राम्राम मंडळी ,
इकडे बरेच सौथंडियन लोक असल्याने असेल कदाचित , पण मस्त झकास अप्रतिम असा तयार ईडली आटा मिळतो.
पण एक लफडे असे आहे , एक पाकिट आणले की त्यात जवळपास ३६ ईडल्या होतात; त्यामुळे मग २-३ सांजेला ईडली-चटणी / ईडली-सांबार असा बेत असतो. फारच हुक्की आली तर डोसे करतो.
तर परवा असेच एक पाकिट आणले. मग आज सकाळी इडली-चटणी चा बेत केला.
चटणी पा़कृ यापुर्वी वालाच्या शेंगांच्या बरोबर दिली गेल्या आहे.ईडली करणे सोपे आहे , ईडली पात्र मात्र हवे त्यासाठी.
एका कढईत १ ग्लास पाणी उकळ्त ठेवा अन तोवर ईडली पात्राला थोडे तेल लावुन घ्या म्हणजे ईडली त्याला चिकटत/चिटकत नाही ( प्रा डॉ शुध्लेखन बघा ब्वॉ जरा). तेल लावुन झाले की एक एक चमचा ईडली आटा एकेका ईडलीच्या साच्यात टाका. अन मग ईडली पात्र कढईत ठेवा न वरुन झाकण ठेवुन द्या. २-३ मिनिटांन्तर गॅसची ज्योत बारीक करुन टाका. अजुन ५ मिनिटे वाट बघुन गॅसची ज्योत बंद करा.
१० मिनिटे झाकण तसेच असु द्या. मग ईडली पात्र कढई बाहेर काढुन गार होउ द्या.
सुरीचा वापर करुन काळजीपुर्वक ईडल्या काढुन घ्या अन चटणीबरोबर ओरपा.
क्रमश: ( सांबार पा कृ पुढच्या भागात , त्याची कृती सौजन्य पैसा तै. )
प्रतिक्रिया
9 May 2012 - 12:28 am | JAGOMOHANPYARE
सांबार आणेस्तोवर इडल्या संपतील
9 May 2012 - 12:47 am | अत्रुप्त आत्मा
@सांबार आणेस्तोवर इडल्या संपतील>>> +१
9 May 2012 - 1:13 am | कुंदन
लेकोहो तुम्हाले ईडली नि चटणी चालत नाही का बे ?
9 May 2012 - 1:37 am | रेवती
घरात इडली पीठ तयार (घरीच केलेले ;) ) असल्याने जळजळ, तळमळ्,कळकळ झाली नाही. ;)
फोटू छान.
9 May 2012 - 9:46 am | इरसाल
एका कढईत १ ग्लास पाणी उकळ्त ठेवा अन तोवर ईडली पात्राला थोडे तेल लावुन घ्या म्हणजे ईडली त्याला चिकटत/चिटकत नाही( प्रा डॉ शुध्लेखन बघा ब्वॉ जरा) .तेल लावुन झाले की एक एक चमचा ईडली आटा एकेका र्ईडलीच्या साच्यात टाका. अन मग ईडली पात्र कढईत ठेवा न वरुन झाकण ठेवुन द्या. २-३ मिनिटांन्तर गॅसची ज्योत बारीक करुन टाका. अजुन ५ मिनिटे वाट बघुन गॅसची ज्योत बंद करा.
आटा भिजवत नाय का ? की डायरेक गिल्ला आटा मिलतो ?
9 May 2012 - 9:51 am | कुंदन
>>इकडे बरेच सौथंडियन लोक असल्याने असेल कदाचित , पण मस्त झकास अप्रतिम असा तयार ईडली आटा मिळतो.
डायरेक गिल्ला आटा मिलतो ना भौ.
9 May 2012 - 9:58 am | पैसा
फोटो चांगला आहे. चटणी मस्तच दिसतेय! पण कढईत पाणी ठेवून इडल्या वाफवून निघतात? नाय म्हणजे आम्ही इडलीसाठी स्पेशल कूकर बिकर घेऊन बसलोत, त्याची खरं तर मोठी आवश्यकता नाही वाट्टं!
9 May 2012 - 10:34 am | पिंगू
>>> नाय म्हणजे आम्ही इडलीसाठी स्पेशल कूकर बिकर घेऊन बसलोत..
तसं पैसाताईकडे इडली-सांबाराचा आस्वाद घेतला असल्याने हे माहितीच आहे... :)
- पिंगू
9 May 2012 - 10:10 am | स्पा
मस्त मस्त मस्त
9 May 2012 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
व्वा....! सकाळी सकाळी इडली. लै भारी हं कुंदनशेठ.
बाकी, शुद्धलेखनाचं तुम्ही कै टेन्शन घेऊ नका.
’चिकटत’ शब्द बरोबर आहे.
-दिलीप बिरुटे
9 May 2012 - 10:28 am | गवि
एकदम हटके पाककृती.. ;)
करुन बघणार..
(पहाटे तयार इडल्या मिळतात त्या आणाव्यात का? .. ;) )
9 May 2012 - 10:36 am | पिंगू
च्यायला सगळंच हटके दिसतयं...आणि तेही इडलीसकट ;)
- पिंगू
9 May 2012 - 11:48 am | परिकथेतील राजकुमार
ह्यात पाककृती कुठे आहे ?
बाकी ही डिश अंडे घालून कधी करता येईल ?
तिकडे फटू देखील बुरख्या आडून काढावे लागतात का ?
कढईत उकळलेल्या पाण्याचे काय ? ते इनोसाठी ठेवले आहे का ?
बाकी कुंद्या सारख्या आमच्या फायनॅन्सरला देखील 'डायरीया' झाल्याचे पाहून शरम वाटली. ह.भी.*नानासाहेब चेंगट ह्यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
*हरामखोर भिकारचोट
9 May 2012 - 3:32 pm | पहाटवारा
२-३ मिनिटांन्तर गॅसची ज्योत बारीक करुन टाका. अजुन ५ मिनिटे वाट बघुन गॅसची ज्योत बंद करा.
"कढइखालील" हा शब्द गाळून अर्धवट सल्ला दिल्यामूळे तुमचा हा लेख पाककृती ह्या सदरातून बाद करावा अशी आम्हि विणंती करित आहोत.
लवकर लेख संपादीत करा आणी "अप्रतीम" या चांदणीला पात्र व्हा .. त्वरा करा ..
9 May 2012 - 12:15 pm | विजुभाऊ
अरे व्वा कुंद्य सुधारला वाटते............ कधी नव्हेत तो अख्खा लेख लिहिलाय.तेही पुढच्या लेखाच्या आश्वसना सहीत !!!
9 May 2012 - 12:48 pm | विनायक प्रभू
ह्या पाकृ च्या पोस्ट बद्दल कुंदन शेट ना "हवालदार भिकु मोलकरीन सखु"
ची ह्या अजरामर कलाकृतीची शिडी पोस्ट पेड कुरीयर ने पाठवल्या गेली आहे.
9 May 2012 - 12:53 pm | sneharani
छान ! पण क्रमशः लवकर येऊ दे हो ;)
9 May 2012 - 1:26 pm | गणपा
हल्ली तुझे 'सत्याचे प्रयोग' जोरात चाललेले दिसतायत. :)
10 May 2012 - 11:24 am | विजुभाऊ
हल्ली तुझे 'सत्याचे प्रयोग' जोरात चाललेले दिसतायत.
तुम्हाला सट्ट्याचे प्रयोग असे म्हणायचे आहे का? की सुट्ट्याचे प्रयोग असे म्हणायचे आहे?
9 May 2012 - 3:17 pm | नाना चेंगट
बरा स्वयंपाक करतोस तु
मग बायको तुला टोले का देत असते?
जरा नंबर दे बघु बायकोचा.. तुझी वकीली करतो जरा
9 May 2012 - 3:31 pm | प्यारे१
चान चान!
अवांतर (ह्ये टीप्प असते) : आमच्या अप्पार्टमेंट्ट मध्ये येक तमिळ बाई असते. ती आमच्या गरी आल्यावर सांगत असते, तुमची इड्डली पुगत नसते कारण तुमी इडलीपात्र मदी परत परत पीट सोडत असते.
येकदाच पीट सोडून चम्मचा बाजूला क्येला की इड्डली टम्म पुगते.... आनि इडली झालं का बगायला चाकू गेऊन टोचून बगायचा. चाकू किलीन आलं की झालं.
आमचं आई तसं केलं की झालं की वो टम्म.... त्ये इडली म्हणतो मी! :)
10 May 2012 - 10:39 am | शिल्पा ब
लै भारी !!
आजच ईडल्या केल्त्या...चटणी सांबर कै नै...नुसत्याच गिळल्या.
10 May 2012 - 10:14 pm | कुंदन
मी सांगितलेली चटणी करायला मात्र १० मिनिटे पुरेशी आहेत. तेंव्हा उगाच आळशीपणा न करता सहज जमाव्यात कोणालाही.
आणि जेवणा/खाण्यासारख्या चांगल्या कृतीला "गिळणे" म्हणणे म्हणजे ..... असो.