मध्यम ते दीर्घ मुदतीची गुंतवणूक...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
23 Oct 2007 - 9:18 am
गाभा: 

राम राम मंडळी,

खालील कंपन्यांचे समभाग आम्हाला मध्यम ते दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीकरता योग्य वाटत आहेत. साधारणपणे येत्या वर्षा-दोन वर्षांच्या कालावधीत सदर समभाग प्रतिवर्षी ३० ते ४०% परतावा मिळवून देतील असा आमचा अंदाज आहे. साधारणपणे सध्याच्या बाजारभावात (किंवा कंसात दिलेल्या किंमतीच्या रेंजमध्ये ) हे समभाग खरेदी करावेत!

किंमत/उत्पन्न गुणोत्तर, प्रति समभाग उत्पन्न, लाभांश, मागील वर्षीचे आणि गेल्या तिमाहीचे विक्रीचे आणि निव्वळ नफ्याचे आकडे, इत्यादी सर्व निकषात हे समभाग आम्हाला समाधानकारक वाटल्यामुळे आम्ही ते इथे सुचवत आहोत!

1) ABC Bearings (89 - 92)
2) Canfin Home ( 55-58)
3) Omax Auto ( 58 -63 )
4) City Union Bank ( 208 - 211)
5) First Leasing ( 45 - 47)
6) Deccan Cement ( 225 - 228)
7) Deepak Nitrate ( 100 - 105)
8) Savita Chemicals ( 260 - 266)
9) SRF ( 127 - 133) --------> STRONG BUY!!
10) Sukhjit's Strach ( 138 - 142)
11) India Nippon Batterys ( 144 - 150)
12) Micro Tech ( 208 - 212 )
13) Seshasayee Paper ( 161 - 170)

सूचना -

१) ज्याची नजिकच्या भविष्यात काही कमिटमेन्ट आहे असा निधी कृपया वरील कंपन्यात गुंतवू नये!
२) 'अमूक अमूक परतावा मिळेल' अशी लेखी खात्री समभाग बाजारात कुणीच देत नसल्यामुळे वरील समभागात गुंतवणूक करताना आपण आपले पैसे गंगेत टाकले असेच समजून चालावे! :)
३) वरील सर्व समभागात थोडी थोडी गुंतवणूक करावी, 'Never put your all eggs in a single basket' हा नियम आवर्जून पाळावा!

डिस्क्लेमर -

१) माझी वरील सर्व समभागात गुंतवणूक आहे व त्यात माझा आर्थिक स्वार्थ दडलेला आहे.
२) वरील कंपन्यांच्या समभागात पैसे गुंतवल्यामुळे होणार्‍या फायद्याकरता अथवा तोट्याकरता तात्या अभ्यंकर, मिसळपाव पंचायत समिती, तसेच मिसळपाव डॉट कॉम हे कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी!

कळावे,

आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.

प्रतिक्रिया

राजे's picture

23 Oct 2007 - 9:36 am | राजे (not verified)

Omax Auto ( 58 -63 ) [ह्यांची काही कामे माझ्याकडे आहेत अंदाज चागला आहे झुकते माप देण्यास हरकत नाही]
City Union Bank [हम्म वाटले होतेच तुम्ही हे लिहाल असे]
Micro Tech / Seshasayee Paper [कारण ?]

"वरील कंपन्यांच्या समभागात पैसे गुंतवल्यामुळे होणार्‍या फायद्याकरता अथवा तोट्याकरता तात्या अभ्यंकर, मिसळपाव पंचायत समिती, तसेच मिसळपाव डॉट कॉम हे कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी!"

असं कसं ? तात्या हे काही बरोबर नाही, नियम बदला ;}

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

विसोबा खेचर's picture

24 Oct 2007 - 11:39 am | विसोबा खेचर

9) SRF ( 127 - 133) --------> STRONG BUY!!

दोनच दिवसांपूर्वी आम्ही वरील समभाग सुचवला होता तेव्हा तो १२८/१२९ च्या भावात मिळत होता. आज त्याचा भाव १३७ आहे. दोन दिवसात ६-७% परतावा काही वाईट नाही! :)

अरे कुणी हा समभाग घेतला आहे काय??? :)

असो, बाकीचे समभागही चांगले आहेत. माल लेके बैठ जाओ!

SRF मुळे आमचा आजचा बुधवार मजेत जाईल....:)

तात्या.

तात्या,

तुमच्या सल्ल्याप्रमाणे ३७८ ला पुंज लॉयड घेतला होता.
तो आज ४०० च्या पुढे गेला होता. आत्ता थोडा उतरला आहे. ३९८ आहे
पण प्रत्येक शेअरमागे २० रुपये हा परतावा काही वाईट नाही.

हे शेअर्स होल्ड करुन ठेवू की फुकून टाकू?

तसेच रिलायन्स पेट्रोलियम जास्तीत जास्त किती वाढू शकेल?
१८० ला घेतला होता तो आज १९० आहे.

(सध्या वनडे च्या फास्ट ट्रॅकवर पळणारा) सागर

गुंडोपंत's picture

24 Oct 2007 - 3:49 pm | गुंडोपंत

पुर्वी एका ठिकाणी
मिळलेल्या सल्ल्यानुसार... २५% फुकल्यास उत्तम!

आपला
गुंडोपंत

जुना अभिजित's picture

24 Oct 2007 - 3:55 pm | जुना अभिजित

तसेच रिलायन्स पेट्रोलियम जास्तीत जास्त किती वाढू शकेल?
१८० ला घेतला होता तो आज १९० आहे.

पेट्रो कंपनीची अजून फॅक्टरी सेट अप होत आहे. पुढच्या मे मध्ये की काहीतरी प्रॉडक्षन सुरु होईल. तेव्हा या शेअरचा भाव २०० राहणार नाही. आम्ही १०० ने ५० शेअर घेतले आहेत. पण एकूण१०० घेऊन ठेवणार आहे. डायरेक्ट २-३ वर्षानंतर बघायचा. १००० च्या घरात असेल.

करलो दुनिया मुट्ठी मे. ;-)

अभिजित

सागर's picture

24 Oct 2007 - 5:54 pm | सागर

ओहो
अभिजित तुम्ही तर अलिबाबाच्या खजिन्यासारखा १००० हा आकडा सांगितलात
मी नक्की रिलायन्स पेट्रोलियमचे शेअर्स होल्ड करेन.
२-३ वर्षांनी १ शेअर १००० ला विकला तर फायदा किती?
वा वा. एक्दम झकास बातमी दिलीत राव
तरी म्या म्हनत व्हतो रिलायन्स चे शेअर्स आन् एव्हढे स्वस्त कसे?
पुढच्या महिन्यात रिलायन्स पॉवरचा इश्यू येतो आहे. तो पण दीर्घ मुदतीसाठी चांगला असेल असे वाटते.

मनापासून धन्यवाद
सागर

जुना अभिजित's picture

25 Oct 2007 - 3:18 pm | जुना अभिजित

पण पावर महाग असेल बहुतेक. अनिलने काहीतरी झोल्झाल करून एनर्जीचा शेअर ५०० चा १५०० करून ठेवला आहे.

आपल्याला बुवा काहे कळालं नाही.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

पावर आणि एनर्जी दोन्ही वेगवेगळे शेअर्स आहेत असे वाटते.

पावर नक्की कशासाठी काढतोय ते काय आपल्याला पण अंदाज नाही येत
पेट्रोलियमचा शेअर मात्र जोरात वाढत आहे ही माझ्यासाठी तरी आनंदाची बातमी आहे.
(रिलायन्स पेट्रो १००० कधी पार होतो याची वाट पाहणारा) सागर

जुना अभिजित's picture

26 Oct 2007 - 1:23 pm | जुना अभिजित

रिलायन्स एनर्जीकडून सगळे प्रोजेक्ट्स रिलायन्स पावर कडे ट्रान्सफर केल्याची बातमी होती. बघुया काय होते.

पार्ट पेमेंट पद्धत असेल तर बर पडेल आयपीओत पैसे टाकायला.

आता जवळ जवळ सगळेच शेअर्स वाढले आहेत. त्यामुळे कशाची खरेदी करायची या चिंतेत आहे.

अभिजित

अभिजितराव
असे असेल तर या शेअर ला २-३ वर्षांनी सोन्याचा भाव येईल

रिलायन्स पावर या आय.पी.ओ. मधे जास्तीत जास्त माल गुंतवायला पाह्यजे
शेअर्स कितीचे का असेना. पण २-३ वर्षात पैका भारी मिळेल.

(शेअरबाजाराच्या गुंतवणूकीतून करोडपती व्हायचे स्वप्न पाहणारा) सागर

आवडाबाई's picture

29 Oct 2007 - 12:49 pm | आवडाबाई

अभिजितराव,

रिलायन्स पेट्रो डायरेक्ट २-३ वर्षानंतर बघायचा. १००० च्या घरात असेल.
सहमत.

आर एन आर एल बद्दल आपले काय मत? घेऊन ठेवावेत काय, असेच २-३ वर्षे विसरून जाण्यासाठी?

आजानुकर्ण's picture

29 Oct 2007 - 1:42 pm | आजानुकर्ण

आरपीएल पेक्षा लार्सन घ्या. किंवा भेल. थोडा खाली आला की लगेच घ्या आणि पाच वर्षे थांबा. सोनं आहे सोनं.

जुना अभिजित's picture

31 Oct 2007 - 10:13 am | जुना अभिजित

एकूण आरेनारेलची प्रगती पाहता हा शेअर रेलायन्स इंड बरोबर चाललेल्या कोर्ट केस (तडजोडीचा सल्ला दिला आहेच कोर्टाने)वर अवलंबून आहे. तरीही आरेनारेलच्या बाजूने निकाल लागण्याची आणि त्यांना गॅस चा योग्य वाटा मिळण्याची शक्यता जास्त आहे. अर्थात त्यामुळेच अचानक ५० चा शंभर झाला होता.

पण एकंदरीत चांगला शेअर असला तरी इथून पुढे संथगतीने सरकत राहील. पण पुढे जसे काँन्ट्रॅक्ट्स मिळतील तसा वाढेल. गुरगाव्-नोयडा मध्ये गॅस पुरवण्यासाठी बीड केले आहे. दीर्घ मुदतीसाठी चांगला आहे.

मार्केटवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

यशोदेचा घनश्याम's picture

5 Nov 2007 - 8:21 pm | यशोदेचा घनश्याम

आज अचानक ३०% नी वाढला. मागच्या आठवड्यातहि शेवटि जोरात वाढत होता.
काय कारण असावे?

वाढत राहील? परत खाली येईल? आणखी थोडा वाढून थांबेल?.....
काय मत आहे?

- यशोदेचा घनश्याम.

जुना अभिजित's picture

6 Nov 2007 - 8:45 am | जुना अभिजित

तडजोड करण्यासाठी न्यायालयाने ३ महीन्याची मुदत दिलेली होती. शुक्रवारी आरेनारेल आणि रेलइंड ची बोलणी सुरु झाली.

बाकी शेअरचा इतिहास वगैरे फार जुना नसल्याने आणि प्रॉडक्षन सुरु नसल्याने किती वाढेल सांगता येत नसल्याने अस्मादिकांनी सावध पवित्रा घेतला आहे. शेअर २४ रुपयाचा असल्यापासून पाहतो आहे. २४-->५० सावकाश झाला. पण ५०--१०० आणि १२०-->१८४ दोन दोन दिवसातच झालेला आहे.

रिस्क उचलण्याची क्षमता असेल तर घ्यायला हरकत नाही. लोच्या झाला तर तात्याबा म्हणतात तसे गंगेत गेले असं समजायचं

अभिजित

आवडाबाई's picture

29 Oct 2007 - 12:55 pm | आवडाबाई

ला घेतला होता एनर्जी!! मज्जा !

यशोदेचा घनश्याम's picture

1 Nov 2007 - 6:38 pm | यशोदेचा घनश्याम

अभिजीतराव,

१८२ ला घेतला होता.
आणखी घ्यावे म्हणतो. आज २५९ ला बंद झाला.
मार्केट उतरण्याची वाट पहावी, की आत्ताच घ्यावेत?
काय अंदाज?

यशोदेचा घनश्याम

जुना अभिजित's picture

2 Nov 2007 - 10:02 am | जुना अभिजित

माझ्याकडे १०० ने होते. मार्केट पडायची वाट बघेपर्यंत १८० झाला. म्हणून तुम्ही घेतला तेव्हा मीही १८५ ने घेतला.

हा शेअर मार्केट पडले तरी प्रचंड खाली वगैरे येत नाही. काल मार्केट जरा पडीक होतं. आणि आजही पडलं तरी पेट्रो २०० च्या खाली येणार नाही.(असा माझा अंदाज आहे).

तेव्हा परत २०० येईल तेव्हा मी घेईन असं म्हणालात तर काहीच मिळणार नाही. २३०-२४० वगैरे झाला तर अजून थोडे आपल्या पोतडीत टाकून ठेवायचे.

खाली आला की घ्यायचा २ वर्षे विकायचा नाही.

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

गुंडोपंत सल्ल्याबद्दल धन्यवाद

तरी २५% ला फुकायचे म्हणजे पुंज लॉयड ४७२ तरी हवा.
असो शेअर बाजाराचे स्वरुप पाहता १-२ आठवड्यात हा आकडा पार होईल असे वाटते :)
तेव्हा नक्की फुकून टाकतो हे शेअर्स

(फाश्टकमाई सुरु केलेला ) सागर

आवडाबाई's picture

29 Oct 2007 - 12:43 pm | आवडाबाई

२५% ला फुकायचे
आपल्याकडे असलेल्या एकूण शेअर्सपैकी २५% शेअर्स काढून टाकू शकता !!!'भाव" २५% ने वाढल्यावर नव्हे !!
असेच म्हणायचे होते ना गुंडोपंत ?

पुंज लॉईड आजच फुकून टाकले ४७५.६० ला :)

२५% पेक्षा जास्त परतावा. दुर्दैवाने जास्त शेअर्स विकत नव्हते घेतले.
त्यामुळे माझी फक्त आजची रात्री हॉटेलमधे जेवायची सोय झाली ...
बाजार पडला की परत पुंज लॉईड घेणार आहे ... पण मोठा परतावा मिळवण्यासाठी किमान १००-२०० शेअर्स तरी घेतले पाहीजे
असो.... सध्यातरी भागले आहे :)

(दिवाळीसाठी ११-१२ दिवस अदृष्य होणारा) सागर

कोलबेर's picture

26 Oct 2007 - 8:45 am | कोलबेर

सध्या तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अमेरिकेत OVTI, इंटेल, आणि एन व्हीडीयाचा शेअर बरा दिसतोय. खरेदी करावी का? VASCO Data Security Intl देखिल $१३ पडला आहे. घ्यावा का?

6) Deccan Cement ( 225 - 228)

चार दिवसांपूर्वी आम्ही वरील समभाग सुचवला होता तेव्हा तो २२५ च्या भावात मिळत होता. आज त्याचा भाव २५७ आहे. चार दिवसात १४% परतावा काही वाईट नाही! :)

अरे कुणी हा समभाग घेतला आहे काय??? :)

आम्ही हा समभाग घेतला होता, आज अर्धा माल विकला.

असो, बाकीचे समभागही चांगले आहेत. माल लेके बैठ जाओ!

Deccan Cement मुळे आमचा येता शनिवार मजेत जाईल....:)

तात्या.

6) Deccan Cement ( 225 - 228)

सात दिवसांपूर्वी आम्ही वरील समभाग सुचवला होता तेव्हा तो २२५ च्या भावात मिळत होता. आज त्याचा भाव ३०४ आहे. सात दिवसात ३५% परतावा काही वाईट नाही! :)

असो, बाकीचे समभागही चांगले आहेत. माल लेके बैठ जाओ!

आपला,
(अनुभवी) तात्या.

राजे's picture

29 Oct 2007 - 9:19 pm | राजे (not verified)

मी मी... घेतले होते... Deccan Cement ( २३२.०० X २०० = ४६४००.०० ला)
व विकले आज ३००.०० X २०० = ६००००.०० ला.... दिवाळी जोरात आहे.. आमची देवा...

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

विसोबा खेचर's picture

30 Oct 2007 - 1:13 am | विसोबा खेचर

दिवाळी जोरात आहे.. आमची देवा...

क्या बात है! मिठाईचं बॉक्स पाठवून दे रे बाबा! :)

5) First Leasing ( 45 - 47)

चार दिवसांपूर्वी आम्ही वरील समभाग सुचवला होता तेव्हा तो ४५ च्या भावात मिळत होता. आज त्याचा भाव ४९.५ आहे. चार दिवसात १०% परतावा काही वाईट नाही! :)

अरे कुणी हा समभाग घेतला आहे काय??? :)

आम्ही हा समभाग घेतला होता, आज अर्धा माल विकला.

असो, बाकीचे समभागही चांगले आहेत. माल लेके बैठ जाओ!

Deccan Cement आणि First Leasing मुळे आमचा येता शनिवार मजेत जाईल....:)

तात्या.

केरो लक्ष्मण छत्रे's picture

28 Oct 2007 - 4:04 pm | केरो लक्ष्मण छत्रे

राष्ट्रसंत तात्यामहाराज देवगडकर यांस,

आपण नमूद केलेले समभाग किती घ्यावेत? आम्ही या क्षेत्रात फारच नवीन आहोत पण आपल्या ह्या संकेतस्थळावरील असामान्य मार्गदर्शनामुळे श्रीमंतीची स्वप्ने आम्हालाही पडायला लागली आहेत.

आमची आर्थिक स्थिती हलाखीची नसली तरी बेताचीच आहे. आम्ही संस्कृत विषयाचे प्राध्यापक होतो. पण काही वर्षांपूर्वी अनेक महाविद्यालयातून संस्कृत विषय काढून टाकण्यात आला, त्यात आमची नोकरी गेली. उत्पन्नाचे दुसरे कोणतेच साधन नसल्यामुळे, पुढे आमच्याच महाविद्यालयात आम्हाला सहाय्यक - ग्रंथपाल म्हणून रहावे लागले. एका प्राध्यापकाला सहाय्यक - ग्रंथपाल म्हणून काम करावे लागणे यात किती यातना आहेत ते लोकांना समजणे कठीण. नोकरीतील शेवटची आठ वर्षे आम्ही त्या अवस्थेत काढली. असो.

म्हणून म्हटले की आमच्यासारख्या दारिद्र्यात वावरणाया माणसाने किती समभाग घ्यावेत?

प्रो. केरोनाना छत्रे

विसोबा खेचर's picture

28 Oct 2007 - 4:39 pm | विसोबा खेचर

१) ज्याची नजिकच्या भविष्यात काही कमिटमेन्ट आहे असा निधी कृपया वरील कंपन्यात गुंतवू नये!
२) 'अमूक अमूक परतावा मिळेल' अशी लेखी खात्री समभाग बाजारात कुणीच देत नसल्यामुळे वरील समभागात गुंतवणूक करताना आपण आपले पैसे गंगेत टाकले असेच समजून चालावे! :)
३) वरील सर्व समभागात थोडी थोडी गुंतवणूक करावी, 'Never put your all eggs in a single basket' हा नियम आवर्जून पाळावा!

वरील ३ सूचना ध्यानात घेऊन आपण आपल्या आयपतीप्रमाणे गुंतवणूक करावी...

तात्या.

आजानुकर्ण's picture

30 Oct 2007 - 11:59 am | आजानुकर्ण

तात्या,

रेलिगेअर आयपीओ बद्दल काय म्हणणं आहे? खूप लहान आहे आयपीओ. उगाच पैशे ब्लॉक होतील असे वाटते. पण लिष्टिंग झकास होईल यात शंका नाही.

(आयपीओ गुंतवणूकदार) आजानुकर्ण.

विसोबा खेचर's picture

30 Oct 2007 - 1:15 pm | विसोबा खेचर

आयपीओ बद्दल (प्रायमरी मार्केट) माझा फारसा अभ्यास नाही, त्यामुळे त्याबाबत मला फारशी माहिती नाही...

आपला,
(सेकंडरी मार्केटवाला) तात्या.

तात्या, आजानुकर्ण

वरुण इंडस्ट्रीजचा आय.पी.ओ. चालू आहे सध्या. उद्या लाश्ट दिवस आहे.
६० रुपये प्रति शेअर्स घेणे फायदेशीर ठरेल का?
कोणी घेतले आहेत का हे शेअर्स?
हे शेअर्स दीर्घ मुदतीसाठी की अल्प मुदतीसाठी घ्यायचे?

घ्यावे की न घ्यावे?
सागर

विसोबा खेचर's picture

30 Oct 2007 - 1:12 pm | विसोबा खेचर

Canfin Home ( 55-58)

सात-आठ दिवसांपूर्वी आम्ही वरील समभाग सुचवला होता तेव्हा तो ५६ च्या भावात मिळत होता. आज त्याचा भाव ७५ आहे. सात-आठ दिवसात ३४% परतावा काही वाईट नाही! :)

अरे कुणी हा समभाग घेतला आहे काय??? :)
अरे कुणी हा समभाग घेतला आहे काय??? :)
अरे कुणी हा समभाग घेतला आहे काय??? :)

आम्ही हा समभाग घेतला होता, आज अर्धा माल विकला.

असो, बाकीचे समभागही चांगले आहेत. माल लेके बैठ जाओ!

अरे मुलांनो, मी सांगितलेले समभाग घेऊन ठेवत जा रे! ते फंडामेन्टली चांगले असतात आणि भाव पडला तरी त्यात घाबरण्यासारखे किंवा पॅनिक होण्यासारखे फारसे काही नसते. बाजारात चालणार्‍या सट्ट्याशी त्याचा काहीही संबंध नसतो एवढंच कृपया ध्यानात घ्या. आम्ही गेली अनेक वर्षे बाजारात आहोत परंतु सट्टा चालणार्‍या समभागांकडे आम्ही नेहमीच दुर्लक्ष केले आहे आणि यापुढेही करू!

असो, Canfin Home मुळे आमचा उद्याचा बुधवार मजेत जाईल....:)

तात्या.

आवडाबाई's picture

31 Oct 2007 - 4:24 pm | आवडाबाई

अरे मुलांनो, मी सांगितलेले समभाग घेऊन ठेवत जा रे!
आता हळू हळू पटायला लागलं बघा !!

ह्या वेळेला नाही घेतले खरे ह्यातले एकपण, पुन्हा सांगाल तेव्हा सट्ट्याच्या बरोबरीने आम्ही फंडामेन्टली चांगले शेअर्स सुद्धा घेऊ (पैसे असल्यास)

विसोबा खेचर's picture

31 Oct 2007 - 6:22 pm | विसोबा खेचर

ह्या वेळेला नाही घेतले खरे ह्यातले एकपण, पुन्हा सांगाल तेव्हा सट्ट्याच्या बरोबरीने आम्ही फंडामेन्टली चांगले शेअर्स सुद्धा घेऊ (पैसे असल्यास)

आवडाबाई, माझा सल्ला असा राहील की सट्टेवाल्या समभागात एकही पैसा न लावता सर्व पैसे फंडमेन्टली चांगल्या समभागतच लावावेत. सट्ट्यातील समभागात भरपूर पैसे मिळतात, नाही असं नाही. परंतु एक दिवस असा नक्की उजाडतो की त्या दिवशी अश्या समभागांमुळे जेवढे पैसे मिळालेले असतात त्याच्या दसपट जातात!

त्यापेक्षा फंडामेन्टली चांगल्या असलेल्या समभागातच पैसे टाकून बसावे, आणि निवांतपणे लाभांश वगैरे खावा! अश्या समभागात बाजार क्रॅश झाला तरी घाबरण्याचं कारण नसतं. एक ना एक दिवस त्या समभागांना उत्तम भाव येतो.

अर्थात, हे आमचे अनुभवाचे बोल! आम्ही बाजार क्रॅश होतो म्हणजे काय होतं हे बघितलेलं आहे. लागोपाठ आठ आठ दिवस खालची सर्कीट लागतात आणि हातातला सट्टेवाल्या समभागांचा माल विकताही येत नाही!

उदा, हिमाचल फ्युचरिस्टिक हा समभाग एकेकाळी सट्ट्याचा म्हणून प्रसिद्ध होता. ह्या समभागात सुरवातील लोकांना भरपूर पैसे मिळत गेले. असं होत होत त्याचा भाव २३००-२४०० च्या घरात गेला. तेव्हाही लोकांनी हा समभाग लवकरच २८००-३००० होणार म्हणून कर्ज काढून लाख्खो रुपये यात टाकले होते. शेवटी व्हायचं तेच झालं, आज या समभागाचा भाव अवघा २५-३० रुपये आहे! अनेकांनी हिमाचलमध्ये मार खाऊन १५ व्या मजल्यावरून उड्या मारलेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत!

अर्थात, हे सर्व आमचे अनुभवाचे बोल. पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या!

आपला,
(फण्डामेन्टल एनालिष्ट!) तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट,
मुंबई -२३.

--
पीके ना भूक लगे, ना रहे दर्द कोई
गरीबोका तो नही, ऐसा हमदर्द कोई
कब तक हम आहे भरते, ना पीते तो क्या करते,
पी गई आग हमे, डस गये नाग हमे
सुना है जेहेरको ही जेहेर मारा करता है!

ना पुछो कोई हमे, जेहेर क्यो पी लिया,
जेहेर ये पी लिया तो थोडासा जी लिया!
ना पुछो कोई हमे...

राजीव अनंत भिडे's picture

31 Oct 2007 - 7:49 pm | राजीव अनंत भिडे

ना पुछो कोई हमे, जेहेर क्यो पी लिया,
जेहेर ये पी लिया तो थोडासा जी लिया!
ना पुछो कोई हमे...

बरोबर! आज तात्याचा बुधवार, म्हणून बहुतेक वरील ओळी लिहून गायब झालेला दिसतो आहे!

आता कुणीतरी सांभाळायला हवं या अवलियाला, असं वाटतं!

राजीव अनंत भिडे,
हिंदु कॉलनी, मुंबई.

आवडाबाई's picture

31 Oct 2007 - 9:28 pm | आवडाबाई

सांगू का तात्या, ह्याचा अनुभव आता आलाय - छोट्या प्रमाणात का होईना.
(छोट्या प्रमाणात, कारण फक्त जे पैसे खरोखरच लगेच नको असतात तेवढेच सट्टा मध्ये टाकते, कर्ज वगैरे काढून नाही, तसे कधी करणारही नाही )
ईक्विटी घ्यायचे ते घेतच असते, त्यावर काही उरले तरच एफएनओ ! पण आता जरा मार्केटची भितीपण वाटायला लागलीये, तेव्हा जरा फण्डामेन्टलस वर भर द्यायचा विचार आहेच, कसें ?

विसोबा खेचर's picture

30 Oct 2007 - 1:20 pm | विसोबा खेचर

City Union Bank ( 208 - 211)

सात-आठ दिवसांपूर्वी आम्ही वरील समभाग सुचवला होता तेव्हा तो २०९ च्या भावात मिळत होता. आज त्याचा भाव २३० आहे. सात-आठ दिवसात १०% परतावा काही वाईट नाही! :)

अरे कुणी हा समभाग घेतला आहे काय??? :)
अरे कुणी हा समभाग घेतला आहे काय??? :)
अरे कुणी हा समभाग घेतला आहे काय??? :)

आम्ही हा समभाग घेतला होता, आज अर्धा माल विकला.

असो, बाकीचे समभागही चांगले आहेत. माल लेके बैठ जाओ!

तात्या.

राजे's picture

6 Nov 2007 - 11:02 pm | राजे (not verified)

"City Union Bank [हम्म वाटले होतेच तुम्ही हे लिहाल असे] "
मी मी मी.... सर मी घेतला फायदा.. पण यावेळी आकडा नाही सांगणार.... मजाच मज्जा झाली आहे... दिवाळी ..नवीन गाडी नक्की.. हे वर्ष आम्हाला चांगलेच लाभले आहे...

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

दोस्त लोक,
मागे मी भविष्यवाणी केल्याप्रमाणे सेन्सेक्स खाली येतोय हो....
सकाळी चांगलाच चढवला होता सट्टेवाल्यांनी
आत्ता ३.३० वाजता 19071.36 आहे
दिवस संपेपर्यंत परत १८९०० च्या आस पास येईलसे वाटते

बघुयात :)
१६५०० पर्यंत पडेल या १-२ आठवड्यात असे वाटतेय .. कदाचित स्वप्नही असेल हे - हा हा हा...
तरी १७५००-१८००० पर्यंत यावे म्हणजे खरेदी करता येईल
(खरेदीसाठी मार्केट खाली येण्याची वाट पाहणारा ...) सागर

प्रमोद देव's picture

13 Nov 2007 - 3:38 pm | प्रमोद देव

सागर बाजार रोज ३.३०लाच बंद होतो बरं का!
फक्त सन आऊटेज च्या काळात तो ४.१५ पर्यंत उघडा असतो. अर्थात तेव्हा तो मध्यंतरी पाऊण तास बंदही असतो.
रोज सकाळी ९.५५ ते दुपारी ३.३० ही बाजाराची वेळ आहे.

नित्यानंद काका

शेअरबाजाराची वेळ निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद
मी बापडा समजत होतो की ५ वाजेपर्यंत सेन्सेक्स चा कारभार चालत असेल.
असो...

आज नही तो कल सही.... :)

उद्या दिवसाची सुरुवातच कोसळण्याने होणार की नाही ते बघाच,,,
कधी एकदा बाजार पडेल आणि मी चांगले शेअर्स विकत घेईन असे झालेय...
असो... बघुयात उद्या काय होतेय ते...

(फाश्ट शेअर खरेदी विक्री करायची विच्छा बाळगणारा ...) - सागर

सेन्सेक्सची कोटीच्या कोटी उड्डाणे चालूच आहेत
आज कोसळेल असे वाटले होते पण आज तर रेकॉर्डच केले.
833.70 पॉईंट्स नी उडीच मारली आज. आज काही खरेदीसाठी योग्य दिवस दिसत नाही :(

असो... उद्या तरी खाली येईल असे वाटते आहे. लेट्स सी....
(खरेदीसाठी वाट पाहूनी जीव शिणलेला) सागर

जुना अभिजित's picture

14 Nov 2007 - 3:57 pm | जुना अभिजित

गेल्या ८वड्यात मार्केट पडलं होतं तेव्हा केली की नाही खरेदी?

मिसळीवरची तर्री चापण्यासाठी आलेला अभिजित

सागर's picture

16 Nov 2007 - 6:52 pm | सागर

अभिजितराव,

गेल्या आठवड्यात खरेदी केली होती आणि ती चांगलीच फायदेशीर ठरत आहे असे चढत असलेल्या मार्केट वरुन दिसत आहे

पावर ग्रीड उतरला होता. तो घेतला
रिलायन्स पेट्रो उतरला होता तो पण अजून जास्तीचा घेतला.
अजूनही हा घ्यायला हरकत नाही - (सेन्सेक्स २०००० ला होता तेव्हा २९५ पर्यंत गेला होता)

मार्केटच्या थोड्याफार वास्तव्यामुळे मला चांगले शेअर्स सर्वांनाच सांगावेसे वाटतात. ते खाली देत आहे

जास्तीचे काही:

जिंदाल स्टील & पावर लय महाग आहे राव. पण तो पडलेला असतो तेव्हा ९५०० एका शेअरची किंमत असते आणि चढतो तेव्हा १३५००-१४००० असा असतो. एका शेअर फायदा ४०००-५००० एवढा फायदा आहे तर १०० शेअर्स ज्याच्याकडे आहे तो किती नशीबवान आहे

सध्या १ आय.पी. ओ. चालू आहे . आय.सी.आय.सी.आय डायरेक्टची वेबसाईट सध्या डाऊन असल्याने नाव सांगता येत नाही. पण एकच आय.पी. ओ. चालू आहे.
डबलची गॅरंटी आहे. त्यात पैसे गुंतवायला हरकत नाही

सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर मधे पैसे गुंतवायला हरकत नाही. या कंपनीला सतत ऑर्डर्स मिळत आहेत. नुकतीच ८६० कोटी रुपयांची ऑर्डर कंपनीला मिळाली आहे. येत्या ६ महीन्यात हा शेअर ९००-१००० क्रॉस करेन.

आय.टी. मध्ये सध्या घेण्यासारखा एकच शेअर आहे तो म्हणजे टी.सी.एस. येत्या १ वर्षात तो नक्की २००० पार करेन. सध्या त्याची किंमत ९८२ रुपये आहे. तसा इन्फोसिस घ्यायला हरकत नाही कारण बराच पडला आहे आत्ता. विप्रो कंपनीच्या स्ट्रेटेजी आणि पॉलिसीत मूलभूत बदल झाल्याशिवाय त्यांचा शेअर वाढणे शक्य नाही.

असो... मी वर जे लिहिले आहे ते मी स्वतः करत आहे आणि करणार आहे. मला त्यात फायदा देखील झाला आहे. तरी माझे गणित यदाकदाचित चुकले तर मला कोणी दोषी धरू नये ही विनंती. कारण तोटा झाला तर मला स्वत:ला पण होणार आहे.

धन्यवाद
(दिवाळीची सुट्टी उपभोगून परत एकदा शेअर खरेदी - विक्रीसाठी आसुसलेला) सागर

टिकाकार's picture

14 Nov 2007 - 4:18 pm | टिकाकार

सागरा , त्यापेक्शा तू जुगार का खेळत नाहीस?

टिकाकार

टीकाकार महोदय,

जुगारात पैसे जाण्याची गॅरंटी असते...
आणि मी सभ्य जुगारी आहे ... शेअर बाजाराचा अड्डाच माझ्यासारख्यांना परवडतो...
फायद्याची खात्री असते... जुगाराच्या अड्ड्यापेक्षा - हा हा हा...
शेअरबाजारात पैसे कमवायला खरेच डोके लागते.
आणि आपल्याला तर डोके लावायला जाम आवडते ... :)
इथे इन्व्हेस्टमेंट चुकली की गेलात बाराच्या भावात.... कसे?

- सागर

यशोदेचा घनश्याम's picture

14 Nov 2007 - 5:03 pm | यशोदेचा घनश्याम

HINDALCO
GUJRAT-WELSPUN

अशा काहिंचे भाव मागच्या आठवड्यात बाजार मंद असतानापासूनही वर जाताहेत.
१-२ आठवड्यात १५-२५% परतावा देऊ शकतील असे वाटते.

पण Long Term Investment साठि थोडि वाट पहावी असे मला वाटते.
तरी Reliance petrolium मधे आत्ता शिरता येईल!

(इतरांच्या प्रतिसादांची वाट पाहत आहे) यशोदेचा घनश्याम

माझ्या मते
हिंडाल्को आणि रिलायन्स पेट्रोलियम दोन्ही दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीसाठी चांगले आहेत
Reliance petrolium आत्त्ता देखील घेतला तरी चालेल.

दोन्ही शेअर्स १-२ वर्षाने १००० च्या पुढे जातील असा अंदाज आहे...

सागर