साहित्यः
याला कुठलाही बुटका गहु चालतो. लोकवन चालत नाही. पण कल्याण सोनाची बुटकी जात किंवा एच डी २१८९ चालेल.
स्वच्छ निवडलेले गहु: १ किलो
मीठः रुचेल तेवढे
पापडखारः मीठाच्या प्रमाणात
शेंगदाणे: मुठभर
कढीपत्ता
लसुणः तळणीसाठी: ७-८ पाकळ्या चिरुन
फोडणीसाठी: जीरं, मोहरी, हळद,
लाल तिखट/ हिरवी मिरची: आवडीप्रमाणे
क्रमवार पाककृती:
प्रथम १ किलो स्वच्छ निवडलेला गहु एक रात्रभर भिजवावा.
दुसर्या दिवशी सकाळी, तो गहु उपसुन कुकरमधे पाण्यात ४-५ शिट्ट्या घेउन शिजवावा. यात काळजी एकच घ्यायचीये की गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त त्याची तोंडं उलुन येइपर्यंत शिजवायचा आहे.
कुकर थंड झाला की गहु ३-४ वेळेस थंड पाण्यातुन काढावा म्हणजे एकेक दाणा मोकळा होईल. नंतर गव्हातील उरले सुरले पाणी काढुन टाकावे व त्याला आपल्याला रुचेल इतके मीठ व पापडखार चोळुन ठेवावा. नंतर हे गहु कपड्यावर पसरवुन कडक उन्हात वाळवावे.
वाळवल्यावर कोरड्या केलेल्या स्वच्छ डब्यात भरुन ठेवावेत. हे असे वर्षभर राहु शकतात.
नंतर लागेल तेव्हा, थोडे थोडे काढुन कोरड्या कढईत (तेलात नाही) भाजुन घ्यावेत.
आख्खे शेंगदाणे थोडे लालसर तळुन घ्यावेत.
लसूण बारीक चिरुन तोही खरपुस तळुन घ्यावा.
हिरवी मिरची आवडत असली तर तीही बारीक चिरुन तळुन घ्यावी
यानंतर एका कढईत फोडणी साठी तेल ठेउन त्यात जीरं मोहरी, कढीपत्ता, थोडे हिंग, हळद, लाल तिखट टाकुन त्यात हे भाजलेले गहु परतुन घ्यावेत.
झाला गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा तयार!
डबा भरुन करुन ठेवला तरी आठवड्याभरात फस्त होतो.
हा चिवडा लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडतो.
खान्देशात पाहुण्यांना ज्वारीच्या हळद मीठ लावलेल्या लाह्यांबरोबर हा चिवडा खायला देतात.
प्रतिक्रिया
8 May 2012 - 3:44 pm | गवि
अशा नेहमीच्या पाहण्यात नसलेल्या विविध प्रदेशांतल्या पाककृती पाहिल्या की पाकृ विभागाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं.
अनेकानेक धन्यवाद..
कृती थोडी कठीण आहे. अनेक पायर्यांमधे करण्याची आहे. पण अंतिम रिझल्ट हा एक उत्तम चटकदार पदार्थ असणार याची खात्री आहे. त्यामुळे वर्थ अ ट्राय..
8 May 2012 - 4:04 pm | गणपा
असेच म्हणतो.
गव्हाचा चिवडा पहिल्यांदाच पाहिला/ऐकला. (चाखणे दुरच.)
पण ते उकडलेल्या गव्हाच पाणी फेकुन द्यायच? बरच सत्व उतरलेल असेल कि त्यात.
कणिक तिंबताना वैग्रे नाही का वापरता यायच?
(चिंगुस) - गणा.
8 May 2012 - 4:07 pm | गवि
इथे मिळतो.. या वेळच्या ग्रोसरीत आणणार.. :)
9 May 2012 - 7:41 am | रेवती
आता ग्रोसरी स्टोअर शोधणे आले.;)
8 May 2012 - 3:54 pm | पियुशा
अरे व्वा पहीलांदाच पाहतीये हा प्रकार :)
चला इथे कल्याण सोनाची बुटकी जात किंवा एच डी २१८९ शोधणे आले ;)
8 May 2012 - 3:57 pm | धनुअमिता
खुप छान आहे. नक्की करुन बघेन.
8 May 2012 - 4:00 pm | पिंगू
>> यात काळजी एकच घ्यायचीये की गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त त्याची तोंडं उलुन येइपर्यंत शिजवायचा आहे.
आता हा अंदाज कसा बांधायचा. कित्येक वेळा माझ्याकडून भात शिजवताना गल्लत झालेली आहे. जरा कठीणच प्रकरण दिसतयं...
- पिंगू
8 May 2012 - 4:26 pm | प्यारे१
>>>कित्येक वेळा माझ्याकडून भात शिजवताना गल्लत झालेली आहे.
कीप प्राक्तिसिंग मान... यु कान दु इत! अॅन्द येस, रेवती ग्रॅनी हॅस तेकन अ नोत ऑप इत!
यु विल्ल गेत अ कॉल फ्रॉम हर शॉर्तलि :)
चिवडा पहिल्यांदाच बघतोय. पण मस्त टेम्प्टिंग प्रकार वाटतो आहे.
9 May 2012 - 7:43 am | रेवती
अरे देवा! वाचायला किती अवघड हा प्रतिसाद.
10 May 2012 - 4:00 pm | प्यारे१
तेक अ चिल पिल ग्रानी..... इत्स सो सिंपल. ;)
8 May 2012 - 9:46 pm | आर्या१२३
प्रतिसादाबद्दल आभार पिन्गु!
कुकरच्या ४-५ शिट्ट्या घ्यायच्या! म्हणजे हवा तो परिणाम साधता येइल.
8 May 2012 - 4:01 pm | चटोरी वैशू
लहानपणी खाल्लेले आहे... पाकृ नव्हती माहित ...धन्यवाद !!!
8 May 2012 - 4:02 pm | प्रचेतस
जबरी पण बरीच वेळखाऊ पाकृ आहे.
8 May 2012 - 4:28 pm | कुंदन
मस्तच दिसतोय चिवडा.
चला आता इथे "खान्देश" शोधणे आले.
8 May 2012 - 4:38 pm | जागु
वा मस्त चिवडा.
8 May 2012 - 4:57 pm | परिकथेतील राजकुमार
नवीनच पदार्थ कळाला.
आता कुठे मिळतो ते शोधणे आले, किंवा बनवता येतो अशा व्यक्तीला शोधणे आले.
8 May 2012 - 5:03 pm | इरसाल
घर जाइ बायकोले सांग्न पडी.
आर्या ब र्याच दिवसांनी पहातोय. घरचे दिवस आठवले. छान आहे चिवडा.
8 May 2012 - 5:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> घर जाइ बायकोले सांग्न पडी.
'सांग्न पडी' लै दिवसानंतर ऐकलं. :)
अरे, तुम्ही सगळे खांदेशी मिळून जरा खांदेशावर लिहा ना रे....!
कोणी बोली घ्या, कोणी सणवार घ्या, कोणी कै तर, कोणी कै.
-दिलीप बिरुटे
8 May 2012 - 5:07 pm | यकु
आता आम्ही कुठे जावे??
नुसती तळमळ तळमळ.. :(
8 May 2012 - 5:15 pm | मुक्त विहारि
एक वेगळी , स्वादिष्ट, पौष्टिक आणि पोट भरणारी पाक-क्रुती दिल्याबद्दल...
8 May 2012 - 5:31 pm | सूड
मीठः रुचेल तेवढे
पापडखारः मीठाच्या प्रमाणात
हे काय पटलं नाही. पापडखाराचं प्रमाण सांगाल का जरा, जास्त झाला तर सगळी मेहनत केरात जाईल. पहिल्यांदाच ऐकतोय असा चिवडा आणि चवीला छान लागेल असं वाटतंय. जरा हटके पाकृ टाकल्याबद्दल आभार.
8 May 2012 - 9:49 pm | आर्या१२३
प्रतिसादाबद्दल धन्स सूड!
पापडखार खुसखुशीतपणा येण्यासाठी.
१ किलो गव्हासाठी दीड चमचा मीठ तर एक चमचा पापडखार वापरता येइल. पोह्याचा चमचा वापरावा.
8 May 2012 - 5:35 pm | अत्रुप्त आत्मा
आमच्यासाठी नविन प्रकार,पण अस्सल खानदेशी स्टाइल... अवडला एकदम...
8 May 2012 - 6:16 pm | प्रसाद प्रसाद
एकदम नवीन आणि युनिक प्रकार वाटला, पहिल्यांदा कधीही ना ऐकलेला आणि खाल्लेला!
एकदा करून पहिलाच पाहिजे (म्हणजे आईकडून करून घेतला पाहिजे)
पापडखार पण खारट असतो. मीठ आणि पापडखार एकत्र घालताना पदार्थ खारट होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे असे वाटते.
मस्त नवीन पदार्थ सांगितल्याबद्दल आभार.
8 May 2012 - 6:20 pm | पैसा
पण इतके कष्ट करायची तयारी नाही! कोणी आयता दिला तर ब्येश्टच!
8 May 2012 - 11:04 pm | सानिकास्वप्निल
चिवडा भारी दिसतोय
पाकृ खूपचं वेळखाऊ आहे पण इतक्या मेहनतीनंतर जर चिवडा असा चविष्ट बनणार असेल तर कधीतरी करून बघेन :)
9 May 2012 - 3:22 am | दीपा माने
आपल्या महाराष्ट्रातुन विविध प्रांतांतून अशा पारंपारिक रेसिपीज येत रहाव्यात अशी आशा करते.
9 May 2012 - 8:02 am | सुहास झेले
अरे व्वा... एकदम हटके पदार्थ :) :)
10 May 2012 - 10:48 am | jaypal
झ ह ब ह -या रेसीपी
12 May 2012 - 11:46 am | खादाड
पहील्यांदाच एकला/ पाहीला हा पदार्थ !! पण दिसतोय छानच !!
12 May 2012 - 6:22 pm | स्वाती दिनेश
मस्तच दिसतो आहे चिवडा,
गव्हाचा चिवडा प्रथमच पाहत आहे.
स्वाती