दिल्लीवाली दाल फ्राय

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
19 May 2012 - 8:24 pm

खालील पाककृती शिरीन अनवर ह्यांची आहे :)

साहित्यः

१ कप चण्याची डाळ
१/२ कप तूरीची डाळ
१ टेस्पून कसूरी मेथी
१/२ टीस्पून हळद
१/४ टेस्पून हींग

वरील सर्व साहित्य प्रेशर कुकरला लावून ७-८ शिट्ट्या काढून शिजवून घेणे

मसाल्याचे साहित्यः

१ छोटा कांदा बारीक चिरलेला
एक टोमॅटो बारीक चिरलेला
१ टीस्पून बारीक चिरलेला लसूण
१/२ टीस्पून बारीक चिरलेले आले
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
कढीपत्ता काही पाने
२-३ टेस्पून साजूक तूप (तेवढे लागतेच ;))
१ टीस्पून जीरे
१ टीस्पून लाल तिखट
१ टीस्पून धणेपूड
१/२ टीस्पून गरम मसाला पावडर
मीठ चवीनुसार
बारीक चिरलेली कोथींबीर

.

पाकृ:

शिजवलेली डाळ पातेल्यात काढून थोडे पाणी घालून उकळी काढा.
दुसरीकडे एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जीरे घाला. जीरे तडतडू लागले की त्यात कढीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून फोडणी तयार करा.
आता त्यात बारीक चिरलेले आले व लसूण घालून परतून घ्या. (कच्चा वास गेला पाहीजे.)
चिरलेला कांदा व टोमॅटो घालून मऊ होईस्तोवर परता.
त्यावर लाल तिखट, मीठ, गरम मसाला, धणेपूड घाला व सगळा मसाला तूप सुटेपर्यंत परता.
शिजवलेल्या डाळीत हा परतलेला मसाला घाला व झाकून ७-८ मिनिटे शिजवा.
चिरलेली कोथींबीर घाला. आवडत असल्यास वरुन एक चमचा तूप सोडा.
ही डाळ जरा घट्टचं असते , पातळ हवी असल्यास थोडे पाणी घालावे.

.

ही डाळ तुम्ही साध्या भाताबरोबर, जीरा-राईस किंवा पराठ्याबरोबर सर्व्ह करु शकता.

.

प्रतिक्रिया

जयंत कुलकर्णी's picture

19 May 2012 - 8:39 pm | जयंत कुलकर्णी

करणार !

प्रभाकर पेठकर's picture

19 May 2012 - 8:41 pm | प्रभाकर पेठकर

व्वा.! क्षुधावर्धक छायाचित्रं आणि वर्णन. सोबत गव्हाची कडक तंदूरी रोटी आणि लिंबाचे लोणचे (किंवा पंजाबी पंचरंगी लोणचे) असेल तर, क्या कहेने..!

jaypal's picture

21 May 2012 - 7:56 pm | jaypal

सोबत गव्हाची कडक तंदूरी रोटी किंवा वाफळलेला भात आहाहा, आहाहा खयलोंमे खयालोंमे

सानिका तुझा सर्व करण्याचा जो मांडणी फोटो असतोना , शेवटचा
तो बघुन अक्षरशा भुकेश व्हायला होत :(

प्यारे१'s picture

21 May 2012 - 10:05 am | प्यारे१

भुकेश...!

व्हा की मग. करा सुरुवात! ;)

मुक्त विहारि's picture

19 May 2012 - 9:36 pm | मुक्त विहारि

छान छान

किसन शिंदे's picture

19 May 2012 - 10:28 pm | किसन शिंदे

व्वा!!

शेवटचा काय किंवा फोडणी देतानाचा काय सगळेच फोटो अप्रतिम! :)

सुहास झेले's picture

19 May 2012 - 10:32 pm | सुहास झेले

व्वा व्वा :) :)

अतिशय आवडता प्रकार. हॉटेलात त्या लहानश्या स्टील/पितळीच्या बालटीतून डाळ सर्व्ह करतात, तश्या दोन आणून ठेवल्या आहेत घरी... एकदम धम्माल :)

मोहनराव's picture

19 May 2012 - 10:33 pm | मोहनराव

मस्त!!

मोदक's picture

20 May 2012 - 9:51 am | मोदक

मस्त मस्त...!!!!

ओह्ह त्तेरी की दाल बनाई है ;) तुस्सी वी ना, एकदम ग्रेट हो सानिका दीद्दी :)
त्वाडी दिल्लीवाली दाल मेनु बडी चंगी लगदी है जी ,जल्दी ही ट्राय करांगे ;)

अत्रुप्त आत्मा's picture

20 May 2012 - 2:46 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटचा फोटू ग्रेट!
बाकीचे फटूही वेगळ्या प्रकारे दिल्याने छान वाटण्यात आल्या गेले आहे. ;)
ही दाल करून बघणारच.

दीपा माने's picture

20 May 2012 - 8:38 pm | दीपा माने

माझी आवडती डिश आहे. सानिका तुमच्या पाकृ मी नेहेमीच वाचत असते.

स्पंदना's picture

21 May 2012 - 6:05 am | स्पंदना

खुप दिवसांनी पाहिली डिश. विसरलीच होती.
धन्स हो सानिका. मी तुझ्या पाकृतले रोटी वा नान प्रकार करुन पाहिलेत. छान होतात.

लंगरवाली दाल आठवली.. कसली असते चवीला..

तूप लावलेल्या रोट्या आणि दाल खायला असली मजा येते ना..

- पिंगू

प्रचेतस's picture

21 May 2012 - 9:16 am | प्रचेतस

आणिक काय बोलू?
शब्दच संपलेत आता.

स्वप्निल घायाळ's picture

21 May 2012 - 11:24 am | स्वप्निल घायाळ

लय भारी !!!!

नाना चेंगट's picture

21 May 2012 - 12:46 pm | नाना चेंगट

वारलो !!

स्वातीविशु's picture

21 May 2012 - 1:27 pm | स्वातीविशु

वा... मस्त.... करायलाच पाहीजे आता. :)

छान दिसतेय डाळ म्हणजे चवीला पण छानच असणार

प्यारे१'s picture

21 May 2012 - 3:26 pm | प्यारे१

चला, आता इकडे सानिका शो धणं आलं.... ;)

मी-सौरभ's picture

21 May 2012 - 6:19 pm | मी-सौरभ

वैनी मिपावर नसतात म्हणून मोकळे सुटता प्यारेभौ तुम्ही.
वैणीना पण मिपाकर बनवायला पाहिजे ;)

ऋषिकेश's picture

21 May 2012 - 3:36 pm | ऋषिकेश

आजच करणार
साहित्य सगळं घरातलंच आहे हे विषेश

निवेदिता-ताई's picture

21 May 2012 - 5:51 pm | निवेदिता-ताई

मस्तच...मला फ़ार आवडते :)

Pearl's picture

21 May 2012 - 7:56 pm | Pearl

छान पाककृती.

फक्त शेवटच्या फोटोमध्ये डेकोरेशन करण्यासाठी सुकी लाल मिरची जास्त छान दिसली असती

सगळं साहित्य होतच म्हणून लगेच करून पाहिली.
दाल अगदी चवदार झाली पण त्यामुळे मी केलेली फ्लॉवरची भाजी उरली. ;)

निवेदिता-ताई's picture

22 May 2012 - 10:49 pm | निवेदिता-ताई

दाल फ़्राय पुढे फ्लॉवरची भाजी कोण खाणार????

सानिकास्वप्निल's picture

22 May 2012 - 9:55 pm | सानिकास्वप्निल

सगळ्यांचे आभार :)

चिंतामणी's picture

23 May 2012 - 11:14 am | चिंतामणी

या पुढे सानीकाच्या पाकृ बद्दल एव्हढीच प्रतिक्रीया देण्यात येइल. त्यात छान, उत्तम, जबरदस्त, लाळ गळाली, कातील वगैरे वगैरे या प्रतिक्रीया गृहीत धराव्या.

सानीकाने उतरोत्तर "शाकाहारी" पाकृंची सख्या वाढवावी ही विनंती करून माझा प्रतीसाद संपवतो.

अवांतर- शाकाहारी मिपाकरांना सानीकाने त्यांना खाण्याजोकता पदार्थ टाकल्यामुळे "इनो"चे सेवन करावे लागले नसणार. ;)

ही डाळ तुम्ही साध्या भाताबरोबर, जीरा-राईस किंवा पराठ्याबरोबर सर्व्ह करु शकता.

पण आमच्या हाताला तशी चव आली तर मज्जा येईल.

रघु सावंत's picture

31 May 2012 - 3:17 pm | रघु सावंत

सानीकाने उतरोत्तर "शाकाहारी" पाकृंची सख्या वाढवावी ही विनंती करून माझा प्रतीसाद संपवतो.
इति - चिंतामणी
पण सायबा वरिल प्रतिक्रियेला माझा सप्शेल विरोध आहे. कारण असं झालं तर आमच्या सारख्या मावसाहारी लोकांचे हाल होणार त्याचे काय.= रघू सावंत

स्मिता.'s picture

31 May 2012 - 3:49 pm | स्मिता.

मावसाहारी म्हणजे तुम्ही काय मावश्याला खाता की काय? ;)
कृपया हलकेच घेणे :)

जिराराईसच्या जोडीने ही दाल फ्राय आली की तो आनंद काय वर्णावा.
अगदी कोंबडीही फिकी पडते या जोडी पुढे.

बाकी पाकृ, फोटो या बद्दल सध्या (बोलायला काही न उरल्याने) बोलणं सोडलय. ;)

परिकथेतील राजकुमार's picture

31 May 2012 - 3:54 pm | परिकथेतील राजकुमार

मानवंदनेचा स्विकार व्हावा !

ऋषिकेश's picture

12 Jun 2012 - 5:18 pm | ऋषिकेश

या विकांताला ही दाल केली होती!
अप्रतिम झाली होती!

फक्त धण्याची पुड करायला कंटाळा आला होता. (म्हंजे धुतलेलं मिक्सरचं भांड पुन्हा वापरायला :) ) तेव्हा पटकन खलबत्यात धणे- लाल मिरची सोबत कुटले.. तरीहि चव जबरा आली होती.

लवकरच फटू चढवतो.