लिंबाचे लोणचे

जागु's picture
जागु in पाककृती
25 May 2012 - 12:17 pm

साहित्यः

१० लिंब
२ चमचे हळद
दिड चमचे लाल तिखट
पाव चमचा हिंग
८ चमचे मिठ
३-४ चमचे मोहरी डाळ
दिड चमचा मेथी
२ मोठ्या पळ्या तेल

(मी जास्त लिंबांच केलय लोणच. मोजून बघा :हाहा:)

पाककृती :

प्रथम लिंबू स्वच्छ धुवून, पुसुन त्याच्या आपल्या आवडी प्रमाणे प्रत्येक लिंबाच्या ४ किंवा ८ फोडी करुन घ्या.

आता एकीकडे मेथी थोड्या तेलावर भाजून वाटून घ्या. ती गार झाली की मिक्सरमध्ये तिची पुड करा. (साहित्याच्या फोटोत छोट्या वाटीत आहे)

लिंबाच्या फोडींवर मिठ टाकुन कालवून ठेवा.

१ पळीभर तेल चांगले गरम करून गॅस बंद करा व त्यात मोहरीची डाळ टाका.

आता ही फोडनी पुर्ण थंड होऊ द्या. हिंग, हळद, मिरचीपुड, मेथीपुडवर ही थंड झालेली फोडणी ओतून मिसळा.

आता हे मिश्रण मिठ चोळलेल्या लिंबांमध्ये एकजीव करा.

आता ह्या मसाला मिश्रीत फोडी एका बरणीत दाबून दाबून भरा.

राहीलेल तेल गरम करुन पुर्ण थंड करा व बरणीतील लोणच्यात ओता. झाकण घट्ट बंद करून ८-१० दिवस चांगले मुरल्यावर खायला घ्या.

अधिक टिपा:
लोणच्याचा तयार मसाला वापरू शकता पण त्यात माझ्यामते मजा येत नाही.

मेथीपुड बाजारात मिळते पण घरी केलेल्या पुडीला जास्त खमंगपणा असतो.

कोणत्याही लोणच्यात लोणच्याच्या फोडी बुडेपर्यंत तेल बरणीत घालावे म्हणजे लोणच्याला बुरशी चढत नाही.

प्रतिक्रिया

मस्तच मला फार फार आवडतं लिंबाचं लोणचं आणि त्यातल्या त्यात फोडणीच्या भाताबरोबर खायला तर काय पा.तों.पा.सु... मस्तच गं :)

चिंतामणी's picture

25 May 2012 - 12:46 pm | चिंतामणी

शेवटुन तीसरा आणि दूसरा फोटो पाहताना तोंडास प्रचंड पाणी सुटले.

लिंबाच्या गोड्या लोणच्याची पाकृ असेल तर टाक.

चिंतामणी पाकृ आहे पण फोटो नाही. म्हणून आधी करते मग टाकते.

चचा धन्स.

चिंतामणी's picture

25 May 2012 - 12:59 pm | चिंतामणी

धन्यु. :D

नेहरिन's picture

26 May 2012 - 7:39 pm | नेहरिन

पाकृ माझ्याकडे आहे पण फोटोसाठि केमेरा नाहि .म्हणुन मी टाकलि नाही.

चिंतामणी पाकृ आहे पण फोटो नाही. म्हणून आधी करते मग टाकते.

चचा धन्स.

प्रचेतस's picture

25 May 2012 - 1:16 pm | प्रचेतस

तोंडाला पाणी सुटले.

मनीषा's picture

25 May 2012 - 1:30 pm | मनीषा

वा ! मस्त ..

धनुअमिता's picture

25 May 2012 - 1:31 pm | धनुअमिता

मस्तच. नक्की करुन बघणार.

लोणचं मुरवत ठेव. मी पार्सल घ्यायला उरणलाच येतो.. :)

- पिंगू

मदनबाण's picture

25 May 2012 - 2:29 pm | मदनबाण

वा,,,मस्तच ! :)
तै, तुला आंबोशीचे लोणचे करता येते काय गं ?

(छुंदा प्रेमी) :)

अमृत's picture

25 May 2012 - 2:31 pm | अमृत

प्रतिक्रीया देणार???? तै भावना समजून घ्या..

अमृत

उदय के'सागर's picture

25 May 2012 - 2:36 pm | उदय के'सागर

व्वा, त्या लिंबाच्या फोडिंचा फोटो पाहुन काय ग्गाग्गार वाटलं म्हणुन सांगू. :)

सानिकाताईचि पाकृ पाहिल्यानंतर एकतर कमात लक्ष लागत नव्हतं.. कसंतरी कामाला सुरवात केली तर जागुतै ची पाकृ आली आणि अता पुन्हा 'जसै थे'... एकतर आधिच शुक्रवार.. कामाचा कंटाळा त्यात अश्या सुग्रणिंच्या पाकृ वाचुन आणि ते कातिल फोटो पाहुन अजुनच मन विचलीत होतं..
संपादकांना विनंती - सानिकातै, जागुतै, मृणालिनी, आणि गणपा ह्यांच्या ऐकमेकांच्या पाकृ मधे कृपया जरा २-३ दिवसांचे अंतर असावे ;) ... (पण त्यांच्यापैकी एकाची तरी पाकृ रोज येत राहो :))

मदनबाण येते ना आंबोशीचे लोणचे. आधी मला आंबोशी तयार करावी लागेल.

पिंगू ठिक आहे ठेउन देते.

अमृत, अमिता, मनिषा वल्ली धन्यवाद.

सूड's picture

25 May 2012 - 3:21 pm | सूड

रेशिपी छानच !! बरणीभर साखरांबा इकडे(म्हणजे पुण्यात) घेऊन आलो आहे, त्यामुळे लोणचं बघून जळजळ झाली नाही.

मी हा धागा उघडायच्या आधीच म्हट्ल कि हि जागुतै असणार

जबरा, तुम्ही हे कसं ओळखु शकता सांगाल का जरा ? एखादं वेळा ट्राय करुन पाहेन म्हणतो.

उदय धन्यवाद. २-३ दिवसाचे अंतर नको उगाच तुम्ही जोमाने काम कराल.

सूड धन्स.

उदय के'सागर's picture

25 May 2012 - 3:47 pm | उदय के'सागर

हा हा हा :)

(इथे काम न करायला आणि ते टाळायला निमीत्तच लागतं ;) )

मी हा धागा उघडायच्या आधीच म्हट्ल कि हि जागुतै असणार

विशाखा राऊत's picture

25 May 2012 - 4:43 pm | विशाखा राऊत

जागुताई बॅक इन अ‍ॅक्शन :)
एकदम सही

बिपिन कार्यकर्ते's picture

25 May 2012 - 7:17 pm | बिपिन कार्यकर्ते

छे!

अत्रुप्त आत्मा's picture

25 May 2012 - 8:00 pm | अत्रुप्त आत्मा

त्रास...त्रास....त्रास.... तोंडात पाणीच पाणी जाहले

छान.

आता या लोणच्याच्या पाच सहा बरण्या भराव्यात.

पहिली या वर्षीसाठी घ्यावी.

बाकीच्या थोडे जास्त मीठ घालून ठेवाव्यात.. त्या बरण्या ४, ५ किंवा ७,८ वर्षानी वगैरे उघडाव्यात.. छान काळे कुट्ट लोणचे तयार झालेले असते.. तोंडात ठेवल्यावर विरघळते.

कौशी's picture

26 May 2012 - 2:05 am | कौशी

आता उरण ला नक्की येणार बघ.

तोपर्यत मी करून बघणार लोणचे .

विशाखा, कार्यकर्ते, अतृप्त आत्मा, जामोप्या, कौशी प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

निवेदिता-ताई's picture

26 May 2012 - 12:28 pm | निवेदिता-ताई

खूपच छान.............................तो.पा. सु.

प्रभाकर पेठकर's picture

29 May 2012 - 12:50 am | प्रभाकर पेठकर

झक्कास.

एम्.पी.एल्. (मिसळ पाव लाजवाब) मध्ये अजून एक सिक्सर.

कैरीच्या लोणच्याची तयारी केली आहेच आता लिंबंही आणावी म्हणतो. माझी आई ह्या लोणच्यात हिरव्या मिरच्याही घालायची. त्यामुले मस्त हिरव्यागाSSर मिरच्याही आणाव्या लागणार.

जागु's picture

28 May 2012 - 10:55 am | जागु

निवेदिता ताई, प्रभाकर धन्यवाद.

शुचि's picture

1 Jun 2012 - 3:16 am | शुचि

सुपर्ब!!!

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2012 - 1:29 pm | परिकथेतील राजकुमार

लाजवाब !