टोमॅटोचं सार... माझं एकदम फेवरेट आहे. हे गरम गरम भाताबरोबर एकदम सह्ही लागतं. १ नंबर Smile आणि नुसतं खायलाही मस्तच लागतं. करायला पण एकदम सोपं.
साहित्यः ४-५ लाल टोमॅटो, ४-५ लसूण पाकळ्या (मोठा लसूण असेल तर २ बास होतील) किसून किंवा पेस्ट करून, १ टीस्पून किसलेल आलं किंवा आलं पेस्ट (लसूण पेस्ट च्या निम्मी आलं पेस्ट घ्या), ३-४ टेबलस्पून खोवलेलं ओलं खोबरं, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मोहरी, चिमूटभर हिंग, अर्धा टीस्पून हळद, २-३ टेबलस्पून तेल, चवीनुसार तिखट, मीठ, साखर
कृती:
१. प्रथम टोमॅटो कुकरला लावून शिजवून घ्या. मग टोमॅटोची सालं काढून शिजलेले टोमॅटो मिक्सरमधून फिरवून त्याची प्युरी करून घ्या.
२. एका कढईत/पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हिंग, हळद टाकून फोडणी करून घ्या. मग त्यात आलं-लसूण किस/पेस्ट टाकून परतून घ्या. मग त्यात टोमॅटो प्युरी घाला. परतून घ्या
३. मग त्यात सारं जितकं दाट-पातळ हवं आहे तितकं पाणी घाला. मी ४-५ कप पाणी घातले आहे. चवीनुसार तिखट, मीठ, साखर घाला. साखर नेहमीपेक्षा थोडी जास्त घाला. आता त्यात खोबरं-कोथिंबीर घालून उकळी आणा.
४. आणि असं मस्त गरम गरम सार वाफाळत्या भाताबरोबर फस्त करा.
प्रतिक्रिया
2 May 2012 - 11:27 pm | मुक्त विहारि
क्या बात है!!!!
2 May 2012 - 11:51 pm | रेवती
वा!! सगळ्यांचे आवडते.
2 May 2012 - 11:57 pm | ज्योति प्रकाश
मस्तच्,माझे आवडते.
3 May 2012 - 12:08 am | सानिकास्वप्निल
भाताबरोबर ओरपायला खूप आवडतं फक्त तेलाऐवजी तुपाची फोडणी जास्त आवडते :)
धन्यवाद पर्ल :)
3 May 2012 - 2:00 am | गणपा
ऐसाइच बोल्ताय.
आणि लाल तिखटा ऐवजी भरड वाटलेली काळीमिरी पुड येवढाच काय तो बदल. बाकी अश्याच पद्धतीने कालच करुन ओरपले. :)
3 May 2012 - 10:02 am | गवि
हो.. साजूक तुपाची फोडणी जास्त चांगली..
पाककृती चटकदार आहे. आहा..
3 May 2012 - 11:36 am | परिकथेतील राजकुमार
साजूक तुपाची फोडणी नाही तर त्याला सार म्हणायचेच नाही.
मस्त दिसती आहे डिश एकदम. आवडेश !
3 May 2012 - 2:20 pm | मेघवेडा
तंतोतंत.
आणि नारळसुद्धा मुबलक हवा. फक्त ३-४ टेस्पून?! अरेरे.. कुणाच्या दाताला लागायचा तो?! ;)
3 May 2012 - 7:30 pm | पैसा
सराला रंग मस्त आलाय. फक्त बदल इतकाच हवा की फोडणीला तेलाऐवजी तूप हवं आणि खवलेल्या खोबर्याऐवजी नारळाच्या एका वाटीचं बारीक वाटलेलं खोबरं. त्याचं दूध काढलंत तर दाताला काहीच न लागता आणखी मस्त सार मिळेल! :D
3 May 2012 - 1:12 am | JAGOMOHANPYARE
छान
3 May 2012 - 10:01 am | प्रचेतस
झकास.
3 May 2012 - 10:29 am | पिंगू
टोमॅटो सार मी टोमॅटो उकडवून करत नाही. तर कच्चेच टोमॅटो मिक्सरमधून इतर साहित्यासोबत फिरवून घेतो आणि घरी सार बनवायचा मक्ता मीच घेतलेला असतो..
- पिंगू
3 May 2012 - 11:40 am | गवि
तो टॉमॅटो ज्यूस..
सार उकडूनच.. :)
3 May 2012 - 5:42 pm | पिंगू
गवि, तुलापण मी बनवलेलं टोमॅटो ज्यूस खिलवतो... मग तर झालं.. ;)
- पिंगू
3 May 2012 - 6:30 pm | पिंगू
प्रकटाआ
3 May 2012 - 6:41 pm | निवेदिता-ताई
सुंदर......टेस्टी
4 May 2012 - 11:44 am | इरसाल
काल राती जमानु साटे बनाडी देखं !
पर्लतै कसं झालं असावं अस वाटतय ?
4 May 2012 - 2:59 pm | स्मिता.
मलाही फार आवडतं टोमॅटो सार ओरपायला. बरी आठवण करून दिलीत. आज संध्याकाळी करेन.
4 May 2012 - 3:14 pm | गवि
आंब्याचा सीझन चालू आहे. आंब्याचेही अशा प्रकारे काही चटकदार (आमरस , पन्हे हे नेहमीचे सोडून) पदार्थ बनवता येत असले तर कोणीतरी कृपया सांगावे. बदल होईल जरा. आणि घरीही आंब्यापासून काहीतरी अनवट बनवून सरप्राईझ देता येईल.
अननसाचे सार असा प्रकार ऐकला होता. मधे गणपाने आंब्याचं सासव दिलं होतं.
आंबे, कोकम अशा कोंकणातल्या मेव्यापासून बनणार्या पदार्थांची मालिका ऐन मे महिन्यात मिपावर येईल तर काय बहार येईल.
या इच्छेपायी तेवढ्यासाठी वेगळा विनंती धागा काढण्यास कचरतो आहे म्हणून इथे टंकले.
4 May 2012 - 5:45 pm | सूड
अरे वा बरी आठवण केलीत, वीकांताला काय करावं हा प्रश्न उरला नाही आता.
4 May 2012 - 6:24 pm | बॅटमॅन
[पु ना ओक मोड ऑन]
"जीवन असार आहे" वगैरे वगैरे वाक्प्रचार हे असे सार प्राशनास न मिळालेल्या माणसांनी काढलेले होते. त्यामुळे त्यांच्या जीवनाचा सूरपण नै लागला. सबब ते असुर झाले, त्यांनीच पुढे असीरिया वसवली.
[ पु ना ओक मोड ऑफ]
आज्याबात अनवांतरः जिभल्या चाटायची स्मायली है का वो मिपावर्ती?
4 May 2012 - 8:24 pm | अत्रुप्त आत्मा
5 May 2012 - 4:51 am | Pearl
सर्वांचे आभार :-)
@गणपा आणि पैसाताई,तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने सारं एकदा करून पाहिले पाहिजे.
आणि सर्वांनी सांगितलेल्या प्रकारे पुढच्या वेळी तूपाची फोडणी करून पाहिन.
@मेघवेडा, खरं आहे. खोबरं भरपूर लागते. प्रमाण अंदाजे दिले आहे.
@इरसाल, छानच झालं असेल ना. रंग पण छान आला आहे.
परत एकदा सर्वांचे खूप खूप आभार :-)
4 Jun 2012 - 12:48 am | राजहंस
मस्तच......