सुबक व सुंदर वळणदार (कॅलिग्राफिक-स्टायलाइज्ड) देवनागरी फाँट्स् कोठे मिळतील?

दिपोटी's picture
दिपोटी in काथ्याकूट
13 May 2012 - 9:04 am
गाभा: 

मी एका पोस्टरवर काम करीत आहे. त्यातील सर्वच मजकूर मराठी असल्याने देवनागरी लिपी मध्ये आहे. तर याकरता मला विविध प्रकारच्या सुंदर वळणदार देवनागरी फाँट्स् ची आत्यंतिक गरज आहे.

मी ओंकार जोशी यांच्या 'गमभन.कॉम' वर टंकन करुन तो मजकूर कॉपी करुन पाहिला पण रोजच्या वापरासाठी/लेखनासाठी 'गमभन' कितीही उपयोगी असला तरी पोस्टर साठी मात्र तेथील फाँट चालेल असे वाटले नाही.

माझ्या मनातील फाँट्स् असे आहेत :
- काही मराठी नाटकांच्या जाहिरातीत त्या नाटकाच्या नावासाठी वापरतात तसे मस्त देखणे विविध प्रकारचे फाँट्स्
- कमल शेडगे वा अच्युत पालव वापरतात तसे (जरी ते हाताने काढत असले तरी त्याप्रकारचे) 'कॅलिग्राफिक' वा स्टायलाइज्ड' फाँट्स्
- सुंदर वळणदार हस्तलिखिताचा भास होईल असे फाँट्स्

तर आपल्या माहितीतील अशा वेगवेगळे देवनागरी फाँट्स् साठी वेबसाईट्स् सुचवल्यास मदत होईल.

पोस्टरचे स्वरुप 'हौशीखातर' असे आहे (थोडक्यात व्यावसायिक नाही आहे) तेव्हा अर्थातच मोफत :) वा माफक-किमान दरात फाँट्स् उपलब्ध असतील तर उत्तम.

- दिपोटी

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 May 2012 - 9:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला वाटतं एपीएस चे सॉफ्टवेअर टाकले तर विविध फॉंन्ट्स मिळतील. अक्षरं अधिक सूबक येतील. पण, टंकायचं मोठं कष्टाचं काम आहे. आता एपीएस वापरून मलाही बरेच दिवस झालेत.

-दिलीप बिरुटे

चौकटराजा's picture

13 May 2012 - 10:15 am | चौकटराजा

फोटोग्राफर लग्नाचे अल्बम करताना करताना काही आकर्षक फॉन्टस वापरतात .अशांशी संपर्क केला असता मदत मिळू शकेल. पण ते
फॉन्ट्स व कमल शेडगे वा पालव यांचे गुणवत्तेत फारच फरक आहे . शेवटी शेडगे पालव हे कलाकार विषयाच्या संदर्भाने कॅलिग्राफी करतात. थोडेच काम करायचे असेल तर फोटोशॉप मधे कॅलिग्राफी करता येते. पण मोठे टायपिंग चे काम हेफॉ न्टच्या साह्यानेच करता येईल. left
वरील प्रमाणे आपण फोटोशॉप मधे प्रयत्न करून पहावा. आपल्यालाही काहे वेगळ्या कल्पना सुचतील.
शुभेच्छा !

दिपोटी's picture

13 May 2012 - 4:23 pm | दिपोटी

चौकटराजा,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद! मात्र त्यातील फोटो दिसत नाही आहे - निदान मला तरी.

काही सुधारणा करुन फोटो दिसू शकेल का?

- दिपोटी

माझ्या संगणकावर दिसत आहे तरीही काही अडचण असू शकते मला काय म्हणायचे आहे ते इथे दिसेल ती लिंक देत आहे .
http://www.facebook.com/photo.php?fbid=381771195192718&set=a.38177049519...

पैसा's picture

13 May 2012 - 10:17 am | पैसा

http://www.wazu.jp/gallery/Fonts_Devanagari.html इथे काही फॉण्ट्स उपलब्ध आहेत.

पैसाताई,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद! मात्र त्यात सुचवलेल्या वेबसाईटचे पान मात्र उघडत नाही आहे.

हे असे माझ्याच बाबतीत घडतं आहे का हे माहीत नाही ... इतरांना दिसू शकते का?

- दिपोटी

नितिन थत्ते's picture

13 May 2012 - 6:51 pm | नितिन थत्ते

पान उघडले नाही तरी चालेल. त्यावरचे फॉण्ट डेकोरेटिव्ह नाहीत.

नाना चेंगट's picture

14 May 2012 - 10:44 am | नाना चेंगट

मॉड्युलर सिस्टमचे श्रीलिपी वापरा.

आनंदी गोपाळ's picture

14 May 2012 - 1:39 pm | आनंदी गोपाळ

त्यांना फुकट / स्वस्त असं काहीतरी हवंय हो..

मोहन's picture

15 May 2012 - 10:38 am | मोहन

माझा मित्र लिमये चा हा ब्लॉग www.calligraphicexpressions.blogspot.in/ बघा. कदाचित मदत होईल.

मोहन.

अविनाशकुलकर्णी's picture

19 May 2012 - 9:17 pm | अविनाशकुलकर्णी

फोन्ट तयार करण्याचे एक सोफ्ट वेर आहे..
त्यात तुम्हि हवे तसे फोन्ट तयार करु शकता.
लिन्क सापडत नाहि मिळाली कि नक्कि पोस्ट करेन