ...आलोच आं जरा ;)
29 May 2012 - 3:33 pm | नरेश_
पाकृ आणि प्र.क्री. ;)
29 May 2012 - 6:04 pm | jaypal
29 May 2012 - 7:06 pm | बॅटमॅन
असेच म्हंतो!! काय फर्मास झालंय चायला!!
बैदवे हे असले झकास स्मायली कुठे मिळतात तो तुम्हाला जैपाल काका?
29 May 2012 - 11:19 pm | सुनील
दिसतेय छान. चवीलाही छानच असणार!
मसाला ३ चमचे (तिखटाच्या आवडीवर कमी जास्त करू शकता)
गरम मसाला १ चमचा
ह्यातील पहिल्या ओळीतील मसाला म्हणजे कुठला मसाला?
30 May 2012 - 12:29 am | कवितानागेश
मसाला ३ चमचे = लाल तिखट
30 May 2012 - 2:28 am | सुनील
धन्यवाद!
30 May 2012 - 10:48 am | इरसाल
ते लाल तिखट नसते तो वेगळ्या प्रकारचा सोळा मसाल्यांचे मिश्रण असलेला मसाला असतो.
31 May 2012 - 2:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जागू यांचा हा मसाल्याचा दुवा.
-दिलीप बिरुटे
31 May 2012 - 10:34 pm | सुनील
धन्यवाद!
30 May 2012 - 9:04 am | चिंतामणी
>>>(हा फोटो अर्धे मटण संपल्यावर काढलेला आहे. वासाने आणि भुकेने विसरले होते.:हाहा:)
असा पदार्थ केला की असे होणारच. ;)
30 May 2012 - 10:37 am | जागु
सुहास, इरसाल, नरेश, बेंटमेंट, चिंतामणी धन्यवाद.
लिमाऊ अंडे घालून पण दाटपणा येतो पण टोमॅटोची चव छान लागते आणि अंड्यांसारख्या शितड्या नाही होत.
सुनिल ३ चमचे मसाला म्हणजे लाल मिक्स मसाला. मिरचीपुड दिड चमचा पुरे होईल.
30 May 2012 - 2:31 pm | सुहास झेले
जबऱ्या.... !!
+१ टू जयपाल :) ;)
30 May 2012 - 2:42 pm | गवि
वाह.. झकास..
एवढ्या अस्सल मटणी पाककृतीत बटाटा मात्र आपला उगाच भर म्हणून मधे आल्यासारखा वाटतोय.
30 May 2012 - 6:46 pm | विश्वनाथ मेहेंदळे
हाय कम्बख्त तुने पीही नही !!
31 May 2012 - 10:50 am | गवि
अरे मी काय म्हणतो, शिजलेल्या मटणाची कन्सिस्टन्सी अन बटाट्याची किती वेगळी. म्हणजे
- केळीच्या शिकरणीत जामफळे
-रबडी जिलेबीच्या मिश्रणात थर्माकोलसारख्या कमळबिया
-गाजर हलव्याच्या मधे लाह्या
-घट्ट आमरसात कलिंगडाचे तुकडे
असे पदार्थ भरीस घातल्यासारखे झाले नाही का?
31 May 2012 - 11:18 am | विश्वनाथ मेहेंदळे
साधारणत: रस्सा असेल तेव्हाच बटाटा टाकतात. सुक्या मटणात नाही. तो रस्सा त्या बटाट्यात नीट मुरला तरच खरी मज्जा. या एकदा घरी, दाखवतो मज्जा. (किंवा पुढच्या सडाफटिंग कट्ट्याला करू) ;-)
आमच्या घरी अनेक प्रकारात टाकतात. कधी उकडून तर कधी तळून. मागे ओरिसात गेलो तिथेही हा प्रकार चालतो, तिकडचा माणूस मला जरा पडेल स्वरात सांगायला लागला कि इथे बटाटा टाकतात म्हणून, कारण बहुतांश लोकांना त्याची सवय नसते.
मला एक सांगा, बिर्याणीत टाकतातच की बटाटा तळून. तो कुठे वाईट लागतो ?
31 May 2012 - 11:31 am | गवि
प्रासनामक महाकाय बलशाली इसम तो प्रयत्न हाणून पाडेल ना पण..
31 May 2012 - 3:35 pm | विश्वनाथ मेहेंदळे
एक वांगे एक्स्ट्रा नेऊ त्याच्यासाठी. खा म्हणावे किती कापे खातोस ती !!!
31 May 2012 - 10:21 pm | jaypal
उसका क्या होंगा विमे ? ;-)
2 Jun 2012 - 3:36 pm | प्रास
मी पण तेच म्हणतो ना, एक वांगेसे मेरा क्या होगा?
आयला, पुढल्या सडाफटिंग कट्ट्यात सामिष पाककृती करणार म्हणताय म्हणजे त्यातून माझा पत्ता कट करायचा कट शिजवताय की काय? :(
बाकी या पाकृ बाबत 'वाचली बरं का!' या उप्पर काही प्रतिक्रिया देता येत नै.... :)
30 May 2012 - 6:01 pm | सानिकास्वप्निल
झणझणीत!
तोंपासू :)
30 May 2012 - 6:30 pm | परिकथेतील राजकुमार
धागा 'वेल लेफ्ट' केल्या गेला आहे.
30 May 2012 - 6:51 pm | वेताळ
आपल्या प.बंगाल मध्ये अश्या पध्दतीने रस्सा करतात. त्यात बटाटे टाकुन मस्तपैकी रस्सा तयार होतो.माझे होस्टेल मधी ल बंगाली दोस्त अश्या प्रकारे रस्सा बनवत होते.
30 May 2012 - 6:56 pm | बॅटमॅन
होय, ते चिकनमध्ये बटाटा घालतात. कोलकात्यात असताना "चिकेन कोषा" नामक एक डिश खाल्ली होती, नेहमीचाच चिकन विथ करी असा प्रकार, पण बटाटे होते. चव अप्रतिम होती हेवेसांनल :)
2 Jun 2012 - 1:03 pm | विश्वनाथ मेहेंदळे
चिकन कस्सा असेल... त्यात वरून पाणी घालत नाहीत. चिकन किंवा मटणाला जे पाणी सुटते त्यातच ते शिजवतात. मस्त असते. ते पाणी कसून येते म्हणून कस्सा म्हणे :-)
31 May 2012 - 10:38 am | जागु
आमच्याकडेही बटाटे घालतात चिकन मटण मध्ये एक भर म्हणून, लहान मुलांना आवडतात शिवाय बटाटा छान लागतो मटणात.
सगळ्यांचे धन्यवाद.
31 May 2012 - 10:58 am | दिपक
मस्त ! :-)
31 May 2012 - 2:56 pm | रघु सावंत
मटण स्वच्छ धुवून त्याला वरील वाटण चोळून मुरवत ठेवा. त्या बरोबर मिठ, हळद आणी तिखट मसाला सुद्दा मटणाला व्यवस्थीत लावून ठेवा. असे केल्याने मिठ-हळद-मसाला त्यात मुरून मटण आणखी चविश्ट होते. थोड मसाला वाटणातही घालावा.
बटाट्या पेक्षा काजू टाकले तर.
एक शंका होती. टोमॅटो ची प्यूरी करताना , टोमॅटो शिजऊन घ्यावे कि काय?
1 Jun 2012 - 3:08 am | संदीप चित्रे
खाऊन पाहिल्याशिवाय चव कशी सांगणार ब्वॉ? :)
2 Jun 2012 - 10:45 am | जागु
काजू टाकतात ना मटणात. छान लागतात.
एकदा रश्यात टाकलेला बटाटा खाऊन बघाच खरच खुप टेस्टी लागतो.
2 Jun 2012 - 1:25 pm | विश्वनाथ मेहेंदळे
अमुक गोष्टीत तमुक टाकायचे या कल्पनेने अंगावर शहारे काढणाऱ्या लोकांची गम्मत वाटते.
या निमित्ताने आमच्या एका काकांची आठवण झाली... पिझ्झा-केचप, पास्ता-मोहरीची, चीजचे पेढे इ चर्चा पण आठवल्या ;-)
अवांतर :- काका हल्ली दिसत नाहीत