साहित्य :- १वाटी मुगाची डाळ, ५-६ लसणाच्या पाकळ्या, १चमचा खिसलेले आले, ३/४ हिरव्य मिरच्या, १ चमचा मीठ. साखर चवीनुसार,१ लिंबाचा रस , १ चमचा हळद १ वाटी बारिक चिरलेली कोथिंबीर, १ सॅशे इनो. फोडणीसाठी - १ टेबलस्पुन तेल, १चमचा मोहरी, १ चमचा हिंग.
कृती :- मुगाची डाळ ४-५ तास भिजत घालावी. नंतर त्यातील पाणि काढुन टाकावे. डाळ, मिरच्या, आलं,लसुण, मीठ, साखर, हळद,लिंबाचारस एकत्र करुन मिक्सरमधुन वाटुन घ्यावे.मिश्रण एका बाउलमधे काढुन घ्यावे.प्रेशर कुकरमधे पाणि घालुन उकळ्ण्यास ठेववे. एका पसरट भांड्याला थोडेसे तेल लावावे.बाउल मधिल मिश्रणात सॅशे मधला इनो घालुन चमच्याने ढवळुन मिश्रण तेल लावलेल्या पसरट भांड्यात घालुन ते भांडे कुकरमधे ठेवावे . झाकण लावुन शिट्टि काढुन टाकुन १५ मिनिटे मिश्रण वाफवावे. गॅस बंद करुन ५मिनिटे तसेच ठेवावे. नंतर वाफवलेले मिश्रण कुकर मधुन काढुन त्याच्या वड्या पाडाव्या.
एका छोट्या कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडलि कि हिंग घालुन गॅस बंद करवा. तयार झालेल्या फोडणीत १/४ वाटी पाणि घालावे. हे तयार मिश्रण ढोकळ्यावर पसरावे. वरुन बारिक चिरलेली कोथिंबीर घालावी.ढोकळा तयार.
साहित्य :
कृती :- मुगाची डाळ ४-५ तास भिजत घालावी. नंतर त्यातील पाणि काढुन टाकावे. डाळ, मिरच्या, आलं,लसुण, मीठ, साखर, हळद,लिंबाचा रस एकत्र करुन मिक्सरमधुन वाटुन घ्यावे.मिश्रण एका बाउलमधे काढुन घ्यावे.
बाउलमधिल मिश्रणात सॅशे मधला इनो घालावा.
तयार ढोकळा.
अवांतर- इनो ढो़कळ्यात घालण्यासाठी आहे. तसेच जळजळ, पोट्दुखी साठीसुद्धा जरूर घ्यावा.
प्रतिक्रिया
12 May 2012 - 12:35 pm | धनुअमिता
मस्त
पण फोटो कुठे आहेत.
12 May 2012 - 7:38 pm | नेहरिन
फोटो टाकलेत बघा.
12 May 2012 - 12:38 pm | प्रास
पराचा टोमणा झोंबला की काय फार? ;-)
फोटो मलाच दिसत नाही आहे की फोटोच नाही आहे? काय कळेना ब्वॉ....
12 May 2012 - 12:48 pm | नेहरिन
नाहि हो .............परा काय चिज आहे हे खूप चांगल माहिती आहे.
12 May 2012 - 1:00 pm | परिकथेतील राजकुमार
एकट्याने खाल्ला ढोकळा.. आता तुम्हाला होईल खोकला.
12 May 2012 - 1:22 pm | चिंतामणी
इनो घे.
12 May 2012 - 3:00 pm | निवेदिता-ताई
छान दिसतोय
12 May 2012 - 4:10 pm | सानिकास्वप्निल
मस्त
12 May 2012 - 4:58 pm | sneharani
अरे वा मस्तच, बरी ढोकळ्याची आठवण काढलीत,
ढोकळा खाऊन बरेच दिवस झालेत, करायला हवा आता!
:)
12 May 2012 - 5:40 pm | रेवती
छान. फोटू पाहिला पण हा ढोकळा हलका झाला काय?
14 May 2012 - 10:05 am | जेनी...
अरे भारिय ही पद्धत ..सोप्पि
करुन बघते .......:)
14 May 2012 - 11:03 am | प्यारे१
पाकृ करतानाच इनोचा वापर केलेला असल्याने डब्बल इनो घ्यावे लागणारसे दिसते!
14 May 2012 - 1:59 pm | अमृत
प्रथमच मूगाच्या दाळीचे ढोकळे बघतो आहे... या विकांताच बेत नक्की...
अमृत
14 May 2012 - 2:50 pm | पियुशा
मला ढोकळा आवडतो :)
असा , कधी खाल्ला नाहि मु.डा.ढो. करुन बघते :)
15 May 2012 - 1:43 am | गेंडा
<निळुभाउ मोड> मुगाची भजी, मुगाचा शिरा/ हलवा, मुंग डाल (तीच ती. तळलेली. चकणा म्हनून खातो तीच) ह्ये समदे ऐकले व्हते. पन ह्ये बी असते हे वाचून अन बघून लई आनंद झाला. आजच वाड्यावर ह्यो डोकळा बनवाया सांगतो. बेसन पिठापेक्षा लई झ्याक<निळुभाउ मोड>