कणकेचे लाडू

ज्योति प्रकाश's picture
ज्योति प्रकाश in पाककृती
1 May 2012 - 3:35 pm

साहित्यः-१) एक वाटी कणीक.
२)एक वाटी गुळ.
३)अर्धी वाटी तूप.
४)पाव वाटी किसलेले सुके खोबरे.
५)एक चमचा खसखस.
५)पाव चमचा वेलचीपूड.
कृती :-प्रथम कणीक तुपात चांगली खरपूस भाजून घ्यावी.किसलेले सुके खोबरे भाजून घ्यावे व हातानेच त्याचा चुरा
करावा.खसखस थोड्या तुपात भाजून घ्यावी.एका भांड्यात जूळ घेऊन त्यावर पाणी शिंपडून त्याचा दोन
तारी पाक करावा.त्यात खोबरे,खसखस,वेलचीपूड व कणीक घालावी.सर्व मिश्रण नीट एकत्र करावे व लाडू
वळावे. हवे असल्यास लाडवात सुका मेवा घालावा.(मिश्रण कोरडे पडत आहे असे वाटल्यास त्यावर थोडे
दुध शिंपडून लाडू वळावे.)

सौजन्यः-दैनिक तरूण भारत.

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

1 May 2012 - 4:28 pm | मुक्त विहारि

एक पारंपारिक पाक्-क्रुती दिल्याबद्दल धन्यवाद...

अमोल केळकर's picture

1 May 2012 - 4:39 pm | अमोल केळकर

सुंदर. माझा अत्यंत आवडता लाडू :)

अमोल

रेवती's picture

1 May 2012 - 7:05 pm | रेवती

छान गो ज्योतीताई.

पैसा's picture

1 May 2012 - 11:25 pm | पैसा

आधी फोटो नव्हता बहुतेक! आता छान दिसतायत. पण कृती तरूण भारतमधून घेतलीय का?

ज्योति प्रकाश's picture

2 May 2012 - 12:12 am | ज्योति प्रकाश

होय्.म्हणुन तर फोटोच्या खाली सौजन्य तरुण भारत असं लिहिलय.

सानिकास्वप्निल's picture

2 May 2012 - 12:11 am | सानिकास्वप्निल

आम्ही ह्यात तुपात तळून घेतलेले जाड पोहे पण घालतो :)

अगदी. त्याने लाडू चुरचुरीत लागतो.

निवेदिता-ताई's picture

2 May 2012 - 8:32 am | निवेदिता-ताई

आमची आई करायची नेहमी, पण तुपात कणीक भाजून घेतली की थोडे कोमट असतानाच त्यात गुळ
घालायची व एकत्र मळून लाडू वळायची...छानच लागतात.

जागु's picture

2 May 2012 - 4:08 pm | जागु

मस्तच.

रामपुरी's picture

3 May 2012 - 2:14 am | रामपुरी

एका भांड्यात जूळ घेऊन
साहित्य न वाचल्याने "जूळ" चा अर्थच लागेना. :) म्हटलं हे काय नवीन. मग साहित्य वाचल्यावर कळालं जूळ म्हणजे गूळ :) :)

ज्योति प्रकाश जी, अप्रतिम पाकॄ.
एकदम मस्त लागतो हा लाडु खायला.