साहित्यः
प्रॉन्स - १ किलो
कांदे - २ पेस्ट करुन
टोमॅटो - १ प्युरी करुन
मैदा - ३ चमचे
नारळाचे दुध - १ वाटी
लसुण - १०-१२ पाकळ्या बारीक चिरुन
हिरवी मिरची - २ बारीक चिरलेल्या
आले,लसुण, मिरची पेस्ट - १ चमचा
हळद - १ चमचा
हिंग - १ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १ चमचा
धणे पावडर - २ चमचे
काळी मिरी पावडर - १/२ चमचा
लिंबु - १/२
चिंच - १ चमचा पाण्यात १/२ तास भिजवलेली
मिठ चवीनुसार
तेल
कृती:
गार्लिक प्रॉन्स
१. प्रॉन्स साफ करुन घ्यावे. प्रॉन्सचा फक्त तोंडाच्या बाजुचा भाग काढावा. प्रॉन्स साफ करुन स्वच्छ करुन घ्यावेत.
२. ताटलीमधे ३ चमचे मैदा घ्यावा. त्यात थोडे मिठ व १/२ चमचा काळी मिरी पावडर टाकुन मिक्स करावे.
३. प्रॉन्स हे टिश्यु पेपरने कोरडे करुन घ्यावेत. आता हे प्रॉन्स वरील मैद्याचा मिश्रणात टाकुन मिक्स करावे, त्यामुळे सर्व प्रॉन्सना मैदा लागेल.
४. कढई मधे ३ चमचे तेल गरम करावे. त्यात बारीक चिरलेला लसुण व हिरवी मिरची टाकावी.
५. लसुण थोडा brown रंगाचा झाल्यावर त्यात प्रॉन्स टाकावे. चवीप्रमाणे मिठ टाकावे.
६. हे सर्व प्रॉन्स मोठ्या आचेवर ३-४ मिनिटे हलवत रहावे. प्रॉन्सला शिजायला जास्त वेळ लागत नाही.
७. शिजलेले प्रॉन्स प्लेट मधे काढुन, गरम serve करावे.
८. आवडत असल्यास वरतुन लिंबु पिळावे. लसुण आणि हिरवी मिरची मुळे खुप मस्त चव येते.
प्रॉन्स करी
१. साफ केलेल्या प्रॉन्सला १ चमचा लिंबाचा रस, १/२ चमचा हळद, १/२ चमचा हिंग व थोडे मिठ लावुन ठेवावे.
२. २ कांद्याची smooth paste करुन घ्यावी. तसेच टोंमॅटोची puree करुन गाळुन घ्यावी.
३. कढईत २ चमचे तेल गरम करुन घ्यावे. ह्या तेलात marinate केलेले प्रोन्स १ मिनिट परतुन घ्यावेत व बाजुला काढावेत.
४. त्याच कढईत अजुन २ चमचे तेल टाकावे. त्यात १/२ चमचा हिंग व कांद्याची पेस्ट टाकावी.
५. तेलामधे पेस्ट ३-४ मिनिटे निट परतुन घ्यावी. पेस्ट पुर्ण कोरडी झाल्यावर त्यात १ चमचा आले,लसुण,हिरवी मिरची पेस्ट टाकावी व परतुन घ्यावे.
६. त्याचे बाजुनी थोडे तेल सुटायला लागल्यावर, त्यात १/२ चमचा हळद, २ चमचे लाल तिखट, १ चमचा गरम मसाला व २ चमचे धणे पावडर टाकुन १-२ मिनिटे परतावे.
७. त्यात टोमॅटोची प्युरी टाकुन मिक्स करावे. हे सर्व झाकण ठेवुन २-३ मिनिटे उकळु द्यावे.
८. २-३ मिनिटांनी त्यात १ कप पाणी टाकावे. हवे असल्यास तुम्ही त्यात अजुन पाणी टाकु शकता.
९. आता ह्या मधे फ्राय केलेले प्रॉन्स सोडावेत. त्यातच भिजवलेल्या चिंचेचा कोळ व चवीनुसार मिठ टाकावे.
१०. ह्या करीला चांगली उकळी आल्यावर गॅस एकदम कमी करावा. त्यात १ वाटी नारळाचे दुध टाकुन मिक्स करावे.
११. १-२ मिनिटे करी मंद आचे वर उकळु द्यावी. थोड्यावेळाने गॅस बंद करावा.
१२. बारीक चिरलेल्या कोथिंबीरने सजवुन, गरम भाता सोबत serve करावी.
प्रतिक्रिया
13 May 2012 - 9:52 am | मुक्त विहारि
रविवार सार्थकी लागला.
आणि बहुतेक आज उपवास पण नाही आहे.
13 May 2012 - 10:00 am | सुहास झेले
प्रॉन्स गिळून गप्प बसायचे ठरवले आहे ;)
13 May 2012 - 11:09 am | मुक्त विहारि
पण प्रॉन्स गिळ्तांना योग्य ते पेय वापरा.
एखादे संडे स्पेशल मिळेल मि.पा. वर
13 May 2012 - 12:26 pm | jaypal
खुपच सोपी आहे आजच करुन बघणार. सर्व फोटो जब-याच आहेत. लगे रहो
13 May 2012 - 5:54 pm | सानिकास्वप्निल
गार्लिक प्रॉन्सची पाकृ खूप आवडली नक्की करून बघेन ...प्रॉन्स माझा विकपॉईंट आहे ;)
प्रॉन्स करी मध्ये टोमॅटो प्युरे व चिंचेचा कोळ घातल्यामुळे जास्तं आबंट नाही का होणार ?? मी चिंचेचा कोळ वापरते पण टोमॅटो नाही म्हणून विचारले.
बाकी पाकृ व फोटो क्लासचं आहेत :)
13 May 2012 - 9:01 pm | Mrunalini
धन्स.... ;)
नाही गं, जास्त आंबट नाही होत. कारण फक्त १ तर टोमॅटो आहे आणि चिंचेचा कोळपण १ चमचाच आहे. त्यामुळे जास्त आंबट नाही झाले.
13 May 2012 - 10:17 pm | योगप्रभू
मृणालिनीताई,
रेसिपी फक्कड असली तरी सजावट हवी होती.
फोटू फारसे पसंत नाय पडले.
जाऊ दे. माझं लक्ष खाण्यात घालतो. :)
14 May 2012 - 3:10 pm | मुक्त विहारि
सूंदर व्यक्तींना रंगरंगोटीची
आणि
स्वादिष्ट पदार्थांना सजावटीची आवश्यकता नसते.
14 May 2012 - 1:35 pm | प्रभाकर पेठकर
छायाचित्र गायब????
14 May 2012 - 2:14 pm | परिकथेतील राजकुमार
गवताळ माणूस असूनही फक्त मृणालीनीतै चा धागा म्हणून 'सजावट, मखर, आरास' बघायला धागा उघडला, पण निराशा पदरी पडली.
16 May 2012 - 10:17 am | बाप्पा
प्रॉन्स म्हणजे कोळंबी का हो? कारण दुकानदाराने साफ करुन दिल्यावर जरा वेगळीच दिसते. फोटु मधे आहे तशी दिसत नाही.
16 May 2012 - 10:30 am | जागु
तोपासु.