सॅलड

नेहरिन's picture
नेहरिन in पाककृती
12 May 2012 - 11:34 am

साहित्यः - १५/२० सॅलडची पाने , २ मध्यम आकाराचे टोमॅटो, १ मोठा कांदा, १वाटी भाजलेले दाणे , १टीस्पुन मीठ, १ टीस्पुन लाल तिखट ( आवडिनुसार कमीजास्त करावे), साखर चविनुसार, १/२ लिंबाचा रस, फोडणीसाठी ; १ टेबलस्पुन तेल, १टी स्पुन मोहरि , १ टीस्पुन हिंग , १टीस्पुन हळद.

कॄती :- सॅलडची पाने स्वछ धुऊन बारिक चिरुन घ्यावित, कांदा, टोमॅटो बारिक चिरुन घ्यावे.

दाणे सोलुन कुट करुन घ्यावे. नंतर एका बाऊलमधे चिरलेली सॅलडचि पाने , कांदा, टोमॅटो, दाण्याचे कुट, तिखट, मीठ, साखर, हळद घालावे . नंतर लिंबाचा रस घालावा..

एका छोट्या कढईत १ टेबलस्पुन तेल गरम करुन त्यात मोहरि घालावि मोहरी तडतडली कि हिंग घालावा आणि तयार झालेली फोडणी बाऊलमधिल साहित्यावर घालावी. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करुन घ्यावे. सॅलड तयार.

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

12 May 2012 - 11:59 am | प्रचेतस

मस्त.

परिकथेतील राजकुमार's picture

12 May 2012 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार

बिल गेटसने लेख लिहिला आहे म्हणून उत्सुकतेने उघडावा आणि आतमध्ये त्याने पेन ड्राईव कसा फॉर्मॅट करावा हे लिहिलेले वाचायला मिळावे तशी अवस्था झाली आहे.

डायटींगवर असलेले, नसलेले, चवीने खाणारे, बॅचलर्स, होउ घातलेल्या वधु आणि त्याच प्रमाणे ज्यांचा कोठा जड आहे त्यांच्यासाठीसुद्धा.

तु खाउन बघ. खूप उपयोग होइल तुला.

अक्षया's picture

12 May 2012 - 12:32 pm | अक्षया

:)
आवडती डीश..

नेहरिन जी , एक अप्रतिम रेसीपी दिली आहेत तुम्ही.

ह्यात तेला ऐवजी तुप घालुन फोडणी दिली की चव भन्नाट लागते.

सलाड मुळे हिमग्लोबीन वाढत .

खरच एक मस्त रेसीपी आहे

रेवती's picture

12 May 2012 - 5:43 pm | रेवती

ही पाकृही आवडली.